Welcome to misalpav.com
लेखक: वडापाव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मला ना ह्या प्रकाराचा एकुणच कंटाळा आला आहे . काय फरक पडतो राव , शिवाय ह्या असल्या विषयांवर चर्चा करणे हे तर एरंडाचे गूर्‍हाळ चालवण्यासारखे आहे . शिवाय मी नुकतेच डिक्लेरेशन ऑफ परसनल इन्डिपेन्डन्स साईन केले आहे ( पहा : माझी फेसबुक प्रोफाईल Declaration of Personal Independence I hereby declare that , I am a free independent soul and no more bound by any social code of conduct or whatever except for few logical and natural thumb rules ! Prasad Godbole . 01 Nov 2013 ) त्यामुळे ह्या जातीपातीच्या बंधनात तर सोडाच , मला धर्म बिर्माच्याही वादात पडायची इच्छा नाहीये नाहं मनुष्यो न च देवयक्षौ,न ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्राः। न ब्रम्हचारी न गृही वनस्थो,भिक्षुर्न चाहं निजबोधरूपः ॥२॥

बरच संतुलीत लिखाण! रोजच्या समाजातल्या व्यवहारातले अनुभव विशेष फोडणी न देता मांडल्याने विषय जहाल झालेला दिसत नाही आहे. अर्थात प्रतिसाद सुद्धा असेच येवोत.

उत्तम विचार. जातियवादाने भारताचे अगणित नुकसान केले आहे आणि करत आहे. सुजाण व पुढारलेल्या समाजात फक्त गुणवत्तेवर आधरित व्यवस्था (Meritocracy) असते, जन्मावर आधारलेली नसते असेच वाटते.

उत्तम विचार. जातियवादाने भारताचे अगणित नुकसान केले आहे आणि करत आहे. सुजाण व पुढारलेल्या समाजात फक्त गुणवत्तेवर आधरित व्यवस्था (Meritocracy) असते, जन्मावर आधारलेली नसते असेच वाटते. सहमत. परंतु असा पुढारलेला समाज अजून अस्तित्वात यायचा आहे जगात.

तत्व आणि वास्तविकता यांची सांगड साधारणपणे अशी असते... माणसाचा जो सहज स्वभाव आहे (ज्यात आप-पर भाव, हेवेदावे, इ अंतर्भूत आहेत) त्यावर मात कारणे समाजाच्या १००% व्यक्तींना शक्य नाही. त्यामुळे या जगात १००% सुजाण असणार्‍या मानवांचा समाज पूर्वी कधी नव्हता, आताही नाही आणि पुढेही होण्याची शक्यता नाही. पण या गोष्टीचा मला समजलेला त्याचा व्यावहारिक अर्थ असा: १. जेव्हा आपण एखाद्या पाश्चिमात्य देशाचा आर्थिक दृष्टीने संपन्न म्हणून उल्लेख करतो तेव्हा तेथली प्रत्येक व्यक्ती श्रीमंत आहे आणि एकही गरिब नाही असा अर्थ नसतो, तर सरासरीने तेथील नागरिक संपन्न आहेत असा असतो. सुजाण समाजातल्या मेरिटोक्रसीचे परिमाण तसेच आहे. २. जगात १००% पांढरे अथवा १००% काळे असे काही नाही... सगळ्या करड्या रंगाच्या छटा आहेत... सुजाण समाज पांढर्‍या टोकाच्या शक्य तेवढे जवळ राहण्याचा जाणीवपूर्वक सतत प्रयत्न करत असतो. ३. अजून थोडे पुढे जाऊन असेही आहे की, सुजाण समाज म्हणजे एका जागेवर थांबलेला समाज होऊच शकत नाही... कारण त्याच्या सुजाणतेपणामुळे त्याचा पुढेपुढे जसा विकास होत जाईल तसतश्या मेरिटोक्रसीच्या कल्पनाही अजून विकसित होत जातील... म्हणजे १००% ची केवल किंमतही (अ‍ॅबसॉल्यूट व्हॅल्यू) सतत वाढत राहिल. त्यामुळे १००% टक्क्याचे स्थान कधीच गाठले जाणार नाहीत, ते क्षितिजाप्रमाणे पुढेच जात राहील. किंबहूना १००% गाठण्याचा जोराचा प्रामाणिक प्रयत्न चालू असतानाही १००% टक्क्याचे स्थान सतत पुढे जात असल्याने ते न गाठले जाणे हेच प्रगतिशील सुजाण समाजाचे मुख्य लक्षण आहे.

