Welcome to misalpav.com
लेखक: संजय क्षीरसागर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

या धाग्यावर किंवा या विषयावर काहीही लिहायची माझी कुवत नाही पण माउलींचे चित्र एकटक पाहता असेच वाटते की, अधिक देखणे तरी निरंतर पाहणे योगिराज विनवणें मन आले ॐ मयी ।

अधिक देखणे तरी निरंतर पाहणे योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । दॅट्स द पॉइंट! लेखात न कळण्यासारखं काही नाही. ती एक निर्वैयक्तिक प्रक्रिया आहे. अँड इट हेल्प्स यू टू फोकस, एनी वे. अध्यात्म कळो न कळो त्यानं फरक पडत नाही.... ट्राय.

चौथा परिच्छेद
मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल.
मग आता ही तीन अंग कुठून आली? अंग आणि विंग्ज यात फरक काय? ऑडिओ म्हणजे श्राव्य आणि विज्युअल म्हणजे दृक ना? मग हे तिसरे 'अंग' कुठून आले?

आमच्या एका मित्रवर्यांनी एका निरुपद्रवी संप्रदायाच्या शिकवणीबद्दल "शब्द जंजाळ" असा शब्द प्रयोग केला होता त्याची आठवण झाली.

थोडा तर्क लावत जा की राव. तुम्हीच शोधू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरे. प्रत्येक वेळी दुसर्‍याने पोथी उलगडून सांगितली पाहिजे असं काही नाही.

ईश्श्य! काहीतरीच काय! -------------------- भांडता येणे ही कला आहे आणि सतत भांडत राहाणे हे मी सिद्ध केलेले शास्त्र आहे. आता याबद्दल कोणाचे दुमत असूच शकत नाही. आणि की नै मला जिलब्या लै आवडतात. आणि आजपर्यंत तरी कोणीही माझ्या याही गोष्टीला बिनतोड प्रतिवाद करूच शकलेलाच नाहीच.

@लैच क्यूट की कायसंसं आहे बॉ.>>> अरे ब्याटम्याना, मनापसून बोललेलं सत्य आहे ते! :) स्व'तःचा स्विकार केलेला तुझ्या/माझ्या सारखाच सामान्य माणूस आहे तो! ;)

अस आहे होय. मी हा अभंग असा ऐकत होतो " कधी कधी कधी कधी निरंजन पाहणे, योगिराज विनवले मन आले हो माये|" म्हणल असल ब्वॉ काहीतरी अध्यात्मिक भानगड. श्राव्यामधे शब्दांच्या स्पष्टता पुरेशा नसल्या कि अस होत. असो! बाकी काही समजले नाही तरी मन हे अगम्य आहे या बाबतीत दुमत नसावे. विज्ञान दुर्बोध मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करीतच आहे. ती निरंतर प्रक्रिया असावी.

ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली प्रक्रिया, अर्थ आणि साध्य यांच्याशी सुसंगत नाहीत. निरंजन म्हणजे निराकार (ज्याला कसलाही लेप लागत नाही) असा अर्थ असला तरी प्रक्रिया 'निरंतर पाहणे' अशी आहे. पुढे, `मन आले वो माये' असं म्हटलं जातं. ते शब्द साध्य (मनाचं ॐ कारमय होणं) दर्शवत नाहीत. >असो! बाकी काही समजले नाही.. हे आवर्जून सांगायला प्रतिसाद दिलात त्याबद्दल काय लिहीणार? लेख शांतपणे वाचून, ती प्रक्रिया समजावून घेऊन, तिची सार्थकता पटल्यावर, स्वतः प्रयोग करुन पाहिला, तर अनुभव येईल कारण ज्ञानेश्वरांसारख्या दिग्गजाचे ते शब्द आहेत. ऐकिव शब्दांशी लेखनातले शब्द जुळत नाहीत हे सांगायला, लगबगीनं दिलेल्या प्रतिसादात, यापेक्षा वेगळं ते काय असणार?

"निरंजन पाहणे" सुद्धा असू शकतं, कारण त्याच ओवीत पुढे "चंदन देहीं भरला, अश्वत्थ फुलला. तैसा म्या देखिला, निराकार वो माये" असे शब्द आहेत. जे बाय डेफिनिशन शब्दातीत/वर्णनातीत आहे ते शब्दांत पकडण्याचा माऊली प्रयत्न करत आहेत असा त्या ओव्यांचा सूर वाटला. हा सगळ्या ज्ञानेश्वरीचाच अंतःप्रवाह वाटतो. उपमा उत्प्रेक्षांची आणि दृष्टांतांची खैरात यामुळेच असावी. जे हजारो शब्द खर्ची घालून पकडता येत नाही ते एका दृष्टांतात श्रोत्याला पटवणं ग्रेट आहे.

