Welcome to misalpav.com
लेखक: बाबा पाटील | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बरोब्बर.. बाकी कोण म्हणलं होतं ग की ह्या पुरुषांच्या धाग्यांना फारसं मनावर घ्यायचं नाही.. इथे धागे काढतील मग आयतं भरपेट गिळुन, ढेकर देत, बनियन ला हात पुसत प्रतिसाद बघत बसतील..!! (इथे तुझी स्मायली.. + ही ही ही)

डोळे पाणावले, ग्लिसरीनचा ओव्हरडोस झालाय बहुतेक.... हां तर काय म्हणत होतो? 'आयतं' पणाची आयते वाचू लागलो तर अख्खे कुराण होऊन जाईल, काय समजलेत ;)

पुस बाळा.. डोळे पुस.. आणि आपला प्रत्येक प्रतिसाद फाऊल आहे हे लक्षात आहे ना.. तु कितीही काहीही बोल.. (किमान माझ्या लेखी तरी) तु अनुनभवि असल्याने तुझे चिमखडे बोल मी मनावर घेणार नाही..

ब्याट्मॅन, क्याट्वुमन शोधून टाक दिवाळीच्या मुहूर्तावर...मग पुढच्या वर्षीच्या धाग्यावर अनुभवाचे चार बोल टाकता येतील...

मग त्याला इतर पुरुषांप्रमाणे घराची साफसफाई करावी लागेल आणि इथे वकिली करायला वेळ नाही मिळायचा!

शोधायला कै हर्कत नै हो...पण ते...आपलं हे ते..अनुभवाचे चार बोल टाकता यावेत म्हणून क्याटवुमन म्हणजे परत ते अल्पदुग्धप्राशनार्थ महिषीपालन =))

तुझ्याच भल्याची गोष्ट सांगितली, पण ऐकतं कोण? एक तर क्याट्वुमनसारखी चपळ बायको शोधलीस की नुस्त्या मारामार्‍या करणे हेच काम उरेल(कुणाशी हा प्रश्न गैरलागू) साफसफाई वगैरे तुला करायला ती लावणार नाही आणि फुकटात मॅरीड असल्याचं प्रमाणपत्र पण मिळेल... असो... चार भल्याच्या गोष्टी ऐकण्याची तयारी अगदी वाघूळमानवाकडेही नसते हे कळलं... :-/

बॅटमॅन भो, उगा काळं चामडं पांघरलेली मांजरी मिळते आणी "चाबकाने" मारामारी करते यास्तव स्वतःचे स्वातंत्र्य धोक्यात घालु नका. दुध हवं म्हणुन हेला खरेदी करणं प्रशस्त नव्हे.( इथे आजुबाजुचे संदर्भ घ्यावेत.) फुकटातलं सर्फ- तिकीट तर कुठे ही मिळेल.

बापा, आपली जरा पडती बाजू दिसतेय या धाग्यात :( बाकी, आपल्या भावनेशी सहमत आहे. आपला आराम करायचा मूड आणि यांना पसारा मांडायची खवखव सुटते. असो, पत्नीपिडित पुरुषांचा सिमला घोषणापत्र ;) -दिलीप बिरुटे [पिडित पुरुषांबद्दल सहानुभूती असलेला]

नाही जमत तर सांगावे बायकोला कि काही करू नकोस ग बाई? उगाच तुझ्या जीवाला हि त्रास नको आणि माझ्या हि. हाउसकिपिंगची सुविधा हल्ली महाराष्ट्रात हि आहे. त्यांना बोलवावे, सगळी साफसफाई करून घ्यावी, उगाच का एवढा त्रागा? असे हि जी हे काम आपलेपणाने करते ती काही मोबदला तर मागत नाही, हो पाडव्याला तिला सरळ म्हणावे कि बाई तुला त्रास नको म्हणुन हाउसकीपिंग वाल्यांना बोलावले कि नाही. मग आता काही भेटवस्तु मिळणार नाही. एका शब्दाने हि काही बोलणार नाही. चुक खरे तर बायकांचीच आहे, नाही आवडत समोरच्याला, नाही मन एखाद्याचे तर का म्हणुन आपले समजुन गोष्टी सांगाव्या. त्यापेक्षा चार पैसे देऊन एखाद्याकडून काम करून घ्यावे. समोरच्या माणसालाच दिवाळीसाठी तेवढी मदत. पण शेवटी पैसा पण घरासाठीच वाजवतात न, जाऊ द्या हो बाबासाहेब, आम्ही बायका अश्याच आहोत, स्वभावाला औषध नाही, राहिले उपायाचे तर हा धागा तुमच्या बायकोला वाचायला द्या, पुढच्या दिवाळी पासुन तुम्हाला गृहीत धरणे सोडले जाईल अगदी तुमच्या मनासारखे.

