Welcome to misalpav.com
लेखक: चतुरंग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

शक्यता तीच दिसते. अन्यथा पुढचा घोडा वाचवताना बरीच कसरत करावी लागेल आनंदला.

सध्या तरी त्याची पोझीशन चांगली वाटते आहे (माझ्यामते जरा सरसच असावी). अर्थात ड्रॉ झाला तरी चालेल कारण पुढल्या डावात त्याची पांढरी मोहोरी आहेत त्यामुळे तो एकप्रकारे आनंदसाठी मानसशास्त्रीय विजय असेल!

वरती लेखात उल्लेख केल्याप्रमाणे चतुरंग - Tue, 05/11/2013 - 05:34 अँड्रॉईड फोन्ससाठी अ‍ॅप्लिकेशन तयार झाले आहे आणि ते इथून उतरवून घेता येईल. माझ्या फोनवर मी घेतले आहे. चांगले वाटते आहे, अजून जास्त खेळून बघितले की जास्त समजेल. .

फारच लवकर संपला डाव हे खरेच. परंतु पहिला डाव असल्याने दोघेही सावधपणे खेळले. उद्या फुलबाज्या मिळाव्यात बाबा बघायला!!

सहमत. बुद्धीबळातले खूप कळते असे नाही. पण मला हा डाव फार खास नाही वाटला. ज्या प्रकारे draw झाला ते पाहून तर जगज्जेतेपदाची लढत पाहतोय असे अजिबात वाटले नाही. आता हा माझ्या अपुर्या ज्ञानाचा दोष असेल म्हणा.

बाकी कटिंग चहा मारायला तयार आहेत दोघे!! >> खी: खी: खी: त्यापेक्षा सांऽबर बाऽत खायला जातील दोघे.

येस्स !! मलाही तेच वाटते ... सिसिलियन नॅजडॉर्फ होईल असा माझा अंदाज आहे ....( ऑब्व्हियसली ;) ) पण पेटृऑफ किंव्वा बर्लिन डिफेन्स पहायला मिळाला तर मजा येईल !!

म्हणतोय की डाव अपेक्षेहून फारच वेगाने डेवलप झाला आणि दहा मूव्हज नंतर त्याला 'इमर्जन्सी ब्रेक्स' लावायची गरज वाटली.

झाली मला वाटते अकराव्या खेळीला प्यादे रेटण्याऐवजी हत्ती ई१ असा हलवून ई४ ची तयारी करायला हवी होती, ते झाले असते तर आनंदच्या पांढर्‍या उंटाची वाट रोखली जाऊन मॅग्नुसचा वजीर जरा मोकळा झाला असता.

जालावरती बर्‍याच ठिकाणी विश्लेषण आलेले आहे. हे चेस्.कॉम वरती आलेले विश्लेषण. http://www.chess.com/news/its-on-carlsen-anand-game-1-4263 कालचा सामना, त्यानंतरची पत्रकार परिषद बघून आणि विश्लेषण बघून माझे मत पुढीलप्रमाणे - कार्लसन अग्रेसिव खेळतो आणि मनाला येईल तशा ओपनिंगच्या चाली बदलत जातो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पहिल्या दोन खेळ्या बघून मी रेटी ओपनिंग समजलो परंतु ५ खेळींनंतर डाव फीयन्चेटो ग्रुन्फेल्ड डिफेन्सकडे सरकला. कर्णातले उंट हे त्या ओपनिंगचे वैशिष्ठ्य. त्यानंतर नवव्या खेळीला आनंदने सी४ चे प्यादे मारले. ही खेळीदेखील कार्लसनला लगेच अपेक्षित नसावी. कारण त्याने लगेच प्याद्याने आनंदने प्यादे मारले नाही तो थोडा विचारात पडलेला दिसला. त्याला अपेक्षित असणार्‍या लाईनपासून खेळ इथे बाजूला सरकायला सुरुवात झाली असावी. कार्लसनने प्यादे मारताच आनंदने घोडा बी६ वर आणला. मी माझ्या पहिल्या लेखात म्हटलं होतं की कार्लसनला प्यादी पुढे सरकवून त्यामागे मोहोरी सरकवून जागा ताब्यात घ्यायला आवडते. इथे आनंदने त्याच्या ह्या सवयीचा बरोबर फायदा उचलला असावा असा माझा कयास आहे. कारण कार्लसनने सी ५ असे प्यादे ढकलले आणि घोड्यावर चाल केली. लगोलग आनंदने सी४ अशी आक्रमक चाल केली, ही देखील अपेक्षित नव्हती कार्लसनला (कालच्या परिषदेत तो अनवधानाने म्हणा पण चटकन बोलून गेला की दहाव्या मूवनंतर "इमर्जन्सी ब्रेक्स" लावावे लागले!) (इथे कार्लसनने सी ४ वरचे प्यादे सरकवण्याच्या उत्साहाला थोडा आवर घालून हत्ती ई१ मधे खेळून ई४ असे प्यादे सरकवण्याची तयारी करायला हवी होती असे वाटते). आनंदचा घोडा अचानक बी२ च्या उंटावर चाल करुन आल्याने उंटाला सी१ वर माघार घेण्याखेरीज पर्याय नव्हता. कारण त्या उंटाची मारामारी केली असती तर काळ्याच्या दोन उंटांसमोर डाव अवघड होत गेला असता. पुढची घोडा डी ५ ही देखील लागोपाठ दुसरी आक्रमक चाल आनंद खेळला!इथे दोन धमक्या आहेत घोडा सी३ वरच्या बिनजोरी घोड्याला मारणार किंवा त्याहीपेक्षा धोकादायक म्हणजे बी ४ वरती तो उडी मारुन येऊ शकतो आणि पुढच्या खेळीला एफ५ मधला उंट सी२ असा येऊन वजिराच्या दाढीला हात घालतो!! डी५ वरचा घोडा मारला तर काळा वजीर घोडा मारुन डावाच्या मध्यात येऊन बसतो. त्यापुढच्या खेळीला ई५ असं प्यादं खेळून डावाचा मध्य भाग ओपन करु शकतो. तिथून पांढर्‍याच्या अडचणी वाढू शकतात. उंटाने सी२ घर धरल्याने आता वजीर फक्त बी३ मधूनच घोड्याला जोर लावू शकतो. वजीर तिथे आणल्या बरोबर आनंदने घोडा ए५ वर नेऊन वजिरावर हल्ला केला. आणि ए ३/बी३ अशा दोनच खेळी वजिराला ठेवल्या. इथे कोंडी फोडून डाव पुढे नेण्यात कार्लसनला काही स्वारस्य नव्हते कारण त्याला कोणतेही कंटिन्यूएशन मिळणे शक्य दिसत नव्हते. बरोबरी करण्यात आनंदचा काहीच तोटा नव्हता, उलट तो कार्लसनला एकप्रकारे सज्जड दमच होता की काळ्या मोहोर्‍यांनी मी १६ खेळ्यात तुला बरोबरीत आणले आता उद्या माझी पांढरी मोहोरी आहेत!! पत्रकार परिषदेत आनंदच्या डोळ्यांमधली चमक लक्षवेधी होती. त्याला पहिल्याच डावात सूर सापडल्याचा आत्मविश्वास दिसत होता. त्याऐवजी कार्लसन जरासा नाराजच दिसत होता, सरळ आहे, कारण पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळतांना लढत वगैरे सोडाच पण काही धुमश्चक्री निर्माण व्हायच्या आतच डाव बरोबरीत गेला होता, नामुष्कीची गोष्ट होती! असो. कालचा डाव इतिहासजमा झाला. आज काय होते ते दुसर्‍या डावावरच्या दुसर्‍या धाग्यात अजून ३ तासांनी बघूयात.