तुम्ही झाझेन ही ध्यानप्रक्रिया करून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की काही सेकंद देखिल, मन आपल्याला निरंतर पाहू देत नाही. विचरांची दृष्यमय प्रोजेक्शन्स आपलं लक्ष वेधून घेतात किंवा मानसिक संवादात आपण इनवॉल्व होतो. निरंतरचा अर्थ `विदाऊट दि इंटरप्शन ऑफ अ सिंगल थॉट' असा आहे. थॉट ही निरिक्षणातली गॅप आहे. त्यामुळे `अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' ही साधना आहे. चंदन देही भरला, अश्वत्थ फुलला. तैसा म्या देखिला, निराकार ॐ मयी । या ओळींचा अर्थ आणखी गहन आहे. कारण मुळात निराकार गंधहिन आहे, विदेह आहे. आणि त्याही पुढे जाऊन तो निर्लिप्त आणि संपूर्ण विकसित आहे. लेखावर चर्चा भलत्याच अंगानं चाललीये. इथे उघड असलेल्या गद्याचीच पंचाईत तर रुपकात्मकाविषयी काय लिहीणार? मी त्या काव्यपंक्तींच रसग्रहण नंतर लिहीन.

नेवैद्य ठेवला...... ते आले ..एक बरीक खरं तो .. साधक फारच चिवट दिसतोय व ते गगनविहारी तर महाचिवट !

तुम्ही म्हणता ते सगळे केल्या नंतर समजा प्राप्तझाली तुम्ही म्हणता तशी मनाची आवस्था. कळले की मी त्याचेच एक रुप आहे. पण त्या नंतर जेव्हा पोटात आग पडेल तेव्हा या भासमान जगात यावेच लागेल ना भासमान भोजन घ्यायला? ते भोजन मिळवण्यासाठी भासमान धडपड करावीच लागेल ना? काहि क्षणांसाठी मनाला कसे फसवले याचे समाधान कदाचीत आपल्याला मिळेल पण तरी शेवटी मनाला आणि शरीराला शरण जावेच लागेल. पिंजर्‍यातल्या पोपटाने गरुड भरारीचे कितीही स्वप्न बघितले तरी भुके साठी त्याला त्याचा मालक शिकवेल तशी पोपटपंची करावीच लागते. निर्गुण निराकाराचा प्रत्यय क्षणीक असतो.तर तहान, भुक, कामतृप्ती या भावना शाश्र्वत असतात. त्या निर्गुण निराकाराचा प्रत्यय घेतल्या नंतरही तशाच शाश्र्वत रहातात. दैहिक विवंचनेतुन माणसाची सुटका कदापि नाही, त्याच शाश्र्वत आहेत. बाकी सब झुट. हे विश्र्व आणि मी एकाच वयाचे आहोत. कारण मी जेव्हा या विश्र्वात आलो तेव्हाच ते माझ्या दृष्टीने अस्तीत्वात आले. त्या आधि ते नव्हते आणि माझ्यानंतरही ते नसेल. मला जे समजत नाही असे या विश्र्वात काही नाही आणि मला जे समजत नाही ते अस्तित्वातच नाही. असे जर असेल तर उगाच काहितरी शोधण्यात मी वेळ वाया का घालवावा? त्या पेक्षा "भाग मिल्खा भाग" पहाण्यात मला जास्त आनंद मिळतो.

अध्यात्माविषयी जनकल्पना अचाट आहेत. एकतर हे जग भासमान नाही. ते कालबद्ध आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत याच जगात आपल्याला जगायचंय आणि ते जगणं आनंदाचं व्हावं यासाठी अध्यात्म आहे. आकार आणि निराकारचा समन्वय अध्यात्म आहे. अध्यात्मामुळे धकाधकीच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होतं कारण निराकार स्थिर आहे. त्याचं दिसणं तुम्हाला स्थिर करतं. त्याही पुढे जाऊन, अध्यात्म मृत्यूचा धसका संपवत, कारण सध्या देहात असलो तरी मुळात आपण विदेह आहोत हा अत्यंत फंडामेंटल उलगडा अध्यात्मानं होऊ शकतो. आता तुमचे प्रश्नः >पण त्या नंतर जेव्हा पोटात आग पडेल तेव्हा या भासमान जगात यावेच लागेल ना भासमान भोजन घ्यायला? ते भोजन मिळवण्यासाठी भासमान धडपड करावीच लागेल ना? = अर्थात, पण ती धडपड रहात नाही याचं बेसिक कारण म्हणजे आतून मन प्रत्येक गोष्ट `अस्तित्वाला धोका आहे' अशा तर्‍हेनं सांगत असतं. पण ती वस्तुस्थिती नाही हे तुमच्या लक्षात येतं. >काहि क्षणांसाठी मनाला कसे फसवले याचे समाधान कदाचीत आपल्याला मिळेल पण तरी शेवटी मनाला आणि शरीराला शरण जावेच लागेल. = मन तुम्हाला फसवतंय. मानसिक धारणांमुळे आपल्याला आपण व्यक्ती आहोत असं वाटतंय. आणि आपल्या निराकारत्वाचा उलगडा होत नाही. मनाला आणि शरीराला शरण जाण्याचा प्रश्नच नाही. मन, शरीर आणि आपण (निराकार जाणिव) ही एक सिंगल हार्मनी होते. जसं बाहेर अस्तित्व एकसंध आहे, तसे आत आपण एकसंध होतो. जगण्यात मजा येते. >निर्गुण निराकाराचा प्रत्यय क्षणीक असतो.तर तहान, भुक, कामतृप्ती या भावना शाश्र्वत असतात. त्या निर्गुण निराकाराचा प्रत्यय घेतल्या नंतरही तशाच शाश्र्वत रहातात. दैहिक विवंचनेतुन माणसाची सुटका कदापि नाही, त्याच शाश्र्वत आहेत. बाकी सब झुट......असे जर असेल तर उगाच काहितरी शोधण्यात मी वेळ वाया का घालवावा? = तुम्हाला निर्गुणाचा अनुभव नाही! तुम्ही ज्यांच नांव घेतलंय त्यांचं अनुसरण करत नाही. ते तर म्हणतायंत : पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी । असे प्रतिसाद, आपल्या श्रद्धास्थानांवर आपलाच विश्वास नाही हे दर्शवतात. तोही एकवेळ व्यक्तिगत प्रश्न आहे पण त्यामुळे आपण इतरांची दिशाभूल करतो याचं भान असणं आगत्याचं आहे. >त्या पेक्षा "भाग मिल्खा भाग" पहाण्यात मला जास्त आनंद मिळतो. तेच तर दुर्दैव आहे कारण मिल्खा किती भागेल? आणि कितीही भागला तरी शेवटी त्याला मृत्यू गाठेलच! ज्याला निवांतपणी झाला नाही त्याला निर्वाणीच्या क्षणी, त्या घालमेलीत, निराकाराचा उलगडा असंभव आहे.

