Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

फोडा, झोडा आणि राज्य करा. मराठी माणूस फोडा आणि शिवसेना इभी करा. मराठी माणूस अजून एकदा फोडा आणि मनसे तयार करा. आधी पण काँग्रेसची मते ३० ते ४० टक्केच होती आणि आता पण तितकीच आहेअध्ती मते तो पक्ष राखून आहे.ते फक्त दर २५/३० वर्षांनी नविन पक्ष स्थापायला मदत करतात आणि राज्य करायला मो़कळे होतात. थोडक्यात काय? हाताला घड्याळ बांधा आणि प्रार्थनेची वेळ सांभाळा.

भाजप परप्रांतियांची बाजू घेतो.. त्याला मनसेने कशाला साथ द्यायची? काँग्रेस भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष बिहारी आणि युपीवाल्यांच्या ताब्यात असतात ,रेल्वे अवजड उद्योग वगैरे भरपुर नौकर्या असलेल्या खात्याचे भैय्ये मंत्री मराठ्याला कात्रजचा घाट दाखवतात... त्यामुळे प्रादेशिक पक्षांची ताकद वाढवणे गरजेचे आहे.. कोणत्याही पक्षाला मत द्या राष्ट्रवादी ,शिवसेना ,मनसे आरपीआय.... प्रादेशिक पक्ष बळकट करा ..तरच दिल्लिश्वर नरमतील..

काँग्रेस भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष बिहारी आणि युपीवाल्यांच्या ताब्यात असतात ,रेल्वे अवजड उद्योग वगैरे भरपुर नौकर्या असलेल्या खात्याचे भैय्ये मंत्री मराठ्याला कात्रजचा घाट दाखवतात...
भाजप केंद्रात सत्तेत असताना राम नाईक केंद्रीय रेल्वेमंत्री होते. नेमकं आठवत नाही परंतू विलासराव देशमुखांकडे कधी काळी अवजड उदयोग खाते होते.

राजसाहेबांकडुन फार अपेक्षा होत्या राव ...पण एकुणच राजकारणाची दिशा पाहता अन नाशिक मधील मनसेचे कर्तृत्व पाहता फार मोठ्ठा अपेक्क्षाभंग झाला आहे हे कबुल करतो :(

आर ठाकरे उत्तम भाषणे ठोकतात पण काम ? जाता जाता :- आर ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बहुचर्चीत नाशिकच्या गोदापार्कचा अंबानींच्या ‘रिलायन्स फाऊंडेशन'च्या माध्यमातून विकास केला जाणार आहे अशी बातमी मध्यंतरी वाचली होती. मी मनात विचार केला आर ठाकरेनी ‘रिलायन्स फाऊंडेशन'च्या माध्यमातूनच ठाण्यातल्या रस्त्यांचा विकास केला तर किती बरं होईल ! ठाणेकरांना पार्क नाही निदान धड वाहन चालवायला तरी रस्ते मिळतील. ;)

शिवसेना - मनसे आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी ह्या दोन्ही पक्षात बरीच साधर्म्यता आहे.फरक फक्त शरद पवार. आश्चर्य वाटून घेऊ नका. माझे विधान फारच धाडसी आहे असे वाटू शकण्याची शक्यता अधिक.ज्याप्रमाणे शरद पवार कॉंग्रेसमधून फुटून बाहेर पडले त्याचप्रमाणे राज ठाकरे फुटून बाहेर पडले. कारणे वेगळी असतीलही पण शरद पवारांनी स्व-हित का सत्ता-हित समजून कॉंग्रेसशी आघाडी केली व आपली सत्ता शाबूत राखली. बरोबर याच्या विरुद्ध मनसेचे वर्तन आहे. कॉंग्रेस पक्षाने सुद्धा पवारांना ना'राज' न करता अधिक केले म्हणजेच जवळ केले .याउलट शिवसेनेने ना'राजां'ना वजा केले. वजाबाकी मागे आपसी हेवेदावे कमी व स्वतःची खुर्ची डळमळीत होईल याची भीती जास्त...... थोडक्यात काय तर बेरजेची रीत समजून घेण्यातच मनसे - भाजप - शिवसेनेचे हित आहे.....

