Welcome to misalpav.com
लेखक: चित्रगुप्त | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आत्ताच्या यादवांमधे कुणी यादवी माजवू शकेल का ? ती सुंदोपसुंदी बघायला आवडेल.

मित्रांनो अर्जुन उवाच,
पण आहे तरी कुठे तो ? बसला असेल कुंजवनात पावा वाजवत, गोपिकांबरोबर नाचत, किंवा गोपिकांची वस्त्रे पळवून झाडावर चढून … पण आता या वयात? आणि गोपिका तरी कुठे आहेत इथे ? त्या तिकडे गोकुळात आता म्हातार्‍या झालेल्या असतील … छे… छे … मला काय झाले आहे? विचारांनी डोके अगदी फिरून गेले आहे.
जिथे खुद्द धनुर्धारी अर्जुनाचे माथे फिरायची वेळ आली तिथे आपल्या बापुड्यांचूी काय कथा? नाही का? महाभारतकालीन कथेतील उदात्त विचारांत रमावे. पण भान ठेवावे लालू ते कालू आदि विक्षिप्त व बेदरकार राजकारण्यांच्या विविध दुष्टाव्यांवर...

वाचतोय म्हणण्यापेक्षा खरं सांगू का? लेखात मध्ये मध्ये दिलेली चित्रं जास्त आवडीनं पाहतोय. निरनिराळ्या शैलींमधले फरक, बारकावे वगैरे काही कळत नाहीयेत हे खरं, पण कांगडा शैली अन रविवर्म्याच्या पध्दतीमधल्या चेहर्‍यांच्या ठेवणी, पेहराव, रंगसंगती इत्यादी गोष्टी मात्र एंजॉय करतोय. :) ठ्यांकू!

@धमु ...लेखात मध्ये मध्ये दिलेली चित्रं जास्त आवडीनं पाहतोय ... 'देवादिकांच्या तजबिरींमधील चित्रांची कहाणी' असा खास या विषयावर लेख लवकरच लिहिणार आहे. त्याबद्दल काही सूचना असल्यास अवश्य द्याव्यात.

वेगवेगळ्या चित्रकारांच्या वेगवेगळ्या शैलींवर सचित्र आणि सोदाहरण भाष्य आले तर वाचायला आवडेल. त्यातून चित्रकलेतील तांत्रिक तपशिल समजण्यास मदत होईल असे वाटते.

येऊंद्या लवकर. :) विषय तर मोठा खासा निवडलाय बुवा. मजा येईल वाचायला अन शिकायला. अन सुचना काय देणार मी ढढ्ढोबा? हां, निरनिराळ्या प्रांतांमधल्या चित्रकारांच्या शैलीवरचा प्रभाव, रंगसंगतीतले फरक, कॅरेक्टर्सची वैशिष्टं असंही आलं तर छान! उदा. राजा रविवर्मा आणि त्यांची छाप असलेल्या चित्रकारांच्या चित्रांमधल्या स्त्रियांची शरीरं भलतीच घाटदार असतात. केसही बहुतेकदा सरळसोट नसतात, थोडेसे कुरळेसे असतात. चेहरे गोल असतात, अन तब्येतीनं थोडे खात्यापित्या घरचे वाटतात. तेच राजस्थानी चित्रांमधले कॅरेक्टर्स उभट चेहर्‍यांचे, बहुतांश कॅरेक्टर्सचे केस सरळ असतात. आणि कॅरेक्टर्स शिडशिडीत असतात (असं मला वाटतं.) बाकी चित्रकलेतले बारकावे वगैरे कळण्याची अक्कल नाही मला..पण असंच काहीसं डिटेलिंग आलं तर छान! असा एक विचार तरळला. :) बाकी, विशेष दखल घेऊन विचारलंत त्याबद्दल मंडळ आभारी आहे. :)

महाभारतात संदर्भ मिळणार नाहीत बहुतेक, कारण हा सर्व माझा कल्पनाविलास आहे. १. नुस्ते आपापसात मारामारी करून सर्व यादव कसे ठार झाले? २. अर्जुनासारख्या महान धनुर्धराचा पराभव अभीर कसा करू शकले? ३. कृष्णाला पारध्याने पावलात बाण का मारला? अश्यासारख्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

ह्या सर्व चित्रातील स्त्रीया अगदी निर्वस्त्र होऊन उघड्यावर (नदीवर) आंघोळ करीत आहेत हे जरा नवलाचे वाटते. पुरूषही कधी 'अशी' आंघोळ करीत असतील असे वाटत नाही. आजकालच्या तथाकथित पुढारलेल्या समाजातही पुरूष (निदान) एका वस्त्रावर आणि स्त्रिया दोन वस्त्रांवर आंघोळ करताना/पोहताना दिसतात. पण कृष्णकालीन समाज आपल्यापेक्षा बराच पुढारलेला होता असे दिसते आहे.