असे प्रतिसाद, आपल्या श्रद्धास्थानांवर आपलाच विश्वास नाही हे दर्शवतात. तोही एकवेळ व्यक्तिगत प्रश्न आहे पण त्यामुळे आपण इतरांची दिशाभूल करतो याचं भान असणं आगत्याचं आहे.
जर कोणी आपल्या विचारां बद्दल असहमती दर्शवली तर त्याचा प्रतिवाद करताना व्यक्तीगत टिका करण्याचे काहिच प्रयोजन नाही. ज्ञानोबाराया मला पूर्णपणे उलगडला असा माझा मुळीच गैरसमज नाही. किंबहुना मी ज्ञानोबारायासारखा होण्याचा मुळी प्रयत्नच करत नाही. ती निर्गुण निराकार आवस्था त्यालाच लखलाभ होवो. माझ्या मर्यादांची मला पुर्णपणे जाणीव आहे, त्यातच माझ्या बरोबर निवृतीनाथांसारखा गुरु ही नाही. त्या मर्यादांमधे राहुन तुम्ही ज्या मर्गावर चालायचा प्रयत्न करता तो माझ्या सारख्या सामान्यांसाठी नाही इतकेच मी सांगु इच्छीतो. त्याही पुढे जाऊन, अध्यात्म मृत्यूचा धसका संपवत :- या असल्या दाव्यांनाच माझा विरोध आहे. अध्यात्मामुळे नक्की कोणते फायदे तोटे याचा दावा या क्षेत्रातले दिग्गजदेखील करत नाहीत. तो पुर्णपणे व्यक्तीगत सापे़क्ष अनुभव असतो. असल्या सवंग दव्यांमुळेच माझ्या सारखे सामान्य लोक साशंक होतात. सध्या देहात असलो तरी मुळात आपण विदेह आहोत :- हा देह आहे म्हणुनच आपल्याला विदेही पणाची जाणीव होते. समजा हा देहच नसता तर? पिंजर्‍यातल्या पोपटाला पिंजरा तोडणे शक्य नसते. उगाच त्याला गरुडभरारीची स्वप्ने दाखवु नयेत. मन तुम्हाला फसवतंय. मानसिक धारणांमुळे आपल्याला आपण व्यक्ती आहोत असं वाटतंय :- माझे मन मला का बरे फसवेल? ते माझ्याशी का म्हणुन वैर घेईल? माझे मन जर खरोखर माझे असेल तर ते माझ्या हिताचाच विचार करेल. मनाच्या शक्ती बद्दल बोलायचे झाले तर वेगळा धागा काढावा लागेल. आणि क्षणभर समजून चालु की तुमचे मन तुमच्याच विरुध्द बंडखोरी करतय. तर त्याला जागेवर आणायचे सोडुन तुम्ही त्याला बाजुला फेकुन द्यायला सांगत आहात. घरातला लहान मुलगा जर बंडखोरी करु लागला तर त्याला वठणीवर आणायचे की त्याला दुर्लक्षीत करुन बाजुला टाकायचे? माझे शरीर, माझे मन,माझा मेंदु व त्यातल्या माझ्या स्मृती आणि सगळ्यात शेवटी माझा आत्मा हे सगळे एकत्र म्हणजे मी आहे. या पैकी एकाच्याही अनुपस्थीतीमुळे माझे अस्तित्व संपते. तेच तर दुर्दैव आहे कारण मिल्खा किती भागेल? आणि कितीही भागला तरी शेवटी त्याला मृत्यू गाठेलच :-यात तुम्ही काहीच नविन सांगत नाही आहात. मृत्यु हेच एकमेव शाश्र्वत सत्य या जगात आहे. मिल्खा धावला किंवा नाही धावला तरी त्याचा मृत्यु अटळ आहे. आणि हाच नियम या जगात आलेल्या सगळ्यांसाठी आहे. पण त्या चित्रपटाने जो आनंद मला दिला त्या आनंदाची तुलना मी तुम्ही वर्णन केलेल्या आनंदाशी केली तेव्हा चित्रपट बघणे मला जास्त आनंददायी वाटले. ज्याला निवांतपणी झाला नाही त्याला निर्वाणीच्या क्षणी, त्या घालमेलीत, निराकाराचा उलगडा असंभव आहे. :- मुळात ज्ञान हे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती कडे सारखेच असते. ते वढु शकत नाही किंवा कमी होउ शकत नाही. चांगला गुरु सुध्दा नेहमी तुम्हाला तुमच्या कडल्या ज्ञानाची जाणीव करुन देत असतो. माझ्या कडे जे आहेच त्याची जाणीव फक्त माझ्या मेंदुच्या पातळीवर करुन घ्यायचा हा सगळा खाटाटोप वाटतो.जो प्रश्र्ण आपल्याला डिग्रीच्या परिक्षेला विचारला जाणार आहे त्याची तयारी के.जी. मधे कशाला करायची? वेळ आली की सगळे आपोआप समजेलच ना.

