Welcome to misalpav.com
लेखक: गवि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आज प्रतिसाद द्यावासा वाटला. नाहीतर मन मोडुन गेल होत. एव्हढे प्रयास त्या आईचे अन अस व्हाव हे खरच खुप दुखवुन गेल. चला आता काहीतरी चांगल बघायला मिळेल.

A B C उंदरांचा सप्लाय काल सकाळपासून न दिसल्याने आणि काल रात्री माझ्या चाहुलीनेच पिल्लांनी "खायला द्या" चा आक्रोश सुरु केल्याने आणखी चिकन पीसेस घातले. गोद्रेज रियलगुड झिंदाबाद. कदाचित आईबापांचे उंदीरही चालू असतीलच, आणि ते येताच तातडीने गट्टम करुन पुन्हा सर्व साफसूफ.. पण पुरवठा कमी झालाय असं वाटतं खरं. उंदीर सापडत नसतील कदाचित..

पिल्लांनी काय भन्नाट पोझेस दिल्या आहेत! इतक्या लहान वयातही डोळे आणि त्याभोवतीची वैशिष्ठ्यपूर्ण महिरप आकार घेऊ लागलेली आहे. फारच छान. पिल्लं मोठी होताहेत हे बघून अतिशय आनंद झाला. गवि, तुम्ही त्यांचं पालकत्व अतिशय सक्षमपणे निभावत आहात त्यामुळे तुमचे कौतुक वाटते! :) (गगनविहारी नाव वेगळ्या अर्थाने सार्थ करताय! ;) )

फोटो अतिशय/एकदम उत्कृष्ठ आले आहेत. अगदी स्पर्धेत असतात तसेच. गवी, हे जपुन ठेवा... तुम्ही पिल्लांची काळजी छानच घेताय..

अखंड हाडासहित गिळतात. मग नंतर (या धाग्यावर अनेक फोटोंत दाखवल्याप्रमाणे) न पचलेला भाग तोंडावाटे पॅलेट्स ऊर्फ गोळ्यांच्या स्वरुपात तिथेच आसपास थुंकून / ओकून टाकतात. हे गोळे नंतर वाळतात आणि त्याचाच भुगा करुन पिल्लांसाठी मऊ मऊ जमीन तयार केली जाते. किळसवाणे.. आय नो.. पण त्यांची तीच पद्धत... :)

विष्ठेला पर्याय नाहीच.. :) पाणी मात्र मला वाटतं कोणताच पक्षी आपल्या घरट्यापर्यंत चोचीने आणून पाजू शकत नाही. गव्हाणी घुबड तरी वेगळं पाणी पीत नाही. अन्नातून (उंदरांमधून) जो पाण्याचा अंश मिळतो तोच.. मोठे होईपर्यंत तरी.. शिवाय या खाली दिलेल्या आणि अशाच अन्य दुव्यांवर असं वाचायला मिळतं की घुबडं तसंही पाणी पीतच नाहीत. अन्नातूनच मिळवतात. http://www.barnowltrust.org.uk/infopage.html?Id=295

गवि साहेब, एक शंका. शीतकटीबंधातील पक्ष्यांना पाणी लागत नाही परंतु उष्ण कटिबंधात पक्षी पाणी पितात आणि आपली पिसे पाण्यात भिजवून ती घरट्यात परत येतात त्या भिजलेल्या पंखातून पिलांना पुरेसे पाणी मिळते. शिवाय जे पक्षी मांस भक्षक असतात त्यांना आपली पिसे आणि पंख स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याची गरज पडतेच कारण भक्षाचे रक्त हे जीवाणूसाठी अत्यंत उत्तम अन्न आहे त्यामुळे गरुड गिधाडे (किंवा घुबडे) हे शिकारी आणि खाण्यानंतर आपली पिसे आणि पंख अतिशय निगुतीने साफ करतात. आपली घुबडे असे काही रात्री करत असावीत काय? दुसरे -- पक्षी वर्गात मुत्र द्वार (URETHRA) गुद द्वार (anus)आणि योनी (vagina) हि तिन्ही अंगे एकाच पिशवीत(CLOACA) उघडतात.पक्षी अंडी सुद्धा त्याच अवयवातून(cloaca-अवस्कर) देतात.(त्यामुळे कोंबडीच्या अंड्याला कधी कधी काळसर विष्ठा लागलेली आढळते.) त्यामुळे पक्ष्याची विष्ठा आणि मूत्र हे एकत्र अर्धद्रव (semiliquid) परिस्थितीत दिसते. जेंव्हा पक्ष्याच्या शरीरात पाणी कमी होते तेंव्हा हि विष्ठा जास्त घन होत जाते. आपल्या घुबडाना पाणी एखाद्या वाटीत ठेवण्याची व्यवस्था करता येईल काय? जेणेकरून त्यांना पाणी लागते कि नाही हे पण कळू शकेल. अर्थात हि एक सूचना आहे. जर यात कोणताही उपमर्द वाटत असेल तर खुशाल कचर्याच्या पेटीत टाकावी.आपण घेत असलेल्या काळजीबद्दल कोणतीही शंका नाही.

