Welcome to misalpav.com
लेखक: स्पंदना | प्रसिद्ध:


Comments

पन त्ये साजूक तूप इसरला जनू? अस्सं वाटीभर घ्यायाचं पघा आन भिजवायच्या बाट्या त्या तूपामंदी.. त्याबिगर मजा नाय ह्या डिशला पघा....

+ १ तूप नसेल तर दाल बाटीची तितकी मजा नाही याच्याशी सहमत. महाराष्ट्रात जळगाव भागातही दालबाटी खाल्ली जाते - अनेक गावांत पाहुणे आलेत म्हणून माझ्यासाठी खास दालबाटी बनवली जात असे - त्याची आठवण आली. हं! आत्ता मी जिथं राहतेय तिथं दालबाटी मिळण्याची अजिबात शक्यता नाहीये :-(

तुम्ही केलेली बाटी ही चुलीत ( चुलीवर नव्हे) भाजून करतात. भराणपुर कडे ही बाटी तळून करतात. त्यात तूप साखर आणि बाटी साठी स्पेश्यल रश्शाची भाजी असते.

तुम्ही केलेली बाटी ही चुलीत ( चुलीवर नव्हे) भाजून करतात. भराणपुर कडे ही बाटी तळून करतात. त्यात तूप साखर आणि बाटी साठी स्पेश्यल रश्शाची भाजी असते.

चवीचवीनं सांगितलेली कृती आहे ही! बाटी करण्याची वेगळी पद्धत (कायस्थी गं) आवडली. फोटूही झक्कास! वरच्या फोटूत तू जशी दिसतेस तशीच असणार हे तुझ्या लेखनावरून मनात आलं होतं. माझ्या एका मैत्रिणीनं बाटी करून त्यात बटाट्याचे सारण भरले होते. आधीच दाल बाटी हा पोटभरीचा पदार्थ, त्यातून बटाट्याचे सारण असलेली एक बाटी खाऊन मी जी गप्प बसले की गप्पा मारायलाही तोंड उघडलं नाही. ;) माझ्याकडे बरीच कलौंजी आहे. ती एका पंजाबी भाजीच्या फोडणीत घालायला म्हणून आणली होती. बरीच उरलीये. आता दाल बाटी करताना बाट्यांना लावून लावून येत्या दहा एक वर्षात नक्की संपेल.

दालबाटी माझ्या एक राजस्थानी मित्राकडुन हादडण्यात आलेली आहे... छान लागतो हा प्रकार ! (सध्या कुल्फी विथ रबडीची चव जिभेवर घेउन फिरणारा);)

राजस्थानी कायस्थ (हे काय असत? अस विचारायच नाही. ते अगदी अभिमानाने सांगतात,"हम राजस्थानी कायस्थ है।) 'कायास्थितः सः कायस्थः' परम शक्तीने जेव्हा आकार धारण केला ( काया धारण केली) तेव्हा कायेत स्थित झाल्यामुळे तो कायस्थ झाला. कायस्थांमधे अनेक पंडीत, संत योद्धा होउन गेले आहेत...यांनी ४ही वर्णाला स्वतःमधे समावुन घेतल. याच प्रमाणे "ब्रम्हम जानाति सः ब्राम्हणः" याचा अर्थ जो ब्रम्ह जाणतो,ज्याला आत्मज्ञान आहे,तो ब्राम्हण. इथे ब्राम्हण ही जात किंवा वर्ण नसुन तो ती वॄती आणि गुण आहे. वेदांमधे आणि अनेक ठिकाणी ब्राम्हण हा शब्द येतो तो याच अर्थाने. :)

गोळवलकर गुरुजी (ब्राह्मण) यांना एकदा कोणीतरी त्यांची जात विचारली . त्यावर त्यांनी मी कायस्थ आहे कारण माझा या कायेत वास आहे असे उत्तर दिल्याचे वाचले आहे.

नेहमीप्रमाणेच खुशखुशीत लेखनासहित खुशखुशीत बाट्या. मी सुद्धा हा प्रकार एकदा (च) राजस्थानी मैत्रिणीच्या लग्नात खाल्ला तेवढाच. परत काय खायची म्हणुन हिम्मत झाली नाहि. असो पण तू कॄतीवार वर्णनच ईतकं छान केलयस कि आता परत एकदा करुन पाहिन. बाय द वे चुरमा लड्डु कुठे आहेत? असं एकलय कि डाल-बाटि-चुरमा सर्व करतात.