त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही.
माझ्या बाबतीत ही असाच किस्सा झाला होता. आमच्या ऑफिस मध्ये एका मुलीला माझ्या बोलण्यावरून मी ब्राह्मण आहे असे वाटले पण ज्या वेळी तिला (असेच गप्पांमध्ये) माझी खरी जात कळली त्यावेळे पासुन तिचे माझ्या बरोबर बोलणे एकदम कमी झाले. तसेच दिवसभरात १०-१५ वेळा येणारे Whatsapp messages एकदम शून्यावर आले. असो, तसा पण आपल्याला काय फरक पडतो अश्या फालतू गोष्टींचा ?

जात म्हणजे जन्माने आलेली नव्हे तर संस्काराने आलेली. म्हणजे जात ही असतेच. एका विशिष्ट ब्राह्मण जातीचा कंजूस पणा व भारतातील एका विशिष्ट राज्यावरून असलेल्या जातीचा कंजूसपणा वेगळा. त्याची कारणेही वेगळी कारण जीवनदृष्टी संस्काराने निर्माण होते. ईदच्या दिवशी दहा हजाराचा बोकड कापला व गरीबाना वाटला. असे ऐकले तेंव्हा या वाक्याचा पहिला अर्ध ऐकून कसेसेच वाटले. कारण मी संस्काराने शाकाहारी आहे. सबब माझी एक त्या अर्थाने जात आहेच. दुसरा अर्ध ऐकून बरे वाटले कारण त्याही अर्थाने माझी एक जात आहेच.

'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??
या वाक्याशी सहमत नाही ...........!

हा फरक विचारसरणी चा आहे . मी स्वतः जन्माने ब्राह्मण असून अनेक देश पालथे घालूनही शुद्ध शाकाहारीच आहे , याचे कारण लहानपणी झालेले सन्स्कार. मला स्वतःला असे मुळीच वाटत नाही की नॉन-व्हेज न खाल्ल्याने मी कोणत्याही स्वरूपात मागासलेला आहे. याचे कारण जग कितीही बदलले आणि कितीही वैज्ञानिक प्रगती झाली तरी धर्माची काही स्थिर आणि काही चल तत्त्वे असतात . चल तत्त्वे कालानुरूप बदलतात ,जसे की १९ व्या शतकात चालू असलेल्या सतीप्रथा / विधवा केशवपन इत्यादि कुप्रथा आज बन्द झाल्या म्हणून धर्म बुडाला नाहीए . पण धर्माची स्थिर तत्त्वे असलेले व्यक्तिगत सन्स्कार ,जसे की चोरी करणे हे पाप आहे ,आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे पशुहत्या / जीवहत्या करून त्यावर उपजीविका करणे हे पाप असल्याचा सन्स्कार अन्तर्मनावर अतिशय प्रभावीपणे कोरला गेला असल्याने जर ब्राह्मण नॉन-व्हेज खात नसतील, तर याचा अर्थ ते मागासलेले आहेत ,असा होत नाही !

मी असं लिहीलंय.
शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??
पशुहत्या / जीवहत्या करून त्यावर उपजीविका करणे हे पाप असल्याचा सन्स्कार अन्तर्मनावर अतिशय प्रभावीपणे कोरला गेला असल्याने जर ब्राह्मण नॉन-व्हेज खात नसतील, तर याचा अर्थ ते मागासलेले आहेत ,असा होत नाही !
नाहीच होत. पण पशुहत्या / जीवहत्या करून त्यावर उपजीविका करणे हे पाप असल्याचा सन्स्कार ब्राह्मणेतर अन्तर्मनावर सुद्धा होऊ शकतो. माझ्या मावसभावावर झालाय(तो ब्राह्मण नाहीये). आणि फक्त 'मी ब्राह्मण आहे' या एवढ्याच कारणापोटी 'मी नॉनव्हेज खाणार नाही, कारण ब्राह्मणांत नॉन-व्हेज खात नाहीत', असं जर कोणी म्हणालं तर त्याला मी तरी मागासलेलाच म्हणेन.

