Welcome to misalpav.com
लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अपर्टमेंट्साठी बरेचदा कंपनी मदत करते. चौकशी करून बघा. चौकशी न केल्याकारणाने तशी मदत केली न जाण्याची एक केस मला समजलीये. ते नाहीच म्हणाले तरी काळजी करू नका.
हे खरंय. तुमच्या कंपनीला विचारा. माझी कंपनी सुरवातीचा आठवडा Exteded Stay America या हॉटेलमधे सोय करायची. आठवड्यात घर नाही सापडलं तर कंपनीच्या Discount Rate मधे स्टे वाढवता येत असे. मला शेअरींग मधे घर न मिळाल्याने मी अजून आठवडा वाढवलेला. ते पैसे मला भरावे लागलेले. कंपन्या शक्यतो ऑफिसपासून जवळच हॉटेल बघतात. माझ्या नवर्‍याला कंपनीने स्टे नव्ह्ता दिला. पण एक महिन्याचा पगार आगाउ भारतातच दिला तसंच Crediत Card हि दिलेलं. त्यामुळे सुरवातीला अपार्ट्मेंट घेतांना डिपॉसिट भरतांना प्रश्न आला नाही. तुम्ही चौकशी करा ऑफिसमधे.

पुण्यातून कर्मचार्‍यांना कामानिमित्त परदेशात पाठवणार्‍या कंपन्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनचे तिकिट काढून देऊ लागल्या आहेत का? अमेरिकेतील ठिकाणासाठी अगोदरच २२-२३ तासांचा प्रवास असतो त्यात ९-१० तास अगोदर पुण्यातून रस्त्याने निघायचे अन मुंबई शहरात प्रवेश करून संपूर्ण वाहतूकीचे अडथळे पार करून छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळावर पोचावे लागते. अन तेथे पोचल्यावरचे वातावरण व वर्दळ पाहता महाराष्ट्रातली अनेक बसस्थानके बरी अशी अवस्था असते. तसेच बहुतांशी आंतराष्ट्रीय विमाने मुंबईला मध्यरात्री उतरत असल्याने व नंतर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर संपूर्ण रात्रभर कुर्मगतीने प्रवास करावा लागतो (रात्रीच्या वेळी मोठाले ट्रेलर्स त्यांना दिवसा प्रवेश नसल्याने बहुसंख्येने असल्याने इतर वाहनांनाही वाहतुकीच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो). त्याऐवजी पुण्याहूनच तिकीट असल्यास हे सर्व द्राविडी प्राणायम करायची वेळ येणार नाही. व मुंबई पुणे रस्त्याने प्रवास करायचा खर्चही वाचेल. पहिल्या काही वेळेस मुंबईहून प्रवास करण्याचे असे अनुभव आल्यावर मी जमेल तेव्हा पुण्याचे तिकीट काढतो. पण आजवर आंतराष्ट्रीय विमानाने पुण्याला यायची व उड्डाण करण्याची संधी मिळाली नाही. नवी दिल्ली व बेंगरुळू आंतरराष्ट्रीय विमानतळांचा अनुभव मुंबईपेक्षा बराच चांगला आहे.

सहमत. पण मला नाही वाटत पुण्यापासून व्यवस्था करीत असतील. मीही शक्य असेल तेंव्हा पुण्यापर्यंत जायला शिकलीये. तो मुंबईचा छ शि हवाईअड्डा नको झालाय. एक पुस्तक लिहू शकीन त्या अनुभवांवर. उतरल्यानंतर सगळ्यात भीती वाटते ती पेंगणार्‍या ड्रायव्हरांची! दोनेक वेळा तर गाडी थांबवून दोन तीन तास झोप घेऊ द्यावी लागली होती. भलेही सगळेजण खिडकीबाहेर बघत असतील, मी सतत चालकरावांच्या डोळ्यांकडे बघत असते म्हटले तरी चालेल. बरं, कारण विचारलं तर "अहो ताई, पहाटेपासून तिसर्‍यांदा येतोय. काल ३ तास झोपलो." असं काही ऐकून आपल्यालाच वाईट वाटतं.

पण आजवर आंतराष्ट्रीय विमानाने पुण्याला यायची व उड्डाण करण्याची संधी मिळाली नाही.
मार्गे दुबई किंवा फ्रँकफर्ट गेलात तर तशी संधी मिळू शकेल. एअर इंडियाची पुणे - दुबई अशी विमानसेवा आहे. तर लुफ्तांझाची पुणे - फ्रँकफर्ट अशी सेवा आहे.

मी शिकागोसारख्या ठिकाणी राहत असतो तर लुफ्तान्साच्या मार्गे फ्रँकफर्ट सेवेने केवळ १ थांबा घेऊन पुण्यात पोचता आले असते. हे (मिनियापोलिस - सेन्ट पॉल) डेल्टा चे हब आहे व एअर फ्रान्स, केएलएम यांच्याबरोबर डेल्टाची युती असल्याने इथून पॅरिस वा अ‍ॅमस्टरडॅमचा थांबा घेऊन नवी दिली, मुंबई व बंगळुरूला चांगली सेवा आहे. गेल्या भारतवारीत काश्मीर पहायचे असल्याने जातानाचे तिकीट दिल्लीपर्यंतचे होते व परतीचे पुणे बंगळुरू व मग आंतराष्ट्रीय असे होते. इथे लुफ्तान्साची सेवा सुरू व्हायला हवी किंवा वर उल्लेखलेल्या त्रयीने पुण्याचे विमान सुरू करायला हवे म्हणजे फारच सोय होईल :-).

