पूर्वी कंटाळा आला की मी काही विशिष्ट ब्लॉग्ज वाचत असे.
हल्ली मी संजय सरांच्या लेखांवरील प्रतिसाद वाचतो. संजय सरांचा लेख कळो न कळो परंतू त्यांच्या लेखावरील प्रतिसाद म्हणजे करमणूकीची हमी.
काही सुज्ञ, बुद्ध किंवा अबुद्ध, बालिश, टप्पर लोकांना याचा उपयोग होऊ शकतो:
Psychology's answer to trolling and online abuse
संक्षी, लेख बराच फिरतोय. हसायलाही आलं, काय विनोदी वाटलं हे सांगत नाही, तुम्हाला महित्येच.
परंतु फक्त तुम्हीच सर्वज्ञ आहात या थाटात लेखन करून तुम्ही तुमच्या ज्ञानाची चेष्टा मांडत नाहीये का..?
सदस्यांना ज्ञान याचा अर्थ सच्चिदानंद बाबांची गोष्ट वाटते. अशा लेखनात काही त्रुटी दिसत नाहीत कारण त्यात समाजमान्य धारणांच दळण फक्त नव्या शब्दात काढलेलं असतं.
लेखक, सोयिस्करपणे बाळ सप्रे आणि माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. आणि सदस्यांना इतकी उघड गोष्ट उचलून धरता येत नाही.
नाऊ सी, हा लेख देखिल त्याच ज्ञानेश्वर महाराजांवर आहे पण दोन ठिकाणी आलेल्या प्रतिसादात कमालीची तफावत आहे. याचा अर्थ तुमच्या मते, मी सर्वांना कमी लेखतो असा आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे :
`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं आहे. आणि तसं (अप्रत्यक्षपणे) सांगणारे लेखक तुम्हाला ज्ञानी वाटतायंत. आता याला मी काही करू शकत नाही.
संक्षी, लेख बराच फिरतोय. हसायलाही आलं, काय विनोदी वाटलं हे सांगत नाही, तुम्हाला महित्येच.
अप्रकाशित लेख सुद्धा योग्य ठिकाणी पोहोचतो याचं आश्चर्य आहे!
आता इथे एक साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. विडंबनाचा रोख नेहमी व्यक्तिगत असतो. माझ्यावर इतकी विडंबनं झालीयेत की बोलता सोय नाही. मधे मिपा बंद होतं तेव्हा सहज दुसर्या संकेतस्थळावर चक्कर टाकली तर माझ्यावरचं विडंबन तिथे प्रकाशित करून लोक मजा घेत होते! कॅन यू इमॅजिन? जिथे मी कधीही प्रतिसाद देण्याची शक्यता नाही तिथे माझ्यावर चिखलफेक! धिस इज दि हायेस्ट ऑनलाईन अब्युज. शुद्ध मराठीत याला भ्याडपणा म्हणतात.
आता माझ्या विडंबनाला `फारच व्यक्तिगत रोख आहे' म्हणणं, आणि इतरांच्या माझ्यावर केलेल्या विडंबनाला `इट इज ओके, इतपत चालायचंच' म्हणणं याला काय अर्थ आहे? हे म्हणजे `एकाचा बलात्कार सौम्य आणि दुसर्याचा फोर्सफुल, तस्मात पहिला कायदेशीर आणि दुसरा बेकायदा' असा न्याय लावणं आहे .
`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं आहे. आणि तसं (अप्रत्यक्षपणे) सांगणारे लेखक तुम्हाला ज्ञानी वाटतायंत. आता याला मी काही करू शकत नाही.
"`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं" आहे हा निष्कर्ष कशावरून काढलात..??
तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय, त्याची एका वाक्यातली सुटसुटीत व्याख्या "आत्म्याचे परमात्म्याशी मिलन" ही होवू शकते का..?
अगदी अगदी !
आत्म्याचे परमात्म्याशी मिलन
इतकं अध्यात्म सोप्प आहे. माझा संक्षींवर आक्षेप आहे तो हा की , इतका सोप्पा विषय ते प्रचंड शब्दबंबाळ करून आडमार्गाला नेतात. आधीच अध्यात्माबद्द्ल प्रचंड गैरसमज आहेत त्यातून तुम्ही तत्वज्ञानाचा क्लास काढा ..मग लोक आणखी लांब जातात... नाहीतर फुका ट्पल्या मारून गंम्म्त बघत बसतात ! ( मी पण त्यातलाच , करतो कधी कधी गम्मत ,,.. काय करणार वो, अति झालं आणि हसू आलं )
दोन्ही प्रकारात अध्यात्माचेच नुकसान !
संक्षी - एक अनाहूत सल्ला -
नका लिहू अध्यात्मावर ! एरव्ही तुम्ही चांगले लिहू शकता. मागे एक परिक्रमेवर विडंबनात्मक लिहले होते, मजा आली होती वाचताना .. तस्ल कायतरी लिहा हो. लोकांचे मरू दे, ते होतील तेव्हा शहाणे होतील नायं तर नाय होतील. आपण आपल्या पावलांपुरते पहावे !!
लेखक, सोयिस्करपणे बाळ सप्रे आणि माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. आणि सदस्यांना इतकी उघड गोष्ट उचलून धरता येत नाही.
आम्ही "ईलाईट" क्लासमधले नसल्यामुळे काल दुपारी बारा वाजल्यापासून आज पहाटे सहा वाजेपर्यंत कार्यालयात कळफलक बडवत होतो.
जरा सबुरीनं घ्या. असे हातघाईवर येऊ नका. वेळ मिळाला की सार्या प्रश्नांची उत्तरे देईन.
आता इथे एक साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. विडंबनाचा रोख नेहमी व्यक्तिगत असतो.
कैच्या कै लिहू नका. विडंबने लेखाची त्या लेखकाच्या विशीष्ट शैलीची होतात. त्याने व्यक्तिगत आयुष्यात काय केले आहे व किती संस्थळे काढली आहेत व त्यावर किती लोक येतात वगैरे असंबद्ध गोष्टी त्यात नसतात. मी काही विडंबन एक्स्पर्ट नाही पण मी मिपावर जे काही थोडे बहुत लेखन केले आहे ते बहुतांश विडंबन या प्रकारात केलेले आहे. विडंबन तुमच्या वर केलेले नसून तुमच्या लेखावर केलेले असेल तर ते ज्या लेखनावरून स्फुरलेले आहे त्याची लिंक दिली तरी पुरे असावे.
