माफ करा. पण हे विनोद म्हणून नाही टंकलेले. हां, आमच्या मूर्खपणाला हसत असाल तर गोष्ट वेगळी. पण कमीत कमी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने (हे वाचून) एका माणसाचा जरी फायदा झाला तरी, याच साठी केला होता अट्टाहास हि आमची भावना सार्थ होईल.
सचिन साहेब
आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. रिक्षाने जाताना कमीत कमी भाडे १५ रुपये असताना वीस रुपये घेतले तर ते परवडत नाही म्हणून नाही तर फसवले गेलो याची भावना जास्त क्लेशदायी आहे. अशा तर्हेने ग्राहक जागृती झाली तरच अशा गैर प्रकाराला आला बसेल. आपण मगनलाल चिक्की वाले यांना पत्र लिहून हि भावना जरूर कळवावी. अगदी काहीच झाले नाही तरी मनाचे समाधान होईल. आपण पडत असताना हसणे हा काही लोकांचा स्थायी भाव आहे त्याकडे दुर्लक्ष करणे आणि आपले चांगले काम चालू ठेवणे.
मला काय म्हणायचे आहे ते आपल्याला exactly समजले आणि इतरानाही ते समजतेय. पत्राचे म्हणाल तर pack वर त्यांचा batch number आणि email id आहे. आपण सुचविल्याप्रमाणे त्यांना email करतो.
कदाचित फसवणुक टळली असती. अॅसोर्टेड ड्रायफ्रुट हे संदिग्ध नाव आहे. अॅसोर्टेड म्हणजे मिश्र तेव्हा इथे साळसूदपणे ड्रायप्फ्रुटसहीत मिश्र चिकी. फक्त ड्रायफ्रुट चिकी म्हणजे त्यात अन्य काही नसावे. जर शंका आली तर विक्रेत्याला स्पष्ट विचारावे, नको तिथे भिड बाळगु नये.
आय एस आय पी विषयी ऐकले आहात काय? ही अशीच एक लबाड संज्ञा आहे. पी म्हणजे 'परफोर्मन्स' म्हणजे आय एस आय निकषांनुसार पण सगळ्याच कसोट्यांवर उतरेल असे नाही.
कुठलीही गोष्ट गृहित धरणे चुकीचे आहे.जगात सज्जन आहेत तसे लुच्चे आहेत. फसवणुक होणार असे समजुन काळजी घेतली तर ती होण्याची शक्यता कमी आहे.
सर्वसाक्षीजी, Assorted Chikki नावाचे पण एक pack १०० रुपयांना होते. ज्यामध्ये साधारण शेंगदाणा,खोबरा,तीळ,ईत्यादी चिक्क्या मिक्स अस्तात. Assorted Dryfruit म्हणजे ज्या चिक्क्या बदाम,काजू,mixed dryfruit अश्या वेगवेगळ्या मिळतात त्या mix असायला हव्या होत्या.बाकी ((कुठलीही गोष्ट गृहित धरणे चुकीचे आहे.जगात सज्जन आहेत तसे लुच्चे आहेत. फसवणुक होणार असे समजुन काळजी घेतली तर ती होण्याची शक्साथीसात्।आहे). यासाठी +१. धन्यवाद.
चांगले पाव किलो काजू घ्यावेत . पाव किलो पिस्ते.पाव किलो सुके अंजीर . सगळ्याचे साधारण भरड चूर्णे करावे त्यात एक चमचा शेण टाकावे मग लाडू घट्ट वळावेत.
हे शेणाचे लाडू फार चविष्ट लागतात.
सचिन , आपल्याला मिळालेली रूपये १७५ ची अॅसॉर्टेड डायफ्रूट चिक्की मी दिलेल्या कृतीच्या नेमकी उलट आहे.
शेणाचे लाडू काय किंवा तुम्ही खरेदी केलेला माल काय वकिलाला विचारून केला असल्यास त्यावर आपले म्हणणे काय आहे भौ ?