.......अरे रे रे रे........!
अजूनी तो हरित नयनांचा आला नाही का धाग्यावरी? की मनी विहरते आहे त्याच्या "संदेशा"ची ती परी ? करोनी कौतुके घेतो, तो कुणाही झाडावरी कडवट निघते आतून,ती-जो-देतो ती कॅडबरी सावध रहा हो नव अभ्यागत,बोक्य्या पासूनी या..! परगोलॅक्स वर्खुनी देतो,सांगतो ही "मिठाई" खा..! गोड गोड वाटून आपण भक्षितो दोन/तिन "गोळ्या" तरी..! नंतर सुरु होते आपुली - डबडे घेऊन बारी ! जेंव्हा आपण पुसतो तयाला,का मजला फसविले..! म्हणतो तो "ह्या-ह्या" करूनी,"अत्ता का तुझ्या लक्षात आले???" आजचा तांब्या संपला ,जातो टाकून मी जिल्बी..! नव-लेखकूंन्नो सावध राहा हो, अचानक व्हाल एल्बी..! =))

खरे स्थितप्रज्ञ कोणालाही सुधारण्याचे प्रयत्न करत नाहीत. त्यांच्या संगतीचा परिणाम होऊन सुधारणारे आपोआप सुधारतात. फूल उमलणे ह्याप्रमाणेच व्यक्तिव उमलणे ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती स्वत:च्या गतीने होतच असते. कोणी उपदेश केला किंवा नाही केला तरी ती प्रक्रिया थांबत नाही. रोपटे लावल्यानंतर फूल उमलण्याची वाट पहावी लागते. ते फूल आत्ताच इथेच ह्याच क्षणी उमलले पाहिजे म्हणून रोपटे मुळांसकट उपटून काढणे हे स्थितप्रज्ञाचे लक्षण निश्चितच नाही. इतरांची रेडीमेड उत्तरे ऐकून व्यक्तित्वाचा खरा विकास घडत नाही. म्हणूनच खरे स्थितप्रज्ञ कोणाचेही व्यक्तित्व घडवत नाहीत तर स्वत:कडे कसलेही श्रेय न घेता तुमच्या मूळ व्यक्तीत्वावरील आवरण दूर करतात. त्यासाठी संयम आवश्यक असतो. "आम्हाला कोणी समजूनच घेत नाही", अशी तक्रार एकाही स्थितप्रज्ञाने केल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही.

ते फक्त त्यांच म्हणणं मांडतात. >त्यांच्या संगतीचा परिणाम होऊन सुधारणारे आपोआप सुधारतात....म्हणून रोपटे मुळांसकट उपटून काढणे हे स्थितप्रज्ञाचे लक्षण निश्चितच नाही. = काय वाट्टेल ते आख्यान लावलंय. इथे कुणी कुणाला मुळांसकट उपटू शकत नाही. >इतरांची रेडीमेड उत्तरे ऐकून व्यक्तित्वाचा खरा विकास घडत नाही..... "आम्हाला कोणी समजूनच घेत नाही", अशी तक्रार एकाही स्थितप्रज्ञाने केल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही = बुद्ध त्याच्या वेळीही लोकांना समजला नव्हता आणि शून्यत्वाची त्याची संकल्पना अजूनही लोकांना समजत नाही. अभ्यास वाढवा. आणि मी काय म्हणतो, तुम्हाला स्थितप्रज्ञाची इतकी लक्षण वगैरे माहिती आहेत आणि स्वतःला `आवतार' म्हणवताय तर तुमचं आकलन स्वतंत्रपणे मांडा मग बघू... का आवतार फक्त प्रतिसाद देण्यासाठीच घेतलाय?

