Welcome to misalpav.com
लेखक: चिंतातुर जंतू | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

धक्कादायक आहे ही बातमी देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ. ह्या प्रसंगी श्रामो ह्यांचे मिपा वरील लेखन उपलब्ध करून द्यावे अशी मी विनंती करतो म्हणजे नवीन मिपाकरांना श्रामो कोण ,काय होते हे त्यांच्या लिखाणातून कळेल. आणी जुन्या मंडळी त्यांचे लेखनरुपी विचार पिंपळपान म्हणून जपू शकतील.

श्रामोंशी प्रत्यक्ष ओळख नव्हती. त्यांच्याशी खरडवहीतून किंवा व्यनितून खुप गप्पा मारल्या आहेत, असंही नाही.. पण नेहमीच एक जाणवत राहीलं, की हे रसायन वेगळं आहे. अत्यंत अभ्यासू, जाणकार आणि तरीही शिकण्यास उत्सूक असा माणूस त्यांच्या लिखाणातून, मग तो लेख असो वा प्रतिसाद, समोर येत राहीला.. अत्यंत क्लिष्ट अशी विनोदबुद्धी असलेलं हे व्यक्तिमत्व माझ्या औत्सुक्याचा विषय होता व राहील. मिपाने एक जाणकार, हुशार व्यक्तिमत्व गमावलंय, हे नक्की.. त्यांच्या मृताम्यास देव शांती देवो आणि कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती लाभो, हीच प्रार्थना..

श्रामो? अगदी हक्काने "अग अग आवर स्वतःला" अस म्हणणारेच श्रामो मला आठवताहेत. एकदा टिम म्हणुन त्यांच्या बरोबर काम केल मिपा कृपेने. हल्ली दोन दिवस सारख ध्म्याच्या खवत त्यांना पाहुन जाउन बोलावस वाटत होतं. श्रामो वी वील मिस यु!

श्रावण मोडकांची प्रत्यक्ष कधी भेट झाली नाही, थोडाफार व्यनितून व ई- मेलीतून संवाद झाला तेव्हढाच. त्यांच्या व माझ्या 'ओळ्खीची' सुरूवात येथील एका चर्चेच्या दरम्यान झाली. त्यात त्यांच्या डाव्या भूमिकेवर आडून मी काही तीर मारले. ते त्यांनी समजूतदारपणे परतवले. तेव्हा अगदी प्रकर्षाने मला जाणवले ते त्यांचे प्रगल्भ व्यकित्मत्व. वाद होऊनही, त्यात मी त्यांच्यावर थोडे शरसंधान केल्यानंतरही त्यांनी ते फारसे मनात ठेवले नाही. सामजिक प्रश्नांवरील त्यांच्या भूमिका मल नेहमीच पटत असत असे नव्हे, पण तरीही आमचा वैयक्तिक संवाद सुरू झाला. येथील अन्य काही अनुभव पहाता, हे मला अगदी लक्षणीय वाटले. त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांच्या हृदयविकाराविषयी माहिती झाली होती, त्याची तीव्रताही माझ्या लक्षात आली होती. पण चळवळीतील अगदी सक्रिय कार्यकर्ता असल्याने, ते बहुधा सदैव फिरतीवर असावेत व त्या दरम्यान पथ्यपाणी ते फारसे संभाळू शकत नसावेत असा माझा कयास होता. आमचे संबंध अगदी घनिष्ट नव्हते, तेव्हा ह्याविषयी त्यांना मी कधी काही लिहीले नाही. पण त्यांच्या प्रकृतीची चिंता मला वाटत राहिलीच. तरीही हे अगदी असे टोकासे अघटित इतक्या लवकर घडेल असे वाटले नाही. ह्यानिमीत्ताने आयुष्याची क्षणभंगूरता माझ्यापुरती पुन्हा: एकदा अधोरेखित झाली. आता ते पुढच्या प्रवासास निघून गेले आहेत. तिथे जे कष्टकरी, शेतकरी असणार, त्यांचे निशाण ते स्वतःच्या खांद्यावर घेणार. तेथील जमिनदार, सरकारी बाबू इत्यादींनी आता जपून रहावे.

विश्वासच बसत नाही. न बघता न भेटता ज्यांच्याबद्दल अत्यंत जिव्हाळा वाटतो त्यापैकी एक. पटलावर श्रामोंचं अधोलेखित नाव वाचताच एक शंका मनात चुकचुकली. शंका चूक ठरू दे आणि श्रामोंच्या कुठल्यातरी किंवा सगळ्याच गुणांबद्दल कौतुक करणारा धागा असूदे हा विचार करत धागा उघडलाझ छे! नको तेच खरे ठरले. श्रा मो आम्हा मिपावासियांच्या मनात चिरंतन जीवंत राहतील.

