Welcome to misalpav.com
लेखक: सोत्रि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एकच वादा... रॉजर दादा !!!
+१ -(विम्बल्डनप्रेमी) सोकाजी

नदाल हरल्याने काय आनंद झाला सांगु...... कुठे गेले नदालचे चाहते कोणास ठाऊक ? बाकी, सोत्रीशेठ धागा काढल्याबद्दल खूप खूप आभार. -दिलीप बिरुटे

राफा हरल्याने आनंद ? कोणीतरी जिंकले असते तर आनंद ठीक आहे ..पण हरल्याबद्दल आनंद ? या वर्षी राफा ग्रास कोर्ट वर फार खेळला नव्ह्ता..आणि पूर्ण फिट नाहिये..

ते कळण्यासाठी तुम्हाला फेडेरर-राफा खुन्नस माहीत पायजेल. कुठलाही आडपडदा न बाळगता मी असे जाहीर करतो की राफा हारल्याने मला अत्याधिक आनंद झाला आहे. एकच वादा रोजर दादा आहेच.

सरळ सरळ सांगा की राफा पुढे आला असता तर फेडररची फेफे उडाली असती.. सुंठेवाचून खोकला गेला म्हणून खुश..कारण मॅच झाली असती तर रॉजरदादाचा वय आणि दम बघता लैच वाईट अवस्था झाली असती ..

त्यासाठी पुढ याव लागत हो. जेनवा राफा पहिला राउंड क्रॉस करेल तेन्वा या चर्चा करायला. राफा ला बहुतेक पात्रता फेरी खेळावी लागेल पुढच्या वर्षी हे हे आणि रोजर दादा या वयात पण पहिल्या राउंड ला आउट होत नाहीत

रोजर दादा या वयात पण पहिल्या राउंड ला आउट होत नाहीत
टाळ्या टाळ्या टाळ्या -(खुन्नस असलेला) सोकाजी

दुसर्‍या राउंडात पडलेच ना बाहेर .. म्हातारा घोडा पळून पळून पळणार किती ? राफा फ्रेंच ओपन मधे तरी इतका ढासळत नाही

फेडेरर-राफा खुन्नस माहीत पायजेल.
खुन्नस मॅच होउन जिंकण्यासाठी लढण्यात असते .. दुसरा हारला म्हणून आनंद मानण्यात नसते .. असो रॉजर च्या फॅन ना काय माहीत खुन्नस काय असते ते !!

राफा हरल्यामुळे एक बर झालं, आता ती ट्रॉफी, टॉफी सारखी खातानाची पोझ दिलेला फोटो येणार नाही ह्यावर्षी! एकदम फालतु फोटो असतो तो! (हे.आ.मा.म.) आणि प्रत्येक स्पर्धा जिंकल्यावर तो आपली तीच पोझ देतो!

मी एक भारतीय असूनही मला 'क्रिकेट पेक्षा टेनिसच जास्त आवडते' असे म्हणण्याचे धाडस येथे करतो (अर्थात कुठल्याही खेळाची तुलना करणे अयोग्यच, पण माझं आपलं हे मत). नुकतीच फ्रेंच ओपन संपून त्याची नशा उतरत नाही तर 'विम्बल्डन' सुरु झाले... व्वा... मज्जा येणार... :) नदाल हरल्याने एक वाईट वाटले की आता तसे 'अटीतटीचे', 'खिळवून' ठेवणारे सामने पहायला मिळणार नाही. पण मग लक्षात आलं की आता 'नोवॅक', ' मरे' हे लोक ही काही कमी झुंज देत नाहीत... त्यांचे सामनेही खेळाचा आनंद देणारे असतात.... :) 'अ‍ॅन्डी मरे' जिंकावा ह्यावेळी ह्या सदिच्छा...

महिला एकेरीतला नुकताच संपलेला एक सामना लॉरा रॉब्सन विरुद्ध मारिया किरिलेन्को. हा सामना लॉरा रॉब्सनने सरळ २ सेट मध्ये ६-३ आणी ६-४ असा जिंकला. मॅचमध्ये थरार किंचीत होता कारण लॉरा रॉब्सनचा पूर्ण कंट्रोल मॅचभर होता. महिला टेनीसमध्येही एस(बिनतोड सर्व्हिस)चा सढळ वापर जरा चकित करुन गेला.
लॉरा रॉब्सन मारिया किरिलेन्को
Laura maria

पुरुष एकेरीतला चालू असलेला एक सामना रिचर्ड गॅस्केट विरुद्ध मार्शल ग्रॅनोलर्स. गॅस्केट याने पहिला सेट 6-7 सात असा गमावला असला तरीही पुढ्चे दोन सेट 6-4 आणि 7-5 असे जिंकून सामन्यावर पकड मजबूत केली आहे. आत्तच त्याने तिसरा सेट 6-4 असा जिंकून सामना खिशात टाकला आहे.
रिचर्ड गॅस्केट मार्शल ग्रॅनोलर्स
प्राथमिक फेरीतले सामने बघण्यातली मजा खेळाबरोबरच देशविदेशातल्या खेळाडूंची वेगवेगळी नावे ऐकणे आणि वाचण्यातही खुप आहे. मला तर त्यात खुपच मज्जा येते :)

सोत्रि अण्णा, फोटो टाकून मजा आणताय! नावांबद्दल सहमत. कधी कधी असे कोपर्‍यातले खेळाडू भयंकर चुरशीने लढतात. त्यात हा गॅस्केट पाहून कूकरची गास्केट आठवली!