बुद्ध त्याच्या वेळीही लोकांना समजला नव्हता आणि शून्यत्वाची त्याची संकल्पना अजूनही लोकांना समजत नाही. अभ्यास वाढवा.
बुद्ध त्याच्या वेळी लोकांना समजत नव्हता म्हणून त्याने आकांडतांडव केल्याचे किंवा लोकांशी तुच्छतेने बोलल्याचेही कुठे नमूद नाही.

बुद्ध त्याच्या वेळीही लोकांना समजला नव्हता...
मूळ वाक्य नीट वाचले तर अर्थ कळू शकेल. "आम्हाला कोणी समजूनच घेत नाही", अशी तक्रार एकाही स्थितप्रज्ञाने केल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही बुद्ध किती लोकांना समजला होता यापेक्षा बुद्धाने किती लोकांना समजून घेतले हे जास्त महत्वाचे आहे. अभ्यास वाढवण्याची गरज कोणाला आहे हे यातून स्पष्ट व्हावे.
तुमचं आकलन स्वतंत्रपणे मांडा मग बघू...
वरील प्रतिसादात स्वतंत्र आकलन मांडण्याचाच प्रयत्न केला आहे. स्वतंत्र आकलन केवळ लेखातूनच मांडता येते हे आजच कळले. जे सत्य मोजक्या शब्दांत मांडता येते त्यासाठी भाराभर शब्द वापरणे हे इतरांना सोयीचे वाटत असले तरी मला गैरसोईचे वाटते.
मग बघू...
हे आव्हान झाले. आवाहन नव्हे. आव्हान देणे आणि स्वीकारणे हे अहंकाराच्या पातळीवर शोभून दिसते. सत्याच्या शोधात असणाऱ्यांना स्वत:चे म्हणणे सिद्ध करण्यासाठी आव्हान देण्याची गरज पडू नये.

तुमचं अध्यात्मिक आकलन काय आहे ते पाहा : >खरे स्थितप्रज्ञ कोणालाही सुधारण्याचे प्रयत्न करत नाहीत. त्यांच्या `संगतीचा परिणाम होऊन' सुधारणारे आपोआप सुधारतात.. ...वगैरे वगैरे = इंटरनेटवर लेखन होतं. संगत नाही. आणि पुढे तर तुमचा प्रतिसाद फार विनोदी आहे : >रोपटे मुळांसकट उपटून काढणे हे स्थितप्रज्ञाचे लक्षण निश्चितच नाही. = इथे कोण कुणाला उपटतंय? का नुसतं लिहीत सुटायचं. >इतरांची रेडीमेड उत्तरे ऐकून `व्यक्तित्वाचा खरा विकास' घडत नाही ? = आहो व्यक्तित्व हीच तर वैयक्तिक धारणा आहे. त्याचा विकास कुठून काढला?... पण पुढे स्वतःची चूक लक्षात आली हे नशिब. > म्हणूनच खरे स्थितप्रज्ञ कोणाचेही व्यक्तित्व घडवत नाहीत तर स्वत:कडे कसलेही श्रेय न घेता तुमच्या मूळ व्यक्तीत्वावरील आवरण दूर करतात. = श्रेय दोन्हीकडे असतं. ज्ञानी, शिष्य समजू शकला म्हणून आनंदित होतो तर शिष्य, गुरूनी समजावलं म्हणून उतराई होतो. >त्यासाठी संयम आवश्यक असतो. = हा काही आश्रम नाही. आणि कुणाकडे गुरूपद नाही. तुम्ही कसल्या गोष्टी करता आहात? > "आम्हाला कोणी समजूनच घेत नाही", अशी तक्रार एकाही स्थितप्रज्ञाने केल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही. = तुम्ही फेकत राहा. अश्या तक्रारींच्या नोंदी अध्यात्मिक ग्रंथात किंवा त्यांच्या चरित्रात होत नाहीत. बुद्धाला अवहेलना सहन करावी लागली हा इतिहास आहे. आणि संयम म्हणाल तर त्याचा शून्यवाद अजूनही लोकांना समजत नाही ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला थोडं जरी अध्यात्मिक आकलन असतं तर बुद्ध ज्याला शून्य म्हणतो त्यालाच ज्ञानेश्वर : `तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी' म्हणतायंत हे लक्षात आलं असतं आणि तुमचा फोकस `स्थितप्रज्ञाची लक्षणं' वगैरे शोधण्याऐवजी लेखनावर राहिला असता. >आव्हान देणे आणि स्वीकारणे हे अहंकाराच्या पातळीवर शोभून दिसते. शाब्बास! आहो, लेख `अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' या प्रक्रियेवर आहे, त्याविषयी तुमच्या प्रतिसादात एक शब्द नाही. प्रतिसादात तुम्ही स्थितप्रज्ञाविषयी लिहीतायं, इथे तुम्हाला ते कुणीही विचारलेलं नाही. म्हणून म्हटलं की त्याविषयी तुमचं आकलन स्वतंत्रपणे मांडा. आणि `मग बघू ' यात तुम्हाला भिती वाटलेली दिसते कारण भय हेच तर अनाकलनाचं मुख्य लक्षण आहे आणि अहंकार त्याचा परिपाक आहे.