जग कितीही बदलले आणि कितीही वैज्ञानिक प्रगती झाली तरी धर्माची काही स्थिर आणि काही चल तत्त्वे असतात . चल तत्त्वे कालानुरूप बदलतात ,जसे की १९ व्या शतकात चालू असलेल्या सतीप्रथा / विधवा केशवपन इत्यादि कुप्रथा आज बन्द झाल्या म्हणून धर्म बुडाला नाहीए . पण धर्माची स्थिर तत्त्वे असलेले व्यक्तिगत सन्स्कार ,जसे की चोरी करणे हे पाप आहे ,आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे सर्वं स्वं ब्राम्हणस्य इदं यत किंचिद जगती-गतम. श्रेष्ठ्येन अभिजनेन इदं सर्वं वै ब्राम्हण: अहर्ती. स्वम एव ब्राम्हण: भुड्क्ते स्वं वस्ते स्वं ददाति च. आनृशंस्याद ब्राम्हणस्य, भुज्ज्ते हि इतरे जना: ( मनुस्मृती १.१००-१०१) अनुवाद- या जगामध्ये जी काही संपत्ती असते, ती संपत्ती ब्राम्हणांची असते.श्रेस्ष्ठत्वामुळे आणि जन्माच्या उच्चतेमुळे या सर्वांसाठी ब्राम्हण योग्य असतो. ब्राम्हण स्वत:चेच खातो, स्वत:चेच नेसतो आणि स्वत:चेच देतो. ब्राम्हणाच्या दयेमुळे इतर लोक (त्यांनी स्वत: कमावलेल्या संपत्तीचा) उपभोग घेतात. विश्लेषण- जगातील सर्व च संपत्ती ही ब्राम्हणाचीच आहे त्यामुळे त्याने दुसर्याा एखाद्याची संपत्ती वापरली तर ती त्याने चोरी केली आहे असे होउच शकत नाही. तो दुसर्यातची अर्जीत केलेली संपत्ती वापरत असतो ती त्याचा जगावरील प्रत्येक संपत्ती वर त्याला जन्मजात श्रेष्ठत्वामुळे जो मालकी हक्क प्राप्त झाला आहे त्यामुळेच. म्हणुन ब्राम्हण दुसर्याकचे नव्हे तो स्वत:चेच खातो ,स्वत:चेच नेसतो आणि स्वत:चे देतो त्यामुळे ब्राम्हणाने कोणाची चोरी वगैरे केली असा प्रश्न च उपस्थित होत नाही. या उलट एखाद्या दुसर्याेने कष्ट करुन काही संपत्त्ती मिळविली आणि जर का तो तिला ब्राम्हणांची दया नसतांना परवानगी नसतांना वापरु बघत असेल तर ही त्या माणसाची चोरी मानली जाते. कारण मुळ मालक हा ब्राम्हण असता या माणसाने त्याच्या दये-परवानगी शिवाय अशी संपत्ती वापरणे ही चोरीच नव्हे का ? चोरी न करणे हे धर्माच्या एका महान अशा स्थिर तत्वांमध्ये येते. मनुस्मृती हे महान असे धर्माचे शास्त्र त्यावर महान असा स्थिर नियम घालुन देते.आणि स्थिर नियम कधीही बदलत नाहीत त्यावरच धर्म शतकानुशतके स्थिर टिकुन ही राहतो. बाकी मुर्ख लोक म्हणी बनवित राहतात उदा. एव्हरीथींग चेंजेस एक्सेप्ट द लॉ ऑफ़ चेंज. तरीही काही बिनडोक लोंक ब्राम्हणां च्या चोरी विरुध्द न्याय मागण्यासाठी एखाद्या राजा किंवा न्यायाधीशांकडे जातातच मग राजा किंवा न्यायाधीश ही कधीकधी अशा बिनडोक लोकांच्या नादी लागुन ब्राम्हणांविरुध्द निकाल देण्याची शक्यता निर्माण होउ शकते. आणि मग न्याय हे दुसरे महान असे स्थिर तत्व धोक्यात येउ शकते. कारण न्याय हा ही जगातल्या सर्वच धर्मांमधील एक महत्वाचं अस स्थिर तत्व आहे. मग काय करावे बरे ? चला तैत्तिरीय संहीता आली की हो न्याय करायला काय म्हणते बघु या यद ब्राम्हण: च अब्राम्हण:च प्रश्नम इयातां ब्राम्हणाय अधिब्रुयात. यद ब्राम्हणाय अधि-आह आत्मने अधि-आह. यद ब्राम्हणं परा-आह आत्मानं परा-आह. ( तैत्तिरीय संहीता २.