पाचवी - सहावीत असताना एका शेतातून सायकल घेऊन जात असताना या बाई अडकल्या होत्या टायरमध्ये . . कशी काय माहित . गुडघ्यापर्यंत गवत होतं. एकदम सायकल जड वाटायला लागली . थोडं गवत बाजूला करून बघितलं तर हे चाकात . "नागोबा नागोबा" बोंबलत पळालो होतो तिथून . :P
तासभर तरी थरथरत होतो भीतीने . :D
नंतर कोणी तरी सायकल आणून दिलीन घरी .
सगळ्या तारा तुटल्या होत्या .
पण . दुर्दैवाने त्या लोकांनी सापाला पण मारलं होतं नाग समजून :-/ :(
लेख नेहमी प्रमाणेच जबरा .
पुढचा भाग लवकर येउदे :)
अप्रतिम माहिती. त्यातही सगळ्याला खास विनोदाची फोडणी!
अगदी वाटच पाहत असतो जॅक डनियल्स च्या लेखनाची.
इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. मी तिला शांतपणे पोत्यात घातली आणि (पाणी पुरी खाण्यासाठी )घरचा रस्ता पकडला.
धामण आणि नाग ह्यातील फरक चटकन न ओळखता आल्याने बर्याच धामनी जिवाला मुकत असतील.
५-६ फुटी पिवळी धम्मक धामण शेताच्या बांधावरुन जाताना पाहिली आहे.
सुंदर दिसते (दुरुनच) :)
दुर्दैवाने नाग आणी धामण यातील फरक लांबून सहज ओळखता येत नाही आणी धामण हि नागाची बायको असते अशा तर्हेच्या गैरसमजुती असल्यामुळे धामणींची सर्रास कत्तल होते. खरा तर धामण हि शेतकऱ्याची खरी मित्र आहे कारण तिचे मुख्य भक्ष्य उंदीर हे आहे आणी इतर साप जी गोष्ट विषाने साधतात ते विष नसल्यामुळे धामण हि उंदरांना आपल्या चपळतेने पकडते. नागासारखी दिसणारी आणी अत्यंत चपळ असल्याने तिच्याबद्दल अजूनच गैरसमज पसरलेले आहेत. अन्यथा या खर्या शेतकऱ्यांच्या मित्राची इतकी कत्तल झाली नसती. आमच्या स्वतःच्या घरात मुंबईत (१ ९७४ ) धामण शिरली होती पण ती ओळखणे शक्य नव्हते आणी त्यावेळेस असे सर्पमित्र उपलब्ध नव्हते त्यामुळे प्रथम तिला मारण्यात आले आणी नंतर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काही करता आले नाही.
जॅडॅ, तुमचं लेखन म्हणजे भन्नाटच असतं. माहितीने भरपूर असूनही किंचितही थांबू न देता, वाक्यावाक्याला कोपरखळ्या मारत, चिमटे घेत लेख धामणीसारखाच सळसळत कधी संपला ते समजलंच नाही!! जियो!!! :)
@सळसळत कधी संपला ते समजलंच नाही!! जियो!!! >>>++++++++++११११११११११११११११११
==============================================================
@एक वेळ कोंबडी पकडणे सोपे, कारण तिच्या वर उडी मारली तर पिसे तरी हातात येतात.>>>
@ घुशींची बिळे म्हणजे "बायकांचे मन", इथे थांगपत्ता या शब्दाला अर्थच नाही>>>
@शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला. ट्यूब पेटली- खोलीतली थंड जागा म्हणजे “मोरी”, घर मालकाची परवानगी घेऊन नवीन मोरी खोदली. २ फुट बाय २ फुट फरशी खाली, ८ फुटी धामण वेटोळे मारून बसली होती. शेवटी ५ वाजता धामणीला पोत्यात घातल्यावर त्या घरमालकाने माझ्या पायावर लोळण घेतली, घर मालकीण रडायला लागली...."कुठल्या देवाने सांगावा धाडला तुला ? पांग फेडलस पोरा, काळूबाई तुझे भले करो !" अश्याच अनेक वाक्यांनी पिच्चर शेवट गोड झाला. >>> __/\__ जे.डी...तुमच्या कामातल्या आत्मीयतेला आणी जिगरबाजीला सल्लाम! __/\__ :)
उत्तम लिखाण.. माहिती पोचवण्याची शैली आकर्षक. त्यामुळे नुसतेच पुस्तकी अ.ब.क. मुद्दे न राहता वाचण्याची इच्छा जागती राहते. लगे रहो.