ते लेखकाविषयी लिहीतायंत. ज्या संकेतस्थळाचा नांवलौकिक लेखनावर फोकस असण्याचा आहे त्याच्या हे विरुद्ध आहे. लेख आणि प्रक्रियेविषयी विद्वजनांचा एकही प्रतिसाद नाही. आणि मजा म्हणजे ज्ञानेश्वरांसारख्या व्यक्तीच्या काव्यपंक्तीवर लोक ही ज्ञानसुमनं उधळतायंत! मला खरंच कुतुहल आहे. लेखात कुणाची निंदा नाही. कुणाची कुणाशी तुलना नाही. जे सांगितलंय ते कंटेपररी युगात, मनाच्या प्रक्रियेचा अभ्यास करून, स्वानुभवातनं लिहीलं आहे. कुणीही लेखनविषयाशी संबंधित लिहावं मी चर्चेला तयार आहे. आता यात माझी काय चूक असू शकते?

ज्ञानेश्वरांसारख्या व्यक्तीच्या काव्यपंक्तीवर लोक ही ज्ञानसुमनं उधळतायंत!... नाहीतर काय. कळतच नाही काही कुणाला इथे.

कळतच नाही काही कुणाला इथे. मग नायतर काय:-( एका ओळॆच्या प्रतिसादासाठि चार चार ओळि स्वाक्षरी म्हणजे फुकट शाई अन वेळ वाया घालवायचे धंदे.;-)

इथे वारंवार विनोदी आणि हास्यास्पद कोणाला ठरवले जात आहे ते एव्हाना पुरेसे स्पष्ट झाले आहेच.
बुद्धाला अवहेलना सहन करावी लागली..
याचा अर्थ ज्यांची अवहेलना होते ते सर्वच बुद्ध असतात, असा नक्कीच नाही.
तुम्हाला थोडं जरी अध्यात्मिक आकलन असतं.., तुम्हाला भिती वाटलेली दिसते
यालाच रोपटे मुळांसकट उपटून काढणे असे म्हणतात.
पण पुढे स्वतःची चूक लक्षात आली हे नशिब.
हे लिहिण्याची संधी तुम्ही इतरांना कधी देणार?

बुवा, आहो लेखनविषयवार लिहा. नांव `अवतार' पण प्रतिसाद काय दिलेत ते पाहा. बुद्धाची अवहेलना झाली हे तुमच्या `संयम' वगैरे लक्षणांना उत्तर आहे. आणि अवहेलना करणार्‍यांना शून्यवाद कळला नाही असा त्याचा अर्थ आहे. `अवहेलना होणारे सर्व बुद्ध नसतात' वगैरे भानगड पुन्हा आकलनातली तृटी दर्शवते. प्रत्येक जण बुद्धच आहे, कुणाला ते समजेल कुणाला नाही हा अध्यात्माचा सारांश आहे. आणि रोपटं मुळासकट उपटतंय असं वाटत असेल तर लिहीण्यापूर्वी विचार करा. असली मुळं काय कामाची? वरच्या एका प्रतिसादात लिहीलंय ते पुन्हा सांगतो, लेखनविषयावर चर्चा होऊ द्या. आणि लेखनविषयात चूक दाखवली तर त्यावर मान्यता, अमान्यता ठरू शकते. स्थितप्रज्ञतेचा उपदेश वगैरे करुन चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न खरं तर हास्यास्पद आहे.

प्रत्येक जण बुद्धच आहे, कुणाला ते समजेल कुणाला नाही
या वाक्यावरून आपली एकूण आध्यात्मिक कुवत लक्षात आली आहे.
असली मुळं काय कामाची?
रोपटे एकाने उपटले म्हणून दुसऱ्या ठिकाणी ते रुजणारच नाही असे नाही. तेव्हा रोपट्याच्या मुळांना दोष देण्यापेक्षा ते उपटणाऱ्या हातांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.
नांव `अवतार' पण प्रतिसाद काय दिलेत ते पाहा.., अवहेलना करणार्‍यांना शून्यवाद कळला नाही.., चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न खरं तर हास्यास्पद आहे
तुम्ही वापरत असलेल्या या भाषेमुळेच चर्चा लेखनविषयावर न होता लेखकाविषयी होते आहे. आणि हे तुमच्या प्रत्येक धाग्यावर होत आहे. त्यासाठी काही विशिष्ट सदस्य आणि त्यांची मानसिकता जबाबदार नाही हे सत्य समजून घेणे हे अंतिम सत्य समजण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे.