मी परदेशी जाण्यापूर्वी इथे भारतात driving license मिळवले. त्याच्यासाठी गाडी चालवायला शिकण्याचे learning license घेतले व driving शाळेत जाउन शिकलो. माझ्याजवळ गाडी नसल्यामुळे काही दिवसांनतर मित्राची गाडी वापरून टेस्ट दिली व भारतीय license मिळवले. त्याच्या आधारावर मग international license स्थानिक आर. टि. ओ . मधून घेतले . हे license जगात जवळ जवळ सर्व देशात चालते. valid license असतानासुद्धा त्या युरोपातील देशात रस्त्यावर उजव्या बाजूने गाडी चालवण्याची सवय नसल्याने आणि स्थानिक traffic नियम समजण्यासाठी व माझ्या ऑफिस कडे जायचा सराव करण्यासाठी तेथील driving शाळेच्या माणसाबरोबर बसून ८ दिवस शिकलो. नंतर गाडी घेतली. वर्षाच्या शेवटी सम्बन्धित ऑफिस मध्ये गेल्यावर त्यांनी त्या देशाचे वयाचे ७० पूर्ण होईपर्यंत चालणारे कायम स्वरूपाचे license दिले.

शतशः आभार! खूप उपयुक्त माहिती मिळतेय. मी याआधी एकदा अमेरिकेला (एकटाच) जाऊन आलेलो आहे त्यामुळे माझ्याकडे एसएसएन आहे. मी एच१ व्हिसावर येणार आहे त्यामुळे बायकोला काम करता येणार नाही. मोबाईल फोनचे अजून काय पर्याय उपलब्ध आहेत? हेमांगीके म्हणतात त्याप्रमाणे $५०/महिना हा प्रीपेडचा पर्याय चांगला (वाचा: स्वस्त) आहे काय? यात स्वतःचा हँडसेट वापरावा लागतो का? ६-७ महिन्यांसाठी येत असल्याने कार विकत घेण्यात काही पॉईंट आहे का? मला कार चालवता येत नाही. कधीच प्रयत्न देखील केलेला नाही म्हणून हा पर्याय टाळण्याकडे माझा कल आहे हे सुज्ञांच्या (म्हणजे सगळ्यांच्याच) लक्षात आले असेलच. :-) मी जिथे राहीन तिथून साधारण ४-५ माईल्सवर माझे कार्यालय असणार आहे. मूर्सव्हीलमध्ये भारतीय दुकाने आहेत असे समजले. अजून एक, क्रेडित कार्ड घेणे आवश्यक आहे का? मी मागच्या वेळेस विना क्रेडिट कार्ड राहिलो होतो. अर्थात तेव्हा मी फक्त ३ महिने राहिलो होतो. माझ्याकडे भारतात देखील क्रेडिट कार्ड नाहीये. काही अप्रिय अनुभवांमुळे मी क्रेडिट कार्ड ही संकल्पनाच माझ्या आयुष्यातली बाद करून टाकली. ज्यांनी फोन नंबर्स आणि ईमेल आयडीज दिले आहेत मी त्यांना फोन करून शंका विचारू शकतो असे मी गृहित धरत आहे. :-) तसदीबद्दल आगाऊ क्षमस्व! मी सगळे नंबर्स साठवून ठेवीन. धमाल मुलगा, तुमच्या प्रतिसादाने जरा मोकळं वाटतयं. श्रीरंग_जोशी, हेमांगी के, उपास, लंबूटांग, अमित तलथि, मराठे, सखी आणि सगळ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल आणि मदतीच्या तयारीबद्दल शतशः धन्यवाद! वर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास बरे होईल. बाकी सगळी माहिती उपयोगी ठरेलच आणि गरज लागेल तशी माहिती मी विचारीनच.

भारतातून स्वतःचा हँडसेट आणल्यास प्रिपेड वा पोस्टपेड दोन्हीमध्ये केवळा सिम घेण्याचा पर्याय उपलब्ध आहेच (एटिअ‍ॅन्डटी). बहुतेक वेळी आपण काम करतो त्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना फोन कंपनीद्वारे १२% किंवा २४% अशी सुट असते पोस्टपेड कनेक्शन घेतल्यास. पण सुट घेताना त्या दुकानात २ वर्षांचा करार नाहीये ना याची खात्री करून घ्या. पोस्टपेडमध्ये ३९.९९ + कर - सुट असा किमान प्लॅन घ्यावा लागतो. चतुरभ्रमणध्वनी असल्यास डेटाप्लॅन वेगळा. एटीअ‍ॅन्डटी व वेरायझन यांच्या सेवेचा दर्जा चांगला आहे. इथे येऊन कार शिकल्याने व लायसन्स घेतल्याने वास्तव्याच्या काळात ज्या सहली कराल त्यात रेन्टल कार घेता येईल अन सहलीचा आनंद अधिक उपभोगता येईल. बरेच नॅशनल पार्क जसे ग्रँड कॅनियन वगैरे ठिकाणी स्वतः कारने फिरण्यात जी सोय होते व आनंद मिळतो कुठल्या टुरबसबरोबर नक्कीच मिळू शकत नाही. क्रेडिट कार्ड अमेरिकेत तरी जवळजवळ आवश्यकच आहे. अन माझ्या अनुभवानुसार अमेरिकेतील कडक कायद्यांमुळे व अंमलबजावणी करणार्‍या सजग व्यवस्थेमुळे आपण नेटकेपणाने बिल भरल्यास कुठलाही वाईट अनुभव येण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. दुसरा मुद्दा असा की इथले रिवॉर्ड प्रोग्राम्स फारच फायद्याचे ठरतात. मला दरवर्षी किमान ५०० डॉलर्स तरी कॅशबॅकद्वारे परत मिळतात. इथे येऊन स्थिरस्थावर झाल्यावर सांगा, इथे ऑनलाइन खरेदीद्वारे चांगल्या डील्स मिळवणे वगैरे यावर चर्चा सुरू करता येईल. वर फोन क्र. दिलेला आहेच, संपर्क साधण्यास कधीही संकोचू नका. टीप: पुण्यातून निघण्यापूर्वी बाजीराव रस्त्यावरील चितळे बंधूंच्या मुख्य दुकानातून एकदम ताजी बाकरवडी आणल्यास व ती कामाच्या पहिल्याच दिवशी सहकार्‍यांमध्ये वाटल्यास त्यांच्याबरोबर मधुर संबंध प्रस्थापित होणे अगदी सहज होईल :-). इथे आयात केलेली मिळते पण ती जरा मिळमिळीत असते. भारतातून आलेली ताजी बाकरवडी खायचा मजा काही औरच.

