साक्षात ज्ञानेश्वरांच्या हस्ताक्षरातील ग्रंथ पाहिल्याचे भाग्य लाभले नाही आजून!
बाकी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मल्याळम, गुजराती, बांग्ला किंवा उडिया ह्या भाषांना जशी खास स्वतःची म्हणता येईल अशी स्वतंत्र लिपी आहे, तशी मराठीची कोणती, ते सांगितलेत तर आमच्या ज्ञानात थोडी भर पडेल!!
असो.
+१
बोली आणि भाषा यांच्यातील सीमारेषा ठरवणारे कोणतेही ठोस शास्त्रीय निकष नाहीत.. जे काही ढोबळ स्वरुपातील आहेत, त्यावरुन सध्याच्या स्वरुपातील कोंकणी मला नक्कीच 'भाषा' वाटते. पण तिला हट्टाने बोलीच म्हणायचे असेल तर दाखवण्यापुरते पुरावे मिळवणे काही अवघड जाणार नाही. आणि त्यांचा प्रतिवाद करणेही तितकेच सोपे असेल. थोडक्यात, हा वाद घटनेच्या आधाराने सोडवणं सोयीस्कर आहे...
आणि पैसाताई म्हणतात त्याप्रमाणे, मराठी मृत्युपंथाला लागली म्हणून जी ओरड चालू असते ती अनाठायी आहे. खरी भीती कोंकणीसारख्या छोट्या भाषांना आहे. एकीकडून इतिहासाने लादलेलं पोर्तुगीजचं आक्रमण, दुसरीकडून जागतिकीकरणाची इंग्रजी , आणि तिसरीकडून शेजारच्या मोठ्या राज्याची मराठी अशा स्थितीत सापडलेल्या कोंकणीला आणि तशाच लहान-सहान भाषांना टिकवण्याची खरी गरज आहे...
लेखकाची भावना तळमळीची आहे पण मांडणी जरा आततायीपणे झाली आहे असे वाटते.
मातृभाषेचा अभिमान असावा, प्राथमिक शिक्षण, अवांतर वाचन, घरातील संभाषण मातृभाषेतच असावे. हिन्दी आणि इंग्रजी ह्या सुद्धा महत्त्वाच्या भाषा आहेत. जगात बहुसंख्य देशांमध्ये इंग्रजी चालते. उच्च शिक्षणात इंग्रजी भाषेचे ज्ञान नक्कीच उपयोगी ठरते. भाषेच्या ज्ञानात ती लिहीता, वाचता, बोलता येणे आवश्यक असते. प्रभावीपणे व्यक्त होण्यासाठी त्या भाषेचे ज्ञान अत्यंत गरजेचे असते. उच्च शिक्षणात म्हणूनच इंग्रजी भाषेचे महत्त्व आहे. असो.
आजकाल, दूरचित्रवाणींच्या मराठी वाहिन्यांवर बोलले - लिहीले जाणारे, मराठी कधी कधी अंगावर काटा आणणारे असते. 'आम्ही अमुक अमुक प्रकरणाचा 'भांडाफोड' केला', 'आजची ब्रेकींग न्यूज अशी आहे' वगैरे वगैरे मराठी (?) वाक्यांचा सर्रास उपयोग केला जातो. हळू हळू नव्याने मराठी शिकणार्या मुलांना तेच खरे मराठी वाटू लागते.
दूसर्या भाषेतील शब्द स्विकारल्याने भाषा संमृद्ध होत जाते असा प्रतिवादही केला जातो. पण आपल्या भाषेत चपखल शब्द असताना दूसर्या भाषेतील शब्द वापरण्याचा करंटेपणा का करावा? आपल्या भाषेत आधीच रुळलेले शब्द जसे स्टेशन, पेन, बॉलपेन इ.इ.इ. वापरू नका असे माझे म्हणणे नाही. पण विस्मृतीत जाणारे चांगले शब्द वापरात ठेवून भाषा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सतत करीत राहावा असे मला वाटते.
मराठीत आधीच अनेक उर्दू, फारसी, अरबी शब्द आहेत, बोलीभाषा - प्रमाणभाषा इ.इ. वादात न पडता जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे मराठीचाच आग्रह प्रत्येक मराठी माणसाने धरावा.
तात्पर्य, इंग्रजी ही अनेक कारणांनी महत्त्वाची भाषा आहे तेंव्हा ती शिकाच त्याच बरोबर मातृभाषेची कासही सोडू नका. दोन किंवा अधिक भाषांवर प्रभुत्व असणे अशक्य नसते.
त्यांच्या घरी कोणी तोतरं नाही किंवा त्यांची जीभही मुळात जड नाही. तरीही ही बोबडेपणाची अडचण! कशामुळे? कारण ज्या वयात शुद्ध-स्पष्ट बोलायची सवय लावायला हवी, त्या वयात हाय-फाय आणि स्टायलीश शैलीची इंग्रजीच फक्त काय ती शिकवली गेल्याचा हा परिणाम!
हे जरा जास्तच झालं. याचा अर्थ आंग्ल भाषा हि "शुद्ध-स्पष्ट" नाही वाटतं. आपल्या तर्का नुसार सगळे ईंग्रज हे बोबडे असायला हवेत. संभाषण सफल होत असल्यास भाषेचा अट्टहास का? आज किती लोकांना ज्ञानेश्वरी मधली मराठी समजते? जसं नदीला अनेक नद्या येउन मिळतात आणी ती मोठी होत जाते तसंच भाषेचं ही आहे. शुद्धतेचा टेंभा मिरवुन आपण आपली दारे इतरांसाठी बंद करायची आणी मग ती कुणी बोलत नाही म्हणुन कांगावा करायचा.
