अगदी अगदी. मराठी माणसालाही नरेंद्र दाभोळकर माहिती नाहित हे नव्यानेच कळाले. आत्ताच एकाशी बोलत होतो तर नरेंद्र दाभोळकर कोण हे समजावुन सांगत होतो तेव्हा मी " ते नाही का ते जे जादू टोणा अंधश्रद्धा वगैरे विरुद्ध......" तर फक्त जादू शब्द ऐकुन ओह ते मॅजिशियन का? माहिती होते ते मला. ऐकले होते. " असे उत्तर आले. मी स्वतःच्याच उरल्यासुरल्या झिंज्या उपटुन घेतल्या.
दोन प्रचंड मोठी माणस आपल्यातुन आज गेली. फार वाईट झाल. ऐक देवावर नितांत भक्ती असलेले व दुसरे दैव वादावर कडक आसुड ओढणारे. फार म्हंजे फार वाईट झाल. आज अजुन दोन चांगली माणस आपल्यातुन गेली.
सुन्न!
अशा घटना होत राहतात, एकामागून एक.
प्रत्येक वेळी असं काही यापुढे होणार नाही, होऊ नये असं वाटतं ... आणि तरीही ..
समाज म्हणून आपण किती हतबल होत चाललो आहोत!!
अधिक काही केले पाहिजे .... आपण प्रत्येकानेच!
अपवाद म्हणून किंवा हे त्यातल्या त्यात ओके आहे किंवा आमच्यात बाबा या गोष्टी चालत आल्यात आणि आम्ही पाळतो त्या, काय हार्म्लेस आहेत, या मानसिकतेतून मग क्रूरपणा बाबतच्या संवेदना बोथट होत जातात. त्यातून मग कुंडली, राशीभविष्य हे ठीक आहे पण नरबळी म्हणजे खूप वाईट असल्या अतिफालतू आणि मूर्ख विचारांचा पगडा एकूणच बऱ्याच लोकांवर आहे. कुठलाही वैज्ञानिक आधार नसताना केवळ परंपरा म्हणून मानल्या गेलेल्या अनेक गोष्टी हळू हळू बदलतील म्हणून शहाणे लोक आयदर त्याबाबतीत बोलायचे टाळतात किंवा मग एखादा बोलला तर सगळे अतिमूर्ख त्याचा समाचार घेतात. हि श्वापदे कळपाने राहतात. तेव्हा ज्याचा पुरावा नाही ते खरे नाही हि मानसिकता संपूर्णपणे अंगिकारली जाईल तेव्हाच हे मृत्यूसत्र थांबेल. आज एका शहाण्या माणसाचा खून झाला पण समाजाने काय गमावलेय हे जाती पाती मानणाऱ्या, दरबारात जाणाऱ्या (उ दा भोंदु लोक आणि त्यांचे दरबार आणि दाराबारातली ती वेडी लोकं), कुंडलीगिरी करणाऱ्या लोकांना संपूर्णपणे कळणे गरजेचे असले तरी खरंच खूप अवघड आहे.
नरेंद्र दाभोलकरांना श्रध्दांजली …
-निखिल.
नरेंद्र दाभोळकरांना भावपूर्ण श्रध्दांजली आणि त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध.
बौद्धिक पातळीवर दाभोळकरांशी चर्चा आणि प्रतिवाद न करु शकणार्या लोकांकडुन अजुन काहीच अपेक्षा नाही म्हणा. .... हेच म्हणतो.
पुरोगामी महाराष्ट्राचा युपी बिहार होत चाललाय,जिथे मुद्दे संपतात तिथे गुद्दे सुरु होतात्,या बाबा बुवांकडे प्रतिकार करण्याकरिता मुद्दे च संपले होते, पण यांना एक कळत नाही माणसे मारुन विचार संपत नाहित्,उलट आणखी जोमाने उभे राहतात्,या गोष्टीचा नुसताच पोकळ निषेध व्यक्त करुन उपयोग नाही तर विरोधात खंबिरपणे उभे राहणे गरजेचे आहे मी तयार आहे मित्रनो,तुमची तयारी आहे का ? सर्व नेटीझन एकत्र येउन याविरोधात रान उठवु शकतात्,निदान मि.पाने तरी याबाबत पुढाकार घ्यावा ही विंनती....
अतिशय खेदजनक बातमी. एक GREAT माणूस गेला.
पण नरेंद्र दाभोळकरांबद्दल पूर्ण आदर ठेऊन तरीही म्हणावसं वाटतं की-
आंतरजालावर RIP वाचून गंमत वाटली. तथाकथित RATIONAL BEINGS पण देहा नंतर काही उरतं असा मानू लागली की काय ? किती मोठी IRONY ?
डॉ दाभोळकरांच्या हत्येचा निषेध. समाजप्रबोधन करणारी व्यक्ति ज्यांच्या नजरेत सलत आहे अशांचेच हे काम असावे. ही तर मुस्कटदाबी झाली. अंधश्रद्धा निर्मूलनातला एक खंदा कार्यकर्ता हरपला, हे समाजाचे नुकसानच नव्हे तर दुर्दैव आहे. या हत्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे.
डॉ. दाभोळकर आणि श्री. साळगांवकर यांना विनम्र श्रद्धांजली.
माणुस मरतो पण विचार नाही. जादुटोणाविरोधी विधेयकाला सर्वप्रकारे पाठिंबा देणे हीच दाभोलकरांना खरी श्रद्धांजली ठरेल. नाहीतर नुसतेच "जन पळ्भर म्हणतील हाय हाय.."
ह्या दुर्दैवी घटने इतके आश्चर्य वाटण्या सारखे काय आहे?
ह्या देशामधले आमदार, खासदार, नगरसेवक बघितले तर सज्जन माणसांचे खून होणार हे सांगायला कशाला पाहिजे.
डॉ. दाभोळकरांच्या हत्येमागचं कारण वैचारिक असो, राजकीय वा आर्थिक -- "बोला आमच्याविरूद्ध हवं तेवढं! आमच्या समाजातले दोष दाखवलेत म्हणून जीवे मारण्याचे फतवे का निघणार आहेत? तेव्हा रहा सुरक्षित आणि करा टीका." छापाचं जे लंगडं समर्थन अनेकदा वाचायला/ऐकायला मिळे -- त्यातला फोलपणा निदान आता तरी अशांच्या ध्यानी यावा, ही अपेक्षा बाळगणंदेखील व्यर्थ आहे; असं वाटायला लावणारे काही प्रतिसाद (फेसबुकावर/अन्यत्र) वाचले आणि ही दु:खद बातमी ऐकल्यावर वाटलेली खंत अधिक गडद झाली.
हुतात्मा बनलेल्या वैचारिक क्रुसेडर्स् च्या साखळीतला आणखी एक दुवा. हा दुवा अखेरचाच ठरो आणि ही साखळी इथेच थांबो अश्या आशेच्या एका किरणाचीही अपेक्षा करता येऊ नये इतपत वातावरण काळेकुट्ट झाले आहे. आयुष्यभर आपले युद्ध अहिंसकतेने लढणार्याचा अंत हिंसामय असावा हे इतिहासाला मान्यच जणू.
जयंतराव साळगावकरांना श्रद्धांजली.
आत्ता येथे सकाळी सकाळी जालावर वर्तमानपत्र वाचायला घेतले आणि दाभोलकरांची बातमी ऐकून सुन्न झालो. महाराष्ट्र खरेच वाळूत डोके खुपसून बसलेला आहे. या घटनेचे कुठलेही राजकारण न करता त्याच्या मुळाशी जाऊन मारेकरी आणि बोलवते धनी शोधणे गरजेचे आहे असे वाटते.
स्वतः दाभोलकरांचा अध्यात्म (यात फिलॉसॉफी आली, अंधश्रद्धा म्हणून नाही) विश्वास होता का माहीत नाही. म्हणून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी असे मी माझ्या श्रद्धेने म्हणतो आणि त्यांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य पुढे योग्य दिशेने चालूच राहूंदेत अशी प्रार्थना करतो.
सकाळपासून अत्यंत अस्वस्थ आणि उद्विग्न आहे. बातमी कळल्यापासून कामातले लक्षच उडाले. शेवटी लवकर घरी आलो. काय चाललंय हे आपल्या महाराष्ट्रात ?
जास्तीतजास्त लोकांनी या अंधश्रद्धेपासून मुक्ती घ्यावी हीच डॉक्टरांना उचित श्रद्धांजली ठरेल.
मी आध्यात्म वा हे श्रद्धा अंधश्र्द्धा याबाबतीत अगदी दाभोलकरच असल्याने मला घरचा माणूस गेल्याचे दु: ख झाले. मी त्यांना एक अगदी छोटी मदत केली होती. बाकी त्यांच्या कार्यात झोकून द्यायचे राहिले. कारण ते यात्री होते मी शंकेखोर आहे. माणूस जन्मत:च काही तरी बरेच बरोबर घेऊन येतो. त्याला बलदण्यासाठी चळवळी , उपदेश यांच्यापेक्षा अनुभवाचा झटकाच अधिक उपयुक्त असे माझे मत आहे.
डॉ. दाभोळकरांच्या हत्येचा निषेध.
अंधश्रद्धा - जादुटोणा विरोधी विधेयकाचे कायद्यात रुपांतर व त्याची कडक अंमलबजावणीच त्यांच्या कार्याला योग्य ती श्रद्धांजली ठरेल.