दुसरा डाव एकदम धामधुमीतच सुरू झाला की. दहा मिनिटात बारा खेळ्या, अपोजिट साईड कॅसल्स. धुवांधार गेमची नांदी.

शनिवार, दि, ९ नोव्हेंबर २०१३ शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०१४ ला उद्घाटन आणि शनिवार, ८ नोव्हेंबर २०१४ ला बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. ०८ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- १ला सामना ०९ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- २रा सामना १० नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- विश्रांतीचा दिवस ११ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- ३रा सामना १२ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- ४था सामना १३ नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- विश्रांतीचा दिवस १४ नोव्हेंबर २०१४ -- शुक्रवार -- ५वा सामना १५ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- ६वा सामना १६ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- विश्रांतीचा दिवस १७ नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- ७वा सामना १८ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- ८वा सामना १९ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- विश्रांतीचा दिवस २० नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- ९वा सामना २१ नोव्हेंबर २०१४ -- शुक्रवार -- १०वा सामना २२ नोव्हेंबर २०१४ -- शनिवार -- विश्रांतीचा दिवस २३ नोव्हेंबर २०१४ -- रविवार -- ११वा सामना २४ नोव्हेंबर २०१४ -- सोमवार -- विश्रांतीचा दिवस २५ नोव्हेंबर २०१४ -- मंगळवार -- १२वा सामना २६ नोव्हेंबर २०१४ -- बुधवार -- विश्रांतीचा दिवस २७ नोव्हेंबर २०१४ -- गुरुवार -- समगुण फोड सामना

येस येस .. वी नीड धा$$गा .. वी नीड धा$$गा .. चतुरंगशेठ, माहितीचाहि सहि, पण धागा काढाच. -पहाटवारा

>>>> परंतु मला यावेळी धावते समालोचन करायला जमेल असे वाटत नाही असं कसं सेठ, तुमच्याशिवाय सामने रंगतदार व्हणार नाय ! तेव्हा वेळात वेळ काढून समालोचन करायला याच. -दिलीप बिरुटे (रंगासेठच्या बुद्धीबळाचा कौतुक असलेला)

चला सामन्यातल्या पहिल्या लढतीला दोन तास बाकी आहेत. याच धाग्यावर रंगासेठ येईपर्यंत जमेल तसं आपण लिहु बोलू अँड्रॉइडवर चेसचे अ‍ॅप्लीकेशन तुम्ही मोबाईलवर टाकलेले असेलच. सामना इथे दिसावा.

तुमच्या प्रेमाने मला अखेर इथे आणलेच. प्राडाँनी सुरुवात करुन दिलेली आहेच. मी स्वतंत्र धागा सुरु करतो आहे तिथे पहिल्या सामन्याचे वर्णन करुयात. (बुद्धीबळप्रेमी)चतुरंग