Welcome to misalpav.com
लेखक: सोत्रि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सामना सुरु झाला आणि जोकोवीचची सर्वीस असूनही मरेला ब्रेक पॉइंट मिळुन गुण घ्यायची संधी होती घालवली बेट्याने. १-०. मरेची सर्वीस आली तेव्हा बिनतोड खेळ करत त्याने गुण मिळवले.१-१ जोकोवीची सर्वीस. मरेनं जोकोवीचला दमवलं. मरे पुन्हा ब्रेक पॉइंटला पोहचलाय...ड्युस. अ‍ॅदव्हेन्टेज. ड्युस. मरेला अ‍ॅडव्हेन्टेज. ड्युस. पुन्हा मरेला अ‍ॅडव्हेन्टेज. श्या, ड्युस. व्वा भाई वा. काय पॉइंट घेतलाय..पुन्हा अ‍ॅडव्हेंटेज मरे.. आणि घेतला एकदाचा ब्रेक पॉइंट... वॉव. मरे २ :१ सामना संपल्यावर करुच चर्चा... मरेचा खेळ पाहता मरे वरचढ दिसतोय... अर्थात अजून खेळ खूप बाकी आहे तेव्हा माझ्या शुभेच्छा. मरेला. :) - दिलीप बिरुटे

मरे पहिला सेट जिंकल्यानंतर दुसरया सेट मधे सर्व्हिस राखू शकला नाही, दुस-या सेट मधे मरे 1:4 असा पिछाडीवर पडला. चांगला खेळ तोय पण........पाहु आगे आगे कया होता है

अ‍ॅ.मरे अखेर पुरुष एकेरीतील विजयी ठरला. सुरेख खेळला. तिसर्‍या रंगतदार आणि म्हटलंच तर एकतर्फी सामन्यात अ‍ॅ.मरेने बाजी मारली. ६:४ अशा फरकाने तिसरा सेट जिंकला. चार वेळेस मॅच पॉइंटला झुंजावं लागलं. जोकोवीच त्या तुलनेत लढलाच नाही, असे वाटले. मजा आली. -दिलीप बिरुटे

उपांत्य सामन्यातल्या डेल पोट्रो विरुद्ध झालेल्या कडव्या लढतीमुळे जोकोविचची बरीच दमछाक झाल्याने त्याच्या खेळावर परिणाम झालेला असावा. यंदाच्या स्पर्धेतील तीच सर्वोत्तम लढत असावी. मरेने त्याचा सर्वोत्तम खेळ फायनल साठी राखून ठेवलेला असावा मरेचे अभिनंदन.

मरेने त्याचा सर्वोत्तम खेळ फायनल साठी राखून ठेवलेला असावा मरेचे अभिनंदन. - (विम्ब्ल्डनप्रेमी) सोकाजी

७७ वर्षांनी कुणीतरी ब्रिटीश माणूस जिंकला. आनंदी आनंद असेल इंग्लंडात.

आजच हे वाचलं... Murray is indeed the first Brit to win Wimbledon in 77 years unless you think women are people........ Four British women have won Wimbledon women's singles since Fred Perry (1936)... Dorothy Round Little in 1937 Angela Mortimer in 1961 Ann Haydon-Jones in 1969 ... Virginia Wade in 1977 http://www.guardian.co.uk/sport/shortcuts/2013/jul/08/virginia-wade-wimbledon-champion-tennis आणि हे ही पहा कन्फर्म करायला... http://en.wikipedia.org/wiki/List_of_Wimbledon_ladies%27_singles_champions

चार ब्रिटीश महिला जिंकल्या आहेत हे ही आजच कळलं. (समालोचकाने हे सांगितलं होतं का ते आठवत नाही आणि वर्तमानपत्रातल्या हेडलाईन्सने पण अशीच दखल घेतली होती) दुर्दैवाने असा भेदभाव अगोदरपासून आहे. मला आठवतय, मागे स्त्री आणि पुरुष विजेत्यांची बक्षिसाची रक्कम समान नसण्यावरून गाजावाजा झाला होता.

हल्ली वेळ मिळेल तसे विम्बल्डन पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. स्टार स्पोर्ट्स { Star Sports HD 4 आणि दुसरा बहुतेक. नक्की नब्बर परत पहायला हवा ! } चॅनलवर पाहतो आहे. Djokovic ची मॅच पहायला मजा आली, त्याचा उडी मारुन रिव्हर्स हॅड मारलेला शॉट फारच आवडला. :) बाकी सुंदर लेडीज टेनिस प्लेअर्सच्या सामन्यांची अर्थातच वाट पाहतो आहे. ;) अवांतर :- सध्या बीबीसीच्या न्यूज देणार्‍या रिपोर्टस पैकी एका अफगाणी सौदर्यांच्या प्रेमात पडलो आहे ! ;) तिचे नाव यालदा हकिम आहे. ;) P1 मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة