छोटासाच पण मस्त वृत्तांत.
खादाडीचे फोटू न टाकल्यामुळे जळजळ झाली नाही.
बाकी त्याच दिवशी ठाणे आमरस पुरी कट्टा झाला का नाही ते कळले नाही. नसेल झाला तर ठाणेकरांना डोंबिवली बहुत लांब होते की काय?
बाकी डोंबिवलीकर स्पा का आले नाहीत म्हणे?
पण झाला का नाही?
ठाणेकर किसनदेव मात्र त्या रात्री ८.३० च्या सुमारास मामलेदार मिसळीच्या लायनीत उभे होते असे आमच्या खात्रीलायक व्हॉट्स अॅप सूत्रांकडून समजते.
आता ठाणेकरही अधूनमधून पुण्याच्या वाटेवर चालतात त्याला काय करणार?
वल्ली च्या काड्यांना शीळ फाट्यावर मारलेले आहे
चाट वर सगळी चौकशी करून पण, काहीच माहित नसल्याच्या आव आणण्याच्या वल्ली च्या स्वभावाचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे. असो उगाच नाही त्यांना कासम म्हणत :D
मुळात मी कट्ट्याला नसणार हे डोंबिवलीतील सर्वांना माहित होतं , म्हणून मी मुवि काका, प्रथम आणि निम आदल्याच दिवशी भेटलेले होतो. सो फक्त डॉक्टर सुबोध खरे फक्त मला भेटले नाहीत . पण पुढील वेळेस त्यांना नक्की भेटेन .
कट्टा छानच झाला . छोटेखानी वृतांत आवडला .
बदलापूर हून येताना मध्येच रात्री बाईक ने छोटासा घोळ केल्याने जरासं मनस्ताप झाला . असो
माझा यायचा विचार होता पण २५ तारखेपासून माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी येऊ शकलो नाहि. आजच मी कामावर हजर झालो व मिपा बघत होतो. बघून आनंद झाला. बघू पुढच्या वेळी जमवु.
म्हण्जे..? तुम्ही मुंबईकर नियमीत भेटत नाही का..?
मी असे ऐकले आहे की काही पुणेकर आठवड्यातून / दोन आठवड्यातून एखादा कट्टा करतातच! नक्की माहिती / विदा नाही.
म्हण्जे..? तुम्ही मुंबईकर नियमीत भेटत नाही का..?
मी असे ऐकले आहे की काही पुणेकर आठवड्यातून / दोन आठवड्यातून एखादा कट्टा करतातच! नक्की माहिती / विदा नाही.
मोदका, काडी उत्तम टाकलेलीस.. पण मुंबईकरांनी ती छस्स करुन विझवलेली आहे.
बाकी त्याचं असं आहे ना.. की मुंबई शहर आहे अफाट आकाराचं. मुंबईची मुलुंड भांडुप अशी दोन उपनगरे घेतली तरी पुणे (मूळ) शहराचा आकार होतो. त्यात कांजूर, विक्रोळी पवई, चांदिवली मिसळले तर पुण्याचा वाढीव आकारही कव्हर होतो.
मग होतं काय ना.. की वरचेवर भेटण्यासाठी आम्हाला दीर्घ प्रवास करावा लागतो.. त्याला वेळ नाही मिळत..
पुण्यात काय? फार फार तर शनिवारातून नारायणात नायतर लक्ष्मी ते टिळक यांमधे या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलं की झाला प्रवास अन जमला कट्टा..
+११११
आणि आम्ही पुणेकर... चिंचवड, थेरगांव, बर्डव्हॅली, ट्रान्स्पोर्टनगर, तळेगांव व खेडशिवापूर (हे योजनेमध्ये आहे)येथे आठवड्यातून / दोन आठवड्यातून होणार्या कट्ट्याला जातोच जातो.
विमेकाकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. ;-)
आठवड्यातून / दोन आठवड्यातून होणार्या पुण्याच्या कट्ट्याचा वृत्तांत कधी वाचल्याचे आठवत नाही. किमान डोंबिवलीकर मिपाकरांनी माहिती देण्याचे सौजन्य तरी दाखवले हे ही नसे थोडके.
प्रतिक्रिया
छोटासाच पण मस्त वृत्तांत.
बाकी डोंबिवलीकर स्पा का आले
(No subject)
@हे कुणाचं वर्णन आहे वाटतंय
कोण हो बुवा..? कोण कोण..??
किसन देव मोड ऑन "पुणेकरांना
तुला सांगतो सुझे, याला
(No subject)
काय सांगितलं होतं ब्वॉ??
बाकी त्याच दिवशी ठाणे आमरस
ठाणे आमरस पुरी कट्टा आदल्या
झाला की नाही हे गुलदस्त्यातच.
@की मांजर आडवं गेलं कुणास
ठाणे आमरस पुरी कट्टा आदल्या
ठाणे काय नि पुणे काय.....
फक्त "ते" एकारान्त की "हे"
(No subject)
ते प्रसंगपरत्वे ....
वल्ली च्या काड्यांना शीळ
थोडं विषयांतर...
रविवारी मुक्काम पोस्ट नाना !!
कं झालाव?? चाबिना त्या
खिक्क !!
कोण आपला वल्ली..?? कासम..???
असं नाही म्हणायचं.
अरे ते अत्रुप्त बुवांना
@अरे ते अत्रुप्त बुवांना
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
नॉन व्हेज प्लैटर
छान.
शिल्पा काकूशी सहमत! सुबोध सर
वयाने प्रौढ नाहीत, पण त्यांचे
ह्यावरुन मिपावर विचारावे वाटते कि
+९९९९९९९९९९९९९९९
मी पण मी पण !!
बाकी आम्हाला वाटलं की सुबोध खरे आजोबा असतील म्हणुन...
मस्त... छोटेखानी कट्टा
माझा यायचा विचार होता पण २५
नक्की. पुढला कट्टा पावसाळी
म्हण्जे..? तुम्ही मुंबईकर
म्हण्जे..? त्या कट्ट्यांना
त्यांना कुणी कट्ट्याबद्दल
त्या कट्ट्यांना तुम्ही जात
म्हण्जे..? तुम्ही मुंबईकर
ऑ.............
मेल्या, पिंचिंकरांची मते
अगदी.
@तर उगवतीकडे लोणावळ्यापासून
+११११
पुणे कट्टा
Pagination