ऐकून अतिशय धक्का बसला. मागे तीनेक वर्षामागे एकदाच श्रामोंबरोबर भेट झाली होती. अजूनही त्यावेळेला मारलेल्या गप्पा आठवतात. भावपुर्ण श्रध्दांजलि. अभिज्ञ.

दुपारी फोन वरून ही बातमी कळली. विश्वास बसत नाही अजून या बातमीवर. ओळख धागे आणि खरडवही ह्याच्या पलीकडे केंव्हाच पोहोचली होती. अनेकदा भेटीगाठी व्हायच्या. परवाच थोडी चर्चा झाली होती छ्त्तीसगढमधील घटनेवरुन. आणि त्यांनी खरड पाठवली होती. सुन्न झालेलो आहे. शब्दच सापडत नाहीत त्यांना श्रध्दांजली व्हायला. कारण श्रामो गेले यावर अजुन विश्वासच बसत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली

श्रावण मोडक यांस मनःपूर्वक श्रद्धांजली...!!! ईश्वर त्यांच्या म्रुतात्म्यास सद्गती देवो.

मुख्य पानावर श्रावण मोडकांचे नाव अधोरेखित पाहून काहीतरी मजा असेल, कुठला तरी पुरस्कार वगैरे मिळाला असेल, म्हणून अभिनंदनाचा धागा असेल असे वाटले, पण उघडताक्षणी तीव्र धक्का बसला. प्रत्यक्ष परिचय कुठल्याच मिपाकराशी नाही पण आंतरजालावर जे कोणी लेखक उत्सुकतेने वाचावेसे वाटत, त्यात श्रावण मोडक प्रमुख होते. चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि पत्रकारही हे बाहेरून माहीत होते. लिखाणातली बांधिलकी, तळमळ आणि व्यासंग नेहमीच जाणवायचे. आंतरजाल एका प्रगल्भ विचारवंताला मुकले आहे. श्रद्धांजली.

मागेच श्रामोंचा नंबर घेतला त्यांना व्यनि करून. त्यांच्या येशाबद्दल बोलायचे होते. तसे आम्ही अनेकवेळा अनेक कट्ट्यांवर भेटत बोलत होतो पण मध्यंतरी अत्यंत काम लागल्याने थोडा जालापासून दूर होतो. पण येशा चटका लावून गेला आणि मला ते म्हटले होते येशाबद्दल सविस्तर बोलू. येशा गेलाच आणि आता श्रामोही गेले. :(
लेखक: jaypal वेळ: गुरुवार, 05/30/2013 - 15:31 Permalink

मनःपूर्वक श्रद्धांजली..! मोडक परीवाराच्या दु:खात आम्ही सगळे मिपाकर सहभागी आहोत.

श्रामोंना कधी व्यक्तीगत भेटलो नसलो तरी मिपा आणि चेपूवरून अनेकदा संवाद साधला गेला होता. अत्यंत प्रगल्भ व्यक्तीमत्व असे अचानक सोडून गेल्यामुळे खूप वाईट वाटत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली....

काय झाले हे ? काही दिग्गज हे मिपावर गृहीतच धरले होते. ते आता नाहीत ही कल्पनाच करु शकत नाही. फार वाईट वाटतंय!

साहेब, नमस्कार. कुठाय पत्ता. खरंतर मीसुद्धा गायबच आहे मिपामधून बरेच दिवस. बरेच उद्योग चाललेत. तुमच्याकडे काय विशेष? श्रावण मोडक 7/15/12 मिटवा Block रामराम देवा. मी आहे पुण्यातच. फिरतीचा अपवाद. फिरती फक्त व्यवसायासाठी. एरवी पुण्यातच. मिपावर वगैरे असतो. पण लेखन नाही काहीही सध्या तरी. तुमची लेखनकामाठी काय म्हणतेय? You 7/16/12 मिटवा भेटू एकदा निवांत. मी कदाचित मंगळवार-बुधवारी मुंबईला जाणार आहे. त्यानंतर पुण्यातच आहे. तुझं वेळापत्रक कळव. मग ठरवू. श्रावण मोडक 7/16/12 मिटवा Block कळवतो. ............................... काही कामे वेळच्या वेळी केलेलीच बरी असतात..नाही?