आम्हीसुद्धा असाच धसका घेतला होता दाल-बाटीचा. मुख्य म्हणजे दाल-बाटी ची जी डाळ असते ती नुसते उडीद घालुन केल्याने जरा चिकट, अन त्यात त्या बाट्या राखेने भरलेल्या, कडक!! पण भरपूर मोहन घालुन घरात बनवलेल्या बाट्या खरच खुप चवदार अन वेगळ्या लागतात. बाटी चुरमा करताना त्या बाटीत ओवा घालत नाहीत. मोहनाला फक्त तूपच असत, आणी बाटी भाजून झाल्यावर ती खलबत्त्यात कुटून त्यावर आणखी तूप शिंपडुन गुळ, बडीशेप, अन ड्रायफ्रुटस मिसळुन त्याचे लाडु वळतात. मला तर हा चुरमा प्रकार मलिद्यासारखा वाटला, किंवा आपण नाही का पोळीचा लाडु करत? तसा काहीस्सा. नथिंग ग्रेट!

ही वेगळीच पद्धत आहे बाटी बनवायची! आणि दाल पण सुंदर दिसतेय! माझी रेसेपी + सासु बाईंची रेसेपी = आम्ची रेसेपी जरा वेगळी आहे.. ह्यात मी बाटी कणिक + रवा घालुन करते तर सासु बाई गहु आणि मका जाडसर दळुन आणतात आणि त्याची बाटी करतात. मी गोळा लंबुळका लाटते, मग त्याचा रोल करते आणि त्या रोल ला मग दुमडुन त्याचा लहान गोळा करते. (सासु बाई डायरेक्ट गोळे करतात). आता हे गोळे पाण्यात उकडुन घेतो (आई कुकर मध्ये उकडते). आणि मग उकडलेल्या गोळ्यांना पाणी काडुन, थंड करुन, त्याचे थोडे लहान तुकडे करतो. (रोल करुन बनवलेले असल्याने त्याला छान पदर सुटतात). ह्याला तेलात तळु शकतो / शॅलो फ्राय करु शकतो. तेल जास्त पित नाही बाटी. पण तळल्याने कुर्कुरीत होते. आता ही बाटी दाल + तुप (मस्ट) सोबत चुरु खायची. आईकडे आणखी एक व्हर्जन म्हणजे साधा वरण+तुप+गुळ ह्यात बाटी चुरतात. एकंदरित आमच्या कडे दाल बाटी ४-५ पद्धती एकत्र करुन एका विचित्र फ्युजन पद्धतीने बनवली जाते!

धन्यु पिलीयन रायडर. मी पण माझ्या मानस कन्येकडुन, (एका मिपाकराची नवपरिणीता) अस ऐकल होतं पण तुझ्याकडुन व्यवस्थीत माहीती समजली. हे ही करुन पाहेन.

हम्म्म्म! मी ही दालबाटी राजस्थानात खाल्ली होती तेंव्हा मलाही ती तेवढी भावली नाही. परंतु, आता ह्या पाककृती प्रमाणे करून पाहीन. दाल दिसायला सुंदर आहे चवीलाही असणारच. बाटी अजून गडद रंगावर भाजली गेली असती (प्रत्यक्ष निखार्‍यांवर) तर जास्त चांगली दिसली असती. इथे जरा पांढरट दिसते आहे. अर्थात, त्याने चवीत फरक पडणार नसेल तर पांढरी बाटीही चालू शकेल.

निखार्‍यावर ती व्यवस्थीत भाजली नाही जात पेठकरकाका, वरुन जळते अन आतुन कच्ची रहाते, वर आणि कडक होते, त्या ऐवजी मला तरी ओव्हनमधली जास्त आवडली.

निखार्‍यावर ती व्यवस्थीत भाजली नाही जात
हम्म्म्म! कधी कधी आपल्याला जमत नाही हे खरेच. पण निखार्‍यांची धग नियंत्रित करावी लागते. जेंव्हा जास्त हवी असेल (ब्राऊनिंगसाठी) तेंव्हा निखारे वरखाली करून त्यावरील राख झटकून टाकतात त्याने निखारे लालबुंद आणि रसरशित दिसतात. त्यात उष्णता जास्त असते. कमी उष्णता हवी असेल तर निखारे हलवत नाहीत त्यावर राख जमू देतात. उपहारगृहात तंदूरमध्ये जमणारी रोजची राख टाकून देत नाहीत. काढून वेगळी ठेवतात. जेंव्हा गरम तंदूरची उष्णता कमी करण्याची वेळ येते तेंव्हा निखार्‍यांवर ती राख पसरून टाकतात आणि मग पदार्थ शिजवतात. बट्टी आंत पर्यंत शिजविण्यासाठी आधी आंच मंद पाहिजे आणि बट्टी शिजली की राख झटकून रसरशीत निखार्‍यावर 'ब्राऊनिंग' करून घ्यावे. बट्टी कडक न होण्यासाठी बट्टीत मोहन आणि पाणी योग्य असावे. ते कमी असेल तर बट्ट्या कडकडीत होण्याचा संभव असतो. बट्टी शिजल्यावर ती तुपात बुडवितात आणि नंतर सादर करतात. ह्यानेही बट्टी खुसखुसशीत लागते. ओव्हन मध्येही ओव्हनचे तापमान कमी ठेवून आधी बट्ट्या आंतपर्यंत शिजवून घ्यायच्या आणि शेवटच्या कांही मिनिटांत तापमान वाढवून 'ब्राऊनिंग' करून घ्यायचे. ब्राऊनिंग पूर्वी बट्ट्यांना तुप लावले तर ब्राऊनिंग लवकर आणि चांगले होईल.