प्रत्येक जण बुद्धच आहे, कुणाला ते समजेल कुणाला नाही!
>या वाक्यावरून आपली एकूण आध्यात्मिक कुवत लक्षात आली आहे? पुन्हा प्रगाढ अज्ञान दर्शन! आहो, बुद्ध याचा अर्थ सत्य. द काँस्टंट स्टेट, द अबसल्यूट. मला वाटलं होतं तुमचा अभ्यास कमी पडतोय. आता तर आभ्यास शून्य आहे असं दिसतं. सर्व शोध त्या स्टेटचा आहे. ती स्थिती आपलं स्वरूप आहे आणि आपण त्यावेगळे नाही हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायंत : अनंगपण फिटले मायाछंदा साठविले सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी । याचा अर्थ ते आत्मस्वरूप सकळांचं आहे. इट इज एवरी वन्स रियालिटी. आता तुमच्या इतक्या फंडामेंटल चुका आहेत (आणि त्यावर पुन्हा `अवतार' वगैरे आयडी घेऊन कडी केली आहे) म्हटल्यावर तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ उरला नाही. माझ्या लेखांचं सोडा, आता तुम्ही स्वतःचं बघावं हे ब्येस्ट राहिल.

द काँस्टंट स्टेट, द अबसल्यूट
बुद्ध याचा खरा अर्थ Awakened म्हणजे पूर्ण जागृतीच्या अवस्थेत असलेला असा आहे. सत्य हे स्थिर, अचल आणि अपरिवर्तनीय आहे हे माहित असणे वेगळे आणि त्या सत्याच्या डोहात स्वत:च्या जाणीवेला विलीन करणे हे वेगळे. ह्याच स्थितीला आपुले मरण पाहिले म्यां डोळा असे म्हटले आहे. दुसऱ्यांना अभ्यास वाढवण्याचे सल्ले देण्यापेक्षा इतक्या लोकांनी दिलेला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला मनावर (की भ्रमरावर) घेतलात तर उत्तम.
तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ उरला नाही
काय सांगता! इतका वेळ चालली होती ती चर्चा होती? तुमच्याशी चर्चा करण्यात मुळातच काही अर्थ नाही असे सल्ले मला इतरांकडून आधीच मिळाले आहेत. तरीही इतरांना वारंवार तुच्छ लेखण्याची फंडामेंटल चूक करणे तुम्ही थांबवाल अशी अजूनही आशा होती. सत्य हे आहे की मुळात तुमच्या ह्या वृत्तीमुळे इतरांनाच तुमच्याशी गंभीर चर्चा करण्यात काही स्वारस्य उरले नाही. विषयाला सोडून येणाऱ्या विनोदी आणि उपहासात्मक प्रतिक्रियांचे हेच कारण आहे. इतक्या सदस्यांनी पदरचा वेळ खर्ची घालून केवळ चर्चा भरकटवण्यासाठी असे प्रतिसाद द्यावेत इतके तुम्ही मोठे नाही आहात.
तुम्ही स्वतःचं बघावं
आमचं आम्ही बघू शकतोच. त्यासाठी तुमची कोणालाच गरज नव्हती आणि नाही. हाच सल्ला तुम्ही स्वत: वापरून पाहिलात तर कदाचित भ्रमराला थोडी स्थिरता मिळू शकेल.

काहीही संबंध नसतांना `स्थितप्रज्ञाची लक्षणं' सांगून `लेखक कसा स्थितप्रज्ञ नाही' हे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न होता. त्यात `मुळासकट उपटणे वगैरे भाषा होती'. याला दुसर्‍याला तुच्छ लेखणं म्हणतात. आता तुम्ही अशी सुरूवात केल्यावर बाकीचे त्यावर उपप्रतिसाद आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. तुम्ही स्वतःचे प्रतिसाद पहिल्यापासून वाचा म्हणजे घटनाक्रमाची संगती लागेल.

संत वाड:मयावर लिहिणारे तुम्ही एकटेच नाही आहात. इतरही आहेत. पण त्यांच्या वाट्याला इतका उपहास का येत नाही आणि तुमच्याच वाट्याला का येतो ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करून बघा. तुम्ही इतरांना तुच्छ लेखता हा तुमच्यावरील आरोप असत्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते शब्दांतून सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे. त्याऐवजी खाली क्लिंटन यांनी लिहिल्याप्रमाणे इतरांच्या बुद्धीची कुवत काढणे असले प्रकार तुम्ही जितके जास्त कराल तितका ह्या आरोपांचा खरेपणाच सिद्ध होईल. To every action there is always an equal and opposite reaction. ह्या धाग्यावरील प्रतिक्रिया म्हणजे मागील सगळ्या धाग्यांवर तुम्ही जे काही लिहून ठेवले आहे त्याची परिणती आहे. हे सर्व थांबायला हवे असे सर्वांनाच वाटते आहे. ते तुमच्याच हातात आहे. तुम्ही इतरांचा स्वीकार केला नाही तर इतरही तुमचा स्वीकार करणार नाहीत. काही लोकांचा अभ्यास शून्य असू शकतो. त्यांची वैचारिक उंची , बौद्धिक कुवत कमी असू शकते. त्यांचे फंडे चूक असू शकतात. प्रश्न हा आहे की वारंवार तेच तेच लिहित राहिल्याने त्यांच्यात काही फ़रक पडणार आहे काय? सतत दुसऱ्यांच्या चुका वेशीवर टांगणे हा जगात बदल घडवण्याचा मार्ग आहे काय? बुद्ध असण्याचे सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे करुणा [Compassion]. इथे इतर कोणीही अंतिम सत्याचे ज्ञान झाल्याचा दावा केलेला नाही. तो ज्यांनी केला असेल त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. With great power comes great responsibility

