Welcome to misalpav.com
लेखक: जॅक डनियल्स | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

धन्यवाद् ! हा खूप मोठा गैरसमज आहे. धामण हा साप सरपटणारा साप असल्यामुळे त्याचे टायर होत नाही. फक्त तो खूप बुंगाट सरपटतो.

पाचवी - सहावीत असताना एका शेतातून सायकल घेऊन जात असताना या बाई अडकल्या होत्या टायरमध्ये . . कशी काय माहित . गुडघ्यापर्यंत गवत होतं. एकदम सायकल जड वाटायला लागली . थोडं गवत बाजूला करून बघितलं तर हे चाकात . "नागोबा नागोबा" बोंबलत पळालो होतो तिथून . :P तासभर तरी थरथरत होतो भीतीने . :D नंतर कोणी तरी सायकल आणून दिलीन घरी . सगळ्या तारा तुटल्या होत्या . पण . दुर्दैवाने त्या लोकांनी सापाला पण मारलं होतं नाग समजून :-/ :( लेख नेहमी प्रमाणेच जबरा . पुढचा भाग लवकर येउदे :)

:)) :)) काय काय विचार करतात लोक तरी! नुसती कल्पना करुनच पाणी आल डोळ्यात हसुन हसुन.

अप्रतिम माहिती. त्यातही सगळ्याला खास विनोदाची फोडणी! अगदी वाटच पाहत असतो जॅक डनियल्स च्या लेखनाची.
इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. मी तिला शांतपणे पोत्यात घातली आणि (पाणी पुरी खाण्यासाठी )घरचा रस्ता पकडला.
कसले जबरी दृष्य डोळ्यासमोर उभे राहीले... :)

पब्लिक मध्ये बिनविषारी साप चावला तरी खूप जास्त अंधश्रध्दा पसरते याची मला जाणीव होती.
किंवा
शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला.
कसले जबरी डोके आहे... मानले!

धामण आणि नाग ह्यातील फरक चटकन न ओळखता आल्याने बर्‍याच धामनी जिवाला मुकत असतील. ५-६ फुटी पिवळी धम्मक धामण शेताच्या बांधावरुन जाताना पाहिली आहे. सुंदर दिसते (दुरुनच) :)

अस काही वळ्वळणार भयंकर समोर आल तर ते विषारी आहे की बिनविषारी हे समजेपर्यंत मला घेरी आलेली असेल ;) असो लेख अन माहीती नेहमीप्रमाणे कडक :)

दुर्दैवाने नाग आणी धामण यातील फरक लांबून सहज ओळखता येत नाही आणी धामण हि नागाची बायको असते अशा तर्हेच्या गैरसमजुती असल्यामुळे धामणींची सर्रास कत्तल होते. खरा तर धामण हि शेतकऱ्याची खरी मित्र आहे कारण तिचे मुख्य भक्ष्य उंदीर हे आहे आणी इतर साप जी गोष्ट विषाने साधतात ते विष नसल्यामुळे धामण हि उंदरांना आपल्या चपळतेने पकडते. नागासारखी दिसणारी आणी अत्यंत चपळ असल्याने तिच्याबद्दल अजूनच गैरसमज पसरलेले आहेत. अन्यथा या खर्या शेतकऱ्यांच्या मित्राची इतकी कत्तल झाली नसती. आमच्या स्वतःच्या घरात मुंबईत (१ ९७४ ) धामण शिरली होती पण ती ओळखणे शक्य नव्हते आणी त्यावेळेस असे सर्पमित्र उपलब्ध नव्हते त्यामुळे प्रथम तिला मारण्यात आले आणी नंतर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काही करता आले नाही.

मस्त.. धामण आणि घुबड इतके उंदीर खातात, की त्यांना त्यासाठी राष्ट्रीय संरक्षकाचा दर्जा दिला पाहिजे

जॅडॅ, तुमचं लेखन म्हणजे भन्नाटच असतं. माहितीने भरपूर असूनही किंचितही थांबू न देता, वाक्यावाक्याला कोपरखळ्या मारत, चिमटे घेत लेख धामणीसारखाच सळसळत कधी संपला ते समजलंच नाही!! जियो!!! :)

