सहमत्,परन्तु मराठी माध्यम असलेल्या शाळान्मध्ये खरेच चान्गले शिक्षक नाहित असे मी स्वता ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो,त्या शाळेतील सन्चालक मन्डळातील व्यक्तिने सान्गीतले मग नाईलाजाने मुलास ईन्ग्रजी माध्यमातिल शाळेत घालावे लागले.
हे खरेच आहे. मराठी माध्यमाच्या किती चांगल्या शाळा उरल्या आहेत अलीकडे? तुमच्यासारखाच अनुभव कैक लोकांना आलेला आहे. नाइलाज वैग्रे सोडून द्या एकवेळ, पण चांगल्या मराठी शाळा तरी दाखवा. लै कमी.
पण मराठीचा उपयोगच संस्थळावरिल गमज्या सोडल्या तर आणखि कुठे खरच प्रभावी होउ शकतो का ? हा विचार करायची वेळ आज आलि आहे, अनेक लोक्स तर विंग्रजी सुधरत/बहरत र्हावे म्हणून विचारही इग्लिशीतुन करायला लागले आहेत इतके पेनिट्रेशन घडले आहे अमराठिचे, अतिसामान्याच्या द्रुष्टिकोनातुन आजच्या काळाशी सुसंगत, उत्तम व वापरावे लागते असे जे काहि आहे ते बहुतांश अमराठि भाषेतच :(
नाहि म्हणायला बर्याच (विकसनशिल) वयातुन गेलेल्यांना (३० ते ४५ वयोगट) मराठिची विषेश उपरती होत आहे, महती वाटत आहे पण हा प्रवाह वयात आलेल्यांबाबत वाहता होणे जास्त आवश्यक आहे (उदा. १५ ते २५ वयोगट) तर मराठि ही मातृभाषा म्हणून एक अपेक्षित उंची गाठेल.
याला कारण मराठीची सांस्कृतिक केंद्रे आता मरगळली आहेत. नवीन काही सध्या काही होत नाहीये, तर उर्वरित मराठी विश्वात त्याच त्या जुन्या साहित्याचे नव्या जोमाने अभिसरण होत आहे. पण इन्शाल्लाह काहीतरी नक्की होईल, कदाचित अजून ४०-५० वर्षांनंतरचे चित्र बरेच वेगळे असेल. इस्लामी आक्रमणानंतरची सुरुवातीची मराठीही अशीच अरबी-फार्सी शब्दांनी लगडलेली होती. बट देन द एंपायर इंडीड स्ट्रक बॅक :) तशीच रिकव्हरी मराठी नक्कीच करेल. फक्त आजच्यापेक्षा ती मराठी वेगळी असेल, अनेक इंग्रजी शब्द त्यात जास्त असतील. अन काही काळाने तेही मागे पडतील. हा संक्रमणकाळ असल्याने इंग्रजीचे सर्वभक्षीपण जास्त नजरेत भरतेय इतकेच. अन जितकी असुरक्षिततेची जाणीव जास्त तितकाच शुद्धतेबद्दलचा आग्रहही जास्त. खरे तर ब्रिटिश अंमलानंतरची मराठीही इतकी बदलत गेली, की आपल्याला त्याची जाणीवही नसते. सिंटॅक्समध्ये फार जास्त बदल झालेत. पण ते सर्व पचवून मराठी तगली, इतकेच नाही तर अनेक जबरी लेखक-कवीही ती प्रसवू शकली. तसेच आत्ताही होईल.
पण हे होईपर्यंतच्या काळात चेतवलेला वन्ही थोडातरी जागृत राहो अशी अपेक्षा.
इस्लामी आक्रमणानंतरची सुरुवातीची मराठीही अशीच अरबी-फार्सी शब्दांनी लगडलेली होती. बट देन द एंपायर इंडीड स्ट्रक बॅक
बरुबर बरुबर...
शहाजी राजांच्या काळात पत्रामध्ये फक्त २०-३०% मराठी शब्द आढळयाचे
छत्रपति शिवाजी राजांच्या काळात ते प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढून ६०-६५% झालं
छत्रपति संभाजी राजांच्या काळातही ते प्रमाण स्थिर होतं
छत्रपति थोरल्या शाहूराजांच्या काळात हे प्रमाण ९२% इतकं होतं
प्रशासकिय पत्रां संबंधितांचा मराठी शब्दवापर हा शासनकर्त्याच्या मर्जी/धोरण्/प्रदेश/सवयीवर अवलंबुन असणार यात दुमत नको, तर रोजच्या दैनंदिन जिवनात सर्वसामान्य मराठि जनतेचा मराठीत संभाषणासाठी शब्दवापर (बोली भाषा) यात फरक असणार नाही काय ? कारण राजदरबारसंबंधी तुरळक लोक वगळले इतर सामान्य जनतेत असे किती लोक रोज लिखाणाला समर्थ होते.