दक्षिण गोव्यातील बाणावलीच्या (Benaulim) शॉपिंग सेंटरमधील एका दुकानातून काजूच्या चिकीचा पाव किलोचा डबा घेतला होता. डबा गोलाकार होता आणि अनेक चिकटपट्ट्या लावून तो चांगलाच सील केलेला होता आणि डब्याच्या मध्यभागी एक स्टिकर लावला होता.पर्यटक गोव्याला येतात आणि बरोबर घेतलेला खाऊ गोव्यात असतानाच खात नाहीत तर तो घरी गेल्यावर खातात हे त्या दुकानदाराला चांगले माहिती असावे.डबा फोडल्यावर लक्षात आले की त्या डब्याच्या मध्यभागी एक कार्डबोर्ड गोल करून ठेवला होता आणि त्या भागात हवा सोडून काहीही नव्हते.वर चिकटवलेला स्टिकर आणि चांगलाच सील केलेला डबा यामुळे ते लक्षात येणेही शक्य नव्हते.घरी आल्यावर त्या डब्याचे वजन केले.त्या डब्याचे वजन निघाले १९० ग्रॅम.अशीही फसवणुक दुकानदार करतात आणि ते आपल्या लक्षातही येणे शक्य नसते.
हे वाक्य माझ्या प्रतिसादाला उद्देशून आहे की नाही हे नक्की नाही पण मला उद्देशून असेल तर त्याचे उत्तर नाही असे आहे.शेवटी ६० ग्रॅम काजूच्या चिक्कीसाठी मी परत बाणावलीला जाणार नव्हतो.आणि ६० ग्रॅम चिकी कमी आली म्हणजे समजा ५०-६० रूपयाचे नुकसान झाले असे समजू (नक्की आकडा मलाही आठवत नाही).आता ही रक्कम जीवाचा संताप संताप होऊन स्वतःलाच त्रास करून घेण्याइतकी मोठी नक्कीच नाही.असे अनाठायी नुकसान झाले की माझा एक उपाय असतो--नेहमी एखाद्या ठिकाणी रिक्षाने जात असेन तर थोडे लवकर निघून एखाद्या वेळी बसने जावे.म्हणजे कसे तेवढे पैसे वाचतात आणि भरपाई होते.संताप संताप करून स्वतःचे ब्लड प्रेशर वाढविण्यापेक्षा हा उपाय मला चांगला वाटतो.
रस्त्याकडची हॉटेल्स ही कमिशनची असतात . नागोठाण्या जवळच्या एका हॉटेलात पाण्याची बॉटलचे पंचवीस रु( त्यावेळी इतर ठिकाणी बारा रु मिळणारी) घेतले म्हणून एका गिऱ्हाईकाने खटला दाखल केला होता .हॉटेलवाल्याने मुद्दा मांडला की आम्ही एम आर पि प्रमाणे पंचवीस घेतले . केस अजून चालू आहे (तीस वर्षेही चालेल).हॉटेलातल्या प्रत्येक बॉटलवर "स्पेशली पैक्ड फॉर ' हॉटेलचे नाव' आणि किँमत २५ "असे छापून ठेवलेले .पाणी काय स्विझलैंडचे आणतात काय ? (२) आमच्या एक ओळखीचे टुरतर्फे हिमाचल मध्ये कुलु मनालीला गेले होते .आदल्या दिवशीच्या जेवणाने बऱ्याचजणांचे पोट बिघडले म्हणून मेन्यू ऐवजी खिचडि आणि सफरचंद मागवले .तर वेगळे बिल द्यावे लागले चारशे रुपयाचे त्यात एका सफरचंदाचे ( हिमाचल मधल्याच) 'अॅसॉर्टेड फ्रूट' धरून शंभर रुपये घेतलेले .
हे हॉटेल रस्त्यावरचे म्हणजे विठ्ठल कामत यांचे आहे आणि इतर ढाबे जिथे मदिरापान चालते त्यापेक्षा बरे म्हणून आम्ही कामत निवडले आणि मुख्य म्हणजे हे मगनलालचे दुकान फक्त spot वापरून उभारलेले वाटले.म्हणजे जागेचे भाडे वैगेरे देऊन. ते actually कामतांचे नसावे.
धागा लेखकाच्या भावनांशी सहमत आहे. पण दुर्दैवाने असे प्रसंग भारतात अनेक ठि़काणी अनेक वेळा येतात. कुठे कुठे भांडत बसणार? आपल्यालाच त्रास, मनस्ताप होतो. शांत राहावे. पुढच्या वेळी वेगळा मार्ग चोखाळावा.
'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' हा हेतू आवडला, चांगलाच आहे. मी नक्की काळजी घेईन.
अनुभव वाटून घेतल्याबद्दल धन्यवाद.
आणि एक आमचा अनुभव .२००६ जानेवारीत दिल्लीहून आगऱ्याला बसने जातांना दुपारी एका मोठ्या धाब्यावर बस जेवणासाठी थांबली .बऱ्याच बस उभ्या होत्या ( तसा अलिखित नियमच हर्याणातील एका मोठ्या मंत्र्याचा आहे हे नंतर कळले ) . मोठ्या फळ्यावर लिहिलेल्या पदार्थांच्या यादीत सर्वात स्वस्त ' मूलि का पराठा ' पंचाहत्तर रुपये होता .( इतर ठिकाणी पंधरा रुपयात मिळणारा). आमच्याकडे काही खायला बरोबर घेतलेले म्हणून वाचलो .
ढाबावाले सटासट लुटतात. इडली चटणीतील चटणी खराब झालेली,बटाटावड्यातली भाजी खराब झालेली (डबल, टिबल charges घेऊन) हे तर सर्रास असते. काही(च) सन्माननीय अपवाद तर सर्वत्र हेच चित्र. :(
पेठकर काका, तुम्ही या हो परत भारतात. तुमच्या सारख्या व्यवसाय पुरुषोत्तमाची इथे (हायवेवर) नितांत गरज आहे .
हॉटेलवाल्यांच्या नजरेतून आम्ही :लोणावळ्यातील एक किस्सा .मी ,सौ आणि मुलगी नोव्हेंबर मध्ये टायगरर्स लीप ला जाणाऱ्या बसला अवकाश होता म्हणून कोपऱ्यावरच्या 'कुमार प्लाझा'त बसलो .सैनविच आणि कॉफी घेतल्यावर वेटरने बिल छापून आणले फक्त सैनविचचे आणि २ कॉफीचे मला एवढे वेगळे ७०रु द्या असे बोलला .आमच्या अवतारावरून आणि चेहऱ्यावरून ' हे गिऱ्हाईक टीप देण्यात कंजूस असणार ' हे वेटरने ओळखले असावे . शेजारच्या टेबलवर एका महागड्या गाडीतून आलेले जोडपे बसलेले होते .बिल आनंदी चेहेऱ्याने चुकते करून आम्ही डेपोतल्या भांबुर्डेला जाणाऱ्या लाल बसमध्ये स्थानापन्न झालो .यथावकाश टायगर्स लीपला पोहोचलो . इकडे बऱ्याच कार ( मारुति ८०० मॉडेल सोडून)उभ्या होत्या . थोडा वेळ हवा खात गप्पा मारल्यावर एका ४०९ट्रकमधल्याकडे चहाची ऑर्डर देतांना 'पुढची लोणावळा बस कधि ?'मराठीत विचारले . लगेच त्याने 'अरे यांना एक पेशल चहा दे ,यांचे पाच रुपयेच घे आपले गाववाले हैत 'असे आत सांगितले .(बाकीच्यांकडून दहा घेत होता).परत कोयना गाडीने येतांना गाडीतल्या बेसिन वरच्या आरशात मी केस सारखे करायच्या निमित्ताने दोनदा चेहरा पाहून घेतला .