त्यात हा गॅस्केट पाहून कूकरची गास्केट आठवली!
ज्योताय, अगदी अगदी!!! नेमके हेच मनात आले होते. पण फोटो टाकण्याच्या नादात राहून गेले. बरे झाले तु त्याची आठवण करून दिलीस ते :D -(नावातल्या गमती जमती आवडणारा) सोकाजी

महिला एकेरीतला अजुन एक नुकताच संपलेला सामना नादिया पेत्रोव्हा विरुद्ध क्रिस्तीना प्लिस्कोव्हा. ह्या सामन्यात नाजूक चणीच्या क्रिस्तीना प्लिस्कोव्हाचा मल्लसदृश्य थोराड देहयष्टीच्या नादिया पेत्रोव्हापुढे काय निभाव लागणार असे वाटत असतानाच तिने पहिल्या सेट मध्ये ६-३ असा विजय मिळावून आघाडी घेतली. दोन सेटमध्ये सामना निकाली निघणार का ही उत्सुकता वाटेपर्यंत सामन्यावर ताबा मिळवून दुसरा सेट ६-२ असा जिंकून सामना खिशात घातला आणि डेव्हिड आणि गोलीयेथ ह्या गोष्टीची आठवण झाली ;)
नादिया पेत्रोव्हा क्रिस्तीना प्लिस्कोव्हा

काय अन्ना एकदम कोर्टाभायेरचे रंगीत्संगीत फोटो टाकायलाव? ईसपीएन हाय का फ्याशन टीव्ही? आँ पण हायेत ते लैच विंट्रेस्टींग हायेत बर्का. ;)

पुरुष एकेरीतला एक चालू असलेला सामना ज्युलियन बेन्नेटु विरुद्ध फरनॅन्डो व्हरडॅस्को. हा सामना फरनॅन्डो व्हरडॅस्कोने पहिले दोन सेट 7-6, 7-6 असे जिंकून जवळजवळ खिशात टाकला आहे. बेन्नेटुचा गेम एवढा टुकार आहे की ह्या सामन्यात काही मजा नाही. खेळताना चुका कशा करु नयेत ह्यासाठी बेन्नेटुचा गेम आदर्श ठरावा. तिसर्‍या सेटच्या पाचव्या गेममध्ये फरनॅन्डो व्हरडॅस्कोने मध्ये ब्रेक मिळवला पण लगेच पुढचा गेम ज्युलियन बेन्नेटु जिंकून ब्रेक मिळवला आणि अचानकच ज्युलियन बेन्नेटु सामन्यात परत येतोय की असे वाटेपर्यंत त्याने पुढचा गेम एकदम बावळटपणे गमावला. हा सामना अगदीच पकाऊ झाला आहे, काहीच थरार नाही. हा सामना फरनॅन्डो व्हरडॅस्को जिंकल्यात जमा आहे.
ज्युलियन बेन्नेटु फरनॅन्डो व्हरडॅस्को

आजचा दिवस फार विचित्र आहे. आजच्या दिवसात (आत्तापर्यंत) ७ लोकं दुखापतीमूळे बाहेर गेली आहेत. आणि शिरापोहा पण हारली आहे. (तिला पण बहुदा दुखापत झाली होती थोडी !)

बाहेर पाऊस कोसळत असतो विँबल्डनच्यावेळी .सामन्यांच्या वेळाही छान असतात .पुरुषांचे एकेरी सामने टिव्हिसमोर पाय टाकून चारचार तास घरातल्या उबदार कोचावर बसून पाहतांना दोनतीनदा न सांगता चहापण मिळतो .:-)महिलांचे सामने मात्र दीड तासात संपतात त्याचवेळी छत्रीचा तुटलेला दांडा ,गळणारा नळ ,मुलांच्या पुस्तकाला कवर घालणे ही कामे न चुकता पुढे कशी येतात ?:-(

सोत्रीशेठ, आज कोणते सामने होणार आहेत कोणता प्रमुख खेळाडू खेळणार आहे, कोणता सामना कसा रंगतदार होईल अशी माहिती दिली तर आम्ही वाचक सामनेही पाहू आणि तुमच्या धाग्यात प्रतिसादाचीही भर घालू. बाकी, शारोपाव इतक्या लवकर कोर्ट सोडेल असं वाटलं नव्हतं. काल घसरुन पडलेल्या खेळाडुंचेच फोटो आज जास्त दिसताहेत. -दिलीप बिरुटे