जिथे मी कधीही प्रतिसाद देण्याची शक्यता नाही तिथे माझ्यावर चिखलफेक!
विडंबन म्हणजे चिखलफेक? आणि तुम्ही प्रतिसाद द्यावा म्हणून विडंबन करतात असे तुम्ही कोणाला सांगितले? बरं तुम्ही तिथे प्रतिसाद देत नाहीत तिथे तर मग तिथल्या काही सदस्यांना तुम्ही कोण हे माहितही नसेल. विषय संपला.
धिस इज दि हायेस्ट ऑनलाईन अब्युज. शुद्ध मराठीत याला भ्याडपणा म्हणतात.
देअर यू गो अगेन. आक्रस्ताळेपणा. अब्युज काय आणि भ्याडपणा काय.
दोन विडंबनांमधे जमीन अस्मानाचा फरक आहे. तुमच्या लेखनशैलीवरील विडंबना मधे तुम्ही वैयक्तिक जीवनात काय काम करता/ किती साईट्वर लिखाणकरता वा तत्सम उल्लेख नाही आहेत. जे तुमच्या विडंबनामधे होते. म्हणून ते उडाले असावे.
नोटः
मी काही संपादक नाही आणि लेखन उडवण्याला माझा कधीच सपोर्ट नव्हता पण असो तो वेगळा विषय आहे.
ते दिलगीरीचे काय म्हणत होतात. चूक कळली तर दिलगीरी व्यक्त करायला काहीच हरकत नाहीये माझी.
त्यानंतर माझ्या प्रश्नांची उत्तरे देणार का? की ती द्यायला लागू नयेत म्हणून हे दिलगीरीचे कारण पुढे करताय?
ज्या प्रमाणे एखाद्या सर्वशक्तिमान पहिलवानाने उठसूट लोकांची गचांडी पकडू नये हा सामाजिक संकेत आहे त्या प्रमाणे बुद्धिमान माणसानेही उठसूट जनतेची गचांडी पकडू नये असा सामाजिक संकेत आहे. दोघांनी हे केल्यास त्यांच्या शक्तींची अवहेलना व हसे होते.....व त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग होऊन ती वाया जाते.....आणि शक्तीचा स्त्रोत आटू शकतो......
टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं" आहे हा निष्कर्ष कशावरून काढलात..??
इतकी उघड गोष्ट आहे. लेखकच पुरावे देतोय :
आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो.
ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते.
आणि प्रतिसाद तर एकसोएक आहेत :
१) वा! धनाजीराव वा! छान लिहिलेय.
२) आवडलं.
३) मस्त. भिंतीचं अप्रूप मलाही आहे
४) मस्त! आपुले मरण पाहिले म्या डोळां..
५) आमच्या अण्णांना हा लेख वाचून दाखवतो आणि आलेला अनुभव तुला सांगतो
६) लेख आवडला. धन्स हो धन्याशेठ.
काय निष्कर्श निघतो यावरनं?
_________________________
आणि माझा प्रश्न फार साधा आहे: `इफ वन कॅन रेज अ डेड, वाय टू सर्च फॉर द अनडाइंग ?
किमान बुद्धी सुद्धा साधा तर्क करू शकते, जर मृत्यूवर विजय मिळवला तर अध्यात्माची गरज काय?
भारतीय मानसिकता किती बालीश आहे. आपण कुणाही पाश्चिमात्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि त्याला सांगितलं की `धिस इज वन ऑफ दि हायेस्ट ट्रिटाइज ऑन द ग्रेट भगवद्गीता, अँड यू नो? इट इज रिटन बाय अ डेड हू वॉज रेज्ड अलाइव टू राईट इट!
तर तो सरळ म्हणेल, `मॅन, फर्गेट अबाऊट द ट्रिटाइज, वेअर इज दि फॉर्म्युला?'
तुमच्या साधी गोष्ट लक्षात येत नाही. या भंपकपणानं तुम्ही ज्ञानेश्वरीचं मूल्य कमी करतायं. असो, साक्षात लेखक तिथे प्रतिसाद देणार आहेत, तेव्हा बघू.
_____________________________
तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय, त्याची एका वाक्यातली सुटसुटीत व्याख्या "आत्म्याचे परमात्म्याशी मिलन" ही होवू शकते का..?
नाही. माझ्या अध्यात्माची व्याख्या इतकीच आहे `आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत, सत्य आहोत'
अर्थात, यावर तुम्ही पुन्हा उपहास सुरू करण्याची आणि हे वाक्य विपर्यस्त करून जागोजागी वापरण्याची शक्यता आहेच. पण तसं करणं फक्त एकच गोष्ट दर्शवेल, मी माझ्या लेखनाशी प्रामाणिक राहून तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही मात्र, मला समजावून न घेता, पुन्हा बेईमानी केली! अँड दॅटस द होल थिंग, `तुम्ही स्वतः सत्य आहात', हे पुन्हा तुम्ही नाकारलं. आता यानं मला काय फरक पडतो? मी तर निश्चिंत आहे, तुमचं अस्वास्थ्य कायम राहिलं.
काय निष्कर्श निघतो यावरनं?
तो लेख आणि तेथे मिळालेले प्रतिसाद येथे उल्लेखून तुम्हाला "इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स" आला असावा - हा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला आहे.
माझ्या अध्यात्माची व्याख्या इतकीच आहे `आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत, सत्य आहोत'
ओके. माझी व्याख्या किती % चुकीची / बरोबर आहे..?
वरच्या प्रतिसादातील मधल्या भागावर मला विचार करण्यास वेळ मिळाला नाहीये - १९ ऑगस्टपर्यंत मिळणार नाहीये - तस्मात तो भाग सध्या बाजूला ठेवत आहे.
वरच्या प्रतिसादातील शेवटचा भाग वैयक्तीक वाटल्याने त्याला फाट्यावर मारण्यात आले आहे.
_____________________
सुटसुटीत तेच लिहीतो
इतक्या भंपक कल्पना असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिसादांनी मला काँप्लेक्स येऊ शकेल, इतकी महान बुद्धीमत्ता दर्शवल्यावर, पुढे काहीही लिहीण्यात अर्थ नाही.
१९ ऑगस्टपर्यंत काय, तुम्ही माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर विचार करणं कायमच बंद करा, ते तुमच्या आकलना पलिकडे आहे.