पुण्यातून निघण्यापूर्वी बाजीराव रस्त्यावरील चितळे बंधूंच्या मुख्य दुकानातून एकदम ताजी बाकरवडी आणल्यास व ती कामाच्या पहिल्याच दिवशी सहकार्‍यांमध्ये वाटल्यास त्यांच्याबरोबर मधुर संबंध प्रस्थापित होणे अगदी सहज होईल
आखातात येणारे कोणी असतील (नोकरी व्यवसायासाठी, मित्रांना/नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा सफरीसाठी) त्यांनी बाकरवडी किंवा इतर पदार्थ (जसे अनारसे, एखादा केक एखादी मटण डिश) ज्यात 'खसखस' असते असे पदार्थ आणण्याचे कटाक्षाने टाळावे. (कोणी मागवले असतील तरीही). , इथे 'खसखस' वर बंदी आहे (ती 'ड्रग' ह्या वर्गात मोडते). दहा वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आहे. पकडले गेला नाहीत तर बाकरवडीचा आनंद मिळेल पकडले गेलात तर दहा वर्ष सक्तमजूरी. चॉईस इस यूवर्स..!

आखाताखेरीज सिंगापूरच्या अशा नियमांविषयी व निरपराध व्यक्तिस झालेल्या अनेक वर्षांच्या तुरूंगवासाविषयी ऐकले आहे. मी स्वतः अमेरिकेत येताना अनेकदा ताजी बाकरवडी, घरी बनलेले अनरसे, चिवडा अनेकदा आणले आहेत, माझ्या ओळखीच्या बहुतांश व्यक्ती अशा अनेक गोष्टी आणत असतात. काही दक्षिण भारतीय मित्रमंडळी खाण्याचे / वाणसामानातले जे काही आणतात अन जितक्या प्रमाणात आणतात ते पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ येत ;-). पण अशा वेळी कस्टम्स अधिकार्‍यांकडून थोडीफार प्रश्नोत्तरे व काही पदार्थ तिथे टाकून द्यावे लागणे (उदा साबुदाणा) याखेरीज कुठलेही उदाहरण पाहिलेले नाहीये. अमेरिकेतील बर्‍याच मोठ्या विमानतळांवर 'सम ड्राय इंडियन स्नॅक्स' आणले आहेत असे सांगितले तर बॅग उघडून तपासणीही केली जात नाही. एक्स रे मशीनमधून होत असतेच.

माझी Port of Entry सानफ्रान्सिस्कोला होती. घरी येउन बॅग उघडली तेव्हा बाकरवडी नसलेल्या बॅगतलं सामान तसुभरही हललं नवह्तं पण बाकरवडी असलेल्या बॅगेची कसून पाह्णी केली असं वाटलं. सात आठ पाकीटं होती बाकरवडीची. त्यातलं एक फोडलेलं दिसलं. बाकी भाजणी वैगेरेच्या पिशव्यांवर मी इंग्रजीत लेबल लावून आणलेलं. तिला हात नाही लावला. फोडलेलं बाकरवडीचं पाकीट बॅगेत मस्त पसरलं आणि ते साफ करता करता मला चितळे आठवले. :-) पण हा अनुभव सर्वांनाच येइल असं नाही आणि चालतं आणलं तर.

