याच्या आधी थाळीचे दोन प्रकार मिपा वर नुकतेच आले. दोन्ही मासांहारी. १. कोकणी व २. गोवन .
दोन्हींची वाचक संख्या आजमितीस अनुक्रमे ३८२५ व ३९५६ अशी आहे . आता मृणालिनी ताईंनी शाकाहारी थाळी दिली आहे. आणखीही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लोकांच्या आवडीचे असे थाळ्याचे प्रकार येतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
@आणखीही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लोकांच्या आवडीचे असे थाळ्याचे प्रकार येतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही>>> +++++++११११११११११ विदर्भ/मराठवाडा/खान्देश ! :)
आली....आली....अखेर शाकाहारी थाळी 'अन्न...'वर. अवतरली धन्यवाद.
छायाचित्र अगदी आकर्षक आणि निमंत्रण देणारे आहे.
हिरव्या मुगांची उसळ करून पाहायला हवी. आमचा मसाले भात बाकी जSSSरा वेगळा असतो. असो. प्रत्येकाच्या पाककृती आणि हाताची चव वेगवेगळी असतेच.
असे जेवूनि मिपाकर तृप्त झाले....
बघूनच प्रसन्न वाटतंय.
जुन्या वाड्यात मध्यभागी रामाचं छोटं देऊळ असावं, शेजारी चार दोन चाकरमानी (शिक्षक, पोस्टमन, मुद्रणालयात अमुक तमुक) कुटुंबं असावीत नि त्यातल्या एका घरात दुपारी जेवायला बोलावलेलं असावं.
मागे परसात जाऊन हात पाय धुवून यावं नि मोठ्ठ्या लाकडी पाटावर बसावं. समोर असं ताट यावं, एवढंस्सं काय वाढलंय असा 'कुणबी' विचार मनात येईस्तोवर हळू हळू एक एक पदार्थ थोडा थोडा करत ताटात यावा नि गप्पा मारत मारत कधी पोट भरुन तृप्तीचा ढेकर यावा हे समजायचं नाही..... आहाहा!
श्रावण महिना सुरु झाल्यावर दोन मांसाहारी थाळ्या आल्यापासुन एका शाकाहारी थाळीची वाट पहात होतो. श्रावण महिना संपताना आणि गणपती बाप्पाच्या आगमनापुर्वी हि अशी भरलेली शाकाहारी थाळी बघुनच मन तृप्त झाले. यात फक्त उकडीचा मोदक ठेऊन गणपती बाप्पा समोर नैवेद्य ठेवायला हरकत नाही.
__/\__ साष्टांग दंडवत मृणालिनी ताई.
पेठकर काका, तुमच्या आज्ञेनुसार श्रावण महिना मोडायची हिंमत झाली नाही हो. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर तिकडे (तुमच्या थाळीकडे) मोर्चा वळवणारच आहे.
मग हे सगळे पुन्हा कसे खाणार???
आय बि येन ठोकमत वर असतो तर म्हणालो असतो...
पुन्ना एकदा एक थाळी आली आहे आणि पुन्ना एकदा खाण्याचा आग्रह होतोय..
आपल्या प्रेक्षकांना सांगा कि हा नक्की काय आहे ...
मृणालिनी ताई आपल्याला पुन्ना एकदा हा प्रश्न...
हा हा हा !!!
Comments
सुरेख!
मस्त...
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग!
अन्न हे संपूर्णब्रह्म
@आणखीही महाराष्ट्राच्या
+१११
मस्त
मस्तच......!
आणि गुरुजीचा सुद्ध ... Smile
वा..वा.. शाकाहारी थाळी.
झकास
थाळी पाहून भूक जागी झाली
आली गो बाय थाळी
आहाहा...
असे जेवूनि मिपाकर तृप्त झाले.
अप्रतिम थाळी! गणपती बाप्पासाठी नैवेद्य!
शुभेच्छा..!
मस्त. एक नम्बर थाळी.
थाळि...
तोपासु थाळी
थाळी आवडल्याबद्दल सगळ्यांचे
सुंदर थाळी!
आत्ताच जेवलोय नं मी
अतिशय सुंदर
१ नंबर अमोल केळकर
वॉव !
वाह! छान हां मृ! माझ्या
हि हि हि... नक्की विचार करते.
एक नंबर.. कित्ती दिवस ह्या
सुरेख !
आहाहा... सकाळी ९ वाजताच ही
हे तर खरं अन्न! चार दिवस
संतुलित आहार
खूप छान
झकास
खुप छान
वा!!!
थाली आवडली, कैरीचे लोणचे
उत्तम ! तोण्डाला पाणी सुटले !
सगळ्यांचे आभार, :)