Welcome to misalpav.com
लेखक: तिमा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

शिवाजी मंदीरला बटाटेवडे अजूनही चांगले मिळतात हे वाचून फार आनंद झाला आहे. नक्की जाईन तिथे लवकरच. मग तिथे नाटक कुठलं का असेना. :)

२८ पारितोषिकं मिळालेलं नाटक असंही असेल असं वाटल नव्हतं. (मध्यंतरी लता दिदींच्या वक्तव्यावरून झालेला वाद आठवला) बाकी शिवाजी मंदिरलाच मागच्याच गुरुवारी "माझीया भावोजींना रीत कळेना" हे नाटक पाहिलं. साउंड सिस्टम मध्येच गंडल्यासारखी झाली होती. संवाद ऐकूच येत नव्हते. बटाटा वड्यांबद्धल दुमत नाही.

मिळालेली पारितोषिकं आणि नाटक ह्यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसावा असं वाटण्याइतकी पारितोषिक विजेती भयाण नाटकं पाहिली आहेत. अत्यंत गाजावाजा झालेली नाटकंही प्रचंड टुकार असू शकतात असाही अनुभव घेतला आहे. पैसे वाचवल्याबद्दल आभार.

_/\_ किमान शब्दात कमाल पंचनामा! लय भारी. विशेषतः पहिल्या अंकानंतरचा निष्कर्ष तर अगदीच मनाला भिडला बॉ. :) बाकी, 'मराठी रंगभूमीला बरे दिवस आले आहेत' अशी मधूनअधून कुईकुई ऐकू येते, ती ह्या असल्या झोटिंगगिरीच्या जीवावर की काय? :( अवांतर - 'राता'बद्दल तुम्हाला काही विशेष राग आहेसं वाटतंय. :D

मोजक्या पण अचूक शब्दात केलेले परीक्षण आवडले. पैसे वाचवल्यापध्दल धन्यवाद.

मध्यंतरी मिपा उघडत नसल्याने जागच्या जागी पाखरासारखा फडफडत होतो(नुकताच ऐकलेला वाकप्रचार). त्यामुळे प्रतिक्रिया वाचता आल्या नाहीत. तरी सर्वांना धन्यवाद.