इथे येऊन कार शिकल्याने व लायसन्स घेतल्याने वास्तव्याच्या काळात ज्या सहली कराल त्यात रेन्टल कार घेता येईल अन सहलीचा आनंद अधिक उपभोगता येईल. बरेच नॅशनल पार्क जसे ग्रँड कॅनियन वगैरे ठिकाणी स्वतः कारने फिरण्यात जी सोय होते व आनंद मिळतो कुठल्या टुरबसबरोबर नक्कीच मिळू शकत नाही. +१. अगदी सहमत. इथे शनिवार+रविवारी ड्राईव्ह करुन बरेच लोक बाहेर जायचा प्लान करतात - पुण्यातल्या ट्रफिकसारखे इंच इंच लढावे लागत नाही, आणि कारही सोप्या शिकायला. तुमच्याबरोबर लहान मुलं नाहीत असे दिसते, तर सपत्नीसह तुम्हाला नविन देश बघायला खूप संधी आहे - आणि बघण्यासारख्या खरचं खूप गोष्टी आहेत. कारने गेल्यास स्वस्त पडते, सोयीचे पडते. जरी बस-ट्रेन अशी सोय दुस-या शहरात, राज्यात जाण्यासाठी असली तरी. मी जिथे आहे तिकडे सार्वजनिक वाहतूकीची सोय जास्त नाहीये. तुम्ही सुरवातीला ६-७ महिनेच असाल तर सेंकड हॅन्ड कार घेऊ शकता (बहुतेक देसी असे करतात - बरोबर अनुभवी मित्राला घेऊन गेलेले बरे, म्हणजे फार प्रोब्लेमाटीक कार नको पडायला कारण तशा नंतर खर्चिक ठरु शकतात) किंवा रेंटवर कार घेऊ शकता, फक्त विकांताला कुठे जायचे आहे तर फक्त १,२ दिवसांसाठीही रेंटवर घेऊ शकता. पण इंटरनॅशनल लायसन्स पुण्यात घेण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही. आठवल्यांनी सांगितल्याप्रमाणे - तिकडे क्लासेस घेऊन, पैसे भरुन, टेस्ट देऊन, तुम्हाला ते सगळे परत इथे करावेच लागेल, परत इकडचे नियम वेगळे त्यामुळे धम्या म्हटला तसा त्याचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. कार घेण्याचा निर्णय तुम्ही इथे आल्यानंतर, एखादा महीना गेल्यावर, परिस्थितीचा अंदाज आल्यावर घेऊ शकता. क्रेडित कार्ड घेणे आवश्यक आहे का? क्रेडिट कार्ड घेण्याने तुमची क्रेडिट हिस्टरी बिल्डअप होते. ज्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतो, तुमचा स्वत:चा अपार्टमेंट घ्यायला (कोसाईनरशिवाय), नविन कार घ्यायला, घर घ्यायला. मुख्य म्हणजे क्रेडिट रिपोर्ट बघितला जातो ते तुम्ही तुमची बिलं वेळच्यावेळी भरत आहात ना यासाठी.

फोनवर मिळणारी मिनिटे पुरेशी आहेत काय हे तपासायला लागेल. भारतात फोन करणे हे फक्त खुशाली कळवण्याच्या पलिकडे जाते आणि आज कोणती भाजी केली असे होत जाते. ते अपरिहार्य आहे. त्यासाठी इंटरनेट (वॉनेज फोन, स्काईप) सुविधा चाम्गली आहे पण कधीकाळी फोनवर बोलावे लागले तर सोय करावी लागेल. कॉलिंग कार्ड्स हा पर्याय फक्त पर्याय म्हणून सांगत आहे. वॉलमार्टमधील ही सुविधा पहावी. http://www.walmart.com/ip/TracFone-Samsung-S125G-Prepaid-Cell-Phone-Bundle/20933059 तुम्ही कार विकत न घेता रेंट करू शकाल. चालक परवाना भारतातून आणल्यास सगळ्यात चांगले. गाडी चालवण्याला पर्याय नाही. पूर्वी तरी तो परवाना १८ महिन्यांसाठी असे. तुम्ही सात आठ महिने आहात म्हणजे वाहन आवश्यक. थंडीमध्ये पंचाईत होण्याआधी ती सोय करावी लागेल. क्रेडीट कार्ड आवश्यक आहे. जर आणखी काही काळासाठी इथेच राहण्याची वेळ आली तर आपापले वाहन विकत घेण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी ते आवश्यक! आधी काही फार किमतीचे कार्ड मिळणार नाही तरी जे काय मिळेल त्याचे पैसे वेळेवर दिल्यास ते जमून जाईल. मलाही क्रेका आवडत नाही म्हणून तुम्ही म्हणताय ते समज्ते आहे.

वर उल्लेखलेला एटीअ‍ॅन्डटीचा जो ३९.९९ डॉलर्स/महिना प्लॅन आहे त्यात
  • एटीअ‍ॅन्डटीच्या मोबाइल्सला कॉल करायला कुठलिही मर्यादा नाही.
  • नाईट्स अ‍ॅन्ड विकेंड (रोज रात्री ९ ते सकाळी ६) व शनिवार, रविवार २४ तास - एकून ५००० मिनिट
  • इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल व लँडलाइन्स (इथल्या भाषेत होम फोन्स) - ४५० मिनिट
  • या ४५० मिनिटांपैकी उरलेल मिनिट १२ महिन्यांपर्यंत कॅरीफॉर्वर्ड होत राहतात.
  • अ‍ॅडीशनल फोन केवळ ९.९९ डॉलर/महिना या दरावर जोडता येतो मिनिटांच्या मर्यादा मात्र बदलत नाहीत.
अधिक माहिती

>>मी एच१ व्हिसावर येणार आहे त्यामुळे बायकोला काम करता येणार नाही. समीर, सिनेटने पास केलेल इमिग्रेशन रीफॉर्मच बिल हाऊस मध्ये येतय. जर झालच पास (शक्यता कमी दिसतेय) तर एच ४ लाही नोकरीचा पर्याय खुला होऊ शकतो, फक्त माहिती म्हणून सांगतोय.

