Welcome to misalpav.com
लेखक: चाफा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मी येथे प्रतिसाद टाकला होता, कोठे गेला? आता पुन्हा लिहायला आठवतपण नाही आहे. फार गहन अन थरारक आहे लिखाण. अतिशय आवडल.

रोचक कथासूत्र आहे. पॅरेलल युनिव्हर्सवर बहुधा नारळीकरांची कथा वाचली होती. तिची आठवण झाली. आता नाव आठवत नाही. "पानिपतात सदाशिवरावभाऊ पडले नसते तर" असा कॅटेस्ट्रॉफिक इव्हेन्ट घेऊन पॅरेलल युनिव्हर्स तयार केलेली आणखीही एक कथा त्यांचीच आहे. या कथेत मात्र, तो त्या जगातून / व्हॅक्यूममधून / मितीमधून परत कसा आला हे समजत नाही. तिकडे जाताना इजेक्शन सीटचा इफेक्ट इमॅजिन करता येईल, पण परतीचं काय? निव्वळ तात्विकदृष्ट्या असं काहीतरी असणं अशक्य नाही, त्यामुळे वाचताना मजा आली. पण या परिवर्तनात शरीराची सध्याची यंत्रणा कोलॅप्स होऊन मनुष्य मरेल अशी जास्त शक्यता आहे.

गवि, एकदम अचुक टिपलंत मलाही परतीचे मार्ग बंद होते म्हणूनच `वार्‍यावादळाला तोंड देता देता दिशाहीन अवस्थेत कुठेतरी भरकटण्याचा कितवा दिवस होता कोण जाणे ? कित्येकदा या समुद्रात उडी मारून आयुष्य संपवायची इच्छा झालेली खरी, पण सावरलं स्वत:ला. अन्न संपलेलं पाणी संपलेलं कित्येकदा ग्लानी येऊन मी तराफ्यावर पडून असायचो.' हा पॅरा टाकला. :) आणि निव्वळ तात्विकदृष्ट्या असं काहीतरी असणं अशक्य नाही इथे शक्य नाही असं आहे का ?

अशक्य नाही म्हणजे शक्य आहे. प्रॅक्टिकली या क्षणी नाही पण इमॅजिन करणेबल आहे. म्हणून तात्विकद्रुष्ट्या असे म्हटले. टाईम ट्रॅव्हल सारखे.

आवडली कथा. तुमच्या सगळ्याच कथा खुप छान,हटके,भन्नाट असतात. वाचताना आपण प्रत्यक्षात तिथे आहोत असे वाटते.

आणि चाफ्या परतुनि आला. :) नेहमी नेहमी कौतुकाची तीच ती वाक्यं लिहून आता मलाच टंकाळा आलाय बे. तू लिहित रहा, मी वाचत राहीन. :)