इतक्या भंपक कल्पना असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिसादांनी मला काँप्लेक्स येऊ शकेल, इतकी महान बुद्धीमत्ता दर्शवल्यावर, पुढे काहीही लिहीण्यात अर्थ नाही.
आलेला नाहीये का..?? तुमच्या प्रतिसादांचा टोन पहा.
१९ ऑगस्टपर्यंत काय, तुम्ही माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर विचार करणं कायमच बंद करा, ते तुमच्या आकलना पलिकडे आहे.
धन्यवाद! तुम्हाला आलेले काही प्रतिसाद "मनापासून" लिहिलेले आहेत हे तुम्ही ज्या क्षणी कबूल केलेत त्याच क्षणी तुमची आकलनक्षमता कळाली.
असो. देव तुमचे भले करो.
आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो.
तुमचा सर्व लेख या विधानाला दुजोरा देणारा आहे आणि तिथे बाळ सप्रे आणि मी दिलेल्या प्रतिसादांना उत्तर देण्याची जवाबदारी तुम्ही स्विकारली आहे.
`आता हसावं की रडावं हेच मला कळत नाही'
तुम्हाला सोयीचं वाटेल ते करा, आता तो तुमचा प्रश्न आहे.
मी प्रतिसादात काहीही लिहिलं तरी तुमच्यावर त्याचा शष्प परिणाम होणार नाही हे मला माहिती आहे. तरीही या प्रतिसादाच्या निमित्ताने माझी प्रतिवाद करण्याची हौस भागवून घेतो.
तुमचा सर्व लेख या विधानाला दुजोरा देणारा आहे.
माझा चमत्कारांवर विश्वास नाही. त्यामुळे ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर असूनही मला त्यांच्या नावावर सांगितले जाणारे सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात. अगदी त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी भगवदगीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिणं हा सुद्धा माझ्या दॄष्टीने चमत्कार नाही. तो त्यांच्या प्रगल्भ बुद्धीमत्तेचा, त्यांच्या आई-वडीलांच्या त्यांच्यावरील संस्कारांचा आविष्कार होता.
मग मी ती सच्चिदानंद बाबांची गोष्ट का लिहिली?
माझ्या वाचनाची रेंज खुप मोठी आहे. अध्यात्म, मानसशास्त्र आणि सजीवांची उत्क्रांती हे त्यातले प्रमुख विषय आणि त्या अनुषंगानं देव, धर्म, पुनर्जन्म, फलज्योतिष असं खुप काही मी वाचत असतो. नुकताच मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) या विषयावर वाचन झालं. मृत्यूसमीप अनुभव ही गोष्ट सर्वसामान्यांना जरी चमत्कार किंवा अतिंद्रीय वाटली किंवा तो स्वर्ग, नरक वगैरे बाबींचा पुरावा वाटली तरी विज्ञानाने या अनुभवांची उकल केली आहे. मानवी शरीरात काही विशिष्ट संप्रेरके टोचून कृतिमरीत्या असा अनुभव देण्यात वैज्ञानिक यशस्वी झाले आहेत.
मी या दोन बाबींची म्हणजेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट आणि मृत्यूसमीप अनुभव संगती लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि असे असले तरीही त्या लेखात मी कसलाच दावा केलेला नाही. तुम्ही "कोट" केलेली वाक्ये ही मला माहिती असलेल्या किंवा मी येथे लिहिलेल्या सच्चिदानंद बाबांच्या गोष्टीमधील आहेत. ती वाक्ये म्हणजे माझे मत नाही. तसेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट हा नियर डेथ एक्स्पेरियन्स होता असंही माझं मत नाही. तसं काही असू शकेल असा माझा फक्त अंदाज आहे.
विश्वाच्या अफाट पसार्याचं पुर्णतः आकलन होणं हे मानवी बुद्धीच्या कुवतीच्या पलिकडचं आहे. मला सर्व समजलंय असं कुणी म्हणत असेल तर तो त्या व्यक्तीचा भ्रम आहे.
परदेशी परिपक्व मानसिकतेचे दर्शन झोम्बी, ओमेन, नॉन्स्ट्रडॅमस, एक्झॉर्सिस्ट वगैरे वगैरे अनेक चित्रपटांमधून, त्यांच्या सिक्वल्स मधून, कादंबर्यांमधून अनेकदा झाले आहे. येशूच्या कथेतही अशी कांही उदाहरणे असणारच. मी बायबल वाचलेले नाही त्यामुळे त्यावर अधिकारवाणीने भाष्य करू शकत नाही. पण मला खात्री आहे. जिथे भूतखेतांच्या कथा चविने वाचल्या-पाहिल्या जातात तिथे देवादिकांचे चमत्कार अस्तित्वात नाहीत असे म्हणणे भाबडेपणाचे ठरावे.
संक्षी - एक अनाहूत सल्ला देतो. तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात बराचसा डिसकनेक्ट जाणवतो आहे. आक्रस्ताळेपणा, बालीशपणा, मुद्दे सोडून भरकटणे, कै च्या कै तर्क मांडणे वगैरे वगैरे.
अंतर्जालावर येवून तुम्हाला यावर उत्तर मिळणार नाही उलट तुमचे प्रश्न वाढत जातील प्रश्न वाढले नाहीत तर तुमचे मनस्वास्थ्य नक्की हरवेल.
या सर्व प्रश्नांवर एखाद्या तज्ञाची मदत घ्या.
अहो हा समाज कीर्तनाने सुधारणार नाहीये आणि तमाशाने बिघडणार नाहीये - मग तुम्ही तुमची विचारसरणी रेटून काय फरक पडणार आहे..?? बर्र.. तुम्ही हे जे काही विचार रेटताय त्यात तुमचे स्वतःचे सातत्य नाहीये. तुमचे जे कोणी अनुयायी असतील / होतील त्यांच्याकडून सातत्याची अपेक्षा ठेवणे जरा जास्ती होत नाही का..??
ट्रायल बॅलन्समध्ये घोळ असताना बॅलन्सशीट टॅली होईल का..??
तुम्ही सत्य आहात - नो वन इस डडिनाईंग दॅट बट अॅट द सेम टाईम हॅव करेज टू फेस, अॅक्सेप्ट अँड डायजेस्ट एनी निगेटिविटी बिकॉज ऑफ यूअरसेल्फ!!