५.११.९ ) अनुवाद- जर एखाद्या कडे एक ब्राम्हण आणि एक अब्राम्हण आपला प्रश्न (तक्रार) घेउन आला तर ,ब्राम्हणाच्या बाजुने निर्णय द्यावा. ब्राम्हणाच्या बाजुने बोलणे म्हणजे स्वत:च्या बाजुने बोलणे होय.ब्राम्हणाच्या विरोधात बोलणे म्हणजे स्वत:च्या विरोधात बोलणे होय. म्हणुन ब्राम्हणांच्या विरोधात बोलु नये. विश्लेषण- हे काय हो गडे आता विश्लेषण ही तुम्हीच करणार का तुम्ही कीनई फ़ार फ़ार पुर्वग्रह दुषीत आहात.,आम्हाला ना आमचे धुंडीराज बापट शास्त्रीजी जे आहेत ना त्यांनी स्वत: या श्लोकाच केलेल भाषांतरच हवे कारण त्यांच्या इतका या विषयावरील अधिकारी माणुस शोधुन सापडायचा नाही तुम्ही तेच द्या बर. अहो अस काय करता मी पण ब्राम्हण च आहे की , हो पण तुम्ही कीनई बिघडलेले नास्तिक आहात ठिक आहे त्यांच्याच शब्दात.. धुंडीराज बापट शास्त्रिंचे या श्लोकाचे विश्लेषण " ब्राम्हण व अब्राम्हण या दोहोंमध्ये " मी तु्झ्याहुन श्रेष्ठ आहे, मी तु्झ्याहुन श्रेष्ठ आहे, असा वाद जेव्हा उत्पन्न होईल आणि या वादाच्या निर्णयासाठी ते दोघेही एखाद्या तिर्हााइता कडे येउन प्रश्न विचारतील, तेव्हा निर्णय करणार्याश तिर्हासइताने ब्राम्हण श्रेष्ठ आहे असाच निर्णय द्यावा. म्हणजे त्याने स्वत:ला श्रेष्ठत्व मिळविल्यासारखे होते. ब्राम्हण हा पराभुत म्हणजे अब्राम्हणाहुन कमी योग्यतेचा आहे, असा निर्णय दिल्याने तो निर्णय देणार्याश तिर्हााइताने स्वत:चाच पराभव बोलुन दाखविल्याप्रमाणे होते. यास्तव ब्राम्हण हा अब्राम्हणापेक्षा कमी योग्यतेचा आहे असे कधीही बोलु नये. (कृष्ण यजुर्वेद-भाग १-तैत्तिरीय संहीता पृष्ठ क्रमांक-३३०-३३१ प्रकाशक:- चि.धुं बापट- कानपुर-१६- १९९४) समारोप- १-जगातील सर्व संपत्ती ही ब्राम्हणांचीच आहे कोणी दुसरा ब्राम्हणांच्या दये अथवा परवानगी शिवाय जर ती वापरत असेल आणि स्वत: कष्टाने कमविली म्हणुन माझीच असा गैरसमज करुन घेत असेल तर ही त्याने केलेली ब्राम्हणांच्या संपत्तीची चोरी च आहे आणि चोरी करणे हे पाप आहे आणि ते मागच्या शतकातही पाप होते आणि आजही पाप आहे. आणि हे धर्माचे स्थिर तत्व आहे. २ चल तत्वे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वेदना उदा सति या धर्माच्या चल तत्वा ने स्त्रियांना जळतांना होणार्या थोडयाफ़ार वेदना हे म्हणजे फ़ार च बिनमहत्वाच आणि किरकोळ आहे त्या तुलनेने स्थिर तत्वे ज्याने धर्म स्थिर राहतो ते फ़ार फ़ार महत्वाचे आहे. आणि केशवपन काय उकरुन काढता हो कीती कीती क्षुद्र विषय होता तो काय ते चल तत्व किरकोळ हे बघा आपण बालाजीला नाही बघत का मुली केशवपन करतात ते आणि त्याने उवा वगेरेंचा ही त्रास होत नाही शिवाय केशवपना ने स्त्रियांच्या सौंदर्यात ही वाढ च होते नाही का ? आणि बंद झाल हो ते सर्व आता तुम्ही सोडा बर ती चल तत्वे आता महान अशा स्थिर तत्वांवरच बुध्दी स्थिर करु या!