मराठीला विरोध नाही माझा पण तसाच इंग्रजीला किंवा इतर कुठ्ल्या भाषेला ही नाही कारण भाषेचं दळणवळण हेच एकमेव उद्दीष्ट आहे असं माझं शुद्ध-स्पष्ट मत आहे.
खरे सान्गायचे तर मला आलेले अनुभव असेच आहेत्,खास करुन जे गोरे लोक भारतात येतात त्यान्चे उच्चार खरेच समजत नाहीत ईतके कधी कधी अस्पष्ट असतात्,तेव्हा आम्ही बर्याचदा pardon please असे म्हणावे लागते,नाहीतर शेवटी notepad चा उपयोग करावा लागतो.
भाषा ही प्रवाही असते, सोइचे असेल तर मी मिंग्लिशही बोलु शकतो .सर्व भाषांचे कॉकटेल होउन नवीन भाषा तयार झाली तरी चालल. काहीजण संस्कृत भाषा आम्हाला येते असे छातीबडवून नेटवर सांगत फिरतात ,प्रत्क्षतात संस्कृत मृतभाषेकडे वाटचाल करत आहे.
घरातली म्हातारी खपत नाही म्हणून सांभाळायची ,असे या भाषांचे व जुन्या गोष्टींच्या बाबतीत चालले आहे.
प्रत्क्षतात संस्कृत मृतभाषेकडे वाटचाल करत आहे.
संस्कृत मृतभाषाच आहे. आता अजुन कसली वाटचाल करणार?
गृहपाठ : आमच्या घराबाहेरच्या गटारी तुंबलेल्या आहेत, त्या स्वच्च करण्यासाठी नगरपालिकेला संस्कृतात पत्र लिहून दाखवा.
पेठकर काका म्हणतायतत तसंच, हे लिखाण थोडं भावनेच्या आहारी जाऊन/ आततायिपणे झाल्यासारखं वाटतय. अशी चर्चा चालू असते तेव्हा माझ्या मनात संस्कृतविषयी कायम येतं, ते असं - "माझी आजी/ आजोबा म्हणायचे, संस्कृत देवांची भाषा आपलं बरचसं धार्मिक लिखाण संस्कृत मध्ये आहे ती भाषा आलीच पाहिजे. सुदैवाने मी संस्कृत वाचता येईल, बाहेरच्या श्लोकांचा अन्वय लावता येईल इतपत्(च) शिकलो. इतर व्यवधानांमध्ये वेळच नव्हता शिवाय संस्कृत्ला स्कोरिंग करता येते असा ठ्पका.. त्यामुळे शालेय जिवनात संस्कृतकडे बघण्याचा माझा, बरोबरीच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा 'स्कोरिंग' हाच साचेबद्ध दृष्टीकोन. सुदैवाने आम्हाला शिक्षक चांगले मिळाले, गिरगावात दाजी भाटवडेकर तेव्हा संस्कृतमधून नाटकं करायचे, ते वातावरण मिळालं. पण पुढे पुढे संस्कृती संपर्क तुटलाच. जगाच्या पाठीवर जी अनेक पुस्तक घेऊन फिरतो त्यात ती हंसाचं चित्र असलेली धातुरुपावली असते तेवढीच काय ती. अर्थात संस्कृतवरच्या प्रेमाखातरच! उतारवयात पुन्हा नव्या उमेदीने संस्कृत शिकण्याचा विचार आहेच, बघूया......
आता ह्या पार्श्वभूमीवर, मी मुलास मराठी पकडून ठेवायला सांगायची, की संस्कृत की मग मोडी. त्याला जगात स्वतःच्या पायावर उभं राहायला (सुतारकामासरख्या गोष्टी करुन नव्हे तर तंत्रज्ञाम, सशोधन वगैरे करुन) तर विकेपिडिया, गुगल सर्च लहान वयात वापरता येऊन त्यातील माहितीचा फायदा घेण्यासाठी इंग्लिश अपरिहार्य आहेच, मग अशात, प्रेमापोटी मराठीही शिकवणारच त्याला पण संस्कृतला जागा आणि वेळच कुठाय! जशी मी मोडी लिपी लिहू शकलो नाही तसा तो किंवा त्याची पुढची पिढी, संस्कृतपासून लांब जात राहील आणि ते आपल्याला स्विकारायलाच हवं. पण तरिही जोपर्यंत मराठि ही महाराष्ट्र राज्याची भाषा आहे तोपर्यंत तरी तिला मरण नाही हे नक्की! आता तिचं वळण इतर भाषांच्या आक्रमणात बदलेल पण त्यात काही नविन नाही, अगदी इंग्रजी सुद्धा स्थल कालापरत्वे बदलतच आहे की. असो!
प्रतिक्रिया
लिपी
साक्षात ज्ञानेश्वरांच्या हस्ताक्षरातील ग्रंथ पाहिल्याचे भाग्य ला
+१
दोन्ही भाषा महत्त्वाच्या.
त्यांच्या घरी कोणी तोतरं नाही
हे जरा जास्तच झालं. याचा अर्थ आंग्ल भाषा हि "शुद्ध-स्पष्ट" नाही
भाषा ही प्रवाही असते, सोइचे
.
ओ ग्रे.थिं. शिक्षक....
भाषा..
मराठी भाषेवर होणार्या इतर
इ.ए. साहेब...
जुनी विट नवं राज्य..
काय ठरलं मग?
Pagination