अन तरिही आज परिस्थिती ही आहे की इंग्रजी शासनकर्ते नसुनही मराठि मात्र बहरत न्हवे ओसरत चालली आहे...
रोजच्या दैनंदिन जिवनात सर्वसामान्य मराठि जनतेचा मराठीत संभाषणासाठी शब्दवापर (बोली भाषा) यात फरक असणार नाही काय ?
प्रशासकीय मराठी वरुन आठवले. महानगरपालिकेच्या एका प्रकाशनात मुख्य कार्यकारी अधिकार्याचा फोटो हवा होता. मनपाच्या दुसर्या एका कर्मचार्याने बोलताना सहज सांगितले इथे कार्यबाहुल्याचा फोटो टाका. मी चकीत. तो शब्द विचारता त्याने खुलासा केला. कार्य करणारा बाहुला हो. (खरे पाहता प्रशासकीय पत्रात कार्यबाहुल्य हा शब्द जास्त काम असणे या अर्थी वापरला जातो)
अंत्योदय योजनेचा उल्लेख सर्रास अंतुदे असा केला जातो.
सरकारी, कायदेविषयक आणि मुद्रांकावरचे लेखन वाचता तर बखरी वाचत आहोत असा भास होतो.
हा लेख आधी येऊन गेलाय का?
बहुतेक मलाच असं वाटतय.
खूप वर्षांपूर्वी कालनिर्णयच्या पाठीमगच्या पानावर की साप्ताहिक सकाळमध्ये (आता आठवत नाही) कै. शांताबाई शेळके यांचा लेख वाचला होता ते आठवले. त्यात भाषांच्या सरमिसळीबद्दल लिहिले होते. ते किती नैसर्गिक आहे याबद्दल लेख होता असे पुसटसे आठवते.
लेखातले काही मुद्दे पटलेच पण एकंदर विचार सद्य परिस्थितीत रुळणारा नाही. मी मराठी माध्यमात कैक वर्षांपूर्वी शिकलो म्ह्णून सद्य परिस्थितीत मी पुढच्या पिढीस मराठी माध्यमात घालायचा सल्ला मुळीच देणार नाही जागतिकीकरण, चांगल्या मराठी शाळा तसेच शिक्षकांची अनुपलब्धतात [विशेषतः घराजवळ शाळा] ही महत्त्वाची कारणे. अनुभवातून सांगतो, मुले एकापेक्षा अधिक भाषा, त्यांच मिश्रण व्यवस्थित आत्मसात करतात. संस्कार घरी सुद्धा उत्तम करता येतात आणि ते घरीच करावेत (शाळेवर न विसंबता.. )
अजून एक म्हणजे, पालकांनी मुलांवर अगदी शिशुनिकेतनात किती खर्च करावेत आणि किती रुपयांची काय खेळणी आणावीत, स्पर्धेत धावावे की नाही हे त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहेत असं वाटतं, त्याच 'व्हॅल्यू फॉर मनी' असं सरसकटीकरण अनुचित वाटतं.
मस्त लेख
ते पाउण चड्डी घालणारे बाबा आणि सार्वजनिक ठिकाणी मुलांशी इंग्रजीत बोलणारी आई अगदी डोक्यात जातात. अशांचा सध्या अगदी सुळसुळाट झाला आहे.
परवा, एका दवाखान्यात नंबर यायची वाट बघत होतो. वर उल्लेख केलेले पालक आणि सोबत त्यांचे छोटे सुपुत्र होते. आई बाबा दोघेही आप आपल्या फोन मध्ये मशगुल होते , चिरंजीव कंटाळले आणि आई बाबांच्या फोन मध्ये लक्ष घालू लागले. आई बाबांनी लगेच त्याचा इंग्रजीचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूला पेशंट आहेत ह्याचेही त्यांचे भान सुटले होते. इंग्रजी शिकवण्याच्या नादात त्यातील मॅनर्स मात्र ते साफ विसरले होते.
