चित्रगुप्तांचा कल्पनाविलास आवडला. आणि इतर माहितीपूर्ण चर्चा आणि वल्लीचा दुसरी बाजू दाखवणारा संवाद सगळंच आवडलं! एकूणात ज्ञान आणि मनोरंजन युक्त मस्त धागा!
वेगळ्या कोनातून महाभारताकडे बघणारी चित्रमय कथा आवडली.
व्यासांनी साधारणपणे "जसे घडले तसे" लिहून ठेवले आहे... प्रसंगाचे विश्लेशण अथवा मानसिकता उलगडायचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे चित्रगुप्तजी आणि वल्लीसाहेब दोघांचेही दृष्टीकोन किंवा दोघांच्या दृष्टीकोनांतले थोडेथोडे असे काहिही खरे असू शकते किंवा सत्य अजून काही वेगळे सुद्धा असू शकेल... आणि ह्याच गोष्टीने हजारो वर्षांनंतरसुद्धा महाभारताचे आकर्षण कायम आहे.
मूळ लेख आणि प्रतिसाद वाचताना खूप मजा आली.
महाभारत कथेची पार्श्वभूमी, पीडीतांचे क्रांतीकारी विचार, अत्योत्तम चित्रसंगती... हे सर्व मिळुन अफलातुन कलाकृती तयार झाली. एकदम झकास.
पण शेवट फारसा रुचला नाहि.
अभिरमन्यु चाचा नेहरु व्हायला हवा होता, तो विनाकरण बॅ. जीना झाला.
यादवांचं आयुष्य एकुणच वादळी होतं. पहिले तर क्षत्रीय समाजात मान्यता मिळवायला संघर्ष. मग मिळवलेलं स्थान टिकवुन ठेवायला संघर्ष. अभिरमन्यु पहिल्या दोन भागात जितका बुद्धीमान रंगवला गेलाय, त्यातुन त्याला जंगली आदिवासी समाज व्यवस्था व (सो कॉल्ड) सुसंस्कृत शहरी राज्यव्यवस्था यातील भेद ठसठशीतपणे जाणवायला हवा होता. शहरी राज्यव्यवस्था अपरिहार्य आहे हे उमगायला हवं होतं. अभिरमन्यु शेवटी पोथीनिष्ठ कम्युनिझम व अरुंधती रॉय/मेधा पटकर या मायबापांचं कन्फ्युस्ड अपत्य ठरला.
श्रीकृष्णाने कंसापासुन गोकुळाचे रक्षण केले. ते केवळ मानवाधिकार कॅटॅगरीचे नव्हते, तर सुदृढ ग्रामीण अर्थव्यवस्थेला मास बिझनेस टाईप शहरी अर्थव्यवस्था भारी पडत होती, ति ग्रामीण व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न कृष्णाने केला. कर्मकांडात अडकुन पडलेला भक्तीभाव त्याने निसर्गाकडे वळता केला (गोवर्धन पूजा). प्रसंगी पशुपालनाला बाधक ठरणारे नागवंशीय जीवन त्याने गोकुळापासुन दूर लोटले (कालिया मर्दन). पुढील काळात राजकारणाच्या प्रवाहाचा वापर करुन सामाजीक अभिसरण घडवुन आणाण्याचा प्रयत्न केला (जांबुवंताच्या मुलीशी लग्न करणे, १६००० बायका करणे). तत्कालीन जनसामान्यांच्या भल्यासाठी त्याने जे काहि प्रयोग केले चाणाक्ष्य अभिरमन्युला उमगायला हवे होते. हीच पायवाट पुढे अभिरांच्या उत्थानाचा राजमार्ग बनवणे त्याला शक्य होते/ते जास्त प्रॅक्टीकल होते.
असो. शेवटी हा कल्पनाविलास आहे. कोणते पात्र मनाच्या कुठल्या दशेत काय करेल हे सर्वस्वी लेखक ठरवणार.
वल्लीशेठचा "श्रीकृष्ण उवाच" लय भारी.
अर्धवटराव
ठीक आहे पण बर्याचश्या वाक्यांवर हसु आवरता आले नाही उदा.
राजसूय यज्ञाचे वेळी तुझ्यापेक्षा अनेक वयोवृद्ध, थोर पुरुष उपस्थित असूनही अग्रपूजेचा मान मात्र तुला मिळावा, यावर शिशुपालाने हरकत घेतली म्हणून जसा तू तडकाफडकी त्याचा वध केलास,या दिवशी कर्ण तुला निश्चितच ठार करणार होता. परंतु तू माझी शिकार होतास.मी धारदार खड्गाने अर्जुनाचे पूर्ण मुंडण केले, आणि त्याच्या कपाळावर अभीर-भैरवाची तप्त लोहमुद्रा उमटवून त्याला वृद्ध-अपंगांच्या जथ्यासह हस्तिनापुराच्या दिशेने रवाना केले.
=)) =)) =))
भयानक विनोदी लिखाण. लेखन स्वातंत्र्याच्या नावावर जी काय तोड फोड केली आहे ती भन्नाटच आहे.