माझा आवडता खेळ ! एकेकाळी मार्टिना नवरातिलोव्हा, मोनिका सेलेस, बोरिस बेकर आणि माझी आवडती स्टेफी ग्राफ यांचे सामने पाहण्यात दिवस गेले... सध्या मी कांदापोव्हाचा पंखा आहे ! ;) काय दिसते बाँ... एकदम चिकनी सुपारी बघा ! ;) हल्लीच तिचा शुगरपोव्हा हा ब्रांड बाजारात आला आहे... ;) Sharavpova (पोव्हा प्रेमी);) शारापोव्हा

नक्कीच. पीट सँप्रास असाच उतरणीला लागला होता आणि रोजर चा उदय झाला होता. कपिल मुनी यांच्या मताशी पण सहमत. राफा-रोजर युगाचा अस्त जवळ आहे. तेंडुलकर आणि रोजर मध्ये मला अनेक साम्य आढळतात. विक्रमांची रास, प्रचंड लोकप्रियता, ऑफ फील्ड असणारा प्रचंड सभ्यपणा आणि नम्रता. आणि आता करियर च्या संध्या च्छाया पण. दोघांी रसिकाणा अनेक चांगले क्षण दिले ते लक्षात ठेवल्या जातील. सूर्यास्त कुणालाच टळला नाही

तेंडुलकर आणि रोजर मध्ये मला अनेक साम्य आढळतात. विक्रमांची रास, प्रचंड लोकप्रियता, ऑफ फील्ड असणारा प्रचंड सभ्यपणा आणि नम्रता. आणि आता करियर च्या संध्या च्छाया पण. दोघांी रसिकाणा अनेक चांगले क्षण दिले ते लक्षात ठेवल्या जातील. सूर्यास्त कुणालाच टळला नाही
सुंदर आणि वास्तवदर्शी प्रतिसाद. सहमत. तो नवा तारा कोण असेल बरं... ब्रिटिश लोक ७-८ वर्षापुर्वी विम्बल्ड्न आले की हेन्मन, हेन्मन ओरडायचे आता मरे मरे ओरडतात. फेडरर आणि राफा सोडुन जोकोविच, त्सोंगा, मरे, फेरर चांगले वाटतात सध्या.

रॉजरदादा रजनीअण्णाला म्हणतात मला टेनिसबद्दल कोणताही प्रश्न विचार मी ताबडतोब उत्तर देऊ शकतो. रजनीअण्णा: टेनिसच्या नेटला किती भोक असतात सांग पटकन.. रॉजरदादा गार आणि रजनीअण्णाला साष्टांग दंडवत. :) असो. लेखात सोत्रिंच्या अप-टु-डेट प्रतिसादांमुळे मज्जा येत आहे. लगे रहो सोत्रि.. आम्ही वाचतोय.

रॉजर ने आता निवृत्ती घ्यावी. ३१ व्या वर्षीच इतका ढेपाळलाय. बाकी फेडेक्सला हरताना पाहणे हे दु:खदायक होतं. नदाल पाठोपाठ फेडरर ची एक्झिट. आता फायनल जोकोविच- मरे अशी होणार की काय?

रॉजर , फेडरर आणि शारापोव्हा बाहेर पडल्यावर धाग्याची धग थंड झाली

सातत्याने चांगली कामगिरी करत पहिले मानांकन राखणारा जोकोविच आणि 'जायंट किलर' डेल पोट्रो यांच्यातला उपांत्य फेरीचा अटीतटीचा सामना अफलातून झाला. ही लढतच निर्णायक ठरेल असे वाटते आहे. त्या अर्थाने 'फायनल मॅच' कालच झाली असे म्हणायला हरकत नाही. सामन्याची क्षणचित्रे: जर्मनीच्या डस्टिन ब्राउनचा खेळ असाच बहरत राहिला, तर ग्रासकोर्टवर त्याचेच साम्राज्य येउ शकेल. त्याचा खेळ पाहताना ऐन बहरात असलेल्या बोरीस बेकरची आठवण होते. बेकरची आठवण करून देणारी ही एक थक्क करून टाकणारी व्हॉली -

डस्टिन ब्राउनच्या अफलातून आक्रमक खेळापुढे टिकाव न धरू शकल्याने नदाल विंबल्डनमधून दुसर्‍याच फेरीत बाहेर पडला आहे.

या वर्षी आत्तापर्यन्त ७ खेळाडू या ग्रास कोर्ट खेळता खेळता पाय घसरून पडले आणि त्यापैकी काहीना निवृत्त व्हावे लागले असे वाचनात आले. यामुळे या वर्षीच्या स्पर्धेस tumbledon स्पर्धा म्हणावी असे वाटते आहे.

जोकोविच आणि मरेत अंतिम सामना होतोय. वर उल्लेख झालाच आहे तेव्हा रंगतदार सामन्याची अपेक्षा करु या. बाकी, मरेला माझी पसंती असली तरी जोकोविच जिंकावा वाटतोय. :) -दिलीप बिरुटे