मारवा शेट हे नक्की काय लिहिले आहे ? तुमचा प्रतिसाद उपसाहात्मक असावा असे गृहीत धरले तर माझा पास. उपसाहात्मक नसेल तर
जगातील सर्व संपत्ती ही ब्राम्हणांचीच आहे
या समारोपातील तुमच्या वाक्यांनुसार एखाद्या बिल्डर किवा दुकानदाराकडे जाऊन आणि तुमचे हे तत्वज्ञान त्याला ऐकवून हिम्मत असेल तर त्याच्याकडून जास्त नाही पण फक्त १ लाख रुपये मिळवून दाखवा,त्या रकमेत तेवढीच रक्कम घालून आम्ही तुमचा अलका चौकात जाहीर सत्कार करण्यास तयार आहोत.

मारवा जी तुम्ही नक्की काय म्हणू पहात आहात ते ,कुणालाच नीटसे कळलेले नसावे . मी स्वतः मनुस्म्रुति मानत नाही ,याचे कारण जे जे काही सन्स्क्रुत मध्ये लिहिले आहे ,ते सगळे धर्मशास्त्र असे मानणारा मी नाही . वेद्काळ ,पुराणकाळ आणि इतिहासकाळ हे निराळे आहेत.विशेशतः पुराणकाळात धर्मग्रन्थात अनेक प्रक्षिप्त गोश्टी घुसडून दिल्या गेल्या आहेत. मनुस्म्रुति सुद्धा पुराणकाळात निर्माण झालेली असल्याने अनेक फालतू व तद्दन बाजारू टाकावू गोश्टी त्यात दिल्या आहेत , जसे की ''अतिथी देवो भव'' म्हणून अतिथी च्या मनोरन्जना साठी यजमानाने आपली स्त्री अतिथीस एक रात्रीपुरती द्यावी इत्यादी...... यास्तव मनुस्म्रुति सर्वथैव त्याज्य आहेच !

धर्माची कुठली तत्वे स्थिर आहेत? कुठली चल आहेत ? या संदर्भात आपण लिहीले आहे ना ? नेमके कुठल्या ग्रंथात सती हे चल तत्व आहे असे आलेले आहे ? हे चल आणि स्थिर हा भेद कुठुन आला ? की जी परंपरा पाळण मुश्कील झाल ती झाली चल जी अजुन धकविता येते ती स्थिर असे काही आहे का ? तुम्ही च म्हटलेल आहे ना चोरी न करणे हे धर्माचे स्थिर तत्व कालही होते आज ही आहे मग याच धर्माचा पवित्र ग्रंथ चोरी या संदर्भात जो पक्षपाती नियम करतो त्याचे काय ?