समीर, सिनेटने पास केलेल इमिग्रेशन रीफॉर्मच बिल हाऊस मध्ये येतय. जर झालच पास (शक्यता कमी दिसतेय) तर एच ४ लाही नोकरीचा पर्याय खुला होऊ शकतो, फक्त माहिती म्हणून सांगतोय.
माझ्या माहितीप्रमाणे, जे h1 होल्डर्स, ६ वर्षं एच वन वर आहेत आणि ज्यांचं GC process मधे अशा एच ४ साठी ते बिल आहे.

ही माहिती कदाचित आता शिळी झाली असेल. तरीही- मी काही वर्षापूर्वी अमेरिकेत भारतात वापरत असलेला सेल फोन घेऊन गेलो होतो. तो तिथे चालला नाही. तेंव्हा तपास केल्यावर दोन्ही देशात tri band सेल फोन चालू शकतो असे समजले. माझ्या पुढच्या अमेरिका वारीत तसा फोन घेऊन गेलो आणि त्याच्यात तेथील कंपनीचे हवे त्या किमतीचे सीम कार्ड घेऊन वापरले. परत आल्यावर जुने भारतीय कंपनीचे सीम कार्ड वापरले. असे दोन तीन वेळा केले आहे.

समिरसुर आपणास परदेशगमनाच्या शुभेछा... बाकी काही जानकार तिथल्या नवीन नोकरी शोधा बद्दल पण सांगतिल का??? जे सध्या तिथे आहेत त्यांना याबाबत अधिक माहिती असेल......

मी एच१ व्हिसावर येणार आहे त्यामुळे बायकोला काम करता येणार नाही.
मी वर म्हटल्याप्रमाणे बायकोसाठी लायब्ररी अथवा वॉलेंटीअरींग चांगले ऑपश्नस आहेत. अर्थात आवड असेल तर. वॉलेंटिअरींग कामं शोधण्यासाठी ही उत्तम साईट आहे.
हेमांगीके म्हणतात त्याप्रमाणे $५०/महिना हा प्रीपेडचा पर्याय चांगला (वाचा: स्वस्त) आहे काय? यात स्वतःचा हँडसेट वापरावा लागतो का?
हो, यात आपला हँडसेट असावा लागतो. माझ्याजवळ भारतातून आणलेला HTC Experia होता. हे प्लॅन डिटेल्स: टि-मोबाईल प्रिपेड प्लॅन भारतात कॉल करण्यासाठी वॉनेज आहे पण कॉल क्वालिटी तितकीशी न आवड्ल्याने आम्ही कधी वापरलं नाही. आम्ही इंडिया एल्डी प्रिपेड कार्ड वापरतो. वॉनेजमधे हँड्सेट विकत घ्यावा लागतो.
६-७ महिन्यांसाठी येत असल्याने कार विकत घेण्यात काही पॉईंट आहे का?
मलातरी पॉईंट वाटत नाही.
मला कार चालवता येत नाही. कधीच प्रयत्न देखील केलेला नाही म्हणून हा पर्याय टाळण्याकडे माझा कल आहे हे सुज्ञांच्या (म्हणजे सगळ्यांच्याच) लक्षात आले असेलच.
कार घेतली नाहीत तरी चालवायला नक्की शिका. इथे अगदी व्यवस्थित शिकवतात. आणि फार सोप्पं आहे इथे चालवणं आणि शिकणं. फक्त चार्जेस जास्त आहेत भारताशी तुलना केल्यास. पक्के मुंबईकर असल्याने मला आणि माझ्या नवर्‍यालाही कार चालवता येत नव्ह्ती. नवर्‍याने इथे आल्यावर क्लास लावला. अजिबात कार येत नसल्याने त्याने १० hours चा क्लास लावला. त्याला साधारण टॅक्स पकडून $४५० पडले. पण अगदी बेसिकपासून व्यवस्थित शिकवलं. मुळात त्याचा आत्मविश्वास वाढला. लायसन्सही मिळालं. मला अजून तरी कार चालवता नाही येत पण इथली ट्रांझिट सिस्टम बेस्ट आहे. त्यामुळे माझं अजून तरी काहीही अडलेलं नाही. आमच्या मित्रमंडळींमधे ज्यांना कार येत होती त्यांनी ४ hours, ७ hours असे जमतील तसे इथले नियम समजून घेण्यापुरते क्लास लावले. जे फार कमी खर्चात मिळाले.

६-७ महिन्यांसाठी येत असल्याने कार विकत घेण्यात काही पॉईंट आहे का? मलातरी पॉईंट वाटत नाही.
तुमचं वास्तव्य वाढणार असेल आणि तिकडे फार बर्फ वैगेरे पडत असेल तर मग तुम्हाला कार घ्यावी लागेल. मी सिअ‍ॅट्लजवळ असल्याने इथे फारशी बर्फवृष्टी होत नाही. वर्षातून अगदी एक - दोन वेळा. त्यामुळे फारसा त्रास नाही.

तुमच्या वरच्या प्रतिसादात तुम्ही बॉस्ट्नला आहात असं कळलं. इथे ही शोधता येईल. तसंच, तुमचं वास्तव्य असलेल्या काउंटीच्या संस्थळावरही असतील बर्‍याच संधी. आपल्या आवडीप्रमाणे व वेळेप्रमाणे काम करता येतं. मी सध्या लायब्ररी, म्युझियम अशा ठिकाणी वॉलिंटिअर काम करते. बर्‍याच ओळखी तर होतात पण एक वेगळाच अनुभव ही आहे हा.