एक मराठी माणूस जेंव्हा इंग्रजी माध्यमाची बाजू घेऊन भांडायला लागतो तेंव्हा पारा लई सटकतो राव. पण ठीक आहे; आपण मराठी माध्यमाचाच पुरस्कार करत रहाणार. मी मराठी माध्यमातून शिकलो; इंग्रजीवाचून माझं काही अडलं नाही आजवर; किंबहुना ब-याच इंग्रजी वाल्यांना मी अडवू शकलोय.
जे इंग्रजी चा पुरस्कार करतात त्यांना काहीच समजावण्यात अर्थ नसतो. ज्याचे त्याला.
तुमचा राग योग्य आहे. पण जोपर्यंत मराठी भाषा उत्तम रोजगार देऊ शकत नाही तोपर्यंत मराठीच काय कोणत्याही भाषेचा उत्कर्ष होऊ शकत नाही.
केवळ मराठीतल्या इंग्रजी शब्दांच्या प्रयोगाबद्दल म्हटले तर तुमच्या या लेखातील; "अशी चिन्हं काढायला शिकवलं... ...त्या वयात हाय-फाय आणि स्टायलीश शैलीची इंग्रजीच फक्त काय ती शिकवली गेल्याचा हा परिणाम!" या एकाच परिच्छेदात सर्वात कमी म्हणजे "हाय-फाय" आणि "स्टायलीश" हे दोन शब्द इंग्रजीचे आहेत. बाकी सगळ्या परिच्छेदातील... विशेषतः लेखाच पहिल्या अर्ध्या भागात... मोजताना दमछाक होईल इतके इंग्रजीचे शब्द आहेत ;)
लूक, आपण कसे ऑटोमॅटीकली मराठीला ओव्हरलूक करतो ते :)
मराठीकडे होणार्या अश्या दुर्लक्षामुळे कोणाही अभिमानी मराठी माणसाला दु:ख हे होतेच. सध्या तरी अशी अवस्था आहे की, बॅटमन यांच्या:
याला कारण मराठीची सांस्कृतिक केंद्रे आता मरगळली आहेत... ...पण हे होईपर्यंतच्या काळात चेतवलेला वन्ही थोडातरी जागृत राहो अशी अपेक्षा.
या अशावादावर विश्वास ठेवण्यापलिकडे आणि आपल्या परीने मराठी भाषा घरात आणि मिपासारख्या संस्थळांवर तगवणे एवढेच हाती आहे.
तशी आजच्या घडीला परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली नाही... जगातल्या आज जिवंत असणाऱ्या अंदाजे ७,००० भाषांमध्ये मूळ भाषिक लोकांच्या संख्यांच्या अनुक्रमांकाने मराठीचा जगात १९ वा क्रमांक आहे आणि ७.३ कोटी (१.१० % ) लोक तिचा मातृभाषा म्हणून उल्लेख करतात.
मात्र हेही नमूद करण्यासारखे आहे की २० व्या क्रमांकावर असलेल्या आणि ७ कोटींची (१.०६ % ) मातृभाषा असलेल्या तमिळच्या भाषिकांएवढा भाषाभिमान मराठी भाषिकांत नाही.
विशेषतः लेखाच पहिल्या अर्ध्या भागात... मोजताना दमछाक होईल इतके इंग्रजीचे शब्द आहेत
अगदी हेच्च लिहायला आलो होतो.
माझी आजी नेहमी म्हणते, की माणसाने बोलताना एकाच कोणत्यातरी भाषेत बोलावं. मराठीत बोलताना मराठीत, इंग्रजीत बोलताना इंग्रजीत. एका भाषेत बोलताना उगाच दुसऱ्या भाषेचे शब्द वापरू नयेत. मला ते नेहमीच पटत आलेलं आहे.
इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही
या वाक्यांत काही विरोधाभास आहे असं जाणवलेलं दिसत नाही ;)
इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही
हे इंग्रजाळलेल्या पालकांचे विचार असल्याने मुद्दाम धेडगुजरी भाषेत दिले आहेत असे वाटते. अवतरण चिन्हांचा योग्य वापर न केल्याने ते लेखकाचेच विचार वाटत आहेत.
मला वाटते
"इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही, पुढे आयुष्यात सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, तेव्हा आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूया... आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण करुया!"