साहेब आपले मुद्दे मान्य आहेत पण येथे एक महत्वाचा फरक असा आहे कि श्री कुलकर्णी साहेबांनी चिक्की मगनलाल या ब्रान्ड ची घेतली होती कोण्या सामान्य दुकानदाराची नव्हती. अशा लोकप्रिय ब्रान्ड कडून अशी अपेक्षा नसते म्हणूनच त्यांना पत्र लिहा अशी सूचना मी केली. उद्या टाटा ने विकलेले एखादे उत्पादन खराब निघाले तर? आपण ते टाटाचे म्हणून त्यावर विश्वास टाकलेला असतो त्यामुळे हे विश्वासघाताचे पण दुख्ख असते.सामान्य दुकानदार याला ब्रान्ड लॉयल्टी वगैरे चे घेणे देणे नसते.
@सुबोध खरे ,(१)खोटा माल विकणारे लेबल लिहितांना फारच खबरदारी घेतात .त्या चिक्कीच्या पुड्यावर 'मगनलाल' हे नाव नसून 'मघनलाल /मधनलाल 'नाहितर दुसरेही असेल आणि दुकानावर फक्त जाहिरात असेल .लोणावळयातही असेच आहे त्यामुळे बरेचजण नैशनलची घेतात .अॅसॉर्टेडला(मिक्सट् नव्हे) जास्त भाव आणि व्हैटही लावतात . (२)मागे काही वर्षांपूर्वी मी डोंबिवलीत मशिनरीचे तेल विकणाऱ्या दुकानात घडयाळ रिपेरिँगसाठी पातळ असे तेल घ्यायला गेलो तर दुकानदाराने प्रामाणिकपणे विचारले 'तुम्हाला कशाला पाहिजे ?हे आमच्याकडून वाणीलोक गोडेतेलात मिसळायला नेतात'! .विशेष म्हणजे असे गोडेतेल विकल्यास भेसळीचा/फसवणूकीचा गुन्हा ठरत नाही कारण गिऱ्हाइकाला 'शेंगदाणातेल' म्हणून नाही विकत असे एका वाण्यानेच सांगितले .
चिक्कीच्या पुड्यावर मगनलालच नाव आहे. दुकानाचे नाव पण तेच आहे. एवढेच नव्हे तर या पुड्यावर Manufactured and Marketed by Maganlal हे छापलेले आहे. त्यावर batch number आणि त्यांचा email id आहे. माझ्या बाकी मित्रांनी हे पण कन्फर्म केले कि मगनलाल, लोणावळा मध्ये असे असे प्रकार होतात. बाकी मी नाव नीट न बघता पोस्ट टाकली असेल, ह्या निष्कर्षाने मलातरी धक्का बसला.
त्यांनी असॉर्टेड ड्राय फ्रुट्स म्हंटले आहे. असॉर्टेड हा शब्द निसरडा आहे. तसेच सुकं खोबरं हे ही ड्राय फ्रुटच आहे. त्यामुळे टेक्निकली त्यांचे फारसे चुकले नाही. पॅकेजींग वरती असॉर्टेड म्हणजे नक्की कोण कोणते ह्याचा खुलासा केला आहे का बघा. असॉर्टेड चॉकलेट्स, असॉर्टेड मिठाई, असॉर्टेड चिक्की असे लिहिले असले की मी आधी त्यात नक्की काय काय आहे त्याची खात्री करुन घेतो.
मामासाहेब, परत एकदा सांगतो. Assorted Chikki नावाचे पण एक pack १०० रुपयांना होते. ज्यामध्ये साधारण शेंगदाणा,खोबरा,तीळ,ईत्यादी चिक्क्या मिक्स अस्तात. Assorted Dryfruit म्हणजे ज्या चिक्क्या बदाम,काजू,mixed dryfruit अश्या वेगवेगळ्या मिळतात त्या mix असायला हव्या होत्या.आणि त्या लोणावळ्यात तशाच मिळतात.
