Welcome to misalpav.com
लेखक: शिवोऽहम् | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हाही कव्हरेज आवडला. पुढारी माझाही लै फेव्हरीट पेपर होता लहानपणी. विश्वसंचारच्या कितीतरी कात्रणांचा साठा करून ठेवत असे. गुरुवारी निघणारी भरारी पुरवणीही जबरीच. अन पोलीस टाईम्सबद्दल काय बोलावे? हाष्टेलवरचा फेव्हरीट पेपर ;) तीच कथा दै. "काली गंगा" (इच्चलकरंजी स्पेशन) ची.

दक्षता हे पोलिस टाईम्सचे प्रेकर्सर म्हणावे, काळानुसार आणी कंटेंटनुसारही. इतके अंगावर येत नसे. श्री नावाचे एक अफलातुन साप्ताहिक होते. त्यात भानामती, काळी जादु, नरबळी हे पेटंट विषय असायचे. शिवाय इतर माल-मसालादेखिल असायचा. हे साप्ताहिक घरी आणायला, वाचायला बंदी होती. पण खामगावला मी गेलो असताना मावशीच्या माळ्यावरच्या अडगळीत मला खूप गठ्ठे सापडले श्री साप्ताहिकाचे. जमके वाचुन काढले, शाळीग्रामाचे वेगवेगळे प्रकार, दक्षिणावर्ती शंख, नरबळीचे प्रकार, अघोरी पंथाचे किस्से असे सगळे त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत समजावुन घेतले.. आणि हो, हा आठवणींचा फेरा १९८० च्या दशकात सुरू झालाय. तुम्हाल आवडले, मला जमले तर नेऊ २००३ पर्यंत.

आयला जबरीच की. हे माहिती नव्हते. काळी जादू इ. बद्दल कुठेतरी इंद्रजाल किंवा तत्सम कैतरी पुस्तक पाहिल्यागत आठवतंय. रैट्ट-भौतेक नरसोबावाडीतल्या पुस्तकांच्या दुकानात ;) यातला बाकी काही कंटेंट अ.ल.भागवत यांच्या पुस्तकांत पाहिला आहे. त्राटक, भ्रूमध्य, इ. खास खंग्री जार्गन तिथेच वाचली. तुम्हाला वाटेल तितका हा फेरा न्या, वाचायला आनंदच आहे :) बाकी मोदका, चित्राबद्दल धन्यवाद रे. :)

तुम्हाल आवडले, मला जमले तर नेऊ २००३ पर्यंत. नेकी और पूछ पूछ..?? बिन्धास्त न्या. २००३ नंतरच बहुदा या चौथ्या स्तंभावरची राजकारण्यांची पकड फासामध्ये बदलली असावी. हे वृत्तपत्र याचे, ते त्याचे हा प्रकार खूप आधीपासून होता.. मात्र आत्तासारखा लाळघोटेपणा नक्कीच नव्हता! आणखी एक, दक्षता हे पोलीसांचेच प्रॉडक्ट होते त्यामुळे त्यातला कंटेंट अधिकृत आणि वास्तव असे.

प्रेमचंद डोग्रा!! आपण एकाचवेळी कोल्हापुरच्या भुमीत होतो! फार छान बातम्यांची मालिका चाललीय. हा असा एकमेव लेख ठरावा. लिहा. @मोदक-दक्षताच्या मुखपृष्ठाबद्दल धन्यवाद.

याच दरम्यान "स्वराज्य" व चित्रपटाची चटपटीत खबरी "चित्रांसाठी" मायानगरी असे आकारही "श्री" मसिकासारखाच फुल साईझ.. श्री-पो.टा.-मायानगरी केशकर्तनालयात खास विरंगुळा असे (मोफत वाचन) आणि अक्षरशः पत्रावळ्या होईपर्यंत पारायण होई..

जिनिवाहुन कोणी एक नवी पत्रकार, चित्रा सुब्रह्मण्यम नावाची, नव्या बातम्या देऊ लागली होती...
याबद्दल पण येउद्या एखादा भाग.