या परिच्छेदाला लेखक " " करायचे विसरले असावेत कारण तो परिच्छेद तसाच अपेक्षित असावा हे त्यापुढील वाक्यावरून लक्षात येते. हा परिच्छेद म्हणजे मुलांना इंग्रजी माध्यमात घालणाऱ्या पालकांच्या मनातील 'जसे च्या तसे' विचार आहेत.
त्यापुढील परिच्छेदामध्ये भाषा सरळच वाटतेय!
लेखकाने खुलासा करावा.
‘कोणत्याही व्यक्तिला कधीही कोणतीही गोष्ट आपल्या घरी बोल्ल्या जाणाऱ्या आपल्या मातृभाषेतून समजावली, की लवकर लक्षात येते; तीच गोष्ट परकीय भाषेतून समजावणं अवघड जातं’, हे आहे
मी शिकताना जीवशास्त्रात ही भाषा होती ती घरात अजिबात बोलली जात नव्हती. ती मला कधीही कळली नाही. अजूनही काही काही शब्द समजत नाहीत.
असो, मराठी भाषेत किंवा कुठल्याही भारतिय भाषांमध्ये उच्च शिक्षणाचा पर्याय आहे का? जसे की चीन आणि जपानमध्ये जपानी भाषेतूनच डॉक्टरकी शिकता येते किंवा इंजीनीयर होता हेते किंवा हॉटेल मॅनेजमेंट करता येते. उच्च शिक्षण जर इंग्रजीतूनच उपलब्ध आहे तर त्याच भाषेतून प्राथमिक शिक्षण घेणे कसे काय चूकीचे होते?
अर्थात हा प्रतिसाद लेखकाच्या लेखामागच्या भावनेचा पूर्ण आदर राखूनच दिलेला आहे.
-(इंग्रजी माध्यमात शिकणारी मुले असलेला)सोकाजी
http://www.misalpav.com/node/678
सदर धाग्यावरील प्रतिशब्दांचे प्रतिसाद वाचा. मराठी ज्ञानभाषा बनण्यासाठी पहीली पायरी म्हणजे सर्व तांत्रिक व्याख्या आणि शब्दाना प्रतिशब्द मिळणे. तसे करायचा आणि ते वापरायचा कोणी प्रयत्न केला तर त्याची कशी टर उडवली जाते हे जालावरच फेरफटका मारला तर कळेल. सावरकरांच्याच अशा प्रयत्नाची किती लोक अजूनही खिल्ली उडवतात.
प्रस्तुत धागालेखकाचा हत्ती सारखा सोपा शब्द सोडून एलिफंट या शब्दाला असलेला आक्षेप केवळ एक इंग्रजी शब्द म्हणून नव्हे तर वापरण्यातील असुलभता या दृष्टीनेही योग्य आहे. कोणीही कितीही परकीय भाषेतील शब्दांबद्द्ल आणि त्याच्या नैसर्गिकपणाबद्दल लेख लिहीले तरीही हत्ती हा शब्द अधिक सोपा वाटतो हे नक्की.
त्यातही प्रवाहाच्या जरा वेगळ्या वाटेने जायची कोणाची (म्हणजे पालकांची आणि मुलांची) तयारी नाही.
उच्च शिक्षण मराठीतून नाही म्हणून प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून घेणे मला चुकीचे वाटते. त्यासाठी उच्च शिक्षण मराठीतून आणणे हा योग्य उपाय ठरेल. जरी लांबचा मार्ग असला तरीही उच्च शिक्षणासाठी मराठीचा पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे.
आधीच्या पिढीत मराठी शाळेतून इंग्रजी शिकून पुढे जात नव्हते का लोक? मी देखील स्वतः मराठी शाळेतून शिकून नंतर शास्त्रशाखेतून इंग्रजी शिकलेला मनुष्य आहे. पहीले १ वर्ष फक्त जरा त्रास होतो माध्यम बदलल्यावर. आणि तो त्रास सहन करण्यासाठी पालकांनी बळ आणि आधार दिला तर सदर गोष्ट अगदी सहज सुलभ असते हे ही मी अनुभवले आहे.
आणि मूळात पालकही आत्मविश्वासविहीन असतील तर तो आत्मविश्वास ते मुलांना कसा देऊ शकतील हा मुख्य प्रश्न आहे.
टर ऊडवणारच की लोक!
टायर पंक्चर झाले' याला तूमी मराठीत' चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले' असा काहितरी पर्याय दिलात ,तर लोक टर नाही तर वाक्यच टरकवतील.
चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले'
"छिद्रिकरणाने चक्रातील अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले" हे जास्त बरोबर असावे.
माझ्या मते पुपेंचे मत थोडे वेगळे असावे. असे बघा ज्या गोष्टी मराठीत कधी अस्तित्वातच नव्हत्या त्यासाठी इंग्रजी शब्दाचा वापर एकवेळ ठीक म्हणता येइल (तरीही सावरकरांसारख्या लोकांनी अनेक नविन शब्द मराठी भाषेला बहाल केले आणि ते आज अस्तित्वात आणि वापरात आहेत हे बघता नविन शब्द तयार करणेही अशक्य नाही असे म्हणावे लागेल). पण हत्ती च्या ऐवजी एलिफंट म्हटले जात असेल तर ते नक्कीच हास्यास्पद आहे. बाकी चालु देत.
टर ऊडवणारच की लोक!
टायर पंक्चर झाले' याला तूमी मराठीत' चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले' असा काहितरी पर्याय दिलात ,तर लोक टर नाही तर वाक्यच टरकवतील.विनोद छान आहे आणि तुमचा बळजबरीने ओढूनताणून स्वतःचेच हसे करून घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. अभिनंदन ! :)
त्या व्याक्याचे भाषांतर इयत्ता तिसरीतले मूलही सर्वसाधारणपणे "चाकातली हवा गेली" असे करते.
केवळ मुद्दा जिंकायचा म्हणून सत्याला फाट्यावर मारण्याचा प्रयत्न नेहमीच "ग्रेट थिंकिंग" तर नाहीच पण "लॅक ऑफ थिंकिंग" नक्कीच दाखवतो ;)
'टायर पंक्चर झाले' साठी 'चाकातली हवा गेली' एव्हडं सोप्पं सुचलं नाही कारण इंग्रजाळलेली भाषा.
बाकी बरेच पालक लहान मुलांना पक्षी आणि प्राण्यांची ओळख करून देताना इंग्रजी का वापरतात हे कोडं आहे. :)
इतकं विचित्र वाटतं ते, लै डोक्यात जातं. कुंपिणीतली एक आंटी कलीग तिच्या मुलाशी बोलतानाही विचारते, "अॅपल खायचंय का?" अन्य कितीतरी आयाही "तो एलिफंट बघ" इ. छाप जिलब्या पाडत असतात. यात आया जास्त आघडीवर आहेत हे खेदाने नमूद केल्या जात आहे. विंग्रजी बलीवर्दाच्या वृथा झुली पांघरायचे काम लै जोरात सुरू आहे.
टायर या शब्दाला मराठी प्रतिशब्द नसणे स्वाभाविक आहे कारण टायर परदेशात विकसित झालेली वस्तू आहे. तेव्हा तो शब्द तसाच्या तसाच मराठीने अंगिकृत केला तरी मराठीचे नुकसान न होता विकसनच होईल. मी अगोदरच्या प्रतिसादात इंग्रजीच्या इतिहासासंदर्भात दिलेला धागा उघडून वाचलात तर ध्यानात येईल की इंग्रजीने (जी अत्यंत समृद्ध भाषा समजली जाते) अनेक शब्द इतर भाषांतून उचलत आली आहे आणि अजूनही तसेच करत आहे हे ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या दर आवृत्तीत स्पष्टपणे नोंदवले जात आहे.
म्हणून भाषाशास्त्री इंग्रजीला गमतीने "बॉरोव्ड लँग्वेज" असे संबोधतात. मात्र हे "बॉरोईंग" करताना हे ही ध्यानात ठेवले जाते की भाषा संपन्न व्हावी, विनोदी अथवा दुर्बोध होऊ नये.
दोन्ही टोकांचा हट्ट (इतर भाषेतिल शब्द अजिबात नकोच / इतर भाषेतिल शब्दांची कितिही अनावश्यक आवक करायला हरकत नाही) हा अतिरेकच ! या बाबतित मध्यममार्ग नेहमीच योग्य... तो म्हणजे भाषेला सहज सोपेपणा देऊन तिचे सौंदर्य वाढवणार्या परक्या शब्दांचे स्वागतच करायला हवे... जसे आपण बाहेरच्या देशांतून येणार्या नविन सुधारणांचे करतो आहोतच. आणि कोणाला हवे किंवा नको याची पर्वा न करता हे सगळे आपोआप होतेच आहे. गेल्या शतकातली आणि आताची मराठी त्यामुळेच वेगळी झालेली आहे.
