Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आपल्या अतुलनीय प्रतिभेने आम्ही भारावून गेलो आहोत. पण त्याहीपेक्षा त्या 'लगीन' या शब्दातल्या 'ग' खाली ते उर्दु सारखे टिंब काढायला तुम्हाला कसे जमले, हे सांगितले तर तुम्ही मागाल ती गुरुदक्षिणा देईन.

नवनवोन्मेषशाली लेखन. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाचा लेख वाचला तर जातोच, पण ऐकता पण येतो. उदा. आँफिस, साँरी, वगैरे

एका वाक्यात उत्तरे द्या:- दिपा सुर्याकडे तोंड करुन का बसलेली असते? त्यावेळी दिपक चा चेहरा कोणत्या दिशेला असतो? दिपकचे अडनाव काय आहे? दिपकची आणि दिपाची भेट प्रा. उपाध्यांनी गुरुदक्षीणा मागीतल्यावर झाली की त्या आधी? दिपक कडे भरपुर नोकर असतात पण त्याच्या बापावर नजर ठेवायला आई घरात नसते का? का आईच नसते? प्रा उपाध्येंनी बिनधास्त रात्री दिपाला घरी बोलावले याचा अर्थ दिपक सुध्दा रात्री घराबाहेरच असायचा असा अंदाज करता येइल का? दिपकला पप्पांना पप्पा म्हणायची लाज वाटली तर तो त्यांना काय म्हणुन हाक मारेल? पिएचडी पुर्ण होण्यासाठी किती महीने बाकी असताना प्रा उपाध्यांनी गुरुदक्षीणा मागीतली? सहा, दोन कि एक? आयुष्यभरासाठी उपाध्यांकडे जायला तयार असलेली दिपा घरी गेल्यावर पलटी का मारते? लगीन हा शब्द "ग" च्या खाली टिंब देउन दहा वेळा लिहा

दिपा सुर्याकडे तोंड करुन का बसलेली असते? त्यावेळी दिपक चा चेहरा कोणत्या दिशेला असतो?
दिपाकडे
दिपकचे अडनाव काय आहे?
प्रसाद!
दिपकची आणि दिपाची भेट प्रा. उपाध्यांनी गुरुदक्षीणा मागीतल्यावर झाली की त्या आधी?
दिपानं गुरुदक्षिणा देण्यापूर्वी!
दिपक कडे भरपुर नोकर असतात पण त्याच्या बापावर नजर ठेवायला आई घरात नसते का? का आईच नसते?
उपाध्ये सारखी दक्षिणा मागतात म्हणून त्या माहेरी गेल्या आहेत
प्रा उपाध्येंनी बिनधास्त रात्री दिपाला घरी बोलावले याचा अर्थ दिपक सुध्दा रात्री घराबाहेरच असायचा असा अंदाज करता येइल का?
दार बंद असल्यानं तो घराला प्रदक्षिणा घालत असणार.
दिपकला पप्पांना पप्पा म्हणायची लाज वाटली तर तो त्यांना काय म्हणुन हाक मारेल?
दक्षिणदास!
पिएचडी पुर्ण होण्यासाठी किती महीने बाकी असताना प्रा उपाध्यांनी गुरुदक्षीणा मागीतली? सहा, दोन कि एक?
प्रबंध आणि दिपा यापैकी नक्की काय बरं आहे ते लक्षात आल्यावर.
आयुष्यभरासाठी उपाध्यांकडे जायला तयार असलेली दिपा घरी गेल्यावर पलटी का मारते?
स्रीचं मन बदलून ती केव्हा पलटी मारेल सांगता येत नाही.

खरं तर कथाबीज सशक्त आहे. कथा प्रकाशित करण्यापूर्वी दोन-तीनदा स्वतःच शांतपणे वाचून पाहिली असतीत तर तुमच्या तुम्हालाच दुरुस्त्या सुचल्या असत्या. तुमच्या आधीच्या धाग्यांवर वाचकांनी केलेल्या सूचना तुम्ही मनावर घेतलेल्या दिसत नाहीत - बहुधा तुम्ही त्या वाचल्याही नसाव्यात म्हणा :-)

खरं तर कथाबीज सशक्त आहे.
प्रचंड ताकतीने सहमती! - (कथाबीज आवडलेला) सोकाजी

केलेली गुरुदक्षिणा...
केलेली दक्षिणा???? दक्षिणा देतात किंवा घेतात , फार तर मागतात असे म्हणा. करायला गुरुदक्षिणा म्हणजे काय मुंज आहे की मंगळागौर?

उद्या कदाचित नविन कार्य पण तयार होईल... आणि भटजी पण मिळतील... "इथे गुरु दक्षिणेचे कार्य करून मिळेल" अशा पाट्या पण तयार होतील...

च्यायला. प्रा उपाध्याचे आणखी कोणकोणते 'धंदे' असतात की त्यांना घरी भरपूर नोकर ठेवणे परवडते? बाकी, मी लेखकाच्या प्रतिभेने भारावून त्यांचा फुल्ल ऑन ओरिएंट पीएसपीओ पंखा झालो आहे..