प्लीज विचार करा. सल्ला वैयक्तीक वाटल्यास मी काही करू शकत नाही. घेणे न घेणे तुमच्या हातात आहे.
धन्यवाद.
आम्ही बॉल टाकलेला ... हे पहा ...http://www.misalpav.com/comment/502398#comment-502398
पण बहुतेक त्यांना तो बाऊंन्सर गेला असावा किंवा त्यांनी लेफ्ट ओव्हर केला असावा ... किंवा ते बोल्ड झाले असावेत
असो ... नेक्स्ट टाईम ;) =))
सर, अगदी पहिल्या लेखामधला (१. अध्यात्म : पूर्वभूमिका ) डिस्क्लेमर (?)
२) अध्यात्मातला संवाद हा नेहमी ऐकणाऱ्याच्या ओपननेस वर अवलंबून असतो, ज्या क्षणी तुम्हाला मला काही कळले नाही असे वाटेल त्या क्षणी माझ्यातला आणि तुमच्यातला दुवा निखळेल. त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे. आध्यात्मिक चर्चा हा दोघातला संवाद आहे त्यामुळे बोलणाऱ्याला ऐकणाऱ्याला समजले आहे की तो उगाच वाद घालतो आहे हे लगेच समजते. अर्थात सांगणाऱ्याचा आनंद हा ऐकणाऱ्याला समजल्यावर द्विगुणित होतो पण बोलणारा प्रतिसादांचा कौल पाहून बोलत नाही, नाहीतर ते न समजलेल्याने समजलेल्या शिकवण्या सारखे होईल. तुम्हाला ही चर्चा निरस वाटली तर तुम्ही बाजूला होऊ शकता पण एखाद्याला खरंच समजत असेल तर त्याला डायव्हर्ट करू नका. या लिखाणाचा उद्देश एक अतिशय सोपी गोष्ट अत्यंत सोप्या पद्धतीनं तुमच्या पर्यंत घर बसल्या आणि मोफत पोहोचवणे आहे, वाद निर्माण करणे, कुणाचाही अपमान करणे, कुणालाही कमी लेखणे हा नाही. तुम्हाला सत्यं समजले नाही तरी तुमच्यात कोणतेही न्युनत्व येत नाही त्यामुळे अश्या प्रकारचे गैरसमज करून घेऊन किंवा मी स्वतःला कोण समजतो अशी माझी संभावना करून काहीही साधणार नाही. काहीही करून तुम्हाला समजलेच पाहिजे किंवा मला समजले आहे हे सर्वमान्य झाले पाहिजे असा या लेखनाचा हेतू नाही.
हा मेन भाग आहे
त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे.
इथे आधी टाकायला हवा होता असं वाटुन गेलं. तरीही गोंधळ कमी झाला असता कि नाही हि श़ंकाच आहे !
बाय द वे , मी वाचतो आहेच.
जसं पोहण्यात काय मजा आहे हे आधी पाण्यात उडी मारुन तरंगायला शिकल्याशिवाय कळत नाही तसं लेखांमधल्या गोष्टी पेशन्स ठेवुन करुन पाहील्याशीवाय , जे लिहिलंय ते अॅट लीस्ट पडताळुन पाहील्याशीवाय ( इच्छा/इंटरेस्ट असेल तर ) त्यातुन नेमका काय फायदा होईल किंवा खरोखरच फायदा होइल की नाही हे समजणार नाही.
धन्यवाद आणि आभार
उन्मेष
लेखांमधल्या गोष्टी पेशन्स ठेवुन करुन पाहील्याशीवाय , जे लिहिलंय ते अॅट लीस्ट पडताळुन पाहील्याशीवाय ( इच्छा/इंटरेस्ट असेल तर ) त्यातुन नेमका काय फायदा होईल किंवा खरोखरच फायदा होइल की नाही हे समजणार नाही.
जे लिहिलय ते आधी कळले तर पाहिजे नं!
दुसर्याला कमी न लेखता, त्याची मानसिकता, आकलनशक्ती, त्याचा नुसत्या पाठांतरावर आधारीत व्यवसाय आदी गोष्टींवर नकारात्मक आणि अपमानकारक शेरेबाजी आणि शब्दप्रयोग टाळून आपल्याला जे म्हणायचे आहे ते स्वच्छ आणि सोप्या भाषेत मुद्देसुदपणे मांडले, शंका विचारणार्यांना शब्दांच्या घोळात न भरकटवता जर त्यांना समजेल अशा मोजक्या शब्दांत त्यांचे शंका निरसन केल्यास, आपला वरील मुद्दा विचारार्ह ठरू शकतो.
आदर हा मागुन मिळत नसतो तो कृतीतून मिळवावा लागतो. मीच सर्वज्ञ आणि मीच दिपस्तंभ ही भूमिका सोडून वाचकाच्या पातळीवरून खेळीमेळीच्या वातावरणात, किमान दुसर्याला कमी न लेखता कांही बोधामृत पाजले तर त्याचा स्विकार नक्कीच होऊ शकतो.
मिपावर ज्ञानामृताचे कण वेचता येतील असे अनेक धागे येतात. लोकं वाचतात सहमत/असहमत होतात पण ह्या 'भ्रमरा' इतके घाऊक पातळीवर नाकारले जात नाहीत. त्या चांगल्या लेखांचा अभ्यास करून नंतर सोप्या भाषेत आपले विचार मांडले तर मिपा सदस्य नक्कीच त्या विचारांकडे आदरयुक्त नजरेने पाहतील.
@उन्मेष दिक्षीत:
तुमची तुलना जरा चुकते आहे.
एक म्हणजे इथे काही लोकांना तरंगता येते आहे आणि बहुधा त्यांना तेवढेच हवे आहे पण संक्षी त्यांना तुम्ही सरळ नं पोहता बटरफ्लाय स्ट्रोकच मारून पोहा असे सांगतायत. इतकेच नाही तर तरंगणे कसे मूर्खपणाचे आहे हे अतिशय हीन पद्धतीने सांगतायत.
दुसरे म्हणजे असेही काही लोक आहेत ज्यांना पोहायची गरजच वाटत नाहीये. पण संक्षींच्या लेखनाचा सूर असा आहे की सर्वांनाच पोहायचे आहे आणि त्यांनी बटरफ्लाय स्ट्रोक मारूनच पोहले पाहिजे. बरं ज्यांनी विचारले की तुम्ही म्हणताय बटरफ्लाय स्ट्रोक मारून असे होते आणि तसे होते पण मग आमच्या पद्धतीनेही तर तेच होतेय तर त्यांना परत हीन लेखले जातेय. किंवा जर एखाद्याला वाटत असेल की ह्या पद्धतीने त्यांचे सुरळित चाललेले तरंगणे डळमळीत होईल तर त्यांना खात्री नं देता अजूनच शब्दांच्या जाळ्यात अड्कवणे सुरू आहे.
अथवा माझ्यासारखे काही जे त्यांना ह्या बटरफ्लायच्या तंत्रात काही गड्बड आहे असे विचारतायत त्याकडे ते सोयीस्कर पणे दुर्लक्ष करतात.
त्यामुळे लोक पडताळण्याच्या फंदातच पडत नाहीत.
"मला चढलेली नाही" हे पुनः पुनः सांगणार्या माणसालाच सर्वात जास्त चढलेली असते. तसंच "मी निश्चिंत आहे" हे पुनः पुनः सांगणाराच सर्वात जास्त अस्वस्थ असतो. तो स्वतःच्या मनालाच हे बजावत असतो "निश्चिंत रहा, अस्वथ होऊ नकोस" =))
आणि निखळ मनोरंजनाचा हा ठेवा वाचनखुणेत साठवला.
एकिकडे शब्दांच्या नवनव्या व्याख्या काय, कोलांट्या काय, लोकांना (स्व)अध्यात्मसाक्षर करून सोडायचेच यासाठी चाललेले भगिरथ प्रयत्न तर दुसरीकडे मूढ, अजाण जनसामान्य. काय होणार या जगाचे? इथे एक माणुस जबरीने आपला अनुभवामृत जबरीने गळी उतरवत आहेत, आणि इथे सगळे नाहीऽऽऽ,नकोऽ म्हणताहेत! का? का? का?
मला वेगळंच सांगायचं होतं ..
मी स्वतः २०१० पासुन सरांचे सगळे लेख वाचलेत ! मला स्वत:ला त्यांचा वैयक्तिक गायडन्स मिळाला आहे ! माझ्या लेखांशी रिलेटेड असलेल्या अगदी साध्या प्रश्नांपासुन पर्स्नल प्रॉब्लेम साठी ही त्यांचा गायडन्स मला आजही आहे !
मी जेव्हा गोंधळ म्हणालो, तेव्हा मला धाग्यावरचे प्रतिसाद आणि बाकीचं कन्फयुजन म्हणायचं होतं.
मला स्व्तःला फायदा झालाय .. अगदी पहील्या लेखांपासुन ची वाक्य अन वाक्य माझ्यासाठी मोलाची आहेत !
काय फायदा झाला, कशा पद्धतीनं झाला, या करुन बघण्याच्या आणि अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. ते असं नाही सांगता येणार.
म्हणुनच मला हा पार्ट महत्वाचा वाटतोय.
त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे.
@संजय सर,
थँक्स. मला माहीत नाही हे मी लिहायला हवं होतं की नाही तुमच्या परवानगीशीवाय, पण मला गरजेचं वाटलं आणि लिहीलं
धन्यवाद,
उन्मेष
मीही त्यांचे लेख वाचतो. आणि ज्या काही शंका असतील त्या विचारतो. त्यांना ते उत्तरे देत नाहीत.
तुम्हाला फायदा झाला, तुमच्यासाठी ही वाक्य मोलाची आहेत, मान्य.
मी वर लिहील्याप्रमाणे संक्षींच्या पद्धतींचा/ अनुभवाचा/ गायडन्सचा फायदा होणारच नाही असा दावा कुठेच केलेला नाही. तुम्हाला बहुधा त्या वेळेस/ अजूनही त्याची गरज होती/ आहे इतर पद्धती तुमच्यासाठी उपयोगी पडत नव्हत्या/ नाहीयेत म्हणून तुम्ही अनुभवण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांन गरज नसेल तर/ त्यांच्यासाठी इतर पद्धती उपयोगी पडत असतील तर माझीच पद्धत श्रेष्ठ हा दावा का? किंवा एखाद्याने जर त्याच्या पद्धतीचे उदाहरण दिले तर त्याला मूर्खात काढायची गरज काय?
एक विचारतो, तुम्हाला तुम्ही सत्य आहात हे कळले आहे तर मग आजही त्यांचा गायडन्स कशाला लागतो? लेखावरून तर असे वाटते की एकदा तुम्ही सत्य आहात हे कळले की सर्व प्रॉब्लेम्स संपतात आणि आयुष्याची मजा येते.
मी स्वतः २०१० पासुन सरांचे सगळे लेख वाचलेत >
सेम पिंच. त्यांचे मनोगतावरचे सगळे ६०-६५ लेख मीदेखिल वाचलेत.पण गम्मत अशी आहे की त्यांचे इतर संस्थळांवरचे देखिल वाचलेत. शिवाय त्यांच्या सगळ्या प्रतिक्रियादेखिल वाचल्या आहेत. तुमचा अभ्यास कमी पडतोय की काय अशी शंका आहे.
त्यांच्या लेखांशिवाय इतर पुष्कळ ओरिजिनल वाचन केलेले आणि आयुष्याचा खोलवर अनुभव घेतलेले अनेक आयडी इथे आहेत. पण ते असं प्रत्येक गोष्टीला तुच्छ लेखण्याचे प्रकार करत नाहीत. आपला अनुभव मांडून मोकळे होतात.
आक्षेप घेतला जातो लिहिण्याचा टोन आणि केलेले दावे याला.
एक सुचवणी: तुम्हीच का लिहित नाही लेख तुमच्या अनुभवावर? तुमचा लिहिण्याचा टोन फार सभ्य आहे. बरं वाटतय वाचायला.
एक विचारतो, तुम्हाला तुम्ही सत्य आहात हे कळले आहे तर मग आजही त्यांचा गायडन्स कशाला लागतो?
>> मी मला सत्य समजलंय असा दावा केलेला नाही.
@लीमाउजेट
थँक्स फॉर धीस :) -
तुमचा लिहिण्याचा टोन फार सभ्य आहे. बरं वाटतय वाचायला.
>> मला काही लिहिता आलं असतं तर लीहिलं असतं आत्तापर्यंत. आणि मला काय अनुभव आलेत किंवा नाही हे मला क्लेम नाही करायचंय इथं.
माझा उद्देश हे सांगणं होता ,
मला एखादा लेख जर कळाला, पटला, (अगदी संपुर्ण नाही तरी) तर लेखाच्या अनुशंगाने मला प्रश्न विचारता येतील.
जर मला अगदी पुर्णच नाही कळाला किंवा पटला आणि लेख हा जर लेखकाचा अनुभव आहे पण मला याच्याबद्दल डाउट आहे तरीही मी लेख / लेखकावर टीका करुन माझं दुसरं मत अगदी हीरिरीने मांडलं तरीही कुणाला काय उपयोग त्याचा ?
बर, माझ्या पद्धती या लेखातल्या पेक्षा वेगळ्या असतील (टेक फॉर इन्स्टन्स नामस्मरण) आणि माझ्यासाठी जर ती वर्क होत असेल तर वेल अँड गुड. इन दॅट केस आय डोन्ट नीड टु डिफेंड एनीथींग हीअर. माझी पद्धत तुच्छ लेखली गेली आहे असं मला वाटायचा प्रश्नच येणार नाही. मी मग लेखातल्या पद्धती एक तर काहीतरी नवीन आहे म्हणून ट्राय करुन वेरिफाय करू शकतो, किंवा मी माझ्या सध्याच्या पद्धतीने कधीही कंटीन्यु करुच शकतो, इथं कुणाला काय कंपल्शन आहे ? प्रत्येक जण ठरवू शकतोच की काय करायच काय नाही.
पण जर माझ्याकडे नुसती माहीती आहे दोन्ही पद्धतींबद्दल आणि दोन्हीही मी करून नाहीत बघीतल्या (भलेही कुणीही सांगीतल्या असल्या तरीही )तर मग मी कसं ठरवु शकतो कि ही पद्धत चांगली कि ती ?
अशावेळी लेख पटणं किंवा न पटणं याचासुद्धा प्रश्न रहात नाही. मग मला काय पर्याय उरतो ?
आता याचा विचार करून पहा.
"मला एखादा लेख जर कळाला, पटला, (अगदी संपुर्ण नाही तरी) तर लेखाच्या अनुशंगाने मला प्रश्न विचारता येतील."
जर लेखक प्रत्येक प्रश्नाला सरळ उत्तर न देता तुमच्या आकलनक्षमतेविषयी शंका उपस्थित करत असेल मीच किती मोठा हे दाखविण्याचा प्रयत्न करत असेल आणि अडचणीचे प्रश्न सरळ कबुली न देता टाळत असेल तर?
"मी लेख / लेखकावर टीका करुन माझं दुसरं मत अगदी हीरिरीने मांडलं तरीही कुणाला काय उपयोग त्याचा "
हाच न्याय लेखाला लावला तर लेख लिहिण्याचे प्रयोजनही उरत नाही हे पटतं काय?
"माझी पद्धत तुच्छ लेखली गेली आहे असं मला वाटायचा प्रश्नच येणार नाही"
प्रत्येक वेळी आपली रेषा मोठी आहे असं भासविण्यासाठी दुसरी लहान आहे हे पुनःपुनः ठळकपणे सांगण्याची गरज असते का?
"इथं कुणाला काय कंपल्शन आहे "
प्रत्येक वेळी लेखकाकडून अशी जबरदस्तीचीच भूमिका घेतली जात असेल तर? (उदा. तुम्ही नामस्मरण करता मग तुम्ही वेळ व्यर्थ घालवत आहात)
याचे पुरावे लेखकाच्या सगळ्या प्रतिसादात आढळतील. ते शोधून दुवे देण्यात वेळ घालवणे शक्य नाही. असो...
माझ्या समजुतीप्रमाणे इथे लेखाला किंवा लेखातील विचारांना विरोध होण्यापेक्षा त्याचा मांडणीला जास्त विरोध होत आहे. लेखक लेखात आणि प्रतिसादात जी भाषा वापरतो त्याला विरोध आहे. "मी काहीही लिहीन कुणालाही काहीही बोलेन पण कुणीही प्रतिवाद करायचा नाही की विरोधी शब्द काढायचा नाही. सगळे माझ्यासमोर तुच्छ आहेत" या वॄत्तीला विरोध आहे. बघा पटतंय का...
सार्या आंतरजालीय दुनियेत मला प्रत्यक्ष (आणि ते सुद्धा फक्त एकदाच) भेटलेला, केवळ एक माणूस आहे - उन्मेष दिक्षीत!
अँड आय एम रियली थ्रील्ड! वॉट अ ट्रान्सफॉर्मेशन! इतक्या प्रत्यक्ष पुराव्याची मी कधी कल्पना देखील केली नव्हती.
बाय द वे, उन्मेष; इथे माझ्यावर मुख्य आरोप इतरांना तुच्छ लेखणं असा आहे. इंटरनेट असं माध्यम आहे की जिथे सगळं तारीख, वार आणि घटनाक्रमानं उपलब्ध असतं. मी फक्त तीन उदाहरणं देतो म्हणजे नक्की काय प्रकार आहे ते तुझ्या लक्षात येईल.
पहिले सदगृहस्थ (इतकेच नाही तर तरंगणे कसे मूर्खपणाचे आहे हे अतिशय हीन पद्धतीने सांगतायत) वाले, किती विनम्रपणे वागतात हे पहिल्या लेखावरच्या, त्यांच्या पहिल्याच प्रतिसादात बघण्यासारखं आहे :
मला तुमच्या लेखनावर काहीही प्रतिक्रीया देणे म्हणजे वेळ वाया घालवणे हे माहित आहे....जर काही लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे वगैरे असतील त्या सर्वांवर त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपाय शोधू देत की
दुसर्या मॅम (आक्षेप घेतला जातो लिहिण्याचा टोन आणि केलेले दावे याला) म्हणणार्या, किती सुरेख टोनमधे गर्भित अर्थ विचारतात हे देखिल वाचनीय आहे : निराकार ही जाणीवेचीच स्थिर अवस्था आहे >... म्हणजे कोमा का?
तिसरे सर का कावलेत ते तुला, माझा पैसा हा लेख वाचला की लगेच लक्षात येईल.
प्रश्न माझ्या लेखनाचा किंवा प्रतिसादांचा नाही कारण कोणताही व्यक्तिगत, किंवा एखाद्या सदस्याला तुच्छ लेखणारा प्रतिसाद इथे प्रकाशितच होऊ शकत नाही. त्यामुळे त्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. शिवाय इंटरनेटवर कुणीकुणाचं ऐकून घेत नाही.