"आई गं!" ही पहिली प्रतिक्रीया आली तोंडातून.. लाजिरवाणी गोष्ट आहे एक समाज म्हणून आपल्याला. "पटले नाही विचार, टाक संपवून" ही वृत्ती पुन्हा पुन्हा वर येतेय. सतिश शेट्टींच्या हत्येचं पूर्ण राजकारण केलं गेलं.. आर्.टी.आय. च्या चळवळीचं अपरिमित नुकसान झालं तेव्हा.. शासनाला दोष देऊन थांबता येणार नाही, खूप चुकीच्या दिशेने वेगात चाल्लोय आपण. सामाजिक कार्यकर्त्यांना जीव ओतून काम करायला कसा धीर देणार आता! निराश वाटतय एकदम.. असं काही झालं की सामाजिक चळवळींचा वेग अतिशय मंदावतोच, ते कधीही न भरुन येणारं नुकसान असतं! डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या नावानेच विधेयक आणणं हीच खरी आदरांजली असेल त्यांना, बाकी सरकार काही करेल असं वाटत नाही, त्यांच्यावर तितका विश्वास राहिला नाही हे उघड सत्य आहे!
सरांना विनम्र श्रद्धांजली.
आपलं प्रतिबींब बघवत नाहि तर रूप टीकठाक करण्याऐवजी आरसा फोडायचा... हे कृत्य केवळ अविचारी नव्हे तर आत्मघाती आहे.
सरांचं शरीर संपवलं तरी त्यांचे विचार संपणार नाहित वगैरे गप्पा तात्वीक म्हणुन ठीक आहे, पण एक माणुस निर्भीडपणे समाजाला त्याच्या उणीवा दाखवुन देत होता. तो आता गेला, तर त्या कार्याचे व्हायचे ते नुकसान झालेच :(
वर गविंनी म्हटलय तसं, हा प्रकार केवळ वैचारीक मतभेदातुन झाला असावा असं वाटत नाहि. कुठे तरी हितसंबंध दुखावले गेले असावेत. अनिंस हि संस्था काहि खुप पैसा बाळगुन नसावी, व त्यात राजकीय फायदा देखील नसावा, त्यामुळे सरांच्या खुर्चीवरुन हे कांड झालेलं नाहि. सरांच्या कोअर वर्तुळातल्या लोकांना काहि कल्पना असेल... त्यांनी आता अधिक सावधानी बाळगण्याची गरज आहे.
मेणाबत्ती मोर्चावाल्यांना हस्तिदंती मनोर्यातले समाजसुधारक म्हणुन हिणवले जाते... पण आजघडीला पुणे शहरात या मंडळींनी मोर्चा काढण्याची अत्यावष्यकता आहे. या खुनावर समाजाने सक्रिय प्रतिक्रीया द्यायलाच हवी.
अर्धवटराव
आजच्या काळापेक्षाहि प्रतिकूल परिस्थितीत पूर्वी समाजसुधारकांनी, प्रचंड टीका सहन करीत काम केले, पण तेव्हा विरोधकांनी असे खून नाही केले. आज जे घडले ते भयंकर आहे. मन सुन्न झाले.
दाभोळकरांना दोन तीन वेळा प्रत्यक्ष भेटायची संधी मिळली... प्रचंड कार्यक्षम व्यक्तीमत्व....
कट्टर नास्तिकाला ओंकारेश्वरा जवळ म्रुत्यु यावा हा कसला विचित्र योग....
भावपुर्ण श्रद्धांजली!!
प्रतिक्रिया
अगदी अगदी. मराठी माणसालाही
औघड आहे सारंच
दाभोळकरांच्या विचारांची हत्या आधीच झाली होती. आता शरिराची झाली.
दोन प्रचंड मोठी माणस आपल्यातुन आज गेली. फार वाईट झाल.
सुन्न!
फलज्योतिषाचे
वाईट बातमी. श्रद्धांजली.
नरेंद्र दाभोलकरांना श्रध्दांजली.
धक्कादायक बातमी
भावपूर्ण श्रद्धांजली.
नरेंद्र दाभोळकरांना भावपूर्ण
अतिशय खेदजनक बातमी.
हिजड्यांच्या राज्यात राहात असल्याची लाज वाटते.
पुरोगामी महाराष्ट्राचा युपी
+१
अतिशय खेदजनक बातमी. एक GREAT
विनम्र श्रद्धांजली
असं घडायला नको होतं ...
अत्यंत भ्याड कृत्य आहे. निषेध
माणुस मरतो पण विचार नाही.
विचार मरू नये हे म्हणणे जास्त
ह्या दुर्दैवी घटने इतके
सुन्न करणारी घटना!
भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध
डॉ. दाभोळकरांच्या हत्येमागचं
दुर्दैवानं खरंय.
श्रद्धांजली
इतिहास
वाईट बातमी. श्रद्धांजली.
(No subject)
अस्लम बाबा
विचार पटले नाहीत म्हणून त्या
!!??
+१११
खरं आहे...
कालाय तमे नमह
उद्विग्न
माझी अवस्था तशीच तिमा...
काय चाल्लंय हे. :(
+१
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धांजली
श्रद्धांजली व निषेध
कळवळलो ऐकून..
वी वील टेक इट फॉर्वर्ड सर.
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.
मनःपूर्वक श्रद्धांजली!!
आजच्या काळापेक्षाहि प्रतिकूल
दाभोळकरांना दोन तीन वेळा
महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या
Pagination