अन केवळ सुरेख नाट्यमयता व ओघवतेपणा आहे म्हणूनच हे लेखन आवडले म्हणतो (मग भलेही पटले नाही तरी...)

परवा प्राणी संग्रहालयात गेलो होतो.तेंव्हा २ गेंड्यांचा संवाद कानावर आला. एक गेंडा दुसर्‍या गेंड्याला म्हणत होता की, त्याची कातडी जीवन भावूंसारखी आहे...

तुमच्या आमच्या सारख्या संसारात गुरफटलेल्या माणसांपण कोषातून बाहेर काढलेच की नाही ह्या भाउंनी...

हाहाहा =)) छिद्रान्वेषी मोड ऑनः प्रतिसादातील शेवटच्या महास्फोटाचे अनेक अर्थ निघू शकतात. (मोडच्या नावावरूनही तेच करता येते हेवेसांनल) छिद्रान्वेषी मोड ऑफ.

आहाहा, आजचा दिवस सोनियाचा, पुण्याला प्रवास करायचा आहे. ह्या कथेची PDF करुन मोबाइलवर ठेवली आहे. आता प्रवासात वेळ कसा जाइल ते कळणारही नाही. ह्या कथेतील मराठीला बहाल झालेल्या नवशब्दांचे उच्चार करायची प्रॅक्टीस करता करता पुणे येइल. सासंरा, लग़ीन, माग़णि हे असले बघून आज तात्या अभ्यंकरालाही 'खून किंवा आत्महत्या' करावीशी वाटली असती. - (ह्या शब्दांवर पी.एच.डी. अशी मनिषा असलेला) सोकाजी

मायमराठीला ओ'हेन्री घावला ईंग्रजीतून हेन्री वाचणं अंमळ जड जात असतं.जीमोराव यांच्या लेखणीत हेन्रीची ताकद आहे. नाट्यपूर्ण कलाटणी आणि काही आकळायला अवघड असे शब्द डिट्टो डिट्टो

एतद्देशीय लगीन शब्दाला आक्षेप घेणार्‍यांचा निशेध. तुम्ही लिहा हो जीवनभौ. पण ही कथा मी लिहिली असती तर त्या दिपा आणि दीपकचं लगीन लावून त्याना डायरेक उपाध्यांच्या पाया पडायला पाठवून दिलं असतं.

1)पी एच डी करणारी दिपा लगीन सारखा गावरान शब्द कसा काय उच्चारते , 2) कथेतील मुलीचे नाव दिपा ,मुलाचे दिपक तर प्रा.उपाध्येचे नाव काय?

काही शंका : १) उपाध्ये आडनावाच्या गृहस्थाने मुलाला लग्न हा शुद्ध शिकवण्या ऐवजी लगीन हा शब्द का शिकवला असावा? २) गुरुदक्षिणा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द "शिष्यउत्तरा " असा असेल का? ३) बागेत जर दुपारची बारा वा़अन्या वेळेस दीपा सूर्याकडे तोंड करून बसली असेल तर दीपक तिच्यामागे म्हणजे नक्की कोठे बसला असेल? ४)
आसा विचार करुन दिपाने केबीनमध्ये प्रा.उपाध्याशी चर्चा करुन ते जात आसताना, दिपा त्याना म्हणाली
आसा आणि आसताना ? या शब्दांचे नक्की अर्थ काय असावेत?

जीव्न भाउंच्या लेखात हे असे काही शोधायचे नसते हो.... ते शोधता शोधता एक संकेत स्थळ हँग झाले आहे माहितेये.. गेले २ दिवस ते बंद आहे...

G-1 भौनीं मिपाच्या पर्तेक आय्डीचं नाव वाप्रुन लेख लिवाय्चं ठरिव्लं आहे वाट्टं.. आन या श्पीडने लिवलं तरं महिन्या दोन महिन्यात सम्दे आय्डी सपंअतिलं.. ;)

ग्रेट कथा.. जीवनभाऊ राॅक्स ! मराठीला त्याच त्या जुन्या शब्दांच्या कैदेतून बाहेर काढून त्या शब्दांना नवा साज चढवणार्या त्यांच्या संस्थळबंदपाडू प्रतिभेला सलाम..

कथेचे सार... दिपकचा यात काय दोष, त्याचे प्रेम का अव्हेरले, बाबाच्या पापाची शिक्षा आजच्या जमान्यात पोराला...? दिपाचा निर्णय योग्य होता काय...? यावर चर्चा घडायची सोडुन नावे, वये, वापरेली शब्दे यावरती घडणारा खल बघुन एक तरल, संवेदन्शिल मिपाक्र मणून शरम वाटली.

मोकलायाच्या जातकुळीतील अजून एक सशक्त लेखन. आपण तर फुल्टू "फ्यान" चक्रीवादळागत गरगर फिरणारा फंका (एका मल्लू मित्राचे स्पेलिङ्ग) झालोय ज़ीव़ण़साहेबांचा.

या कथेवर चित्रपट काढायचा झाल्यास गाणी कुठे बसतील? लावणी / आयटम साँग /विरह गीत / भाई भैन का प्यार /लोरी / गोडावुन मधली मारामारी इत्यादी प्रसंगासाठी गाणी रचून मिळतील