Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कमल हसन यांनी 'हे राम' चित्रपट का काढला असेल याचा अंदाज आला.

. मला मथळ्यावरून वाटले की , गुर्जीचे भाव ( ऊर्फ भावफलक) याचे विश्व या संबंधी काही कोष्टक गुर्जी सादर करताहेत की काय ? ( मराठी भाषा इज अ व्हेरी फन्न्नी भाषा ! ) .गुर्जी तुम्हाला एक प्रपोज्ड यजमान भेटले होते. वास्तुशांतीचा फक्त देखावा दिसला पाहिजे म्हणणारे ! असे काही किस्से सांगा ना !

@ .गुर्जी तुम्हाला एक प्रपोज्ड यजमान भेटले होते. वास्तुशांतीचा फक्त देखावा दिसला पाहिजे म्हणणारे ! असे काही किस्से सांगा ना !>>> :-D कळ.... सोसा जरा! "घेतो" @#&@¢●×√~¶#%@ पुढच्या भागात!!! :P

@एकान्गि लेखन नको,>>> होणारंही नाही..पण तरी सांगतो,की हे ललित-लेखन आहे,यात "आजच्या काळातल्या पुरोहितांचे-भाव विश्व प्राधान्यानी येणार..आणी बाकी सर्व आलच तर अनुषंगानी! हीच ललित लेखनाची मर्यादा असते. :) हे आपणही समजून घ्या! :) @गुरुजीन्ची विपन्न अवस्थासुद्धा लोकन्समोर येवुद्या>>>धीsssर धरी...धीssssssरं धरीssss...अनि रुद्ध....सु विचारीssss! :)

आपले लेखन हे विनोदी अन्गाचे अस्ते हे माहीत आहेच तसेच पु ल देशपान्डे या प्रमाणे विनोदाला भावनेचा ओलावासुद्धा असुद्या हि विनन्ती असो,धीर तर धरलेलाच आहे.

माणसांशी सतत संबंध येत असल्याने मॅनेजमेंटचे फंडे वापरात येत असतीलच! शारीरिक कष्ट नसले तरी साबुदाण्याच्या खिचड्या खायला लागत असतील! सगळे येऊ द्या!

येऊंद्या. वाट पाहतोय पुढच्या भागांची. :) 'चलता है' ते कर्मठ अशा रेंजमधल्या पुरोहितांची वर्णनंही येऊद्या बुवा. शिवाय शॉर्टकट मारणारे, स्तोत्रं, मंत्र नीट न येणारे, वाघ मागं लागल्यासारखं म्हणणारे, अन ह्या उलट स्पष्ट, खणखणीत आवाजात सगळे मंत्र म्हणणारे.... असं सगळं येऊंद्या. वाट पाहतो :)

वेगळे अनुभव वाचाचायला मिळतील. पुढील भागाची प्रतिक्षा.

"अ"सामान्य/"ब"सामान्य/"क"सामान्य असण्यापेक्षा सर्वसामान्यच असणं मला बरं वाटतं.खरंतर सर्व सामान्यही नको,कारण त्यातला सा वगळला की माणूस सर्वमान्य होतो.लोकमान्य/सर्वमान्य...हेही आपल्याला परवडणारं नाही. तेंव्हा आपण आपलं सामान्यच असलेलं बरं! अता अश्या या सर्व मतामतांच्या गराड्यात माझ्या सारख्या सामान्य भिक्षुकानी ही भिक्षुकिच्या धंद्याची आत्मकथा का सांगावी? तर...एका धंद्याची आत्मकथा,ही दुसर्‍या धंद्याची बोधकथा ठरते,असं पर्वाच कुठेसं वाचलेलं अठवलं...म्हणून! (तसच,माझे एक काका मला नेहमी म्हणत,"अरे आत्मू...आपले अनुभव दुसर्‍याबरोबर नेहमी शेअर करावे...गुरु करण्यापेक्षा हे "करणं"..फार मोलाचं असतं...बरं का???...म्हणूनही!)
आत्मुस अतिशय समृद्ध लेखन. या अश्या पॅरँनी अगदी षटकार पाहिल्याचा आनंद मिळाला भौ!

+१०^१०००००००!!!! जितके वैविध्यपूर्ण लेखन होईल तितकी मराठी भाषाच समृद्ध होईल. त्यामुळे हे वाचण्यास एकदम उत्सुक आहोत!

बर्याच दिवसापासुन वाचेन म्हणत होतो आज मुहुर्त लागला.. आता रोज एक (नेट वर आल्यावर ) या प्रमाणे वाचले जाईल. लिखान ओघवते आहे.. पहिले २ प्यारेग्राफ तर खेचक झालेत.. बाकी वाचतो आहे..

यशोधराताई, तुमच्यासाठी हा धागा वर काढलाय. अनुक्रमणिकापण आहे याला. २८ भागापर्यंत काही काळजी नाही. खरडफळ्यावर याल न याल. . . . म्हणून हा उद्योग :)