या हॉटेलात विठ्ठल वडा पहिल्यांदा खाल्ला. कचोरीत ज्याप्रमाणे विविध चटण्या, दही आणि शेव टाकतात तसाच प्रकार बटाटा वडा फोडून केला होता. मला नाही आवडला हा प्रकार पण माझ्या बाकी मित्रांना आवडला…
हा अनुभव येथे मांडून सावध केल्याबद्दल धन्यवाद.
शेंगदाणा चिक्कीखेरीज इतर प्रकारची चिक्की एक दोनदाच खाऊन पाहिली पण शेंगदाणा चिक्कीची मजा त्यात न वाटल्याने पुन्हा विकत घेतली नाही. सदर प्रकारावरच्या आक्षेपावर सहमत.
इथे एक जाहिरात डकवतोय. ती पाहताच काय वाटते ते सांगा...
या कार्यक्रमातील काही कलाकारांचाच स्व.आर डी बर्मन यांच्या गाण्यांवर आधारीत कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी झाला होता. तेव्हाही अशीच जाहिरात होती पण आर डी बर्मन या जगात नसल्यामुळे कुणालाही चुकीचा संदेश जाण्याचा प्रश्नच नव्हता.
वरील कार्यक्रमाची तिकिटे नेहमीपेक्षा बरीच महाग होती. मी तिकिटे खरेदी करायला गेलो असताना मुख्य आयोजकाने मला प्रश्न विचारला की मराठी मंडळी फार कमी संख्येने तिकिटे खरेदी करताहेत, असे का? मी उत्तर दिले की ही जाहिरात चुकीचा संदेश देणारी आहे. जाहिरात प्रथम पाहता मला अत्यंत आनंद झाला होता की गुलझार यांना प्रथमच पाहण्याची, ऐकण्याची संधी मिळेल, तिकिट खरेदीला जाण्यापूर्वी जाहिरात नीट वाचल्यावर कळले की गुलझार स्वतः उपस्थित असणार नाही. जर मला ही जाहिरात प्रसिद्ध करावी लागली असती तर मी अतिशय स्पष्टपणे उल्लेख केला असता की या कार्यक्रमाला गुलझार उपस्थित राहणार नाहीत.
यावर तो माणूस फारच चिडला, आम्ही हे काम नफ्यासाठी करत नाही आहोत, कॅन्सरवर संशोधनासाठी निधी देण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. सार्वजनिक कार्यात असणार्या कुणाकडूनही असे उत्तर मी आजवर ऐकले नव्हते.
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी इतर प्रेक्षकांच्या तोंडूनही सदर जाहिरातीबाबत अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. मध्यांतराच्या वेळी (वर भेटलेल्या) आयोजकाने छोटेखानी भाषण केले त्यात १००% तिकिटे न खपूनही आम्ही जितका निधी दान देणार होतो तितकाच देतोय असे सांगितले. त्याने दानाची जी रक्कम सांगितली ती फारच किरकोळ होती.
निमंत्रण पत्रिका नीट वाचली नाहि तर कार्यक्रम हा गुलजार यांचाच आहे असे भासण्याची शक्यता आहे. अगदिच टिपीकल "फाईन प्रिंट" चा प्रकार नसला तरी हेतु साधारण तसाच दिसतो आहे!
एकंदर काय की रोज आपण वेगवेगळी गिऱ्हाइके फसतोय पण फायदा मात्र रोज एकाचाच होतोय . शिवाय काही 'ब्वॉक' ठिकाणी पैसे फेकणारं इतकं 'झ्याक पब्लिक' येतंय की माझ्यासारख्या चिलटाने इथे आवाज उठवून काय होणार असा प्रत्येकजण विचार करतो . दुसरा एक जबरी झटका गोवा रोडवरच्या हॉटेलांना बसला जनशताब्दि गाडी सुरू झाल्यावर .सकाळी मुंबईतून निघालेला आरामात जेवायला गोव्यात पोहोचू लागला .अथवा कारवाले पुणे बेळगावकडून जाऊ लागले .मग थोड्या प्रवाशांकडून जास्ती पैसे उकळण्याचे हे प्रकार वाढले .