मूळ वैदिक धर्मात असे भेदाभेद नव्हते, तेच तर सान्गतो अहे ना .... हे जे पक्षपाती किम्वा भेदाभएद करणारे नियम नन्तर घुसडन्यात आले, त्यामुळे धर्मास ग्लानी आली . आजही धर्मात अनेक विक्रुत गोश्टी आहेत जशा की तन्त्र मार्गास धर्माचा एक भाग मानला जातो, परन्तु प्रत्यक्षात तसे नाही . वामाचारी /आसुरी तान्त्रिक मार्ग हा त्याज्ज्य आहे. परन्तु स्वार्थासाठी काही मण्डळी तन्त्राचा पुरस्कार करताना दिसतात . प्रत्यक्षात वामाचारी तान्त्रिकाना फाशीच दिली पाहिजे इतकी माणुसकीला काळिमा लावणारी क्रुत्ये ही मण्डळी करतात . यास्तव धर्माची स्थिर आणि चल तत्त्वे कोणती हे समजून घेण्यासाठी प्रथम धर्म म्हणजे काय ते समजुन घ्यवे लागेल .... तेवढा अभ्यास करण्याचि पात्रता ,कुवत आणि जिद्द असल्यास नक्की सर्व प्रश्नान्चि उत्तरे मिळतील.!

अहो हा पवित्र धर्मग्रंथाचा आदेश आहे याचे काटेकोर पालन झालेच पाहीजे तुम्ही टर उडवित आहात का ? मनुस्मृतीची पवित्र तैत्तीरीय संहीतेची? आणि जो पाळणार नाही त्या पाप्याला कुठली शिक्षा दिली जाईल याची कल्पना असुन ही ? तुम्ही फार धाडसी आहात हं

अहो हा पवित्र धर्मग्रंथाचा आदेश आहे याचे काटेकोर पालन झालेच पाहीजे तुम्ही टर उडवित आहात का ? मनुस्मृतीची पवित्र तैत्तीरीय संहीतेची? आणि जो पाळणार नाही त्या पाप्याला कुठली शिक्षा दिली जाईल याची कल्पना असुन ही ? तुम्ही फार धाडसी आहात हं
कशाला उगाच कॉमेडी करताय राव??

लेख आवडला. यात ब्राह्मण- ब्राह्मणेतर एलिमेंट आला की धाग्याचे शतक होईल. आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे हे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवायचे वाक्य आहे. आजचा सुधारक या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात लिहिणार्‍या लोकांची आडनावांवरुन जात काढून बघा येथे ब्राह्मणांचे प्राबल्य आहे असे आमच्या पुरोगामी मित्रांनी सिद्ध केले होते. आता काही आडनावे ही सर्व जातीत असतात त्यामुळे ती संभ्रमात टाकतात पण असे प्रमाण फार कमी. आपल्याकडे जात ही जन्मानुसारच ठरते वृत्तीनुसार नाही. समाजावर जातीचा पगडा मोठा आहे हे विसरुन चालणार नाही. जाती तील उच्चनीचता नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह केले पाहिजेत. अंनिस ने यासाठी मोहिम राबवलेली आहे. कारण जात हीच एक अंधश्रद्धा आहे अशी भुमिका अंनिसची आहे. असो.....

जात हीच एक अंधश्रद्धा आहे अशी भुमिका अंनिसची आहे. >>> मग जाति आधारित आरक्षणाला अंनिसचा विरोध आहे तर !!