हेमांगीताई चांगली माहीती दिली आहे तुम्ही दोन्ही प्रतिसादात, ते इंग्लिश्-विंग्लिश चित्रतर भारीच आहे, लय आवडलं. फक्त वॉलेंटीअरींग कामासाठी सोशल सिक्युरीटी नंबर (SSN)नाही लागत का? म्हणजे मलातरी असं सांगण्यात आलं होतं सुरवातीला इथे आल्यावर. ज्यांनी माहीती दिली त्याची मी पुढे खात्री करुन घेतली नाही कारण माझा स्वत:चा SSN आला होता.

नाही. SSN नाही लागत. जी कामं १-२ दिवसाची असतात त्यांना काहीच डॉक्युमेंट नाही लागत. काही long term कामांसाठी काही ठिकाणी Identity Proof विचारतात. तेव्हा Passport Copy चालते. माझ्याजवळ SSN आहे परंतु मला कुठेही विचारला गेला नाही अगदि पासपोर्ट ही नाही. या प्रकारचं काम पूर्णपणे स्वखुशीने केलं जातं, तसंच या कामात जर तुम्ही h4 विसावर असाल तर कुठल्याही प्रकारे मोबदला स्विकारु शकत नाही. पण वेळ सत्कारणी लावायला हा उत्तम पर्याय आहे. त्यातून तुमची आवड लक्षात घेऊन काम शोधाता येतं. जर तुम्हाला फोटोग्राफी करण्याची आवड आहे परंतु तुमच्या करीअरचा त्याच्याशी काहीही संबध नाही अशा वेळी फोटोग्राफिशी निगडीत वॉलिंटिअर काम तुम्ही करु शकता. त्यातून बरच शिकता येतं. मी सुद्धा आता नोकरीतून सुट्टी घेउन h4 वर आहे. आठवडाभर नोकरी सारखंच वॉलिंटिअरींग करते. फक्त माझ्या नोकरीशी काडीचा संबध नसलेल्या क्षेत्रात. आणि आवडीने करतेय. खरंतर आयुष्यात Job Satisfaction काय असतं हे आत्ता कळतंय. अवांतर - इथे आल्यावर h4 वर येउन त्रासलेल्या, वैतागलेल्या कित्येक मुली पाहिल्यात मी. अनेकांना मी हा पर्याय सुचवलाय. ज्यांना खरंच काहीतरी नविन करायची उर्मी असते त्या करतात. अशा वैतागलेल्या h4 वाल्यांसाठी एक लेख पाडायचा फार दिवसावसून मनात आहे.

बॅगांना लॉक्स लावू नका. किंवा लावायचे झालेच तर अमेरिकन कस्टम्स अ‍ॅप्रूव्हड लॉक्स मिळतात तीच वापरावी. इतर लॉक असेल तर चक्क तोडून बॅगा उघडून तपासतात. अर्थात तुम्ही तिथे आधी राहिलेले आहात म्हणजे हे तुम्हाला माहित असेलच.

अधिक माहितीसाठी हा दुवा बघा. अमेरिकन विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था सांभाळणार्‍या द्लाचे नाव आहे - Transportation Security Administration TSA approved locks विकत मिळतात. आंतरराष्ट्रिय विमानप्रवासात चेक इन केलेल्या बॅगेतून काही सामान गायबले आहे असे कधी ऐकले नाही. बहुतेकदा मौल्यवान वस्तू आकाराने शक्य असल्यास स्वतः जवळील केबिन बॅगेतच ठेवल्या जातात.

मी याधी कधीही लॉक लावलं नव्हत. यावेळेस बॅग नविन घ्यायला गेले तेव्हा छोट्सं TSA लॉक आवडलं म्ह्णून घेतलं आणि घेतलं म्हणून लावलं. आणि पहिल्यांदा माझी बॅग चेक केली गेली. बा़की बॅगांच्या भाउगर्दीत आपली बॅग ओळखण्यासाठी काहीतरी खूण ठेवाच. (आधी प्रवास केल्याने तुम्हाला माहीत ही असेल.) मी छोटे छोटे स्माईली स्टिकर्स बॅगभर चिकट्वते. मागच्या बाजूला नाव, गाव, पत्ता, फ्लाईट नंबर्स कागदावर छापून चिकटवून टाकते. कोणाची बिशाद माझ्या बॅगेला हात लावायची.

माझ्या मुळे कोणीतरी धन्य झाले हे ऐकून/वाचून आज आषाडी कार्तिकीला माझा तर वेलू गगनावरती गेला. :P (jokes apart, but it took 10 mins to type. :( )

मित्राची आठवण झाली, जेवताना "वेळ नाही" म्हणून चावायच्या ऐवजी गिळायचा.. आणि मग पोट दुखतय म्हणून रडायचा :))

आपल्या सगळ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादांबद्दल आणि मदतीच्या तयारीबद्दल मी खरंच आभारी आहे. माझी मानसिक तयारी करण्याचे काम आपल्या या धीर देणार्‍या शब्दांनी केले आहे. बायकोसोबत पहिल्यांदाच इतक्या लांबच्या (आणि ते ही अमेरिकेच्या) प्रवासाला जात असल्याने आणि तिथे मुक्काम तसा बरेच महिने असल्याने थोडे टेंशन आले आहे. क्रेडिट कार्ड घेता येईल पण कारचे कसे करावे हा थोडा प्रश्न आहेच. बायको सोबत असतांना घरात बसून राहणे तसे तिच्यावर थोडे अन्यायकारक होईल. असो. बघू, कुछ तो हल निकल ही आयेगा... तिथे मोबाईल फोनवर अजूनही दिवसाच्या येणार्‍या कॉल्सना पैसे पडतात का? २००८ मध्ये असे काहीतरी होते असे अंधुकसे आठवते आहे. कृपया ही माहिती पण द्यावी.

