Welcome to misalpav.com
लेखक: बाबा पाटील | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

? (विस्कटून सांगण्याच्या प्रतीक्षेत) बॅटमॅन.

आहाहाहा! काय तरी निरीक्षण केलंय! मुळात घरामधे ढीगभर पसारा करण्याचा मक्ता फक्त आणि फक्त पुरूषमंडळींचाच असतो.सणवार कशाला रोजचंच बघा ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हातात घेतलेली वस्तू कधी जागेवर ठेवणार नाही आणि दुस-या दिवशी मात्र ती वस्तू सापडली नाही की बोंबाबोंब सुरूच!

तुम्ही माझा डु आय डी तर नाही ना? ;) वस्तू कधी जागेवर ठेवणार नाही >मी हीच तक्रार करत असते सारखी. पसारा आवरुन घेण्यातच वेळ जातोय. आता पन्खे कधी पुसुन घेउ? स्वच्छता झाल्याशिवाय मी काही नवर्‍याला चकल्या करायला बसू देणार नाही. ;)

नीट वाचलं का? पसारा करण्याची बायकांना सवय असते असं लिहलंय अनं ते ही काम करताना. बाकी तुम्ही म्हणत असलेल्या पुरूषांच्या पसारा करण्याच्या सवयीविषयी तर तो वेगळा मुद्दा आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढण्यातला प्रकार!! :-)

और इसी किसन चौके के साथ इस धागे की शंभरी पार हो गयी है!

एक तर "अबोल्या" च्या काळात आहात म्हणजे खुप जुनी न्युज आहे तुअम्च्या कडे.. अबोल्या अनाहीता झाल्यात.. दुसरं म्हणजे.. मज येतेय.. तुम्ही पण सामील व्ह्या!! दिवाळी पेश्शल.. !!

=)) =)) =)) हे म्हणजे हैदराबादी बिर्यानी फ्यान क्लबात जैन मेंबर घेण्यापैकी =))

देश बद्लायला निघालेत, आधी लग्न करून टीव्हीवरचा चॅनल बदलून दाखवा असं आवाहन थोपुवर करण्यात आलंय. संघटनेनं लक्ष घालावं.ही गोष्ट यांच्या बापाच्यान शक्य नाही.

प्रतिपक्षाला आव्हान आहे की त्या बिनडोक सीरियल्सच्या विळख्यातून अगोदर बाहेर पडून दाखवावे आणि मग आव्हाने द्यावीत. काय म्हणता?

कुणी आपणहूण दाखवलं तर टेण्षण णाही, पण स्वत:हूण आजिबात जाणार णाही. आमचा पुरुष विभाग समर्थ आहे ;)

वर क्रेझी ने जे लिहिलय त्याच्याशी पूर्णपणे सहमत. आमच्याकडे सेम आहे. आणि वरती जाणार कुठे गं जाऊन जाउन? असा छानसा डायलॉग पण असतो. आणि दुसर्या दिवशी मोहरम.;)

धागा पीडित पुरुषांचा आणि त्यांची वकिली करतोय अविवाहित बॅटमन आणि गोष्टी चालल्यात २ बॅचलरांना संघटनेत घ्यायच्या! असोच!!

अगं बोलु दे ग त्याला.. म्हणलं ना चिमखडे बोल.. कौतुकाने वाचायचे..!! तो अविवाहीत आहे म्हणौनच तर बोलतोय.. बाकीचे उगं आपलं इथे जोर दाखवतिल आणि घरी जाउन फडकी घेऊन घरं पुसत बसतील..

बाकीचे उगं आपलं इथे जोर दाखवतिल आणि घरी जाउन फडकी घेऊन घरं पुसत बसतील..
स्वतःचा दिनक्रम इथे सांगितल्याबद्दल आभार :P अन पैसातै, पीडित पुरुषांबद्दल बोलायला विवाहितच असावे लागते काय? तसे तर मग प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टने प्रेग्नंट झालेच पाहिजे =))

तु बायको कडुन पीडित नाहीस सबब तुला इथे बोलण्याचा आवश्यक अनुभव नाही. बाकी पुरुष म्हणुन बायकांबद्दल ज्या काही तक्रारी असतील त्या दुसर्‍या धाग्यात मांडाव्यात.. इथे शिरेस चर्चा चालु हाये.. मुलांनी जास्ती लुडबुड करु नये..!

या धाग्यावर फिर्यादींना आपले म्हणणे मांडण्याची मुभा न देता आरोपींचीच बडबड चालूये. कुणाला तरी फिर्यादींची बाजू घेणे भागच आहे.
मुलांनी जास्ती लुडबुड करु नये..!
वेलांटी राहिली बहुधा.

तु बायको कडुन पीडित नाहीस सबब तुला इथे बोलण्याचा आवश्यक अनुभव नाही.
आरोपींनी आरोप स्वतःच कबूल केला आहे रे बॅट्या! :-)

ठ्ठ्ठ्ठ्ठो!!!!!!!!!!!!!!!!!!! हे लक्षातच आलं नव्हतं किसनद्येवा, तुमच्या पायांची हाय रेझोल्यूशन स्क्यान करून ईमेलवा, प्रिंटून फटू फ्रेममध्ये लावतो ;) शेवटी आरोपीने गुन्हा कबूल केलाच म्हणायचा तर =))

जेव्हा घरी काम करायची वेळ येईल तेव्हा काय करशील मग?

हा अवांतर प्रश्न आहे. त्याबद्दल धागा काढला तर तिथे मत नोंदवेन ;) तूर्तास बायकोशाहीबद्दल बोलणे चालू आहे, नही चलेगी नही चलेगी!!

समस्त स्त्री जातीच्या वर्चस्वाचं प्रदर्शनच चाललंय जणू.... बघा बघा, नवर्‍यांना असं फडकं घेऊन घर पुसायला लावणं हे मानवाधिकाराच्या विरोधात आहे. हा सरळ सरळ पुरुष जातीवर अन्याय आहे. कसलं कोमल हृदय नि कसलं काय! बसाल्ट (सह्याद्रीचा कातळ) बरा च्यामारी.

डॉ. खरे जे लहन मुलांविषयी बोलतात तेच नवर्‍यालाही लागु झाहे. इथे हळवेणा उपयोगाचा नाही !! चांगलं बदडलं पाहीजे..!! सुतळ्या, दोरखंड घेऊन यायला पहिजेत!! आणि त्या दृष्टीने कथा पण येत आहेत हल्ली मि.पा वर (गाईडलाइन्स यु नो..) (अवांतरः- बॅट्याच्या लग्नात काही कथांच्या प्रिंटाऔट देणारे मी त्याच्या बायकोला. "ह्याला खुप खुप आवडली आहे ही कथा" म्हणुन!!) ह.घे रे बॅट्या..

आणि त्या दृष्टीने कथा पण येत आहेत हल्ली मि.पा वर (गाईडलाइन्स यु नो..)
चला, उलट्या दिशेच्या काही कथांचे भाषांतर पाडीन म्हणतो ;) बाकी मी ह.घे.प. (हलके घेण्यात पटाईत) आहे, कल्जि नसावी.

नवर्‍यांना असं फडकं घेऊन घर पुसायला लावणं हे मानवाधिकाराच्या विरोधात आहे आयला प्यारे फडकं घेउन नाही पुसायचे तर कसे पुसायचे रे मग? आता अंगातला बनियान काढुन पुसायचं की काय?