Welcome to misalpav.com
लेखक: सानिकास्वप्निल | प्रसिद्ध:


Comments

आज संपुर्ण अन्न टिमनं लोकांचे प्राण घेऊन त्यांना कायमचं स्वातंत्र्य दायचं ठरवलेलं दिसतय.

श्रावण आहे... चातुर्मास आहे ... काय ह्या वेळी काही खरं नाही . अवांतर : ह्यासोबत काजु फेणीचीही पाकृ देणार का ? ;)

माशाच्या आकाराच्या केळिच्या पानावर पापलेटचे तळलेले तुकडे ठेवण्याची आयडिया आवडली.

चविष्ट पदार्थांनी मस्तं सजवलेले सुंदर ताट. आंबट, गोड, तिखट अशा चवी सोबत माशाचे कालवण, तळलेले मासे तसेच कोंबडीचे सुके वगैरे, शब्दांत वर्णन करता येणार नाही असे, चित्ताकर्षक पदार्थ आणि मस्तं जाळीदार घावणे. काय खाऊ आणि काय नको? नजरेनेच तृप्ततेची पातळी वाढायला सुरुवात झाली आहे.

हे काय आज्जे चक्क आंग्ल भाषेत प्रतिसात लिहतेयस तू ! जय बजरंगलीचा असा प्रभाव ? ;) बाकी धाग्या मधील पदार्थ खाता येत नसल्याने फक्त पास म्हणतो.

ते मध्ये पिवळे वरण आहे ते गोड्या वरणासारखे असते का?? तसे असेल तर त्यावर बोट ठेऊन मी उरलेल्या थाळीचा नजरेचे आस्वाद घेतला.. वरणाच्या ऐवजी भातावर ते मस्त मच्छीचे सार.. त्याबरोबर मी कितीही भात खाऊ शकतो.. अगदी कितीही :) आणि घावणे तर मी सुके किंवा खोबर्‍याच्या चटनी वा चहाबरोबरही आरामात पाच-सहा खाऊ शकतो, इथे तर मेजवानीच आहे.. आज कोकणी आणि गोवन थाळीचा आस्वाद घेऊन तृप्त झालो.. -एक सिंधुदुर्गकर

ते गोडं वरण नाहीये , ते वाटपाचे वरण आहे आणी मी आधी म्हणट्ल्याप्रमाणे आमच्या घरी मासे-मटणाचे जेवण असले की हे वरण लागतचं... भाताबरोबर वरण आणी माश्याचे कालवण / रस्सा असे काँबी झक्कास लागतं :) तो पदार्थ तुमच्यासाठी ऑप्शन्ल आहे मी फक्त पाकृ दिली आहे ;)

कृपा करून असे फोटो अपलोड करू नका. हा फोटो बघून आज जर माझा मृत्यू झाला तर माझा आत्मा अतृप्त राहील. गेले एक वर्ष असे काही खाल्लेले नाही आहे.

अरे कित्ती कित्ती छळाल. आत्ता तिकडे पेठकर काकाशी कट्टी घेवून आले, मिपा मालकांना विनंती, या पुढे अशा छान छान पा कृ करणार्‍यांनी समस्त मिपा करांना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण देणे सक्तीचे करावे अशी अट घालणे.

उच्छाद मांडला आहे या मुलीने, तुला काही श्रावण वैगेरे आहे कि नाही ग? आता डोळे गंगाजलाने धुवायला हवेत, नाहीतर श्रावण मोडेल ….

रापचिक एकदम! 'अन्न हे पुर्णब्रह्म' चा बड्डे दणक्यात झाला म्हणायचा एकंदर.. बाकी मोदकाच्या सुवसिक पीठीपासुन घावन बनवायचे सुचलेच नव्हते. त्याबद्दल अगदी पेश्शल धन्यवाद. तुम्हाला (आणि पेठकरकाकांना सुद्धा याच धाग्यात)एक विनंती की श्रावणी सोमवार निमित्त उपवास सोडायला अशीच एक मस्त सात्विक थाळीसुध्दा द्या ना प्लीज..

वर्षपूर्तिदिन डोळे भरून पावला. पदार्थांची निवड उत्तमच. सादरीकरणाबद्दल आणखी खास काय लिहिणार? नेहेमीप्रमाणे उत्तमच. जाता जाता : तांदळाच्या उकडीचे कुठलेही पदार्थ किंवा घावन-शेवयांसारखे पदार्थ करताना बासमतीपेक्षा आंबेमोहोर बरा आणि त्यातूनही नवा तांदूळ असेल तर उत्तमच. आंबेमोहोर किंवा नव्या तांदुळाला चिकटपणा असतो जो बासमतीमध्ये नसतो असे पट्टीच्या मोदकबनव्या बायकांकडून ऐकले आहे.

आंबेमोहोर किंवा नव्या तांदुळाला चिकटपणा असतो जो बासमतीमध्ये नसतो असे पट्टीच्या मोदकबनव्या बायकांकडून ऐकले आहे.
घावण्यांसाठी 'सुरई' तांदूळही वापरतात. त्याला चिकटपणा चांगला असतो.

मिसळ पाव वर नोंद केल्यानंतरचा पहिलाच प्रतिसाद तुम्हाला. सानिका ताई , आम्ही तुमच्या आणि गणपा भाऊंच्या पाककृतींचे जबरदस्त fan आहोत तुमचे सर्व videos आणि पाककृती प्राधान्याने वाचल्यात आणि त्यातील बऱ्याच करूनही बघितल्या आहेत . धन्यवाद!