ही घुबडे (आधी हजर असताना घुबडाई आणि आता पिल्लेदेखील) सतत ही साफसफाई करत असतात. स्वतःच्या पिसांची अत्यंत निगुतीने स्वच्छता ठेवली जाते. आजुबाजूच्या स्वच्छतेची बोंबच दिसतेय पण. असो. पाण्याचा मुद्दा रास्त आहे. पाणी भरुन ठेवायला हरकत नाही. पण पिल्लं अजिबात डिस्ट्रेस्ड किंवा डी हायड्रेटेड अशी वाटत नाहीयेत. ताजीतवानी आणि उत्साही आहेत. घरट्याची जागा उन्हापासून पूर्ण सुरक्षित आहे. सध्या हवाही थंड आहे. पाण्याचा अभाव असता तर पिल्लं मलूल तर नक्कीच दिसली असती. शिवाय भरभर वाढतही आहेत. अशा वेळी पाण्याची वाटी किंवा भांडे ठेवण्याचे इन्टरव्हेन्शन नको वाटते. न जाणो ते पाणी ठेवून दूषित झाले / संसर्गित झाले आणि त्यातून नसलेले काहीतरी उद्भवले तर? शिवाय त्यांच्या खालची जमीन ही त्यांच्या पेलेट्स, विष्ठा आणि अन्य घाणीने भरलेली आहे. ती सर्व घाण सुकलेली कोरडी आहे. पेलेट्सच कुटून भुगा करुन ते मऊ जमीन बनवतात. भांडे पलटले आणि जर जमीन ओली झाली तर तिथे ओला चिखल होईल आणि तो लगेच कुजल्याने जास्त अपायकारक ठरेल. आणखी एक उपमुद्दा असा की ही जागा बरीच खोलात आहे. तिथे हात पोचण्याची शक्यताच नाही. मधे ग्रिल्स आहेत. ती कापावी म्हटले तर भयंकर आवाज होईल. त्यामुळे पाण्याचे पात्र खाली पक्ष्यांपर्यंत उतरवणे आणि ते पुन्हा भरणे अत्यंत अवघड आहे. केवळ वेबकॅम आणि त्याच्या वेगवेगळ्या रचना (सध्या स्पेशल वेबकॅम स्टिक बनवली आहे) यांमुळे ही दृश्ये दिसताहेत. उंदीर वगैरेंच्या शरीरातून यांच्या पोटात पुरेसं पाणी जात असणार असंच वाटतं. तरीही डिस्ट्रेस वाटला तर पाणी पोहोचवण्याची सोय करता येईल..

गवि साहेब आगाऊपणा बद्दल माफ करा. तिथली प्रत्यक्ष परिस्थिती न पाहता फुकटचा सल्ला दिल्याबद्दल. क्षमस्व

हा व्हिडीओ नेटाने शेवटपर्यंत पाहिलात तर सुरुवातीला पिलांच्या हालचाली, विशेषतः मोठ्या पिल्लाचं माणसाप्रमाणे पूर्ण उभं राहणं, यात खूप गंमत वाटेल, पण तसेच टिकून राहिलात तर साडेतीन मिनिटे ते चार मिनिटे या इंटर्वलमधे एकदा आणि सुमार सव्वाचार मिनिटे या जागी दुसर्‍यांदा, असा तो अत्यंत खास शत्रूला घाबरवण्यासाठी घेतलेला पवित्रा -अंग दबकून फुलवणे- दिसेल. (अद्याप पंख नसल्याने तो अविर्भाव लिंबूटिंबू दिसतो..) पण.. त्यासोबत येणारा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सापासारखा दीर्घ फूत्कार (स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्शशश..) हा खरोखर दचकवणारा असतो..कुकरची शिट्टी जितकी तीव्र असते तितका तीव्र ऐकू येतो जवळ असताना. या व्हिडीओत त्या अविर्भावासोबत तोही ऐकायला मिळेल.

कसली गोड आहेत पिल्ल! मस्तच! वाकुन कशी पाहताहेत ना? माझा पक्षीपण माझ्याकडे असाच निरखुन पहातो, डोक आडव करुन. एकूण तुम्ही पाहताय म्हणुन मिसेस घुत्कारे निवांत आहेत वाटतात.

अरे व्वा! मस्त पोज आहे. घाबरलेली दिसत असली तरी 'सांभाळून असा, कुठल्याही क्षणी आक्रमक होऊ' हा संदेश सक्षमतेने देत आहेत. गवि, जवळच्या शाळेत केजी १ साठी दोन सीट्स बुक करून ठेवा.