@सळसळत कधी संपला ते समजलंच नाही!! जियो!!! >>>++++++++++११११११११११११११११११ ============================================================== @एक वेळ कोंबडी पकडणे सोपे, कारण तिच्या वर उडी मारली तर पिसे तरी हातात येतात.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF @ घुशींची बिळे म्हणजे "बायकांचे मन", इथे थांगपत्ता या शब्दाला अर्थच नाही>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif @शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला. ट्यूब पेटली- खोलीतली थंड जागा म्हणजे “मोरी”, घर मालकाची परवानगी घेऊन नवीन मोरी खोदली. २ फुट बाय २ फुट फरशी खाली, ८ फुटी धामण वेटोळे मारून बसली होती. शेवटी ५ वाजता धामणीला पोत्यात घातल्यावर त्या घरमालकाने माझ्या पायावर लोळण घेतली, घर मालकीण रडायला लागली...."कुठल्या देवाने सांगावा धाडला तुला ? पांग फेडलस पोरा, काळूबाई तुझे भले करो !" अश्याच अनेक वाक्यांनी पिच्चर शेवट गोड झाला. >>> __/\__ जे.डी...तुमच्या कामातल्या आत्मीयतेला आणी जिगरबाजीला सल्लाम! __/\__ :)

उत्तम लिखाण.. माहिती पोचवण्याची शैली आकर्षक. त्यामुळे नुसतेच पुस्तकी अ.ब.क. मुद्दे न राहता वाचण्याची इच्छा जागती राहते. लगे रहो. धामणीशी बराच परिचय आहे. नेहमी आसपास दिसणारा साप असला तरी सांगलीत मात्र अगदी घराच्या खाली असलेल्या (सिमेंटचा ढाचा आणि खालची भुसभुशीत शेतजमीन यांच्या)सापटीत कायमची वसतीला असलेली धामण नेहमी पाहिली आहे. ती कधीच घरात येत नसल्याने आणि तसा अपाय काही न दिसल्याने दुर्लक्ष करीत असे. पाळीव कुत्रा आणि धामण यांचा नेहमी पाठलाग आणि खुन्नस चालायची पण कुत्र्याला चाहूल लागून तो पळत येईस्तोवर धामण सापटीत पसार झालेली असायची, उर्वरित शेपूट बाहेर वळवळताना दिसले तरी कुत्रा चडफडत भुंकत राही.

हा पाळीव वरून आठवलं. आमची आजी कोकणातल्या घरात फार पूर्वीपासून २ घणसं आहेत असे म्हणायची. पण तिची अंधश्रद्धा अशी की त्या आपल्या घरातल्या कोणाला चावत नाहीत. तरीपण ती रात्री कधी विजेरी घेतल्याशिवाय बाहेर जात नसे. आम्ही आमच्या परसांत, लाकडांच्या ढिगार्‍यांत, झाडांवर, पातेर्‍याच्या ढिगात अनवाणी खेळलो पण कधीही सापाचे दर्शन देखील झाले नाही. आजीच्या मते घणसं जोडीनी राहतात. पण आमच्या परसात काम करणार्‍या एका बाईला चावलं होतं घणस पण ते लगेच लक्षात आले म्हणून लागलीच खारेपाटणात नेऊन तिच्यावर उपचार होऊ शकले आणि ती वाचली. त्यानंतर ती बाई आमच्या घरी केवळ सारवलेल्या जमिनीवरच चालत असे. अलिकडे आमच्या वडीलांनी घराच्या आजूबाजूची जमिन साफ करून नवीन कलमं, सागवान लावण्यासाठी सगळी जमिन बेणायचे (झाडे-झुडूपे, गवत काढून जमिन स्वच्छ ज्क्करण्याचे कॉन्ट्रॅक्ट गावातल्या एकाला दिले होते. त्याला मात्र आंब्याखालचे गवत साफ करताना एक घणस मिळाले आणि त्याच्या लोकांनी ते लागलीच मारले. आजीला कळल्यावर आजी म्हणली मला काही त्रास नव्हता त्याचा पण त्याची लोकं कामाला वावरतील तर त्यांना भिती नको म्हणून मारली अस्तील, ठीक आहे. पण म्हटली १ मिळालीये तर दुसरी पण मिळेल. त्याप्रमाणे दुसरी पण पुढील दारच्या परसवा शेजारची आंब्याची खळ साफ करताना मिळाली. ती ही मारण्यात आली. मग आम्ही आजीला चिडवत असू, आजीने पाळलेले दोन घणस मारले म्हणून.

काय वेग असतो या धामणीचा! एकदा सायंकाळच्या उन्हात ही सळसळणारी धामण परड्यात पाहीली होती. कसली वेगात जात होती, की घाबरायच सुद्धा विसरल माझं. नुसतीच अवाक होउन पहात राहीले.तिच्या त्या प्रचंड वेगाने ती जणु तरंगत निघालीय असा भास होत होता त्या सोनेरी किरणात. बाकी धामण नागाची बायको? अगागा!

