Welcome to misalpav.com
लेखक: Mrunalini | प्रसिद्ध:


Comments

याच्या आधी थाळीचे दोन प्रकार मिपा वर नुकतेच आले. दोन्ही मासांहारी. १. कोकणी व २. गोवन . दोन्हींची वाचक संख्या आजमितीस अनुक्रमे ३८२५ व ३९५६ अशी आहे . आता मृणालिनी ताईंनी शाकाहारी थाळी दिली आहे. आणखीही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लोकांच्या आवडीचे असे थाळ्याचे प्रकार येतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

@आणखीही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील लोकांच्या आवडीचे असे थाळ्याचे प्रकार येतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही>>> +++++++११११११११११ विदर्भ/मराठवाडा/खान्देश ! :)

आता तर खरा सीझन आहे ह्या थाळ्याचा... गणपति , महालक्ष्मी, आलेत की.. :) आणि गुरुजीचा सुद्धा ... :) काय हो @ अ. आ. बरोबर ना !

आली....आली....अखेर शाकाहारी थाळी 'अन्न...'वर. अवतरली धन्यवाद. छायाचित्र अगदी आकर्षक आणि निमंत्रण देणारे आहे. हिरव्या मुगांची उसळ करून पाहायला हवी. आमचा मसाले भात बाकी जSSSरा वेगळा असतो. असो. प्रत्येकाच्या पाककृती आणि हाताची चव वेगवेगळी असतेच.

असे जेवूनि मिपाकर तृप्त झाले.... बघूनच प्रसन्न वाटतंय. जुन्या वाड्यात मध्यभागी रामाचं छोटं देऊळ असावं, शेजारी चार दोन चाकरमानी (शिक्षक, पोस्टमन, मुद्रणालयात अमुक तमुक) कुटुंबं असावीत नि त्यातल्या एका घरात दुपारी जेवायला बोलावलेलं असावं. मागे परसात जाऊन हात पाय धुवून यावं नि मोठ्ठ्या लाकडी पाटावर बसावं. समोर असं ताट यावं, एवढंस्सं काय वाढलंय असा 'कुणबी' विचार मनात येईस्तोवर हळू हळू एक एक पदार्थ थोडा थोडा करत ताटात यावा नि गप्पा मारत मारत कधी पोट भरुन तृप्तीचा ढेकर यावा हे समजायचं नाही..... आहाहा!

श्रावण महिना सुरु झाल्यावर दोन मांसाहारी थाळ्या आल्यापासुन एका शाकाहारी थाळीची वाट पहात होतो. श्रावण महिना संपताना आणि गणपती बाप्पाच्या आगमनापुर्वी हि अशी भरलेली शाकाहारी थाळी बघुनच मन तृप्त झाले. यात फक्त उकडीचा मोदक ठेऊन गणपती बाप्पा समोर नैवेद्य ठेवायला हरकत नाही. __/\__ साष्टांग दंडवत मृणालिनी ताई. पेठकर काका, तुमच्या आज्ञेनुसार श्रावण महिना मोडायची हिंमत झाली नाही हो. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर तिकडे (तुमच्या थाळीकडे) मोर्चा वळवणारच आहे.

गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर तिकडे (तुमच्या थाळीकडे) मोर्चा वळवणारच आहे.
जरूर. शुभेच्छा... आणि रिपोर्ट कळवा.

सुंदर दिसत आहे. बघुनच तॄप्त झालोय आणि समाधानाची ढेकर दिली आहे. पण पंचामॄत कुठे आहे? मसालेभाताबरोबर जाम आवडतं.

मग हे सगळे पुन्हा कसे खाणार??? आय बि येन ठोकमत वर असतो तर म्हणालो असतो... पुन्ना एकदा एक थाळी आली आहे आणि पुन्ना एकदा खाण्याचा आग्रह होतोय.. आपल्या प्रेक्षकांना सांगा कि हा नक्की काय आहे ... मृणालिनी ताई आपल्याला पुन्ना एकदा हा प्रश्न... हा हा हा !!!

अशी निगुतीने बनवलेली थाळी अन गणपती बाप्पा घरी आलेले.. चला जेवायला !

वाह! छान हां मृ! माझ्या शेजारी रहायला येण्याचा विचार करावास असे पुन्हा सुचवते. (एकदा अनाहितामध्ये सुचवले आहेच! ;) )

ही थाळी सुरेख आहेच ! ( पण आपली शाकाहारी थाळी अशी असते केळीच्यापानावर... वरणभात + पळीभर तुप + तुळशीचे पान (मस्टच ) लोणचे कांदा टामाटु काकडीची कोशिंबीर ओल्या खोबर्‍याची चटणी लिंबु मीठ कुरवड्या बटाट्याचे पापड भजी बटाट्याची भाजी मसाले भात कटाची आमटी साखरभात पुरणपोळी + पळीभर तुप दहीभात मठ्ठा आणि जेवण झाल्यावर मस्त भावेंची बडीशेप सुपारी घालुन बनवलेले घरगुती पान !! अहाहा क्या बात है !! पुढच्यावेळी फोटो सकट टाकेन )