Welcome to misalpav.com
लेखक: चतुरंग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

असे लगेच दिसते आहे. खेळ्या बर्‍याच पटापट होताहेत.पहिल्या सहा खेळ्या झाल्या आहेत. दोघांचे उंट कर्णात आलेत. सहाव्या खेळीला मॅग्नुस बी ३ खेळलाय.

आनंदची तयारी चांगली आहे तो सुद्धा फार वेळ घेत नाहीये. आनंदचा उंट एफ ५ मधे आला. डावाच्या मध्यातल्या चार चौकोनांवर ताबा मिळवण्याची धडपड सुरु आहे. एक नक्की आहे की आधीच्या जगज्जेतेपदापेक्षा यावेळी भरपूर वेगवेगळी काँबिनेशन्स बघायला मिळतील.

http://chennai2013.fide.com/live-video-streaming-alternate-server/ http://www.geekosystem.com/2013-chess-championship-live/ फिडेचा (चेन्नै) दुवा मेलाय..

इथे ती बया नाही बक बक करायला. फक्त विडीओ नाही, बोर्ड लाईव पाहता येईल.

नंतर काळ्याचा घोडा डी७ मधे आलाय. वजिराचा प्याद्याशी जोर तुटलाय. कार्लसनने डी ५ प्याद्यावर हल्ला चढवलाय. आनंदने सी४ प्यादे घेतले.

कडेचे प्यादे घेणे हे थोडे इन्फीरिअर असते कारण डावाच्या मध्याचे नियंत्रण कमी होते. परंतु विशीची मोहोरी चांगली विकसित आहेत त्यामुळे हा धोका बहुदा विशीने घेतला असावा.

बी ६ मधे हलवलाय. डावाच्या मध्यातलं नियंत्रण हा आता कळीचा मुद्दा आहे. कार्लसन कोणती खेळी करणार? सी ५ खेळला तर घोडा डी५ मधे ताकदवान पोस्टवर येईल त्यामुळे ती शक्यता कमी आहे. घोडा ई५ खेळेल का?

नंतर आनंदचा घोडा बी४ वरती येऊन पाढर्‍याच्या काळ्या उंटावर आलाय

डावाची सुरुवात आणि मध्य यातली सीमारेषा धूसर झालेली समजते आहे. अचानक अकराव्या खेळीलाच डाव मध्यात आलाय. मॅग्नुस काय खेळणार उंट मागे घेणार का?

फायनली.... फायनली एक साईट सापडली जिथे शांतपणे गेम पाहता येईल. http://chessbomb.com/site/

वजीर ए ५ का प्यादे ई ५? वजिराची खेळी आक्रमक आहे. कारण त्यानंतर मॅग्नुसला वजीर सी२ वर किंवा बी३ वर घेऊन घोड्याला आधार द्यावा लागेल.

घोडा डी५. आता ई५ असे पांढर्‍याला उचकवले आहे. किंवा मॅग्नुस घोड्यांची मारामारी करेल का? मग प्यादे डी ५ वर येऊन घोडा सी४ मधे मस्त बसेल!

रमतारामनी किंवा मी दिलेल्या दुव्यावरती. त्यावरुन बर्‍याच गोष्टी सुकर होतील. एकीकडे बोर्ड मांडून बसलात तरी चालेल!

अशा दोन प्रकारे घोड्याला सपोर्ट करता येईल. पैकी बी ३ मधे वजीर आला तर काळा घोडा ए ५ मधे जाऊन वजिरावर हल्ला करु शकतो. त्यामुळे बहुदा सी २ मधेच.

एफ-५ वरचा उंट आणि दोन घोडे यांच्या मदतीने आनंदने मॅग्नुसच्या क्षेत्रात बराच दबाव निर्माण केला आहे. सध्या तरी वजीर बी-३ ला पर्याय दिसत नाही. एक वाईल्स गेसः वजीर ए-४ हा एक धोका पत्करणारा पर्याय म्हणून पाहता येईल. घोड्यांच्या एक्स्चेंज ऐवजी, एका बदल्यात दुसरा घोडा घेऊन दुसर्‍यावरही दबाव टाकता येऊ शकेल. पुढे काय काय घडेल हे तपासून पाहतोय.

आनंद घोडा बी-६ मधे आणून एकाच वेळी दुसर्‍या घोड्याला पाठिंबा नि मॅग्नुसच्या वजीराला धोका देऊ शकतो. परतीचा मार्ग धरण्याखेरीत मॅग्नुसला पर्याय नाही. पण आनंदचा घोडाही मागे फिरतो.

वजिराच्या बाजूला घुसमट झाली आहे. घोडा अडचणीच्या जागी आहे आणि वजिराशिवाय मदतीला कोणी नाही. घोड्यांची मारामारी केली तर डाव सोपा होत जातो. तो वजीर बी ३ खेळला!