मस्तच.. रविवारीच केलेली. आणि काय हा योगायोग!!!!! मी ही आजच टाकणार होतो दालबाटीची पाकृ.. कालच माबो वर टाकली होती.. आता नुसता फोटो टाकतो. मी माझ्या मध्यप्रदेशातील मित्राच्या पद्धतीने केली होती. मिरचीची पिवळी डाळ होती, थोडी वेगळी पद्धत. पण ही डाळ जास्त खास वाटतेय. :) पण बाटी अगदी अशीच. परत खावीशी वाटतेय...

मिरचीचं वरण!!! आहाहा!! त्या वरणाचा आंबट गोड अन तिखटपणा...काय वर्णावा. उफ्फ!! तुमचा फोटो पण मस्त. अस सर्व्ह केल तर आपला साधा वरणभात सुद्धा एकदम फ्युजन होउन जाईल.

पाकृ सांगण्याची स्टाईल आणि एकूणच सगळं छान! फोटो पहिल्यापासून शेवटपर्यंत झक्कास! अवांतर: अरे पाकृ वाल्यांनी सानिकासारखे व्हिडिओ तयार करा ना प्लीज!

पाकृ सांगण्याची स्टाईल आणि एकूणच सगळं छान! फोटो पहिल्यापासून शेवटपर्यंत झक्कास!
+१ अगदी असेच म्हणतो. मी स्वतः आजवर हा पदार्थ कधी चाखला नाही. नुसतं एकुनच आहे या बद्दल.

एकूणच ह्या प्रकाराबद्दल खूप मित्रांकडून वाईट लागते वगैरे प्रतिक्रिया मिळाल्या होत्या, पण ही पाककृती वाचून एकदा तरी ट्राय करावी वाटतेच :) देव बाबू, इथेही येऊ दे की पाककृती. फोटो जीवघेणा आलाय :) :)

खुप खुप आवडीची.आता तुमच्या पध्दतीने डाळ करुन बघेन. पण आम्ही जळगावकर बट्टीला तुपात भिजवुनच खाणार(कितीही वजन वाधले तरी). मी बाल्कनीत एका मोट्या तगारीत गवर्यात बट्टी थेऊन मग भाजते.

'बोलकी' पाकृ मस्तच. देवबाप्पांचं क्रिएशन पण येऊ द्यात लवकर. एकाच्या लग्नाचा अल्बम बघितला म्हणून दुसर्‍याच्या लग्नाचा बघत नाही असं थोडीच्च आहे? ;)

एकाच्या लग्नाचा अल्बम बघितला म्हणून दुसर्‍याच्या लग्नाचा बघत नाही असं थोडीच्च आहे?

तुमच्या पाकृ बाकी भारी जिवंत असतात. फुल्टू मजा येते वाचायला. मागं ती कुठलीशी चिकन का मटनची पाकृपण वर्णनामुळे भारी वाटत होती-मूळ फटू कातिल होता हेवेसांनल. :)

उत्तम +१ एकदम खल्लास पाकृ :) दालबाटी अजून एकदा ही मी करुन बघीतली नाही त्यामुळे आता नक्की बनवून बघणार पण तूप जास्तं घालून ;)

गप्पा मारत सांगितलेली दालबाटी आवडली. माझी एक मारवाडी मैत्रिण आहे तिची दालबाटीची पध्दत खूपच वेगळी आहे.. स्वाती

आम्ही कुकर मध्ये उकडुन करतो त्याला बाफल्या असे म्ह्नणतो व निखार्‍यांवर भाजतो त्याला बाटी. ह्या ईड्ली पात्रात ही छान उकडता येतात. :) एकदा अशा प्रकारे करुन पाहवी लागेल.....