फक्त (प्रत्येक वेळी) सुरूवात कुणी केली आहे ते पाहा. आणि एक गोष्ट उघड आहे, इथे जशाचा प्रतिवाद तशानं झालायं. माझ्या लेखावरच्या उपसाहात्मक प्रतिसादांचा माझ्याशिवाय कोण प्रतिवाद करणार? मला एक आश्चर्य वाटतं, सतत माझी चूक काढण्यापेक्षा, सदस्य लेखनविषय सोडून अवांतर करतायंत आणि ते मूळ कारण आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल तो सुदीन.

सुरुवात धन्यानी केली!! :D इतके सारे लोक आपल्या विरुद्ध बाजूने लिहित आहेत तर कदाचित आपलंही काही चुकत असेल, असं तुम्हाला कधी वाटत नाही का हो? तो विरुद्ध वैचारीक बाजूबद्दल लिहित होता..... पण नेहमीप्रमाणेच प्रतिसाद नीट न वाचताच तुम्ही तक्रारी सुरु करण्याची घाई घाई केलित. असो! तसेही तुमचे कधीच काहीच चुकत नाही याबद्दल तुम्हाला स्वतःल खात्री असल्यानी 'चर्चा' नावाचा हार्मलेस प्रकार इथे कधीही होउ शकत नाही!

माझ्याशिवाय कोण प्रतिवाद करणार?
इतर धाग्यांवर जर उपहासात्मक प्रतिसाद आले तर लेखकाच्या बाजूने त्यांचा प्रतिवाद करायला इतर सदस्य पुढाकार घेतात. तुमच्या धाग्यांवर मात्र हे काम तुम्हाला एकट्यालाच का करावे लागते हे तुमच्या लक्षात येईल तो सुदिन.

पण आता फार झालं आहे. सतत निष्कारण उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता एकदा उलगडून दाखवतो म्हणजे पुन्हा असं करण्यापूर्वी जरा विचार केला जाईल. पाठांतर हा बुद्धीचा सर्वात निम्नतर पैलू आहे. त्याला काहीही समजलं नाही तरी चालतं. घोकणं आणि फेकणं इतकंच काय ते बुद्धीचं काम. आणि त्यात त्यावरच चरितार्थ म्हटल्यावर, सगळी बुद्धी त्याच कामी गहाण पडणार. अश्या बुद्धीला नवा विचार पेलणं अशक्य आहे. खरं तर धोक्याचं आहे कारण ते घोकंपट्टीच्या विरोधात आहे. घोकलेलं डोक्यात इतकं ठोकून बसवलेलं असतं की नवा विचार म्हटला की ते बेभान होतं, अस्वस्थता निर्माण करतं. आतला टेपरेकॉर्डर तत्क्षणी सुरू होतो. इतक्या निम्नतर स्तरावर काम करणार्‍या बुद्धीला कमालीचा न्यूनगंड असतो कारण तिला कुठलीही वैचारिक उंची गाठता येत नाही.... आणि मग विदूषकी चेष्टा करुन ती स्वत:चं सांत्वन करू पाहते.

सतत निष्कारण उपहासात्मक प्रतिसाद आणि असंबद्ध विडंबनं या मागची मानसिकता एकदा उलगडून दाखवतो म्हणजे पुन्हा असं करण्यापूर्वी जरा विचार केला जाईल.
मी त्या मानसिकतेबद्दल वाचायला उत्सुक आहे. लवकर लिहा.

@मी त्या मानसिकतेबद्दल वाचायला उत्सुक आहे. लवकर लिहा.>>> मी ही आहेच..! +++१११... :) अरे धन्या,लवकर लिहाच्या आधी..''कळेल असं'' -- हे दोन शब्द र्‍हायले का? =))

@ तर पुन्हा पुन्हा वाचायचं.>>> मग..आपण नाही वाचलो..तरी चालेल..! ---हे पुढचं वाक्य ल्याहायचं र्‍हायलं अता! =)) ======================================= आजचा कू विचार- आपली कुठलीही वैचारिक उंची नाही वाढली तरी चालेल, पण वैचारिक तळ गाठता आला'च पाहिजे!

जे काव्य "टाकलं" गेलं,ते स्वतःवर आहे,की अजून कोणावर एव्हढंही कळायचं भान व कॉमनसेन्स न राहिलेल्या मंद मती माणसाची कथित वैचारिक उंची,कुठे सूर मारत असेल...हे कळणं अवघड नाही!
! ======================================= आजचा कू विचार- आपली कुठलीही वैचारिक उंची नाही वाढली तरी चालेल, पण वैचारिक तळ गाठता आला'च पाहिजे!

खरं तर मी सोडून देत होतो आणि आता ही सोडून देणार होतो हे नक्की कशाबद्दल लिहिलेले आहे?