अत्यंत संतापजनक आहे हे.
मला एकदा ह्यापेक्षा वाईट अनुभव आलेला आहे. इराक मह्द्ये मला 'शेंगदाणा तेल' म्हणून 'क्रूड ऑईल' दिले गेले. पण मी गप्प बसणार्यातला नव्हतो. अमेरिकेच्या मदतीने मी त्यांना चांगलाच धडा शिकवला.
फालतू जेवण! त्यापेक्षा मुंबई-गोवा हायवेवर महाड्ला सीमा गार्डन आहे. फक्त तिथेच बरं असतं जेवण! अर्थात फॅमिली बरोबर रात्री जरा प्रॉब्लेम वाटतो. बार आहे. आणि एक, महाड्च्या हॉटेल विसाव्याच्या पुढचा रत्नागिरीकडे येतानाचा टोल बंद झालेला आहे. अजूनही गाड्या अडवल्या जातात. टोल मला वाट्तं पाच आहे. त्यामुळे सहज दिला जातो. तो देऊ नका. हे आम्ही जाता येता बरोबरच्या गाड्याना सांगतो. आता इथे मुद्दाम सांगते.
कुडाळला त्यांचे एक हॉटेल आहे. आम्ही नाव बघून मुद्दाम गेलो तर थंड इडल्या, आमटीच्या चवीचं सांबार आणि एका कपाला ४ चमचे साखर घातलेला चहा. (तेही साखर कमी घाल असे सांगितल्यानंतर दिलेला!)पूर्ण पश्चात्ताप पावून बाहेर पडलो. बरं दर काही कमी नव्हते. पण त्यापेक्षा हायवेवरच्या टपरीवर जास्त चांगला चहा मिळतो.
ही हॉटेल्स बहुतेक फ्रँचाईसी आहेत. पण त्यांचं नाव खराब होतंय हे त्यांना माहित नाही.
प्रतिक्रिया
आम्ही चिक्क्या फक्त
हाहाहाहा
समजले नाही..
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
धन्यवाद खरेसाहेब
आपण हे जरुर कराच,
सुचविल्याप्रमाणे त्यांना email करतो.
नक्की..
ठ्यांकु....
नाव नीट वाचलं असत्त तर
Assorted चिक्की असे दुसर्या नावाचे
शेणाचे लाडू
ह्या सगळ्या चिक्क्या
आमचीही एक छोटी फसवणुक
OMG
वरील प्रतिसाद क्लिंटनजीना उद्देशून आहे.
नाही
रस्त्याकडची हॉटेल्स ही
हॉटेल..
तुम्हांस ठेच, मी शहाणा.
धन्यवाद
आणि एक आमचा अनुभव .२००६
ह्म्म
हॉटेलवाल्यांच्या नजरेतून
लोल..
याला म्हणतात कस्टमर प्रोफायलींग...
आणि मार्केट सेगमेंटेशन!
@ कंजूस ,क्लिंटन ,सर्वसाक्षी -
आठवण
अगदी अगदी...मनातलं बोल्लात !
@सुबोध खरे ,(१)खोटा माल
मगनलाल
त्यांनी असॉर्टेड ड्राय
Assorted Dryfruit आणि Assorted चिक्की
अहो ते म्हणतायत खोबरं हे पण
एक अवांतर
धन्यवाद
कार्यक्रम
अर्थात जाहिरात पूर्ण वाचूनच हे समजतेय
बरोबर
हम्म!
एकंदर काय की रोज आपण वेगवेगळी
हम्म्म
उद्दाम परासेन अशी स्वाक्षरी
लाईक
हा हा हा
अहो त्या कामतांकडे जाऊच नका!
धन्यवाद
विट्ठल कामत ब्रँड
स्वतः
Pagination