होय बहुतांश सेवादाते, स्वतःच्या सोडून इतर नेटवर्कहून आलेल्या इनकमिंग कॉल्सला आउटगोइंगसारखाच चार्ज लावतात. या कारणाने आपले नेहमी ज्या लोकांशी बोलणे होते त्यातील बहुतांश लोक ज्या कंपनीचा फोन वापरतात त्याचाच घ्यावा. भारतात कॉल करण्यासाठी आम्ही पण वॉनेजइंडियाएलडी वापरतो. वॉनेज एकाच मोबाईल नंबरवरून एक्सेंशन म्हणून वापरता येते अन कधीकधी गंडतेही म्हणून बॅकअप असलेले बरे.

आई शप्पथ.. पुढे मागे कधी उसगाव ला गेलेच तर मला काहीही प्रोब्लेम येणार नाही.. काय डिट्टेल सुचना आहेत!!!!

उसगावात स्वागत. मी मिनियापोलिस मधे राहते काही मदत लागल्यास कळवा. इथे आल्यावर मेडिक्ल इनशुरन्स काढल्यावर "Primary Care Provider(PCP)" साठी जरुर नोदंणी करा तुम्हा दोघांसाठी. हे खुप गरजेचे आहे कारण कोणी आजारी (ताप वा इतर साधे दुखणे) असेल आणि "PCP( family doctor)" असेल तर डोक्टर ला भेटायची वेळ लवकर मिळते."Emergency Room" मधे साध्या दुखण्यासाठी जाणे इथे योग्य ठरत नाही व कदचित महागही असु शकते. मेडिक्ल इनशुरन्स आणि PCP असणे आवश्क आहे.जाणकार लोक यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

बहुतेक वेळी इकडच्या नोकरीत रुजू झाल्यावर पहिल्या काही दिवसांतच आरोग्यविम्याची नोंदणी करणे प्रत्येक कंपनीमध्ये कर्मचार्‍यांसाठी सक्तीचे असते. ते करत असताना सर्व संज्ञा व प्रक्रीया नीट समजून घ्यावी. इथे ही सर्व प्रक्रिया उगाचच क्लिष्ट आहे असे बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे. एक उदाहरण सांगतो, माझी एक मैत्रीण अमेरिकेत नवी आलेली असताना हापिसातून सहकार्‍याबरोबर त्याच्या कारमधून जेवणाच्या सुटीत बँकेत खाते उघडायला गेली होती. परत येताना या सहकार्‍याने अनावधानाने कमी वर्दळीच्या रस्त्यावर एक सिग्नल मोडला. पण दुर्दैवाने एका जाडजूड गाडीने यांच्या कारला साईडने ठोकले. चौक असल्याने वेग कमी होता व कुणालाही फार लागल्याचे लगेच लक्षात आले नाही. मात्र या सहकार्‍याने त्याची कार १५०० डॉलर्स किमतीला जुनी पुराणी घेतलेली असल्याने अगोदरच टिनपाट होती व आजच्या कार्सप्रमाणे त्यात अपघात संरक्षण सुविधा कमी होत्या. माझी मैत्रीण नेमकी ड्रायव्हरमागच्या सीटवर बसली होती व डाव्या बाजूने मोठ्या गाडीचा धक्का बसल्याने गाडीच्या दारातली कडी नेमकी तिच्या बरगडीत डाव्या बाजूने टोचली गेली. दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आल्या. ९११ ला फोन लावला गेला. पोलिसाने चौकशी केली. ज्यांचे नुकसान झाले त्याच गाडीच्या चालकाची चूक असल्याने मोठ्या गाडीच्या चालकाच्या मोटार विम्याची माहिती न घेता सोडण्यात आले. काही वेळानंतर बरगडीतून फारच वेदना होऊ लागल्याने माझी मैत्रीण जवळच्या इमर्जन्सी रूम (क्लिनिक) मध्ये गेली व अपघातात असे लागल्याचे सांगितले. फॉर्म वगैरे भरून घेताना तिला विम्याची माहिती मागितली तर तिने स्वतःच्या आरोग्यविम्याचे कार्ड दाखवले अन त्यावरचा क्रमांक त्या फॉर्मवर लिहिला. अमेरिकेतील पद्धतीप्रमाणे तिच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या ज्यात गर्भधारणा चाचणी पण होती, एक्स रे होता. दोन तासांनी प्रत्यक्ष डॉक्टरांनी तपासले व १ आठवडा पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला व वेदना कमी होत नसल्यास ibuprofen गोळ्या सकाळ संध्याकाळ घेण्यास सांगितले. या गोळ्यांसाठी इथे प्रिस्क्रिप्शन लागत नाही. त्या दिवशी तिथे तिला केवळ मिनिमम पेमेंट करावे लागले जे आरोग्यविम्याच्या प्रकारानुसार ठरते. इतर रक्क्म विमाकंपनी भरत असते. १५ दिवसांनी त्या इमर्जन्सी रूम कडून ५०० डॉलर्सहून अधिक रकमेचे बिल आले. कारण होते विमा कंपनीने क्लेम स्विकारायला नकार दिला. विमा कंपनीला फोन लावून विचारले तर त्यांनी सांगितले की हे उपचार अपघातामुळे घ्यावे लागले असल्याने त्यांच्या कव्हरेजमध्ये बसत नाहीत. ज्या चालकामुळे अपघात झालाय त्याच्या मोटारविम्यामध्ये हे कव्हर होईल. तिने त्या कर्मचार्‍याला संपर्क साधला तर त्याने सांगितले की त्याचा मोटार विमा अपघाताच्या अगोदरच्या दिवशीच संपला होता. त्याने त्याची अपघातग्रस्त कार ५०० डॉलर्सला विकली अन तो भारतात परत जात होता. म्हणजे बिलाची सर्व रक्कम अपघातग्रस्त व्यक्तीलाच भरावी लागली. किमान काही उपचार मिळाले असते जसे काही तासांसाठी इस्पितळात भरती होणे, इंजेक्शन, सलाईन वगैरे तर भारतीय मानसिकतेनुसार बरे तरी वाटले असते. ibuprofen च्या गोळ्या ज्या तश्याही भेटतातच त्यासाठी ५०० डॉलर्सहून अधिक रकमेचा भूर्दंड. नियमानुसार माझी मैत्रिण त्या सहकार्‍याला वकीलाकडून नोटीस देवू शकली असती पण त्याचा मूळ उद्देश मदतीचाच होता व तो अमेरिकेत थांबणारही नव्हता. या सर्व प्रकरणात येथील नियमांबाबत व प्रक्रीयेबाबत नेमकी माहिती नसणे हा अपघातग्रस्त व्यक्तिचा सर्वात मोठा दोष होता असे मला वाटते.

