नॉनव्हेजवाले जे वार पाळतात त्यात बहुतेकदा सोमवार, मंगळवार, गुरुवार अन शनिवार पाळणारे पाहिलेत.
बाकी मी कुठलाही वार पाळत नाही. मूड असेल त्या दिवशी निवांत दाबतो. मग तो श्रावण असूदे नैतर कुठला सणाचा दिवस असूदे.
हो. नॉनव्हेज खाताखाता कोणीतरी आज कोणता वार आहे रे? असं विचारलंच तर मोबाईलमधे किंवा भिंतीवर कॅलेंडर असल्यास त्यात वार बघतो आणि सांगतो.
पण असा योगायोग क्वचित घडतो.
पहा असं आहे कि शरीर शास्त्रानुसार पचनक्रियेला आठवड्यातून १ दिवस आराम द्यावा. . . . शास्त्रीय कारण देवभोळ्या लोकांना पटवून देण्यासाठी देवाचे नाव . . . इतकेच !
आणि वार पाळण्याचे म्हणाल तर कोणता वार कोणत्या देवासाठी हे देवाने ठरवले कि माणसांनी ?
या प्रश्नाच्या उत्तरात सर्व काही आहे.
मध्यंतरी अपर्णा ला छळले होते यावरून ...मुळात कॅलेंडर बघताना शनीवार हा शनीवार नसुन सॅटरडे असतो ...कारण कॅलेण्डर ईन्ग्लीश ...मग पाळून काय उपयोग ...;)
असो ...मासे खाताना अजिबात वार बघु नयेत असे आमचे स्पष्ट मत आहे ;)
नॉनव्हेज म्हणून खायला? बाप रे! काय काय खातात लोकं. मागे ऐकलं होतं सायप्रसची माणसे कुत्रे पाळतात आणि त्यांच्या एका वार्षिक महत्त्वाच्या दिवशी शिजवून खातात.
खायचो तेव्हा पाळायचो नाही.
बुधवारी रात्री ११.४५ पर्यंत घड्याळात बघून बकाबका चिकन मटण खाणारे पाहिलेत.
जठरात पोचेस्तोवर गुरुवार उजाडणार च्यायला.
अर्थात जमत असेल तर पाळावा. किमान आठवड्यातले २-४ दिवस आवडींबाबत संयम पाळायला शिकतो माणूस.
एक बाश्शा ऑडिटर मला रोजच नॉन्व्हेज देत नाहीत म्हणून आमच्या अॅड्मिन वर कावला होता.
असं बघितलं की माणसानं अन्न खावं की अन्न माणसाला खातंय तेच कळत नाही.
दूध आणि ब्रॉयलरची अंडी ही प्राणिज. पण प्राण्याला मारून मिळालेली नव्हेत. तशी शाकाहारी तर अजिबात नव्हेत. मग उपासाला दूध आणि तूप कसं चालतं?
आमच्या घरात किती प्रकार आहेत सांगू? मी स्वतः दूध आणि अंडी खाते. मासे/मांस नाही. अर्थात दूध आणि अंडी खाताना वार बघत नाहीच. सासूबाई आणि नवरा मासे खातात, सोमवार, गुरुवार आणि शनिवार सोडून इतर दिवशी. ते दोघे इतर मांस खात नाहीत. मुलं आणी सासरे मासे आणि चिकन सुद्धा खातात. मटण खात नाहीत. वार अर्थातच बघत नाहीत. दीर जाऊ आणि पुतण्या मासे, चिकन आणि बोकडाचं मटणसुद्धा खातात. पण डुक्कर्/बीफ खात नाहीत. ते पण सोमवार, गुरुवार, शनिवार, पंचमी वगैरे सगळे व्यवस्थित पाहून इतर वेळी हे सगळं खातात. एकाच घरात किती प्रकार बघा!
तुमच्या तो जिभेवर, डोळ्यांवर आणि पोटावर अत्याचार करणाऱ्या जिवघेण्या पाककृती शनिवार रविवार सोडुन इतर दिवशी न टाकल्यास बरे होईल. तुमच्या पाकृ वाचल्यावर हापिसात बसून काम करायला जमत नाही हो.