भावनाताई,माझ्या मनात आनी डोळ्यात भावनांचा अगदी कल्लोळ कल्लोळ दाटुन आलो हो.पण आमची जगदंबा तिला ह्याचा काहीच उपयोग होत नाही. माझ्या घरातली आनी हापिसात जितकी म्हणुन कामगार मानस हायती अगदी माझ्यासकट ती त्या सगळ्यांना कामाला लावती.आणी असही आम्हाला त्यांनी कधी गृहित धरल्याल मागच्या दहा वर्षात आठवतच नाही बघा.आखिर नाविलाज को क्या विलाज है बाबा !

पुरुषांच्या धाग्यावर म्हैलांना गोंधळ घालताना पाहून एक पुरुष मिपाकर म्हणून शरम वाटली. (शरमून रात्रीऐवजी दिवसा बाहेर पडणारा) बॅटमॅन.

ए! जा जरा आईला मदत कर! नाहीतर फराळ देउ नको म्हणुन सांगते बघ!

आम्हाला थोडा तरी हक्क आहे.. फिर्यादीची तक्रार आमच्या विरुद्ध असल्याने आम्हाला धिंगाणा घालायचा पुर्न हक्क आहे. पण तुझा काय संबंध? तुला बायको नाही आणि सांभाळायला पोरं पण नाहीत!! आणि बायकोच्या जाचाची सर आईला नाही. त्यामुळे तु तर राहुच दे.. (अवांतर - ह्याचं लग्न करुन द्या रे.. मग बघु या मज्जा...!! (परत एकदा पैतै ची स्मायली + ही ही ही)

>>>> बायकोच्या जाचाची सर आईला नाही. त्यामुळे तु तर राहुच दे.. हाहाहा लंबर एक. फार्मात आहात. सच्यासारखी खत्रा फलंदाजी चालू आहे. मस्त. समस्त पुरुषांना विनंती की इकडे या धाग्याकडे फिरकू नका. :) -दिलीप बिरुटे

*mosking * *JOKINGLY * 8 P 8 p ही घे पिरा स्मायली! JOKINGLY नंतर मी स्पेस टाकली आहे ती काढ अन स्टार चिटकव. झाली स्मायली. mosking नंतर पण तेच अन एट पी मधलही अंतर काढ.

आम्हालाच खरा हक्क आहे. आम्ही फिर्यादी आहोत. पण तुला काय हक्क आहे? आरोपी ते आरोपी अन वर फिर्यादीच्या उलटी फिर्याद? त्यामुळं राहूच दे. (अवांतरः लग्न करूनही न सुधारणे हा स्त्रियांचा गुणविशेष म्हणावा काय?) -एलियन स्पायडर.

ब्याट्या..... तुला माहीत आहे का एका सर्व्हे ने असे दाखवुन दिलय की स्त्रीया पुरुषांपेक्षा अधीक आनंदी असतात. त्या अधीक जगतात" कारन सोप्पय रे. "स्त्रीयाना बायको नसते "

=)) =)) ऐकलेय खरे अशा सर्व्हे बद्दल. बाकी, ज्यांना स्त्रियांत रस असतो अशा स्त्रियांबद्दलचा सर्व्हे काय म्हणतो तेही वाचायला आवडेल ;)

समस्त स्त्रीवर्गाला आपली बाजू कळकळीने मांडताना पाहून ड्वाॅले पानावले. मुळात टिचभर काम अन ढिगभर पसारा असा बायकांचा हातखंडा असतो. मदत तर घ्यायचीच पण केलेलं अख्खं काम स्वतःच राबून केलं या थाटात वावरायचं. :-)

अहो, कळकळीने बाजू मांडताहेत ते पुरुष. चला पळा लौकर घरी. तुमची सौ. फॅन पुसण्यासाठी वाट बघत असेल!

तीन प्रश्न १. कळकळ कुठे दिसली? (कडकड, कट कट दिसु शकेल.. कळकळ??) २. तुमचं लग्न झालं आहे का? (नसल्यास हा प्रतिसाद फाऊल आहे..) ३. तुम्ही संपादक आहात ना? (इन दॅट केस.. कसं काय मालक? चला चहा पाणी करुन येऊ.. दमला असाल..!!)

येकच नंबर किसनद्येवा!!! "पुर्षांच्या धाग्यावरि म्हैलांचा घाला आला आला सावध करा किसनद्येवाला सद्गदिता पुर्षांच्या ओ दे हाकेला करुणारव साचा तव कानी जो गेला"

किसनद्येवा या गोपींना सद्बुद्धी दे रे बाबा!

हाहाहा बाकी तुमची स्मायली त्या जळमटनिर्मात्या स्पायडरम्यानसारखी वाटू लागलेय =)) तिथे हाताची अ‍ॅक्शन तर इथे जिभेची इतकाच काय तो फरक.

मला कामाला लावून ही मस्त घोरत पडली आहे, म्हणून इकडे आलो तर.... ह्या भगिनींनी उच्छाद मांडला आहे. अशा वेळी मात्र ह्या सगळ्या नणंदा-वन्स एकत्र होतात.

मुळात टिचभर काम अन ढिगभर पसारा असा बायकांचा हातखंडा असतो. मदत तर घ्यायचीच पण केलेलं अख्खं काम स्वतःच राबून केलं या थाटात वावरायचं.