Welcome to misalpav.com
लेखक: नानबा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

छोटासाच पण मस्त वृत्तांत. खादाडीचे फोटू न टाकल्यामुळे जळजळ झाली नाही. बाकी त्याच दिवशी ठाणे आमरस पुरी कट्टा झाला का नाही ते कळले नाही. नसेल झाला तर ठाणेकरांना डोंबिवली बहुत लांब होते की काय? बाकी डोंबिवलीकर स्पा का आले नाहीत म्हणे?

बाकी डोंबिवलीकर स्पा का आले नाहीत म्हणे?
अहो,
आलो तर येईन पासून रात्री उशीर होईल पण नक्की येईन असं सांगून टांग देणारे वगळले,
हे कुणाचं वर्णन आहे वाटतंय तुम्हांला??

बाकी त्याच दिवशी ठाणे आमरस पुरी कट्टा झाला का नाही ते कळले नाही.
ठाणे आमरस पुरी कट्टा आदल्या दिवशी होता. रामदास काका येणार म्हणून मीही तिकडे जायचे ठरवले होते.
नसेल झाला तर ठाणेकरांना डोंबिवली बहुत लांब होते की काय?
आता ठाणेकरही अधूनमधून पुण्याच्या वाटेवर चालतात त्याला काय करणार? :))

ठाणे आमरस पुरी कट्टा आदल्या दिवशी होता. रामदास काका येणार म्हणून मीही तिकडे जायचे ठरवले होते.
झाला की नाही हे गुलदस्त्यातच.. !!??

@की मांजर आडवं गेलं कुणास ठाऊक?>> :O मांजर आडवं जाणार? आणी ते ही तो ******चा हिरव्या डोळ्यांचा बोका असतांना? ;-) अशक्य ,केवळ अशक्य! =)) @******>> शब्द सौजन्या मा.अगोबा ;-)

ठाणे आमरस पुरी कट्टा आदल्या दिवशी होता.
पण झाला का नाही? ठाणेकर किसनदेव मात्र त्या रात्री ८.३० च्या सुमारास मामलेदार मिसळीच्या लायनीत उभे होते असे आमच्या खात्रीलायक व्हॉट्स अ‍ॅप सूत्रांकडून समजते.
आता ठाणेकरही अधूनमधून पुण्याच्या वाटेवर चालतात त्याला काय करणार?
लैच. =))

वल्ली च्या काड्यांना शीळ फाट्यावर मारलेले आहे चाट वर सगळी चौकशी करून पण, काहीच माहित नसल्याच्या आव आणण्याच्या वल्ली च्या स्वभावाचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे. असो उगाच नाही त्यांना कासम म्हणत :D मुळात मी कट्ट्याला नसणार हे डोंबिवलीतील सर्वांना माहित होतं , म्हणून मी मुवि काका, प्रथम आणि निम आदल्याच दिवशी भेटलेले होतो. सो फक्त डॉक्टर सुबोध खरे फक्त मला भेटले नाहीत . पण पुढील वेळेस त्यांना नक्की भेटेन . कट्टा छानच झाला . छोटेखानी वृतांत आवडला . बदलापूर हून येताना मध्येच रात्री बाईक ने छोटासा घोळ केल्याने जरासं मनस्ताप झाला . असो

>>असो उगाच नाही त्यांना कासम म्हणत वल्लीला कासम म्हणून तू त्याच्याबद्दल गैरसमज पसरवतोयेस बरं का!! ;)

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र......... सॉरी सॉरी हां... तो वरती छूपा हा शबुद र्‍हायला =))

नॉन व्हेज प्लैटर नशीब आमच त्याचे फोटो टाकले नाहीत त्यापद्दल. अगोदरच सविस्तर (संक्षिप्त!) वृत्तांत वाचून बरीच जळजळ झाली आहे.

छान. बाकी आम्हाला वाटलं की सुबोध खरे आजोबा असतील म्हणुन...आता त्यांना सुबोध किंवा सुबोधभौ म्हणायला हरकत नै !! हरकतीवाल्यांनी आताच सांगा हो !

शिल्पा काकूशी सहमत! सुबोध सर त्यांच्या एकूण लिखानावरून,अनुभवावरून वयाने प्रौढ असतील असं वाटलं होतं पण या फोटोने ती सगळी शक्यता निकाली लागली. :)

पण डॉ. खर्‍यांच्या चेहेर्‍यावर भूत पाह्यल्यासारखे एक्स्प्रेशन्स का आहेत फोटोत?

माझा यायचा विचार होता पण २५ तारखेपासून माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी येऊ शकलो नाहि. आजच मी कामावर हजर झालो व मिपा बघत होतो. बघून आनंद झाला. बघू पुढच्या वेळी जमवु.

म्हण्जे..? तुम्ही मुंबईकर नियमीत भेटत नाही का..? मी असे ऐकले आहे की काही पुणेकर आठवड्यातून / दोन आठवड्यातून एखादा कट्टा करतातच! नक्की माहिती / विदा नाही.

त्या कट्ट्यांना तुम्ही जात नाही का..?
अगं, ते पुणेकर आहेत. विशेष निमंत्रण दिल्याशिवाय स्वतःच्या लग्नालासुद्धा जात नाहीत म्हणे. :P

म्हण्जे..? तुम्ही मुंबईकर नियमीत भेटत नाही का..? मी असे ऐकले आहे की काही पुणेकर आठवड्यातून / दोन आठवड्यातून एखादा कट्टा करतातच! नक्की माहिती / विदा नाही.
मोदका, काडी उत्तम टाकलेलीस.. पण मुंबईकरांनी ती छस्स करुन विझवलेली आहे. बाकी त्याचं असं आहे ना.. की मुंबई शहर आहे अफाट आकाराचं. मुंबईची मुलुंड भांडुप अशी दोन उपनगरे घेतली तरी पुणे (मूळ) शहराचा आकार होतो. त्यात कांजूर, विक्रोळी पवई, चांदिवली मिसळले तर पुण्याचा वाढीव आकारही कव्हर होतो. मग होतं काय ना.. की वरचेवर भेटण्यासाठी आम्हाला दीर्घ प्रवास करावा लागतो.. त्याला वेळ नाही मिळत.. पुण्यात काय? फार फार तर शनिवारातून नारायणात नायतर लक्ष्मी ते टिळक यांमधे या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलं की झाला प्रवास अन जमला कट्टा..

ऑ............. आम्ही चिंचवडला राहत असूनही कट्ट्यासाठी आठवड्यातून एकदा -दोनदा तब्बल साताठ कोसांवर असलेल्या पुण्यास जाणे होतेच की.

a अगदी. अहो मावळतीकडे कर्जतपासून पुढे हुंबै तर उगवतीकडे लोणावळ्यापासून पुढे पुणंच.

+११११ आणि आम्ही पुणेकर... चिंचवड, थेरगांव, बर्डव्हॅली, ट्रान्स्पोर्टनगर, तळेगांव व खेडशिवापूर (हे योजनेमध्ये आहे)येथे आठवड्यातून / दोन आठवड्यातून होणार्‍या कट्ट्याला जातोच जातो. विमेकाकांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत. ;-)

आठवड्यातून / दोन आठवड्यातून होणार्‍या पुण्याच्या कट्ट्याचा वृत्तांत कधी वाचल्याचे आठवत नाही. किमान डोंबिवलीकर मिपाकरांनी माहिती देण्याचे सौजन्य तरी दाखवले हे ही नसे थोडके.