ते आले आले आले आले ते गेले गेले गेले गेले ते उद्घाटनाला आले आले आले आले ते उद्धाटन करून गेले गेले गेले गेले त्यांनी ब्ल्यू प्रिंट आणली आणली आणली त्यांनी ब्ल्यू प्रिंट नेली नेली नेली एकहाती सत्त्ता नागरीकांनी दिली त्यांचीच उडवली तुम्ही खिल्ली खाजगीकरण हटवीण्याच्या केल्या गप्पा नंतर मात्र ठेकेदारांचा घेतलात पापा कुठलाच निर्णय ठोस घ्यायचा नाही खळ्ळ खट्याक केले तर रडायचे नाही मोठी आशा होती तुमच्याकडून सुरूवातीला नंतर पाने पुसली नागरीकांच्या तोंडाला कारभार लोकांनी लोकांसाठी करायचा ही लोकशाहीची व्याख्या असते एखाद्या माणसाच्या एकाच मतावर निर्णय घेण्यासाठी थांबायचे नसते सगळे आधीच्याचसारखे आहे तर सांगा तुमच्यात अन त्यांच्यात फरक काय? फक्त त्यांच्या अंगावर खादी हाय अन तुमच्या डोक्यावर पांढरी टोपी नाय! पण लक्षात ठेवा, असेच जर नवनिर्माण असेल तर पुढल्या वेळेला सत्तेत नवा बदल निश्चित असेल

मिपाच्या तमाम वाचकांना आठवतच असेल की ज्याने मनसेचे गुणगाण गाईले त्याच्याच हातून असले काव्य निर्माण व्हावे यासारखे दुर्दैव कोणते? त्याच्य हृदयाचे किती शकले झाले असतील त्याचा तुम्ही विचार केला आहे काय? वाचकांनो तुम्हीदेखील असले गुणगाण करणारे, कौतूक करणारे, चांगले बोलणारी काव्यमौतिके, लेखसुमने, आनंदमाला या व्यक्तीविषयी ऐकल्या आणि वाचल्या नसतील काय? हेची फळ काय मम तपाला असा उद्गार काढून आधीच का माझी वाचा बंद झाली नाही, हे प्रभो, हे दिनदयाळा, हे आकाशातल्या बापा, हे परवरदिगार, हे तथागथा असले काय घोर पाप मी केले होते ज्यायोगे माझ्या लेखणीतून पोवाड्यासारखे ओजस्वी कावलेखणीतून प्रगट झाले? या सार्‍या प्रकाराला काळ हाच जबाबदार नव्हे काय? वाचकांनो, तुमच्याही हृदयसिंहासनावर कधीकाळी विराजमान असलेल्या आर. ठाकरेंबाबत आपलेही मत असेच झाले आहे काय? - दिवाळीच्या शुभेच्छा!

शिवसेना -मनसे एकत्र येवुन निवडणूक लढल्यास नक्की फायदा होईल ,पण इगो आडवे येतात इगो सोडा ,महाराश्त्ट्राच्या भल्यासाठी एकत्र या !

अहो ह्या दोन पक्षांनी एकत्र येउन तरी काही मोट्ठे दिवे लावले नसते. मुळात एक गोष्ट मान्य करायला हवी, की शिवसेनेकडे सत्ता हातात ठेवायची आणि राबवायची व्यवस्था आहे मग भले ती मोडकी किंवा तोकडी का असेना आणि मनसेकडे मुळात अनुभवच नाही. त्यामुळे जरी हे पक्ष एकत्र आले तरी सत्ता नक्की कोण आणि कशी राबवणार ह्यावर एक मत होणे मुळातच कठीण. मग उद्धव कितीही संयमी असले आणि राज कितीही रोखटोख असले तरी. कारण जर राज शिवसेनेच्या मर्जीने काही करू लागले तरी आणि नाही ऐकले तरी होणारा फायदा शिवसेनेचाच. आणि त्याचसाठी राज ह्यांनी नाशिकचा गेम खेळलेला आहे. न पटणाऱ्या भिडू बरोबर आधीच हात मिळवण्यापेक्षा मिळालेला जिल्हा किती व्यवस्थित चालविता येतो ते आधी पाहू मग नंतर ठरवता येईल काय करायचे ते. ह्या दोन्ही पक्षांची स्वबळावर निवडणूक न जिंकण्याची अशी अनेक कारणे आहेत. इगो तर आहेच. पण खरच आत्ताचे सरकार भ्रष्ट असेल आणि ह्या दोन्ही पक्षांना महाराष्ट्र आणि मराठी पुन्हा उभा करायचा असेल तर तसा प्रयत्न त्यांनी आधीच केला असता ना, आपल्याला सांगावे लागलं नसतं.

कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय न करता अब्जाधीश असलेला मनुष्य. माझ्या दृष्टीने हेच एक मोठे कुतुहल आहे.

खासच! असा विचार केला तरच 'नवनिर्माण' म्हणजे 'नेमके' काय ते लक्षात यावे! :) -(अब्जाधीश कसे व्हावे ह्या विचारात असलेला) सोकाजी

कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय न करता अब्जाधीश असलेला मनुष्य. माझ्या दृष्टीने हेच एक मोठे कुतुहल आहे.
+१००००० (राजकारणातल्या सगळ्याच घराण्यांच्या चरितार्थाबद्दल कुतूहल असलेला) चावटमेला

आण्णा, दोनचार शून्या अजुन वाढवायच्या की, म्हणजे आमी पण अब्जाधीश नसतो का झालो?

राज ठाकरे कडुन काही नवनिर्माणाची आशा होती पण एका कार्यक्रमात थोरल्या पवारांच्या पाय पडताना पाहील आशा संपुष्टात आल्या .नंतर म्हणाले राजकारण आणी खाजगी आयुष्य वेगळ असत .

कसलाही काम धंदा नोकरी व्यवसाय न करता अब्जाधीश असलेला मनुष्य. माझ्या दृष्टीने हेच एक मोठे कुतुहल आहे.
आपण सारे चाकोरीमध्ये असलेला काम धंदा करतो तसेच तेही इतर नेत्यांसारखेच किबहुना (बहुगुणा नाही) जास्तच काम करतात - १ मेंदू आणि वाणी मर्मभेदी राहाण्यासाठी नियमित वेगवेगळ्या आवाजांची नक्कल करणे २ स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अनेक व्यक्ती आणि संघटनांची कार्ये (स्वतःची वगळून) कोळून पिणे. ३ सत्ताधारी पक्षाचा आणि सरकारचा समाजाला होणारा त्रास ह्या बद्दल अनेक मेनू असलेला बुफ्फे बनवणे आणि इतर …।

नंतर म्हणाले राजकारण आणी खाजगी आयुष्य वेगळ असत . पण तुझं राजकारण आमच्या खाजगी आयुष्याला मारक ठरतय त्याचे काय !

राज सध्यातरी कुठल्याही वादात २न्ही कडून पैसे काढायचे काम करतो. ते पाकीस्तानी कलाकरांचे कार्यक्रम भारतात प्रक्षेपित झालेच ना शेवटी. :)

आशा ताईंच्या विनंतीवरुन स्पेशल एपिसोड होता तो! बहुतेक चकटफु असणार. नेहमी असंच असतंय. जोरात सुरुवात करायची नि नंतर आत्ता झालं ते झालं...' ह्यापुढं हे खपवून घेणार नाही'. आर्र तिज्यायला. (त्यांचीच स्टाईल) काय खेळणं वाटलं का काय?

बाकी ज्या ज्या वेळी धाग्याचं नाव वाचतोय 'राज ठाकरे यांचे काय चाललेय' तेव्हा तेव्हा १. कुणास ठाऊक? २. काही बोलले नाहीत मला... ३. बरें चाललें असावें! ४. तुम्हाला काय करायचंय? अशी उत्तरे कशी आलेली नाहीत अजून ह्यावरुन अचंबित झालोय. कदाचित खळ्ळ खट्याक ची भीती असावी! :)

मग सोत्रि कधी सुरु करताय नवा धंदा स्वारी ते नवनिर्माण बा द वे शुभेच्छा ... अब्जधीश भव !

मला पण अब्जाधीश व्हावस वाटतय.... उत्तम टोपीबदलू राज-कारणी कसे बनावे हे शिकवणारे क्लासेस चालु करा रे कुणीतरी ! ;)

बाकी सेना आणि मनसे यांचा विषय निघाली की मला नेहमी ज्ञानेश्वर मेश्राम यानी गायलेले विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती हे गाणं आठवतच आठवत ! प्रत्येक ओळ नी ओळ मनाला भिडणारी ! जाता जाता :- शेवटी या मंडळीसाठी काय सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती ! ( नमो मंत्र जपणारा)

