Welcome to misalpav.com
लेखक: किलमाऊस्की | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मती गुंग होऊन्स जाते. तर्क तोडके पडतात. हा सगळा खटाटोप कशासाठी ? हा प्रश्न अनुत्तरीत राहिल्याची सल मोनार्कच्या सौंदर्याने फार धुवुन निघते. उत्तर एकच... हा सगळा खटाटोप केवळ आनंदासाठी. फार सुंदर झाली हि लेखमाला. तुमच्या पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत.

+१. फार सुंदर झाली ही लेखमाला. >>>हा सगळा खटाटोप केवळ आनंदासाठी. कदाचित फुलपाखरांना ठाऊक देखील नसेल. पण आम्हाला मात्र निश्चितच आनंद मिळतो आहे.

एका चिमुकल्या पण वर्षानुवर्षे हजारो किमी प्रवास करणार्‍या सुंदर जीवाची भन्नाट कथा ! ती रोचकपणे प्र्स्तूत केल्याबद्दल तुमचे आभार !

खूप सुंदर लेखमाला आहे. परवाच माझ्या टेक्सास मधल्या एका मित्राने (अमोल खेडगीकर) त्याच्या बागेतला मोनार्क चा फोटो टाकला. तेंव्हा तुमच्या लेखाची आठवण आली. मोनार्क

इथे आर्वजून टाकल्याबद्द्ल धन्यवाद! आंतरजालावर उपलब्ध असणारे मोनार्कचे बरेचसे फोटो प्रताधिकार्मुक्त नसल्याने लेखात वापरता आले नाहीत. तुमच्याकडे अजून फोटो असतील तर ऩ़क्की टाका इथे.

इवल्याशा फुलपाखराचा एवढा मोठा प्रवास! थक्क करणारा आहे, आणि त्याचा मागोवा घेणार्‍यांची चिकाटीही! आमच्यापर्यंत आणल्याबद्दल हेमांगी, खूप धन्यवाद! आता पुढची लेखमालिका कधी? ;)

फुलपाखरे बघितली की जगात अजून सौंदर्य बाकी आहे हे पटतं. तुमचे पुनश्च आभार आणि गूगलून न पाहिल्याबद्दल माझ्या संयमाला माझीच दाद... ;)

अरे वा ! पीबीएस वर काही वर्षांपूर्वी मोनार्क्स वर सीरीज पाहिली होती. कॅनडाच्या ग्रेट लेक्स ची सहल आम्ही खास ऑगस्ट महिन्यासाठी राखुन ठेवली आहे. तुझी लेखमाला आता नीट वाचते, सहलीसाठी उपयोग होईल. वाखु पण साठवली आहे.