लोकांच्या धारणा फार लवचिक आहेत आणि लेखन त्या प्रश्नांकित करतं, ही वस्तुस्थिती आहे.
हा प्रतिसाद, विषयाचं संपूर्ण अज्ञान दर्शवतो.
...
...
...
तुम्ही व्याख्येतच पराभूत झालात त्यामुळे पुढचा सर्व प्रतिसाद व्यर्थ आहे.
अर्थात तुमचे आभार मानायलाच हवेत कारण `नामसाधनेचा' संपूर्ण भोंगळपणा तुम्ही (स्वतःच्या आकलनासहित) सविस्तर उलगडून दाखवला आहे.
`देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहे
ही वस्तुस्थिती आहे आणि त्यात व्यक्तिगत रोख (खरं तर, तुमच्यावर) नाही. तस्मात, उदाहरण रद्द.
माझ्या लेखनात रस असणारे आणि मी पाहून घेऊ. तुम्ही मधे पडण्याची आवश्यकता नाही.
हे तुमच्या उपहासाला उत्तर आहे.
हा प्रतिसाद, विषयाचं संपूर्ण अज्ञान दर्शवतो.
यात खरं तर तुमचा काहीही सबंध नाही. पण जे लिहीलंय ते मुद्देसूद आहे.
तुम्ही आता विनोदी लिहायला लागलात!
इथेही तुमचा संबंध नाही पण सोयिस्करपणे, ज्या प्रतिसादाला ते उत्तर आहे त्यातला उपहास तुम्ही वगळला आहे. (त्यांचे स्वतःचे विपश्यनेवरचे लेख इथे प्रकाशित आहेत, त्यामुळे त्यांना अध्यात्मिक टर्म्सची पुरेशी कल्पना आहे. त्या स्वतः संपादिका आहेत त्यामुळे `गर्भित अर्थ' त्या बरोब्बर नियमात बसवतात. या गोष्टी लक्षात घेऊन ते प्रतिसाद वाचले तर नेमका अर्थ कळेल.)
मला वाटतं `आता सुरूवात कोण करतं' हे एकदम स्वच्छ आहे. त्याविषयावर परत चर्चा करण्यात अर्थ नाही.
तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणावेसे वाटते मोठे व्हा.
हे सुरूवात कोण करते आणि शेवट कोण करते वगैरे मी लहानपणी करायचो चुलत मामे बहिणींच्या तक्रारी करताना.
पहिली गोष्ट म्हणजे ही पब्लिक फोरम आहे. तुम्ही लेख सर्वांसाठी लिहीलेत. प्रतिसादही सर्वच वाचतात. ओपन फोरमवर प्रश्न विचारण्याचा आणि प्रतिसाद देण्याचा मुद्दाच हा असतो की पब्लिक ला उपयोग व्हावा. त्यामुळे मला प्रतिसाद दिलेत का अजून कोणाला हा मुद्दा नाही.
मी वर केवळ उदाहरणादाखल काही प्रतिसाद उद्धृत केले. तुम्ही तर मला प्रतिसादच देणे बंद केले आहेत. मधेच एकदा येऊन मला दिलगीरी वगैरेही व्यक्त करायला लावली आहेत. कशाबद्दल ते मलाच माहिती नाही. मनःपूर्वक विचारले तर तुम्ही उत्तरही दिले नाही. त्यामुळे मलाच दिलेले प्रतिसाद कसे लिहीणार.
मुद्दा तुम्ही मला कोणते प्रतिसाद दिले आणि का दिलेत हा नाही, तुम्ही जे सो कॉल्ड प्रूफ दिलेत ना, तर तसेच प्रूफ तुमच्या स्वतःच्या प्रतिसादांत अनेक ठिकाणी आहेत ते दाखवून दिले. इतकेच.
मला तेवढे खोद्काम करत बसायला वेळ नव्हता काल. हापिसात ह्याप्पी अवर असल्याने फुकटचे अॅपटायझर्स आणि बीअर ढोसायला पळायचे होते नाहीतर इतरही ठिकाणचे प्रूफ शोधून दिले असते. पण एकंदरीत आयडीया आली असेल. ते आमचे हापिसवाले स्वच्छंद जगतच नाहीत हो. फक्त ४:३० ते ६:३० या वेळातच या सांगतात. (शेवटची २ वाक्ये ही उपहासात्मक आहेत. कृपया उपहासाचे उदाहरण देण्याशिवाय इतर कसलाही प्रूफ म्हणून कुठेही quote करू नयेत.)
तुमचे जे दावे आहेत ना, की असे वैयक्तिक रोख असलेले प्रतिसाद प्रदर्शितच होऊ शकणार नाहीत, ते मनोगतावर बरोबर आहेत. तिथे प्रदर्शित होण्याआधी फिल्टर केले जातात माझ्या माहितीप्रमाणे. सद्ध्या बदल झाला असल्यास माहिती नाही. पण मिपावर तरी सर्व काही प्रकाशित होते आणि नंतर संपादक फिल्टर करतात. तसे तुमचे कैक प्रतिसाद आणि लेखही उडालेही आहेत. तुम्ही जो मला inferiority complex आहे असा लिहीलेला प्रतिसाद देखील उडाला आहे बहुतेक.
असो. आता माझ्या लिंकवलेल्या प्रतिसादाबद्दल २ गोष्टी.
तिथे लिहीले आहे की तो तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून दिलेला आहे. फक्त त्याच लेखाला/ प्रतिसादाला नाही.
मी जे वेळ वाया घालवणे लिहीले आहे तेही ह्या बॅक ट्रॅक करून आलेल्या अनुभुतीतून लिहीले आहे. तुम्ही माझ्या प्रश्नांना उत्तरे नं देऊन त्याला पुष्टीच दिलीत. "प्रूफ" हवा असेल तर हा घ्या. consolidated प्रूफ.
बादवे. हा आणि इतर सर्व प्रतिसाद म्हणजे त्या पहिल्या लेखातच लिहील्याप्रमाणे सध्या हातात प्रचंड मोकळा वेळ आहे ह्याचा प्रूफ समजावा.
अवांतर: तुमची दुसर्या कोमा वाल्या प्रतिसादाची लिंक चुकली आहे. माझ्याच प्रतिसादाला जातेय.
प्रतिक्रिया
साक्षात्कार झाला!!
तुमचे तार्कीक निष्कर्ष नेहमीच माझ्या आवाक्याबाहेरचे असतात
पूर्वी कंटाळा आला की मी काही
तुम्ही जितकं स्पष्टीकरण द्याल
दुनिया काय म्हणेल याचं भान
+१
आवडले !
धन्यवाद!
Psychology's answer to trolling and online abuse
Ayya hi tar gadya sharadini
वरच्या (जवळजवळ) सर्व प्रतिसादांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो
`टू रेज अप अ डेड' हेच
`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं आहे. आणि तसं (अप्रत्यक्षपणे) सांगणारे लेखक तुम्हाला ज्ञानी वाटतायंत. आता याला मी काही करू शकत नाही."`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं" आहे हा निष्कर्ष कशावरून काढलात..?? तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय, त्याची एका वाक्यातली सुटसुटीत व्याख्या "आत्म्याचे परमात्म्याशी मिलन" ही होवू शकते का..?आत्म्याचे परमात्म्याशी मिलन
आत्म्याचे परमात्म्याशी मिलनइतकं अध्यात्म सोप्प आहे. माझा संक्षींवर आक्षेप आहे तो हा की , इतका सोप्पा विषय ते प्रचंड शब्दबंबाळ करून आडमार्गाला नेतात. आधीच अध्यात्माबद्द्ल प्रचंड गैरसमज आहेत त्यातून तुम्ही तत्वज्ञानाचा क्लास काढा ..मग लोक आणखी लांब जातात... नाहीतर फुका ट्पल्या मारून गंम्म्त बघत बसतात ! ( मी पण त्यातलाच , करतो कधी कधी गम्मत ,,.. काय करणार वो, अति झालं आणि हसू आलं ) दोन्ही प्रकारात अध्यात्माचेच नुकसान ! संक्षी - एक अनाहूत सल्ला - नका लिहू अध्यात्मावर ! एरव्ही तुम्ही चांगले लिहू शकता. मागे एक परिक्रमेवर विडंबनात्मक लिहले होते, मजा आली होती वाचताना .. तस्ल कायतरी लिहा हो. लोकांचे मरू दे, ते होतील तेव्हा शहाणे होतील नायं तर नाय होतील. आपण आपल्या पावलांपुरते पहावे !!छे: छे:...
व्यक्तिगत रोख, तुच्छता आणि
लेखक, सोयिस्करपणे बाळ सप्रे
समाजमान्य धारणांच दळण
जवळ जवळ म्हणजे सोप्प्या अडचणीत न टाकणार्या प्रश्नांची का?
ज्या प्रमाणे एखाद्या
आता चर्चा बर्यापैकी लॉजिकल होण्याची शक्यता आहे
काय निष्कर्श निघतो यावरनं?
काय निष्कर्श निघतो यावरनं?तो लेख आणि तेथे मिळालेले प्रतिसाद येथे उल्लेखून तुम्हाला "इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स" आला असावा - हा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला आहे.माझ्या अध्यात्माची व्याख्या इतकीच आहे `आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत, सत्य आहोत'ओके. माझी व्याख्या किती % चुकीची / बरोबर आहे..? वरच्या प्रतिसादातील मधल्या भागावर मला विचार करण्यास वेळ मिळाला नाहीये - १९ ऑगस्टपर्यंत मिळणार नाहीये - तस्मात तो भाग सध्या बाजूला ठेवत आहे. वरच्या प्रतिसादातील शेवटचा भाग वैयक्तीक वाटल्याने त्याला फाट्यावर मारण्यात आले आहे. _____________________ सुटसुटीत तेच लिहीतोतुम्हाला "इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स" आला असावा ?
इतक्या भंपक कल्पना असलेल्या
इतक्या भंपक कल्पना असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिसादांनी मला काँप्लेक्स येऊ शकेल, इतकी महान बुद्धीमत्ता दर्शवल्यावर, पुढे काहीही लिहीण्यात अर्थ नाही.आलेला नाहीये का..?? तुमच्या प्रतिसादांचा टोन पहा.१९ ऑगस्टपर्यंत काय, तुम्ही माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर विचार करणं कायमच बंद करा, ते तुमच्या आकलना पलिकडे आहे.धन्यवाद! तुम्हाला आलेले काही प्रतिसाद "मनापासून" लिहिलेले आहेत हे तुम्ही ज्या क्षणी कबूल केलेत त्याच क्षणी तुमची आकलनक्षमता कळाली. असो. देव तुमचे भले करो.लेखकच पुरावे देतोय :
लेखकच पुरावे देतोय
मी प्रतिसादात काहीही लिहिलं
तुमच्या लेखावर
मानसिकता.
संक्षी - एक अनाहूत सल्ला देतो
हे अपेक्षित होतंच!
मस्त बॅटींग चाललीये ...
यूअर टर्न नाऊ!!
बॉलिंग
बापरे !
आमुलाग्र बदलाची गरज.
पेठकर काकांशी सहमत
=)) =))
दगडावर डोके आपटणे सुरुच आहे हे पाहुन थक्क झालो
छे!
@ लंबूटांग, प्रभाकर पेठकर ..
गूड फॉर यू!
मी स्वतः २०१० पासुन सरांचे
माझा उद्देश
आता याचा विचार करून पहा.
यादी
धागाकर्त्याचे प्रतिसाद
माय गॉड, वॉट अ स्ट्रेट प्रूफ !
आता तुमचे प्रतिसाद असे quote च करायचे झाले तर
वॉट अ ज्योक!
मी वयाने आणि अनुभवाने तुमच्यापेक्षा लहान आहे
- तिथे लिहीले आहे की तो तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून दिलेला आहे. फक्त त्याच लेखाला/ प्रतिसादाला नाही.
- मी जे वेळ वाया घालवणे लिहीले आहे तेही ह्या बॅक ट्रॅक करून आलेल्या अनुभुतीतून लिहीले आहे. तुम्ही माझ्या प्रश्नांना उत्तरे नं देऊन त्याला पुष्टीच दिलीत. "प्रूफ" हवा असेल तर हा घ्या. consolidated प्रूफ.
बादवे. हा आणि इतर सर्व प्रतिसाद म्हणजे त्या पहिल्या लेखातच लिहील्याप्रमाणे सध्या हातात प्रचंड मोकळा वेळ आहे ह्याचा प्रूफ समजावा. अवांतर: तुमची दुसर्या कोमा वाल्या प्रतिसादाची लिंक चुकली आहे. माझ्याच प्रतिसादाला जातेय.Pagination