असे सुचते तरी कसे म्हणतो मी. श्रीकॄष्णाचा सर्व खजीना एका वस्त्रात भरणे काय, हजारो सैनीकांना कंठस्नान घालणार्या अर्जुनाला दगड मारून जायबंदी करणे काय, अर्जुनाचा चुकणारा नेम काय, कुठची कुठची चित्र शोधून बादरायण संबंध जोडणे काय... अशा भरपूर विनोदी घटनांनी हा भाग ठासून भरला आहे.
इतिहास स्वतःच्या नजरेतून बघायच प्रयत्न सगळेच करतात. पण इतका विनोदी प्रयत्न दुसर्या कुणाला जमला नसता आणि जमणारही नाही.
गोविंदाच्या सिनेमांसारखी भरदोल एंटरटेनमेंट :)
कृष्णाने सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी लग्न करणे, ऐन युद्धाचे वेळी तासन तास गीतेचे श्लोक ऐकवणे, 'पाच जणात भिक्षा वाटून घ्या' असे आईने सांगितले, म्हणून द्रौपदीला पाच जणांनी वाटून घेणे, परपुरुषांकडून 'नियोग' करवणे, बाण सोडून पाऊस पाडणे, मडक्यातून शंभर मुलांचा जन्म, दोन वर्षे गर्भात रहाणे, अश्या अनेक तुफान विनोदी गोष्टी महाभारतात आहेत, त्यात आमची थोडीशी भर.
अर्जुन द्वारकेतील स्त्रिया व संपत्ती घेऊन निघाला होता, त्याला अभीरांनी हरवून स्त्रिया व संपत्ती लुटून नेली, त्यावेळी अर्जुनाचा 'अक्षय भाता' काम करेनासा झला, तो 'मंत्र' विसरला, कृष्णाला पारध्याने पावलात बाण मारल्याने त्याचा अंत झाला, वगैरे सर्व महाभारतात आहेच, ते कसे घडले असावे, याबद्दल कल्पना केली आहे.
नियोगात नेमके काय विनोदी आहे असे तुम्हाला वाटते?
शिवाय सोळा हजार स्त्रियांशी लग्न करण्याची कथा तुम्हाला सविस्तर माहित आहे असे दुसर्या धाग्यातील प्रतिसादातून दिसते. मग त्याची संभावना इथे विनोदी म्हणून का केली ते ही सांगितलेत तर आवडेल.
रीकॄष्णाचा सर्व खजीना एका वस्त्रात भरणे काय, हजारो सैनीकांना कंठस्नान घालणार्या अर्जुनाला दगड मारून जायबंदी करणे काय, अर्जुनाचा चुकणारा नेम काय, कुठची कुठची चित्र शोधून बादरायण संबंध जोडणे काय... अशा भरपूर विनोदी घटनांनी हा भाग ठासून भरला आहे.
इतिहास स्वतःच्या नजरेतून बघायच प्रयत्न सगळेच करतात. पण इतका विनोदी प्रयत्न दुसर्या कुणाला जमला नसता आणि जमणारही नाही.
गोविंदाच्या सिनेमांसारखी भरदोल एंटरटेनमेंट
चित्रगुप्त, अत्यंत कष्टपुर्वक महाभारत कालीन घटना चक्राच्या कचाट्यातील चक्रावून टाकणाऱ्या सूत्रांना लीलया गुंफून तयार केलेली लेखमाला वाचनीय व मननीय होती . त्यामुळे आपल्या कष्टांचे कौतुक व आभार! अनेक लोकांनी विविध प्रतिसादातून आपले कौतुक केले आहे. या लेखमालेला वल्ली यांच्या माहिती पुर्ण कलाबतूंनी मालेला हाराचा भारदस्त पणा आणला त्यांचे ही आभार
महाभारत एक महासागर आहे. आपापल्या दृष्टीकोनातून प्रत्येक सर्जक मोती वेचतो. आतापर्यंत विभिन्न भाषेत हजारो लेखकांनी आपापल्या दृष्टीने महाभारतातील पात्रांना रंगविले आहे. चित्रगुप्त यांनी आपली कथा सुंदर रीतीने मांडली आहे. मला ही कथा आवडली.
प्रतिक्रिया
बहुत बढीया!!
धन्यवाद ....
कल्पनाविलास
__/\__
वेगळ्या कोनातून महाभारताकडे
आवडलं बॉ ! चित्र अन गोष्ट
शेवट काहि रुचला नाहि.
ठीक
+१११११११
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
विनोद
नियोगात नेमके काय विनोदी आहे
रीकॄष्णाचा सर्व खजीना एका
बेशर्त स्वीकृती.
अतीशय सूदंर कल्पनाविस्तार
नवीन मिपाकरांसाठी.
कल्पना विलास व सत्य घटनांची बेमालूम भन्नाट मिसळ
महाभारत एक महासागर आहे.
अगदी जहबरदस्त लेख माला
चलो एक बार फिर से..
धन्यवाद
Pagination