घरी मांसाहार वर्ज्य असल्याने घरी सगळेच वार पाळले जातात. त्यामुळे बाहेर खायला मिळते तेव्हा वार बघत नाही. सणवार असेल तर मुद्दामून बाहेर नॉनव्हेज खात नाही.
मला बारा महिने २४ तास…नॉन वेज चालते …US मध्ये असलो कि Beaf ।पोर्क सोडत नाही … पूर्ण वर्ष्यात फक्त महाशिवरात्रीला नाही खात …एतर दिवशी खावो दबा के …करन अन्ना महाराज सांगून गेले आहेत We must love animals…because they are so tasty.. :P
खात होतो तेव्हा तसंही आमच्या घरात तीन चार महिन्यातनं एकदा नॉन-व्हेज असायचं. तेही नॉन्-व्हेजची सगळी भांडी वेगळी. ते खाल्ल्यानंतर घरातल्या रोजच्या वापरातल्या ग्लासातनं पाणी प्यायलं तर त्याला तोंड लावायचं नाही. चुकून लावलंच तर ते ताबडतोब घासायला टाकायचं. खात असताना काही हवं असेल तर आपण उठून घ्यायला स्वयंपाकघरात जायचं नाही. जे काही हवं पानापाशी मिळेल. असे सगळे सोपस्कार असायचे.
खाणं बंद केलं त्यानंतर सगळंच बंद. अंडंच काय अंड्याचा केकही नाही. :D
एक्दा होटेलात जैन मित्रा सोबत गेलो होतो तेवा त्याच्या जैन ओर्डर बरोबर माझी अन्डाकरिपण जैन ( कान्दा - लसुण न टाकता) आणली , ( अन्ड जमिनिवर येत अस त्या वेटरच लोजिक)
माझे बाबा आजारी असताना चार दिवस रहायला आले होते, घरी गेल्यावर आईला म्हणाले, पोरीला वारही कळत नाहीसे झालेत रोज सकाळी कांदा- लसणीचे घमघमाट घरात! आमच्याकडे माहेरी कांदा लसूण ठराविक वारीच वापरला जायचा. कच्चा कांदा दिवसा नाही. नॉनव्हेज न खाण्याचे सगळे वार अजूनही पाळते, त्यात अंडेही येते!
घराबाहेर असलो तर कधीपण खातो. सणावाराला गोड आवडतं त्यामुळे ऑपोऑप णॉण्व्हेज होत नाही
नेहमीच्या हाटीलवाल्याला विचारावे काय वारानुसार विक्री कमी जास्त होते का काही. वाईड रेंज कव्हर होईल.
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार सोडून इतर दिवशी नॉनव्हेजला शिवतसुध्दा नाही. ;)
खरं सांगू का? मला तर असं वार पाळणं हा शुध्द वेडेपणा वाटतो. अरे, गुरुवार दत्तगुरुंचा वार म्हणून नॉनव्हेज नाही खायचं, अन आदल्या-दुसर्या दिवशी काय दत्तगुरु सुट्टीवर असतेत काय? देव काय दिवसांच्या हिशेबानं लक्ष द्यायला पर-अवर रेटवर काम करणारा कॉन्ट्रॅक्टिंग कन्सल्टंट है काय? खुळचटपणा नुसता!