कृपया कुकर आणू नये, कस्टम मधे त्रास होण्याची शक्यता आहे. गुगल करून अधिक माहिती मिळेल....ही एक बातमी: http://www.usatoday.com/story/travel/flights/2013/05/13/saudi-pressure-cooker-arrest/2156049/ प्रवासाकरिता शुभेच्छा....काही मदत लागल्यात व्यनि करा.

या बातमीतला माणूस सौदी असल्याने कारवाई झाल्याची शक्यता जास्त आहे. माझ्या माहितीप्रमाणे बरेच भारतीय बॅचलर असोत वा लग्न झालेले कूकर हटकून आणतात. त्यामुळे फार काळजीचं कारण नसावं

माझ्या आई वडिलांनी दोन महिन्यांपूर्वीच भारतातून येतांना प्रेशर कुकर आणला, कुणीही काहीही विचारले नाही. बहुतांश भारतीय लोक पहिल्या खेपेस प्रेशर कुकर नक्की आणतात. मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा स्वतःसाठी नाही तर सहकार्‍यासाठी आणला होता. सदर बातमीमध्ये त्या प्रवाशाचे एकंदर वर्तनच संशयास्पद वाटले म्हणून त्यास अटक झाल्याचे लिहिले आहे. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील कस्ट्म्स अधिकार्‍यांना भारतीय लोकांच्या नेहमीच्या वस्तू, अन्नपदार्थ चांगले ठाऊक असतात. येथील भारतीय वाणसामानाच्या दुकानातही भारतातून आयात केलेले कुकर असतात पण मूळ किमतीपेक्षा बरेच महाग असतात.

तुम्ही दोघांनी अमेरिकेतील भारतीयांचे जीवन ....किती सोपे किती कठीण किंवा स्वप्न की सत्य असला काहीतरी मथळा घेऊन सलीम- जावेद बना व एक धागा टाका... सगळ्या आस्पेक्टस येउ द्या. कसं ?

चौरा - धम्या हे काम अधिक चांगले करू शकेल असे वाटते. पश्चिमी सभ्यतेचा आस्वाद तो घेत असावा असा अंदाज आहे. मी काय बॉ, 'पढना लिखना सिखों, ओ मेहनत करने वालों' गटात मोडणारा ;-).

Here is one more link: http://www.infowars.com/tsa-now-confiscating-pressure-cookers/ This started after Boston incident, just be careful. It is not worth to get stuck at the airport because of a pressure cooker. Aapan sudnya aahat :)

सगळ्यांच्या माहितीपूर्ण आणि मदततत्पर प्रतिसादांबद्दल धन्यवाद! ज्यांनी संपर्कसुलभतेसाठी आपले क्रमांक आणि ईमेल पत्ते दिले आहेत त्यांच्याशी मी नक्कीच संपर्क साधेन. शक्य झाल्यास प्रत्यक्ष भेट अधिक आनंद देऊन जाईल यात शंका नाही. काही प्रश्न, शंका असल्यास मी याच धाग्यावर पुन्हा विचारेन. त्यावेळेस पुन्हा एकदा माहिती द्यावी ही विनंती! :-) --समीर

परदेशात जाण्याचा योग अथवा भोग आमच्या नशिबात नाही. आम्हाला आमचे वरणभातच बरे असे वाटते ( कोल्हा आणि आंबट द्राक्षे याचीही आठवण कोणाला येवु शकते). हा सर्व लेख / प्रतिसाद वाचले असता "अमृत" मासिकात या विषयावर लेख होऊ शकतो असे वाटले.