पण तुझं राजकारण आमच्या खाजगी आयुष्याला मारक ठरतय त्याचे काय !
जोग साहेब, फक्त राज ठाकरेच नाही तर सर्वपक्षिय राजकारण्यांमधे हे दिसते. 'राजमाता' विजयाराजे शिंदे मुलाच्या(माधवराव- काँग्रेस) संघात भाजपाच्या प्रचारासाठी कधी जात नसत.सध्याच्या काळातही हा अलिखित नियम पाळण्यात येतो. भाजपा मावशी- वसुंधराराजेंच्या विरोधात काँग्रेस भाचा ज्योतिर्दित्य बोलायचे टाळतो.अगदी 'त्यागी' नेहरू-गांधी घराण्यामधेही हा नियम पाळला जातो. भारतिय राजकारणात व्यक्तिगत संबंधांपुढे पक्ष,मुल्ये,विचार दुय्यम मानले जातात.

आणखी एक कूणकूण... जयदेव ठाकरे यांचेही काही नवे सुरु आहे. त्यांच्यामागे 'पवार'फुल्ल माणसे आहेत. चित्र लवकरच स्पष्ट होइलच.

राज ठाकरे जेव्हा "तसली" टोपी घालून हिंडला होतो तेवाच मनातून पार उतरला होता तसेही परप्रांतीयांना शिवीगाळ करण्यावाचून येते काय ह्याला?

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/raj-thackeray-gujrati/articleshow/26115852.cms म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर आजवर उत्तर भारतीयांना 'खळ्ळखट्याक्'चा धाक दाखवतानाच, गुजराती बांधवांना कुरवाळणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भूकंपग्रस्तांच्या मदतीवरून गुजरातींना टार्गेट करीत बुधवारी एक नवा राजकीय भूकंप घडविला. मारवाडी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार रामकृष्णदादा बेलूरकर यांना राज ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी नागपुरात प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजय दर्डा होते तर, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी प्रमुख पाहुणे होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापत असताना, राज ठाकरे यांनी दोन दशकांपूर्वी किल्लारी येथील आणि १२ वर्षांपूर्वी भुज येथील भूकंपांचे उत्खनन करीत गुजराती बांधवांसह सगळ्यांनाच धक्के दिले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा अलीकडेच मुंबईतील गुजराती सराफा व्यावसायिकांनी सत्कार करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकासाठी निधी दिला. त्या पार्श्वभूमीवर या धक्क्यांची तीव्रता राजकीय रिस्टर स्केलवर अधिकच जाणवेल. 'माझ्या हस्ते सत्कार करू नका, असे मी वारंवार म्हणालो, पण ऐकेल ते नागपूर कसले! त्यांनी तो माझ्याच हस्ते केला. मला लोकं म्हणतात, मी मारतो. अरे तुम्ही आमच्यासारखे, आमच्यातले बनून रहा, मग सगळं ठीक होईल. तिकडे गुजरातेत बघा. तेथील मराठी लोकं मराठी बोलतात, पण त्यांचा लेहजा गुजराती असतो. आमचीही तीच अपेक्षा आहे, असे राज यांनी स्पष्ट केले.
तेथील मराठी लोकं मराठी बोलतात, पण त्यांचा लेहजा गुजराती असतो. आमचीही तीच अपेक्षा आहे.
याचा अर्थ "येथील गुजराती लोकांनी गुजराती बोलावं पण त्यांचा लेहजा मराठी असावा" असा काढावा की "येथील गुजराती लोकांनी मराठी बोलावं पण त्यांचा लेहजा गुजराती असावा"

विचारावसं वाटतं... "आता गप्प बसायला काय घ्याल(टोलबद्दल) ? तसं आता निवडणूकीत हरायला काय घ्याल" त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका काय ? आणि कुणाचा फायदा करून देणार ? याबाबत उत्सुकता आहे.
आजही हेच वाटतंय

हा संदर्भ वेगळा आहे. राजसाहेबांनी अगोदर पाक कलाकारांना विरोध केला ,आता म्हणतात प्रत्येकी पाच कोटी द्या अन घ्या? नक्की काय धोरण ?

अय हितेस चड्डीत रहायच क्काय ! कुठल्याही चर्चा कुठेही नेउ नकोस. तुझ्याकडे एका वेळेस अनेक आय डी असतात ईथे आमचा एकमेव आय डी ब्लॉक झाला की द्राविडीप्राणायम करावा लागतो. प्लीज ईथे महाराजांचा उल्लेख अनावश्यक होता.