इतर लेखांप्रमाणेच खुसखुशीत लेख. बादवे, कधी विषारी साप बिनविषारी सापांना चावल्याचे ऐकीवात आहे का? जसे की नाग धामणीला चावला वगैरे..

किंग कोब्रा नुसता चावत नाही, तर खातो सुद्धा ! तू नळी वर बघा !

हो, किंग कोब्रा चे स्टेपल फूड म्हणजे धामण आहे. मण्यारपण छोट्या धामणी खाते, किंग तर ७-८ फुटी धामण एकवेळेला आरामात पचवू शकतो.

खूप आवडला हा भाग सुध्दा(सध्या एवढंच म्हणतो, दर वेळेला तेच तेच काय म्हणायचं; )) बाकी ठाणेकर, तुम्हाला एक व्यनि पाठवला होता. उत्तराची वाट पाहतोय.

तुमची माहिती सांगण्याची हातोटी विलक्षण आहे ! उपमा-उत्प्रेक्षांचा खुसखुशीत शैलितला उपयोग खास आवडला.

एक सर्पमित्र आहेत आमच्या सोसायटीत..त्यांच्या हातात परवाच धामण बघितली (लांबुनच) तोंड डोक्याच्यावर (त्यांच्या) आणि शेपुट जमिनीवर (धामणीची) म्ह्णजे ७ फूट तरी लांब असेल

बिनविषारी साप असल्यामुळे नुसत्या हाताने पकडायचा बिनविषारी साप चावल्यामुळे अजिबातच काही होत नाही का? माझ्या महिती प्रमाणे बिनविषारी सापांच्या दातांमध्ये त्यांनी खाल्लेल्या भक्श्याचे कण साठुन रहातात. हे सडलेले कण चावता वेळी माणसाच्या शरीरात जाउन प्रसंगी जीवावर बेततात. प्रकाश टाकावा...

हे सडलेले कण चावता वेळी माणसाच्या शरीरात जाउन प्रसंगी जीवावर बेततात.
असे असेल तर एखादया रात्री ब्रश न करता झोपलेल्या बिनविषारी माणूसाने सकाळी उठल्यावर (ब्रश करण्याआधी) कोणाला चावले तर? :)

काही नाजूक लोकांना इन्फेक्शन झालेले मला माहित आहे. पण त्यांना ताप येतो, तो भीतीने येतो का इन्फेक्शन ने मला अजून पूर्ण माहित नाही. पहिली गोष्ट, साप चावून भक्ष्य खात नाही (तो गिळतो !), त्यामुळे आपल्या दातात जसे बडी शेप अडकते तसे काही अडकत नाही. अजगरासारखा मोठं साप चावला तर जास्त रक्त जाऊन चक्कर येऊ शकते.

>> त्यामुळे आपल्या दातात जसे बडी शेप अडकते तसे काही अडकत नाही. -- =)) उपमा द्यायच्या बाबतीत पु.लं. चा वारसा चालवणारा तुच एक दिसला आजवर.

>> सापांच्या दातांमध्ये त्यांनी खाल्लेल्या भक्श्याचे कण साठुन रहातात. तशी शक्यता कमी आहे, कारण साप भक्ष्य आपल्याला लहापणी शिकवतात तसं बत्तीस वेळा वैगरे चावून खात नाहीत. ते सरळ गिळतात, असा आत्तापर्यंतचा तरी माझा समज आहे. चूक बरोबर जेडिभौ सांगतीलच!!

तो शिंचा रोज दात जरी घासत असला तरी वट्टात कोणीही अगदी सुंदरशी परीदेखील चावणे म्हणजे दुखणार आणि ठसठसणारच की रे ... (उदाहरण चुकले काय रे ?)

>>सुंदरशी परीदेखील चावणे म्हणजे दुखणार आणि ठसठसणारच की रे ... साप चावल्याचा अनुभव नसला तरी लोकांच्या सांगण्यावरुन, वाचनातून कळतं हो. आता परी चावलेलं कोणी माहितीत नाही, स्वानुभव तर नाहीच नाही. आता सापडलीच एखादी आणि चावलीच तर सांगतो. ;) स्वगतः चला, आता एक चावरी परी शोधणे आले. ;)

नाग आणि धामण यातला फरक पटकन ओळखता येईल असे काही फरक सांगाल का? फणा काढणे आणि न काढणे हा एक फरक आहे का? मी पकडायला जाणार नाहीच पण जमल तर एखादा मुका जीव मरण्यापासुन तरी वाचवू शकेन :)