पाककृती

कारले कुरकुरे

Primary tabs

साहित्य : १. कोवळी कारली - किमान चार
२. लाल तिखट - अर्धा चचा
३. गरममसाला - एक मोचा
४. खोबर्‍याचा कीस - तीन मोचे
५. पांढरे तीळ - दोन मोचे
६. फोडणीसाठी तेल - नेहेमीच्या प्रमाणापेक्षा थोडे अधिक, मोहरी, जिरे हिंग, इत्यादी
७. मीठ चवी नुसार
८. साखर - अर्धा चमचा ( आवडत असल्यास. नाही घातली तरी चालेल)
९. लिंबाचा रस (अर्धे लिंबू)
कृती: - कारली धुवून त्यांच्या अगदी पातळचकत्या कराव्यात. (त्यातील बिया काडून टाकणे ऐच्छिक आहे)
-चकत्यांना थोडे मीठ चोळून त्या किमान अर्धा तास बाजूला ठेवाव्या. अर्ध्या तासाने त्या पिळून कोरड्या कराव्या.
- एकाकढाईत खोबर्‍याचा कीस व तीळ भाजून घावेत व बाजूला काढून ठेवावे.
- त्याच कढाईत नेहेमी प्रमाणे तेल, मोहरी, जिरे. हिग घालून फोडणी करावी.
- फोडणी धुरावल्यावर शेगडीची आंच मंद करून कोरड्या केलेल्या कारल्याच्या चकत्या परतण्यास सुरुवात करावी.
- चकत्या थोड्या मऊ झाल्यावर मीठ घालावे. परतणे चालूच ठेवावी.
- मीठ घातल्या थोडे पाणी सुटते. ते आटल्यावर लाल तिखट,गरम मसाला घालावा.
- त्यानंतर भाजलेले तीळव खोबर्‍याचा कीस घालून परतावे. (आवडत असल्यास साखरही)
- शेवटी भाजी अगदी कोरडी झाली आहे असे दिसल्यावर लिंबाचा रस घालावा.
-शेगडीची आंच मोठी करून भाजी लालसर रंगावर कुरकुरीत होईतो भरभर परतावी

टीप: या पाककृतीत हळद लागत नाही.
सूचि: चचा = चहाचा चमचा
मोठा = मोठा चमचा (भात खाण्याचा)

वेलदोडा

वा . छान वाटतीये रेसिपी. करून बघतो आता.

प्राजु

पुण्यात असताना हॉट चिप्स या चिप्स मिळणार्‍या दुकानात कारल्याचे चिप्स खाल्ले होते. सह्ही होते ते सुद्धा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर

कारलं हा आमचा दुश्मन नम्बर एक...! :)

कार्ल्याची कुठलीही पाकृ आवडत नाही...

तात्या.

दिला होता पण चुक लक्षात येऊन लगेच मागे घेतला.
अरेरे! तुम्ही पण कारल्याचे शत्रू दिसता.

'शत्रू'ही नाही म्हणता येणार आणि 'मित्र'ही नाही म्हणता येणार. कारलं माझ्या 'ओळखिचं' आहे. डॉक्टरांनी आठवड्याच्या डाएट मध्येच घातलय ते.

sonalib

zakasssssssss
me karun baghte ajach
pethkar tumhi farach khavaye dista ho.
kai kam kai karta tumhi

ही पाककृती श्री. अरूण वडूलेकर ह्यांची आहे. माझी नाही.
कृपया मराठीत लिहीण्याचा प्रयत्न करावा.