Welcome to misalpav.com
लेखक: अभ्या.. | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हि आयड्या लय मस्तंय हो बुवा, फक्त आणखी त्यात प्रज्वलित केलेल्या मातीच्या पणत्याही असू द्यात म्हणजे आणखीन भारी दिसेल. :-)

नमस्ते , "मिपा"वर मी एक अक्षरबद्ध (acrostic) कविता केली होती, तिचा वापर करता येईल का? कवितेचा दुवा इथे देत आहे... http://www.misalpav.com/node/25757 - सार्थबोध

अशा कलाकारान्साठि एक कार्यशाळा आयोजित करूयात. ;-) वेगवेगळि मॉडल्स आणण्यात येतील. मग पाडा हवि तेवढि चित्रे. मी पण काढेन. फ़क्त येताना सौ. काकूना तेवढे सोबत घेउन या बरे. ;-)

हा अभ्या फारच कलाकार आहे बुवा! तुझ्या डोक्यातून काय काय कल्पना निघतील ते सांगण कठीण! आम्ही कल्पना करून करून कशाची करणार तर पैठणी नेसलेली बाई हातात पणती धरून नाहीतर रांगोळीत पणती. फारतर आकाशकंदिलाचा फोटू. तसलं काही तुम्हाला चालयचं नाही.

अत्यंत अप्रतिम आहे हे वल्ली. आता हे अन्काचे कव्हर म्हणून कसे दिसेल ते उद्या दाखवतो. :) सर्वच सदस्याना नम्र विनंती आहे की बिनधास्त चित्रे छायाचित्रे किंवा कल्पना मांडा. त्याचे रूपान्तर एकदम आकर्षक कव्हरामध्ये होइलच होइल. आणि रेवतीतैनी म्हणल्याप्रमाणे मी फ़क्त एडिट करणार आहे. मुळ कल्पना व् श्रेय सदस्याचेच राहील. माझच डिझाइन वापरायचे असते तर मी हां धागा काढलाच नसता. आणि एकच कव्हर सिलेक्ट झाले तरी इतर डिझाइन्स अंकात असणारच आहेत. त्यामुळे प्लीज प्लीज और आयड्या आन दो. :)

धन्स रे. बाकी अजूनही कित्येक फोटो आहेत. पिकासा लिंक व्यनि करतो. हवीत ती बिंधास्त घे.

करतो की. हाकानाका :) पण ते फोटू इतर कुठे वापरू नका म्हणजे झालं. ;) जस्ट किडिंग.

वल्ली तुला म्हणल्याप्रमाणे तू काढलेला फोटो आपल्याला असा पण वापरता येईल दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी. :) valli बाकी ज्या सद्स्यांना वल्ली त्याने काढलेल्या फोटोची लिंक देणार आहे त्यांच्यासाठी. हे फोटो त्याने बरेच त्रास घेऊन, पदरमोड करुन आणि केवळ त्याच्या अभ्यास व छंदासाठी काढलेले आहेत. आपल्याला सर्वानाच ते पाहावेसे वाटतात, कौतुक वाटते. साहजिक आहे, पण त्याचेच फोटो इतर बर्‍याच ठिकाणी स्व:तचे म्हणून दुसर्‍यांनी वापरलेले आहेत. आजकाल जालावरती अशा प्रकाराने स्वप्रसिध्दी मिळवायचे प्रकार जास्त आहेत. वल्ली बिचारा साधा वॉटरमार्क पण वापरत नाही. त्यामुळे या फोटोचा वापर जपुन करा. दुसर्‍या कोणा चमको लो़कांच्या हाती ते पडू नयेत हिच इच्छा.

घनश्याम नयनी आला सखे, मी काजळ घालू कशाला ?
याचे मस्त चावट विडंबन या निमित्ताने आठवून हसलो. धन्यवाद =))

चालेल की पण मला ते कॄष्ण्धवल कव्हरपेज म्हणलं की साधनाचे मुखपॄष्ठ आठवते. वारी फेम संदेश भंडारेचे अप्रतिम फोटो असलेले. :) रंगीत संगीत माणसांचा अंक पण असु दे की रंगीत (इति गवि आणि नीलकांतमालक उवाच) :)

तुला काही सुचेपर्यंत दिवाळी संपून शिमगा सुरू होईल!

कशाला रॉकेल? तुम्ही दोघींनी एकमेकींकडे पाह्यलं तरी पुरे ना? :D

आर पाटीव सुडा. कवा बी पाटिव. म्याच हाय हितं. घ्यायलाच बस्लोय. :) फक्त नर्कचतुर्दशीची आंघोळ करुन पाठवु का म्हणु नकोस. ;) जर्रा उगी आपलं बिगि बिगि ह्या शन्वार्रैवार करायच बग अन पाटव.

अप्रतिम, मूर्तीही आणि देखावाही.. अवांतर : ठिकाणाची माहिती देणार का पैजारबुवा?? नक्की जाईन.. कान्ह्याच्या प्रेमात असलेली

मला वाटत मिपा च वेगळेपण त्याच्या सदस्यनामातही आहे . असली (वि)चित्र नाव मी आधी कधी पाहिली , वाचली नाहीत . बघा काही जमतय का .