Welcome to misalpav.com
लेखक: मन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ए शेंबड्या!! (प्रस्तुत लेखाच्या पार्श्वभूमीवर वरचे संबोधन हे "भगवंता", "साह्यबा",इ.इ. च्या क्याटेगिरीत मोजोन घ्यावे.) श्लेष्मामाहात्म्य बाकी अंतर्बाह्य बीभत्स शेंबडात आपलं रसात बुचकळोन काढलेले आहे !

'मैने गांधी को नहीं मारा'; Wednesday पाहिलेत तुम्ही? त्यातलं अनुपम खेर यांचं काम कसं वाटलं? मला प्रचंड आवडला होता त्यांचा अभिनय या दोन्ही चित्रपटांत. त्यानंतर कुठल्यातरी भिक्कार सिनेमात त्यांना तितकाच भिक्कार अभिनय करताना पाहून, "चांगलं काम करता येत असतानाही हा माणूस असले चित्रपट का बरं निवडतो?" असा प्रश्न पडला होता. तुमचे इतर लेख आणि प्रतिसाद वाचून आणि आज हा लेख वाचून तो प्रश्न पुन्हा एकदा पडला. अनुपम खेर यांच्याबाबतीत नाही, "मनोबा अथवा मन" या आयडी बाबत!! :-(

ज्यांना माझ्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत त्यांच्यासाठी :- थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक १ http://www.misalpav.com/node/25241 . . थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक २ http://www.misalpav.com/node/25242 . .

विषय जरा चान्गला निवडायला हवा होता. पुढे पुढे अगदी वाचवत नाही! कदाचित हेच बिभत्स रसाचे आणि या लेखनाचे यश असेल

सर्व वाचकांचे आभार. मी इतर काही चांगलं लिहू शकतो असा विश्वास असणार्‍यांचे विशेष आभार. मायबाप वाचकांच्या इच्छेला मान देत हे शेंबूड पुराण इथेच थांबवतो. कृपया धाग्यातील शेवटच्या वाक्याची धास्ती घेउ नये.

मस्त! "मेकूड" हा शब्द ऐकला की आपल्या तर्जनीवर गोखरूच्या काट्यासारखे टोकदार पण लवचिक, काळसर-हिरवट-फिक्कट पिवळसर असे काहीतरी चिकटलेले आहे आणि आपण त्याकडे निरिक्षणपूर्वक पाहात आहोत असं वाटतं.