मुळात देवादिकांचा आणि मांसाहार न करण्याचा जो संबंध जोडला जातो तोच चुकीचा आहे. (हां, आता श्रध्दावंतांच्या भल्यासाठी केलेली ती योजना आहे हे मान्य आहेच. चयापचय क्रिया, पर्यावरणाची काळजी/समतोल सांभाळणं वगैरे मुद्दे दिवसागणिक बदलणार्या 'डाएट प्लॅन'ला तितकेसे लागू पडत नसावेत असा अंदाज!) होमहवनांच्या वेळी बळी देणं, मांसाहाराचं प्रसादरुपानं भक्षण करणं ह्यापासून ते "ईईईईई...आम्ही नॉनव्हेज खाणार्यांच्या घरी पाणीसुध्दा पित नाही" पर्यंतच्या ह्या विचारप्रक्रियेच्या संकोचप्रवासाची मला नेहमी मोठी मौज वाटत आली आहे. :)
शाकाहारी असल्याने वारांचा तसा प्रश्न नाही. अंडंही खात नव्हते पण महिन्या दोन महिन्यातून एकदा आजकाल खाते (म्हणजे डोळे बंद करून संपवते). अगदीच उपाशी मरायची वेळ यायला नको म्हणून ती सवय करतीये.
मुलासाठी शिजवते पण अनिच्छेनेच! त्यात वार वगैरे पळत नाही. ज्या दिवशी नवरा चिकनची स्किन काढून देईल त्या वारी करते.
>>>अगदीच उपाशी मरायची वेळ यायला नको म्हणून ती सवय करतीये.
ऑऑऑऑ? नेमका काय संदर्भ म्हणे?
की सगळ्या भाज्या संपल्या तुमच्या पंचराज्यांतल्या (पंचक्रोशी स्टाईल)?
एकदा एका लांब अंतरावर र्हाणार्या फ्यामिलीनं जेवायला बोलावलं आणि कसं कोणास ठाऊक ते विसरले की आम्ही शाकाहारी आहोत. खरं तर ते तसे नाहीत पण चुकून झाले खरे! पर्याय- घरी येऊन, स्वयंपाक करून जेवणे, किंवा हाटेलात खाणे! त्यांनी गोड पदार्थ म्हणूनही अंड्याचा शिरा केला होता. मक्काय, पिझ्झा मागवला. त्यांना वाईट वाटत राहिलं आणि आम्हाला आश्चर्य (कसे विसरले म्हणून)! निदान अंडाकरी खात असते तर सोयीचे झाले असते असे वाटले म्हणून सवय करतीये. बाकी, पंचराज्यात भाज्यांचा सुकाळ आहेच!
प्रतिक्रिया
नॉनव्हेजवाले जे वार पाळतात
सेम हियर !
हाश्शी...
हो. नॉनव्हेज खाताखाता कोणीतरी
हा काथ्याकुट करून काय
हॅ हॅ..
लोल
(No subject)
वा छान आहेत....
विचार करण्याची पद्धत बदलेल !
हो मी तरी पाळतो. लहानपणीपासून
वार
खुप लोक सोमवार व शनिवार पाळतात.
हो, आमच्याकडेही फक्त बुधवारी
रोज जवळजवळ ४.७कोटी देव
मी १५ वर्षांपूर्वी सोडलय.
घरी असताना पाळतो. (सोमवार,
मध्यंतरी अपर्णा ला छळले होते
हौज द्याट?
ईईईईईईईई......
आम्ही मांजर पाळतो. >>
ईईईई काय?
Man vs Wild ...वरून
आम्ही सोमवार, शनिवार, बुधवार,
अरे व्वा
खायचो तेव्हा पाळायचो नाही.
एक शंका
बापरे मानलं तुला
रैवार खंडोबाचा म्हणून.
दिपक भो
एक नम्र विनंती
घरी मांसाहार वर्ज्य असल्याने
:)
खात होतो तेव्हा तसंही आमच्या
बापरे सॉल्लीड
नॉनव्हेज बंद केल्यामुळे वार
आम्हाला या काथ्याकुटाचा काही
एक्दा होटेलात जैन मित्रा सोबत
औघड आहे....जैन अंडं चालतं तर
उपासाची कोंबडी.
अगदी अगदी
वारांवरून आठवलं,
नेहमीच्या
गुन्हा
आयला आम्ही तर वार लावुन नॉनव्हेज खातो राव.
हो!
हा हा हा.....
शाकाहारी असल्याने वारांचा तसा
>>>अगदीच उपाशी मरायची वेळ
एकदा एका लांब अंतरावर र्
Pagination