मात्र "चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले" या प्रकारचे विनोदी वाद-प्रतिवाद टाळले तरच या विषयावरचा संवाद सुसंवाद राहील. नाहीतर वितंडवादांची काही कमी नाही, त्यांत अजून एकाची भर पडेल. इतकेच.
माझा वरचा प्रतिसाद टंकण्याआतच "आंतरनलिकासंरक्षकबाह्यचक्र" हाही एक विनोद आला.
शिवाय मराठी भूमीत आणि एकंदरीत भारतात विनोदाची आणि दुफळीची कमतरता अजिबात नाही... थोडे तारतम्य आणि एकी असती तर इथला इतिहास आणि भविष्य दोन्हीही फार वेगळे (चांगल्या अर्थाने) झाले असते. बुद्धिची कमतरता नाही... पण दिशा चुकते आहे ;)
बुद्धिची कमतरता नाही... पण दिशा चुकते आहे हे बदलून "बुद्धिची कमतरता नाही... पण ती कशी वापरावी हा निर्णय करण्याच्या बुद्धीत कमतरता आहे असे वाचावे !
बाकी चालू द्या... मधूनमधून म@@लिला पाहून पण छान मनोरंजन होते असा आमचा अनुभव आहे ;) खुर्ची, कॉर्नफ्लेक्स (आम्ही याला मराठीत कॉर्नफ्लेक्सच म्हणतो) आणि सरबत (ह्याला आम्ही मराठीत कोल्ड ड्रींक म्हणत नाही) घेऊन बसलो आहोत. मात्र जsssरा दर्जेदार विनोद जमले तर बघा... नाहीतर असले-नसलेले प्रेक्षक-वाचक उठून निघून जातील ना :)
रबर हा मराठी शब्द आहे.
त्यावरुन खोडरबर हा मराठी जोडशब्द देखील तयार झालेला आहे.
टेबल, मोटार, रबर, पाटलोण, बूट ( (इंग्रजी).
बायको,लष्कर, फौज, समशेर ((उर्दू / फारसी)
इत्यादी शब्द मराठी झालेले आहेत.
अन टायर पंक्चर होणे या दोन वेगळ्या घटना आहेत, असे मला वाटते.
तुम्हा सर्वांना सिरियसली चाकातली हवा जाणे व टायर पंक्चर एकच आहेत असे वाटते काय? की फक्त प्रतिट्रॉलिंग सुरू आहे?
दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन असे अनेक बिनचूक प्रतिशब्द स्वातंत्र्यवीरांनी मराठी भाषेला बहाल केले.
ती यादी अपूर्ण आहे असे वाटत असेल तर तुम्ही पुढाकार घ्यावा आणि या यादीत भर घालावी.
उगा चिखलफेक करण्यात काय हंशील ?
बाकी, तुमचे प्रतिसाद वाचल्यानंतर 'ढालगज' या शब्दाचा अर्थ नीट कळला.
त्यासाठी उच्च शिक्षण मराठीतून आणणे हा योग्य उपाय ठरेल. जरी लांबचा मार्ग असला तरीही उच्च शिक्षणासाठी मराठीचा पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे.
ते आता होणे अशक्य आहे, त्याला खुप उशीर झाला आहे!
आधीच्या पिढीत मराठी शाळेतून इंग्रजी शिकून पुढे जात नव्हते का लोक?
मीही मराठी माध्यमातूनच शिकलो आहे. काहीही कुठेही अडले नाही असे नाही. पण तरीही माझ्या मुलांनी मराठीत माध्यमात'च' शिकले पाहिजे असे मला वाटत नाही. का? ह्या प्रश्नाचे उत्तर माहिती नाही. त्यात आत्मविश्वासविहीन असाण्याचा काहीही संबंध नाही
- (आत्मविश्वास असलेला) सोकाजी
प्रतिक्रिया
पुनम पांडेच्या मातृभाषेचे व इंग्रजीचे ज्ञान बघुन....
छान!
काहि अन्शी
हे खरेच आहे. मराठी
चांगल्या मराठी शाळा ...?
याला कारण मराठीची सांस्कृतिक
+१
प्रशासकिय पत्रां संबंधितांचा
रोजच्या दैनंदिन जिवनात
हा लेख आधी येऊन गेलाय का?
विचार मंथन चांगले केले आहे....