आजचा सुधारक या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात लिहिणार्‍या लोकांची आडनावांवरुन जात काढून बघा येथे ब्राह्मणांचे प्राबल्य आहे >>>> मिपा वर ज्या तर्‍हेने नावासकट आडनाव घेतात त्यांच्याबाबतीत काय मत आहे पका काका ? {( म्हणाल की नाव सेम असल्याने आयडी मिळत नाही ....म्हणून आडनाव ही घेतले जाते ....मग मला काही उदा. कांबळे , डिसुजा , शेख (हा एक अपवाद सोडला तर ......), अडागळे, अशी नावे का दिसत नाही ....बाकी आडनावे मला मिपावर दिसतात ...त्यामध्ये टक्केवारी पाहिली तर .....करा अभ्यास ..बाकी विषय कट्ट्यावर घेवु यात ....ईथे लिहायचे म्हणजे बॅलन्स ची च लागायची .. कट्ट्याला .मिपाकराने तीन वेळा विचारून देखील आडनाव सांगायला ठामपणे नकार देणारा .... वाश्या

दिवाळी अंकाचे संपल्यावर संपादकांना नवे काहीतरी काम तयार करून ठेवायला नको का? ;) त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही. हां, यामुळे खरंतर वाईट वाटलं आहे.

खाण्याच्या सवयीपेक्षा वर्तणुकीतील आधुनिकता महत्त्वाची! तुमच्या मनातील विचार सिध्द करण्यासाठी आपल्याला न पटणाय्रा गोष्टी करून पुढारलेपण दाखवणे आवश्यक नाही. जसे नॉन व्हेज खाणारा माणूस त्याच्या जन्मापासून ते अन्न खात असतो तसेच व्हेज खाणाराही! व्हेज खाणारा प्रत्येक माणूस जात मानतो असा होत नाही. आपण ज्या कुटुंबात जन्माला येतो त्याचे संस्कार कळत नकळत आपल्यावर होत असतात. त्यातले आपल्याला पटतील ते आपण आत्मसात करावे न पटतील ते सोडून द्यावे.

ब्राह्मण असल्याचे तोटे कमी आणि फायदे कितीतरी जास्त आहेत. आमच्या कालिजातल्या तथाकथित उच्चवर्णीय समाजातल्या मुली ब्राह्मण आणि मराठा मुलांना सभ्य समजायच्या .माझ्याच एका मैत्रीणीने मला ब्राह्मण समजून 'ईतर' मुलांविषयी जे अगाध ज्ञान दाखवले ते बघून मी फक्त झीट यायचा बाकी राहीलो होतो. मुलांपेक्षा मुली जास्त जातीयवाद करतात या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. तूझी जात कोणती हा प्रश्न थेट न विचारता तू ब्राह्मण ना?, तू मराठा ना? असे वाकडे प्रश्न विचारायचे कसब मुलींकडे असते. मग एकदा उच्चवर्णीय आहे हे समजले की मग फ्रेंडशीपला उत येतो .असो ,राग येण्याऐवजी यांची किव येते.

मुलांपेक्षा मुली जास्त जातीयवाद करतात या निष्कर्षाप्रत मी आलो आहे.
लग्नाच्या बाजारात, मुलांपेक्षा, मुलींच्या जातीबाहेर लग्न करण्याच्या विचारांना घरच्यांचा विरोध जास्त सहन करावा लागतो. त्या समस्या टाळण्यासाठी मुली मुलांच्या जातीविषयी जास्त जागरूक असाव्यात.

'तू ब्राह्मण आहेस का?'
आठवड्यातुन तीन वेळा विचारला जाणारा प्रश्ण. "दातार तु कोकणस्थ ब्राम्हण ना?" आणि त्यावर "वाटत नाही तुझ्याकडे बघुन" असं उत्तर. :)...!! शिवाय त्यावर काही लोकांच्या "तुमच्या मुळे नॉन-व्हेज महाग झालयं अश्या प्रतिक्रिया" ;)..!! मग वाकड्या आणि तिखट को.ब्रा. जिभेनी उत्तर दिलं गेलं की "झाली कोब्र्याची फुसफुसायला सुरुवात" अशी चड्डी मित्रांची कॉमेंट... :).!! ह्या सगळ्या गोष्टींना मी हलकचं घेतो. आपलेचं मित्र आहेत आपल्या अडीनडीला तेचं कामाला येतात. खरी डोक्यात जाणारी लोकं म्हणजे "बी"ग्रेडी लोकं. दोन-तीन "बी"ग्रेड्यांना त्यांच्या आई-बहीणीची आठवण करुन दिल्यावर त्यांचं टोचुन बोलणं बंद झालं. ;) (को.ब्रा.)

