डाव्या बाजूने हल्ला करण्याची संधी असताना उजवीकडे घोड्यांच्या डेवलपमेंटमधे वेळ घालवला त्याने सगळं बिनसलं. (कालही डावीकडे राजाचा कोट करण्याच्या नादात मॅग्नसचा उजवीकडचा हत्ती मोकळा सोडला नि त्याने घात केला) घोडे नैसर्गिकरित्या जिथे बाहेर येतात त्याहून ऑकवर्ड पोजिशनला नेण्याच्या नादात काही खेळ्या वाया गेल्या.
कारण घोडी जनरली बोर्डाच्या कडेला गेली की आता आणणे अवघड असतेच. त्यात अशी काँप्लिकेटेड पोझीशन असताना अधिकच अवघड. अनैसर्गिक खेळ्यांची किंमत त्याला मोजावी लागली!
याच खेळीवर सगळ गाडं घसरलंय असं दिसतंय. मागचा ए पट्टीतला हत्ती नाजूक असल्याने दुसरा हत्ती कायम शेवटच्या फळीत ठेवावा लागत असल्याने वजीर पुढे काढण्याने उंट-घोड्याच्या अदलाबदलीतून कमकुवत झालेल्या एफ-२ प्याद्याला बाहेर खेचले मॅग्नसने आणि अचानक आनंदला राजाची काळजी करणे भाग पडले.
झटपट ड्रॉ होणार आज असं दिसतंय. हत्ती एफ-१ केव्हाही निष्प्रभ करू शकतो मॅग्नस. ए पट्टीतल हत्ती केव्हाही उचलता येतोय त्याला. आनंदला दुसर्या हत्तीने बरोबरी करण्याखेरीज पर्याय नाही. त्याचा सगळा प्लान उधळतोय. आनंद डिसपॉईंट्स मी. :(
विश्वास बसत नाही!! एका उत्तम पोझीशनमधून डाव कसा घसरवत न्यावा याचे उत्तम उदाहरण म्हणावे का?
मला वाटते आनंद्ने फार प्रेशर घेतले आहे. त्याने मुक्त, नैसर्गिक खेळ केलान तरच सामना जिंकता येईल!!
सुरवातीला त्या घोड्यांच्या खेळ्यादेखील थोड्या वेळकाढू झाल्या असा माझा समज झालाय. घोड्यांसाठी योग्य जागा शोधण्यात काही खेळ्या खर्ची पडल्या नि तेवढ्यात मॅग्नसला त्याचा उंट सुरक्षित मागे नेता आला.
पण राजाच्या मदतीने प्यादे पार होईल नि आनंदला हत्तीचा बळी द्यावा लागेल. आनंदचा राजा एच पट्टीत दाबून धरल्याने आनंदला दुसरा काही पर्याय उरलेला नाही. आनंदचा पराभव नक्की झालाय. :(
रूक ए ४ मुळे घोळ झाला असं सुसान म्हणतेय. नवीन जगज्जेता मिळनार बहुतेक. बाकी सहा सामन्यात तीन विजय अशक्य वाटत आहेत. पोरग्याची तयारी जबरी आहे. किंग एफ ३ जबरदस्त मूव्ह होती. आनंद वाईट खेळलेला नाही पण प्रत्येक सामन्यात त्याने काहीतरी चूक केलीच आहे. मॅग्नसने मात्र दबावातही चूक केलेली नाही.
प्रतिक्रिया
मला वाटते इथे आनंदची कहीतरी गफलत झाली
मला वाटतं
हो असू शकेल
हम्म
मजा येतेय.
वॉव मॅग्नुसने घोडा मारल्यावर प्याद्याने उंट घेतला
ह्यॅ:
हो आता या पोझीशन मधून
आनंद असाच खेळणार असेल तर
आज तानियाला फार मिस करतोय!
डाव ड्रॉ होण्याकडे चाललाय
हुर्रे
अरे वा!
असा हत्ती खेळण्यापेक्षा
*******
दूरदर्शनवर
आनंद जी ४
कालू डी5
अरेरे काय झालं हे?
खरंय
उशीरा आलेय इथं - तोवर बोर्ड
आरं काय कंडिशन
:(
अरेरे...
हो कार्लसनचा
आनंद चक्क एक प्यादं मागं पडलाय!
हं! कालुचं कौतुक वाटतंय -
+१
आनंदला वेड लागले आहे का ?
मीच झोपेत आहे
हा हा हा
हा हा हा!
कालु आक्रमक मोडमध्ये आहे -
आनंद अजूनतरी
मला वाटतंय
वेळेचा
ओके
नक्कीच!
बायली
-२.९
चक्क पुन्हा आनंदकडे एक प्यादे जास्त झाले आहे!!
हम्म
ओक्के. मॅग्नुसला माघार घेऊन
:(
आनंदचा पराभव नक्की
हत्ती चालव
रूक ए ४ मुळे घोळ झाला असं
माताय प्यादे सातव्या घरात पोचले आहे!!
ऑस्सम
हो तो भयानकच आहे!!
Pagination