मानवी भावनांची तुलना ह्यांच्याशी करायची झाली; तर फोटोमधून एक निस्सिम निरागसता प्रतीत होते. ही चिमुरडी त्यांच्या चिमखड्या भाषेत " आमाला खेलायला गार्डनला नेनाल का" असं चटकन् विचारतील असं वाटतं. . सम्यक निसर्ग ही भंकस असेलही. त्यात टोकाच्या आणि हिण्कस क्रौर्याचे दर्शनही होते.(अर्थात क्रौर्य ही पुन्हा मानवी भावनाच."जाणिवेत"ल्या जीवांसाठी) पण ही जी like begets like वाली साखळी आहे ना, ती अतिशय लोभस आहे. निसर्गाची ती लोभस बाजू.( आता साला "लोभस" ही पण मानवी भावना.) कठीण आहे.

निरागस पिल्लं बघताना लहानपणी टीव्हीवर बघितलेल्या रामायणातील जटायूची आठवण झाली!

हा सर्व 'आंखो देखा हाल' पाहिल्यानंतर यानंतर कधीच घुबड या पक्षाविषयी कुणाला घृणा किंवा भीती वाटणं कठीण आहे, Procreate, Protect, Provide ही मानवाची तीन मूलभूत कार्ये/ कर्तव्ये असतील तर निसर्गातील इतर जीवही हेच सर्व किती इमानेइतबारे करतात याचीच गविंच्या लेखमालेने पुन्हा एकदा जाणीव झाली.

पालकत्व मूळ पालकांकडेच आहे. मी फक्त अधूनमधून नजर टाकतो इतकंच.. मी फक्त तुम्हा सर्वांना काही घडामोडी सांगतो. यापलीकडे पालकत्व म्हणावं असं काहीही माझ्या हातून खास झालेलंच नाहीये अद्याप.

म्हणजे उडायचे धडे मिळतील अस वाटतय. निदान हे दोन जीव तरी जगावेत अशी देवाला प्रार्थना.

नवीन व्हिडियो फोटोंची फार वाट पाहत आहोत... जमेल तसे टाका ना प्लिज...

मोठं पिल्लू आता खरोखर खूप मोठं झालं आहे. आजच्या या फोटोंमधे ते खाली बसून असल्याने उंची लक्षात येत नाहीये, पण आज सकाळी बघायला गेल्यावर ते उठून उभं राहिलं तेव्हा मला बर्‍याच दिवसांनी घुबडाईच येऊन बसली आहे असा भास झाला इतकं ते मोठं (उंचीला) झालं आहे. त्याच्या पंखांमधे वाढत्या प्रमाणात अ‍ॅडल्ट घुबडाच्या रंगाची पिसं उगवली आहेत. फोटोंमधे खास हॅपनिंग काही नाही कारण ती पिल्लांची झोपण्याची वेळ आहे. आळसटलेली आहेत. आजची खास बात म्हणजे संरक्षणार्थ कुकरशिट्टी वाजवणे, ख्याव ख्युव आवाज आणि पवित्रे घेणे ही सर्व कामं आता छोट्या पिल्लाने उत्साहाने स्वतःकडे घेतली आहेत. मोठे पिल्लू आसपास चाहूल लागली तरी फारसे काळजी करत नाही. बडा जो हो गया हूं.. असं असावं.. :) A बाजूला जमिनीवर मातृपितृकृपेने भक्ष्य येऊन पडलेलं दिसतंय. अर्धा स्वाहाकार झालेलाही दिसतोय. B सकाळच्या वेळी रोज झोप काढतात.. अर्थात सावध झोपच.. C

छान धागा! पण घुबडाची पिलं जगली म्हणून आनंद व्यक्त करू की मनुष्येतर प्राण्यांचा अवघड होत चाललेला जीवनसंघर्ष पाहून हळहळ व्यक्त करू ते कळत नाहीय.

काल मिपा डाऊन असल्याने अपडेट लिहीता आला नाही. कालचा अपडेट आजः A वाढता वाढता वाढे. लवकरच उडण्याचे पहिले धडे घेण्यासाठी मोठे पिल्लू तयार होईल असं दिसतंय. पाचव्या मजल्यावर वळचणीच्या जागेत उडायला कसं शिकवणार हा प्रश्नच आहे म्हणा..प्रॅक्टिसच्या काळात नाही जमलं तर थेट जमिनीवर गच्छंती..एरवी पिल्लू असं खाली पडलं तरी घुबड आईबाप त्याला तिथेच अन्न देतात, आणि एखादा मजला उंचीइतक्या गव्हाणीत परत यायला मदत करतात. पण पाच मजल्यांच्या उंचीवर ही सिस्टीम कशी चालेल माहीत नाही. पण त्यांनी घर करण्यापूर्वीच हा विचार केला असेल असं म्हणू.. बाकी घरट्यात गुटख्याचे पाकीट दिसत असल्याने यांचे पिताश्री येतजात असावेत असं दिसतंय.. ;)

हे चित्र नंबर वन ! मी किती उंच झालोय हे अभिमानाने दाखवताना दिसतोय ! पण डोळे मिटालेले आहेत, उभ्या उभ्या डुलक्या चालल्या आहेत की काय? :) बाकी घरट्यात गुटख्याचे पाकीट दिसत असल्याने यांचे पिताश्री येतजात असावेत असं दिसतंय... +D