मलाही "तू ब्राह्मण??? वाटत नाही" अशा प्रतिक्रिया एकदोनदा ऐकाव्या लागल्या आहेत. मजा वाटलेली तेव्हा, काही काळाकरिता तरी का होईना आपण मूलनिवासी आहोत या आनंदात अजून एक कोंबडी खाऊन मटण अजून महाग करावे अशी उबळ आली होती. बाकी या मटणाला शिक्षणाचे उत्तर परस्पर दिल्या गेलेलेही पाहिले आहे. ;) असो, बाकी ब्राह्मणांतसुद्धा एकूणच कोब्रांवर लोकांचा जास्त दात असतो असे दिसते. तुलनेने देशस्थ पोटजात ही मराठी आंजावर काय किंवा जण्रल चर्चेत काय, असून नसल्यासारखी आहे. त्यात देशस्थ गोरे घारे वैग्रे नसल्याने अजूनच ;) शिवाय गोरे घारेपणाबद्दल बोलताना लोकांचा संयम जो सुटतो तो पाहणे रोचक असते. सरळ सरळ सेक्शुअल फ्यांटसीज दाखवतात असेच वाटते त्यावरून =))

बाकी ब्राह्मणांतसुद्धा एकूणच कोब्रांवर लोकांचा जास्त दात असतो असे दिसते.
शिवाय गोरे घारेपणाबद्दल बोलताना लोकांचा संयम जो सुटतो तो पाहणे रोचक असते.
+ १०१
त्यात देशस्थ गोरे घारे वैग्रे नसल्याने अजूनच
बहुतेक सगळे दे.ब्रा. लोकं (त्यात निम्मे कुलकर्णी, इथ्ल्या कुलकर्ण्यांनी हलकं घ्या.) मल्लखांबाच्या रंगाचे आहेत. :D :D :D

अगदी अगदी. मी कुलकर्णी नसले आणि मल्लखाम्बाच्या रंगाची नसले तरी देशस्थ असल्याने माझ्या लग्नात लोक म्हणत होते की मुलीपेक्षा मुलगा रंगानं गोरा आहे. किंवा कोकणस्थांच्या संघात अष्टमीच्या पूजेला लोक माझ्याशी फारसं बोलायला येत नाहीत त्यावरून मी पक्की देशस्थ असल्याची खात्री पटली. तरी नवर्‍याच्या मावशीबाई म्हणाल्या की आपल्यात खपून जाईल. मग पैसाताईने पहिल्यांदा माझा फटू पाहिल्यावर "हो, आमच्यात खपून जाशील" असे म्हटले होते. ;)

कोब्रांच्या जीन्समध्ये काही भूमध्यसमुद्रीय कांपोनंट आहे हे तर संशोधनांती सिद्धच झालेले आहे.त्यात कोब्रा, देब्रा, मराठा आणि धनगर या चार जातींचा अ‍ॅनॅलिसिस केलेला आहे. पेपर लिंक. मुद्दा इतकाच, की भारताबाहेरच्या जीन्सचे अ‍ॅडमिक्श्चर असणे हे कोब्रांचे एकट्याचे वैशिष्ट्य नाही, उच्चजातीय म्हणवल्या जाणार्‍या कैक जातींची हीच कथा आहे, मराठा जातीतही बापाकडून मुलाकडे जाणारा जो जेनेटिक कांपोनंट आहे तो पश्चिम आशियातला आहे हे सिद्ध झालेले आहे.

हा हा हा. भारी विनोद आहे. असाच विनोदी प्रकार म्हणजे आमच्याकडचे काही नातेवाईक शेती करतात त्यावर कोणाचाही विश्वास नाही. पूर्वी जातीप्रमाणे व्यवसाय असतील पण अजूनही असेच मानावे म्हणजे कम्माल झाली बुवा!