लेख आवडला पण असहमत..
मस्त लेख
एक मराठी माणूस जेंव्हा
मराठी माध्यमाचाच पुरस्कार करत
तुमचं पटलं. १००%
तुमचा राग योग्य आहे. पण
याला कारण मराठीची सांस्कृतिक केंद्रे आता मरगळली आहेत... ...पण हे होईपर्यंतच्या काळात चेतवलेला वन्ही थोडातरी जागृत राहो अशी अपेक्षा.या अशावादावर विश्वास ठेवण्यापलिकडे आणि आपल्या परीने मराठी भाषा घरात आणि मिपासारख्या संस्थळांवर तगवणे एवढेच हाती आहे. तशी आजच्या घडीला परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली नाही... जगातल्या आज जिवंत असणाऱ्या अंदाजे ७,००० भाषांमध्ये मूळ भाषिक लोकांच्या संख्यांच्या अनुक्रमांकाने मराठीचा जगात १९ वा क्रमांक आहे आणि ७.३ कोटी (१.१० % ) लोक तिचा मातृभाषा म्हणून उल्लेख करतात. मात्र हेही नमूद करण्यासारखे आहे की २० व्या क्रमांकावर असलेल्या आणि ७ कोटींची (१.०६ % ) मातृभाषा असलेल्या तमिळच्या भाषिकांएवढा भाषाभिमान मराठी भाषिकांत नाही.विशेषतः लेखाच पहिल्या अर्ध्या
पालकांचे विचार.
तो परिच्छेद तसाच अपेक्षित आहे असे वाटते
हो, "" टंकायचे राहूनच गेले...
नो ऑफेंन्स
नो ऑफेन्स
टर ऊडवणारच की लोक!
चक्राच्या छिद्रिकरणाने
टर ऊडवणारच की लोक!
टर ऊडवणारच की लोक! टायर पंक्चर झाले' याला तूमी मराठीत' चक्राच्या छिद्रिकरणाने अंतर्गत हवेचे बहीर्गमन झाले' असा काहितरी पर्याय दिलात ,तर लोक टर नाही तर वाक्यच टरकवतील.विनोद छान आहे आणि तुमचा बळजबरीने ओढूनताणून स्वतःचेच हसे करून घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. अभिनंदन ! :) त्या व्याक्याचे भाषांतर इयत्ता तिसरीतले मूलही सर्वसाधारणपणे "चाकातली हवा गेली" असे करते. केवळ मुद्दा जिंकायचा म्हणून सत्याला फाट्यावर मारण्याचा प्रयत्न नेहमीच "ग्रेट थिंकिंग" तर नाहीच पण "लॅक ऑफ थिंकिंग" नक्कीच दाखवतो ;)आवडला
+१
इतकं विचित्र वाटतं ते, लै
'बाळा चल आपण काऊचे दुध आणायला
.
बरोबर आहे,
ओ शिक्षक ते टायर चे आपण नंतर बघू....
...
टायर या शब्दाला मराठी
माझा वरचा प्रतिसाद टंकण्याआतच
हम्म
रबराला मराठी काय म्हणायचं.. ?
बुद्धिची कमतरता नाही... पण
बुद्धिची कमतरता नाही... पण दिशा चुकते आहेहे बदलून "बुद्धिची कमतरता नाही... पण ती कशी वापरावी हा निर्णय करण्याच्या बुद्धीत कमतरता आहे असे वाचावे ! बाकी चालू द्या... मधूनमधून म@@लिला पाहून पण छान मनोरंजन होते असा आमचा अनुभव आहे ;) खुर्ची, कॉर्नफ्लेक्स (आम्ही याला मराठीत कॉर्नफ्लेक्सच म्हणतो) आणि सरबत (ह्याला आम्ही मराठीत कोल्ड ड्रींक म्हणत नाही) घेऊन बसलो आहोत. मात्र जsssरा दर्जेदार विनोद जमले तर बघा... नाहीतर असले-नसलेले प्रेक्षक-वाचक उठून निघून जातील ना :)मात्र जsssरा दर्जेदार विनोद
रबर हा मराठी शब्द आहे.
रबर हा मराठी शब्द आहे
हुम्म्म
(No subject)
चाकातली हवा जाणे
+१
अहो ग्रे.थिं. शिक्षक
ओ ग्रेट थिंकर शिक्षक....
दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन
त्यासाठी उच्च शिक्षण मराठीतून
Pagination