आज दुपारी ऑफिसात एक कंटाळवाणी मिटिंग चालू होती.कोणाचे लक्ष नाही हे बघून फोनवर जीमेल चेक केले.जीमेल ऑन करताच मराठमोळ्याचा जीटॉकवर मेसेज आला--Shravan Modak passed away.मिटिंगमध्ये जीटॉकचा आवाज झाल्यामुळे ताबडतोब लॉग आऊट करावे लागले.पण अर्थातच त्यानंतर मिटिंग कधी एकदा संपते असे झाले होते.मग मिसळपाववर लॉगिन करून ही बातमी दुर्दैवाने खरी आहे हे समजले.
श्रामोंची आणि माझी प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही.काही चर्चांमध्ये मी आणि त्यांनीही भाग घेतला होता.अण्णा हजारेंचे उपोषण जोरात चालू असताना माझा एक प्रतिसाद वाचून पुण्यात कधी येणे झाले तर जरूर भेटू अशा स्वरूपाची त्यांची खरड आली होती.पुढे एका चर्चेत माझी त्यांची कटुता आली.असे नक्की का झाले असावे हे कोडे मला शेवटपर्यंत उलगडले नाही.अनेकदा वाटे की त्यांना कधीतरी खरड करावी, कधी फोन करावा, जमल्यास प्रत्यक्ष भेटावे आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा करावा.पण ते कधी झालेच नाही.एक तर माझी pride मला तसे करण्यापासून परावृत्त करत होती आणि दुसरे म्हणजे "इतकी वर्षे पडली आहेत मग आताच कशाला"--कधीतरी कुठेतरी कट्ट्यावर किंवा इतरत्र भेटू तेव्हा बोलू अशा स्वरूपाची धारणा!! पण आज जाणवले की आता मात्र शाश्वत चुकामुक झाली :(
श्रामोंना श्रध्दांजली. Rest in peace.
काय बोलाव? अशी लोक लवकर का जातात? वैचारिक एकटे पण? वेगळ्या विचारान मुळे आलेल सामाजिक एकांत? का? का? वेगळ असण्याची एवढी मोठी किंमत? भीती वाटत आहे वेगळ असण्याची.
श्रामोंची पहिली भेट पॅराडाईजला झाली. आपल्या खास शैलीत त्यांनी ताबडतोब आपलं करून घेतलं होतं. पुढे आंतरजालावरची ओळख मागे पडून प्रत्यक्ष संबंध जास्त आला. पॅरेडाईज, डेक्कन वरील पुनम, सारसबागेजवळील कल्पना किंवा विश्व ही भेटायची ठिकाणं. अनेकदा श्रामोंशी चर्चा व्हायची. केवळ मिपाच नाही तर प्रत्यक्ष जीवनातील अडचणीसुध्दा त्यांच्या सोबत शेअर केल्या आहेत.
माझा मित्र नाही तर मार्गदर्शकच आज हरवलाय. अतिशय वाईट वेळी श्रामो सोडून गेलेत. अतिशय वाईट वेगात निघून गेले आहेत. अतिशय वाईट झालं. श्रामो तुम्ही कायम आठवणीत राहाल. मिपा तर्फे आणि मी व्यक्तिगत सुध्दा तुम्हाला श्रध्दांजली देतोय.
- नीलकांत
सरांबरोबर दिड वर्ष काम केले. खुपच जवळुन त्याना काम करताना बगीतले आहे, माझा पहीली नोकरी असल्यामुळे सरानी मला एक खुपच मदत केली. त्याची विचार करव्याची पध्दत खुपच विलशण होती. मिपा च्या गमती जमती खुप वेळा सांगीतले आहेत. संगीताची पण खुप आवड होती त्याना. "कसबा बोलला" असे नेहमी मला म्हण्यायचे कारण मी कसबा पेठ मधे राहतो. ८ ८ तास त्याचा शेजारी बसुन काम केले आहे.
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच प्रभूचरणी प्रार्थना!
श्रावण मोडक या दिलदार मित्राला त्यांच्या सहकारयाने वाहिलेली श्रद्धांजली
http://berkyanarad.blogspot.in/2013/05/blog-post_30.html?spref=fb
श्रामो,
तुम्हारी सोच, तुम्हारी लगन , तुम्हारा जज्बा ...
लम्हा ,लम्हा तुम मिल रहे हों हमें.. तुम्हारे पुराने आर्टिकल्स के जरिए ..
शायद एक बार रुबरु भी मिल जातें.
लेकीन वक्तको यह मंजुर न था
इसलिए शायद इस तरह मिल रहे हो ...
जिस तरह सुखे हुए फुल किताबों मे मिलें :-(
श्रामोंची एक व्यक्ती व पत्रकार म्हणून मिपा वर ओळख असल्यामुळे आणखी चुटपुट लागली. श्रा मोंचा कौटुंबिक परिवार काय होता यावर प्रकाश टाकता आला तर आवडेल. त्यांना सांत्वना पत्र पाठवायला सोपे जाईल.
भावपुर्ण श्रद्धांजली!!
काहि दिवसांनी मिपावर आलो आणि ही दु:खद बातमी मिळाली :(
व्यक्तिशः श्रामोंशी परिचय नाही पण मिपासदस्य आणि वाचक म्हणून अतिशय घनिष्ठ संबंध. मिपाच्या जुन्या आणि सुरवातीच्या काळापासूनचे एक अग्रणी आणि सतत लिहीत असणारे सदस्य म्हणून त्यांना ओळखतो.
[अवांतर : हे काय चालंलय ? जेमतेम काही काळ जात नाहीय तर मिपावरील एक आणखी पत्रकार/ले़खक कायमचं गमन करतोय? मिपावर राग की आमच्यासारख्या वाचन मात्र असणार्या सदस्यांवर हा राग ? ]
प्रतिक्रिया
भावपूर्ण श्रद्धांजली..
शाश्वत चुकामुक
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
काय बोलाव? अशी लोक लवकर का
धक्कादायक.
श्रावण मोडकांना श्रद्धांजली.
श्रद्धांजली..
वाईट झालं
श्रावण मोडक यांना आदरांजली.
.
भेटायचे राहून गेले
सर
श्रद्धांजली.
त्यांच्या आत्म्याला शांती
उगा ..
!
दु:खद बातमी
नम्र श्रद्धांजली..
अरेरे !
श्रद्धांजली
श्रा मो ना भावपुर्ण अदरांजली.
श्रावण मोडक यांना भावपूर्ण
श्रावण मोडक यांना भावपूर्ण
श्रामो ना भावपुर्ण
धक्कादायक
तुम्हारी सोच.. तुम्हारी लगन .. तुम्हारे जज्बेको सलाम !!
माशाल्ला...!
डाव्या विचाराचे ?
मनःपूर्वक श्रद्धांजली..!
श्रावण मोडक यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रावण दा याना भावपूर्ण
श्रामो यांना भावपूर्ण
धक्कादायक
अत्यंत धक्कादायक आणि दु:खद...
श्रद्धांजली
धक्कादायक व दुःखद बातमी.
खूप वाईट वाटले.
फारच वाईट बातमी...
श्रावण मोडक साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
सांत्वना पत्र
अभिजीत पोहणकराचा अल्बम
भावपुर्ण
Pagination