'पुढारी','सत्यवादी' नावे ऎकून बर्‍याच आठवणी मनात जाग्या व्हायला लागल्यात.'सत्यवादी' फ़क्त त्याच्या खराब प्रिंटिग क्वालीटीमूळे आठवतोय. इतका खराब,की एका पेजवरची अक्षरे मागच्या पेजवर उलटी उठलेली दिसायची. सकाळ मात्र चांगला साफ़सुथर्‍या स्वरूपात निघत असे.पुढारी यथातथाच होता.पण लोकप्रिय मात्र प्रचंडच होता.आमच्या घरी सकाळच येत असे.पण पुढारीत ‘सोनेरी’ पुरवणी बहुदा त्याच काळात सुरू झाली असावी.त्यामूळे गंगावेशच्या एका बोळात 'रसरंग' ,'जत्रा' ,'मायापुरी' वाचण्याबरोबरच किमान शनिवारचा ‘सोनेरी’पुढारी मस्ट झाला होता. त्यावेळचा पुढारी आणि एका कारणामूळे लक्षात आहे. पुढारीच्या एका पत्रकाराने(नाव बहुदा प्रकाश पाटील किंवा असेच काहीतरी.) त्यावेळी तुरुंगातले जीवन अनुभवण्यासाठी स्वत:ला खोटीच अटक करून घेतली होती.आणि तुरूंगवासातल्या अनुभवावर आधारीत ‘गजाआडचे विश्व’ नावाची सुरेख मालिका पुढारीत लिहिली होती. सदर पत्रकार पुढारीत चित्रपट परीक्षण पण लिहित असे. अमिताभ,दिलीपकुमारच्या ‘शक्ती’ चे छान परीक्षण पुढारीत त्यावेळी वाचल्याचे आठवते. त्यावेळी पेपरमध्ये पंजाबमधल्या घडामोडींना बरेच स्थान असायचे .आंतरराष्ट्रीय घडामोडीत पॅलेस्टाईन-इस्त्राईल विषय आघाडीवर असायचा. त्यावेळी 'प्रायव्हेट हायस्कूल' मध्ये एका जोशी(की कुलकर्णी?) नावाच्या दाढीधारी सरांनी अचानक ऑफ़ पिरीयडला येऊन गप्पांच्या ओघात पॅलेस्टाईन-इस्त्राईल ह्या विषयाच्या दोन्ही बाजू आम्हा विद्यार्थांना छान समजाऊन सांगितल्या होत्या. असो! तुमचे 'पियुष मिश्रा' वरचे लेखन वाचून का कोण जाणे, त्यावेळच्या कॉलेज बोर्डवरच्या ‘चष्म्या आडून’ नामक सदराची आठवण झाली. :) '

दक्षता मासीक खरेच चांगले होते. पोलीस कथा असत पण पोलीस टाईम्स सारखे उथळ नक्कीच नव्हते. या सर्व वर्तमानांच्या तुलनेत स्वराज्य नावाचे एक सोज्वळ साप्ताहीक होते ते नंतर सकाळ ने विकत घेतले. आणि दुसर्‍या कोणाला तरी विकले. श्री नावाचे एक साप्ताहीक त्यातील सनसनाटी पणामुळे प्रसिद्ध होते. इंग्रजी चित्रपटांची स्टोरी देखील सत्यकथा असवी अशी रीपोर्ट करायाचे.

तेव्हा म. टा. आणि लोकसत्ता, एक्सप्रेस सगळेच चांगले होते. तळवलकर, शौरी इ. मंडळींबद्दल अजूनही लोकांना आदर आहे. आताचा म. टा. हे त्या पेपरचं भूत वाटतं. आर के चा कॉमन मॅन बंद झाला तेव्हाच म> टा. संपला आमच्या दृष्टीने. श्री आणि पोलीस टाईम्सबद्दल सहमत. श्री ची आठवण वाचून गंमत वाटली! दक्षताचा दिवाळी अंक मात्र खराच चांगला असायचा. त्यानंतर रत्नागिरीत रत्नागिरी टाईम्स नावाचा पेपर सुरू झाला, आम्हाला आधी वाटलं की हा टाईम्स ग्रुपचा आहे. पण मग त्यातला शोभाताईचा सल्ला आणि पोलीस टाईम्समधे शोभतील अशा बातम्या वगैरे प्रकार वाचून सॉलिड ह.ह. पु.वा.