धामणीशी बराच परिचय आहे. नेहमी आसपास दिसणारा साप असला तरी सांगलीत मात्र अगदी घराच्या खाली असलेल्या (सिमेंटचा ढाचा आणि खालची भुसभुशीत शेतजमीन यांच्या)सापटीत कायमची वसतीला असलेली धामण नेहमी पाहिली आहे. ती कधीच घरात येत नसल्याने आणि तसा अपाय काही न दिसल्याने दुर्लक्ष करीत असे.
पाळीव कुत्रा आणि धामण यांचा नेहमी पाठलाग आणि खुन्नस चालायची पण कुत्र्याला चाहूल लागून तो पळत येईस्तोवर धामण सापटीत पसार झालेली असायची, उर्वरित शेपूट बाहेर वळवळताना दिसले तरी कुत्रा चडफडत भुंकत राही.
हा पाळीव वरून आठवलं. आमची आजी कोकणातल्या घरात फार पूर्वीपासून २ घणसं आहेत असे म्हणायची. पण तिची अंधश्रद्धा अशी की त्या आपल्या घरातल्या कोणाला चावत नाहीत. तरीपण ती रात्री कधी विजेरी घेतल्याशिवाय बाहेर जात नसे. आम्ही आमच्या परसांत, लाकडांच्या ढिगार्यांत, झाडांवर, पातेर्याच्या ढिगात अनवाणी खेळलो पण कधीही सापाचे दर्शन देखील झाले नाही. आजीच्या मते घणसं जोडीनी राहतात. पण आमच्या परसात काम करणार्या एका बाईला चावलं होतं घणस पण ते लगेच लक्षात आले म्हणून लागलीच खारेपाटणात नेऊन तिच्यावर उपचार होऊ शकले आणि ती वाचली. त्यानंतर ती बाई आमच्या घरी केवळ सारवलेल्या जमिनीवरच चालत असे. अलिकडे आमच्या वडीलांनी घराच्या आजूबाजूची जमिन साफ करून नवीन कलमं, सागवान लावण्यासाठी सगळी जमिन बेणायचे (झाडे-झुडूपे, गवत काढून जमिन स्वच्छ ज्क्करण्याचे कॉन्ट्रॅक्ट गावातल्या एकाला दिले होते. त्याला मात्र आंब्याखालचे गवत साफ करताना एक घणस मिळाले आणि त्याच्या लोकांनी ते लागलीच मारले. आजीला कळल्यावर आजी म्हणली मला काही त्रास नव्हता त्याचा पण त्याची लोकं कामाला वावरतील तर त्यांना भिती नको म्हणून मारली अस्तील, ठीक आहे. पण म्हटली १ मिळालीये तर दुसरी पण मिळेल. त्याप्रमाणे दुसरी पण पुढील दारच्या परसवा शेजारची आंब्याची खळ साफ करताना मिळाली. ती ही मारण्यात आली.
मग आम्ही आजीला चिडवत असू, आजीने पाळलेले दोन घणस मारले म्हणून.
काय वेग असतो या धामणीचा! एकदा सायंकाळच्या उन्हात ही सळसळणारी धामण परड्यात पाहीली होती. कसली वेगात जात होती, की घाबरायच सुद्धा विसरल माझं. नुसतीच अवाक होउन पहात राहीले.तिच्या त्या प्रचंड वेगाने ती जणु तरंगत निघालीय असा भास होत होता त्या सोनेरी किरणात.
बाकी धामण नागाची बायको? अगागा!
एक सर्पमित्र आहेत आमच्या सोसायटीत..त्यांच्या हातात परवाच धामण बघितली (लांबुनच)
तोंड डोक्याच्यावर (त्यांच्या) आणि शेपुट जमिनीवर (धामणीची) म्ह्णजे ७ फूट तरी लांब असेल
बिनविषारी साप असल्यामुळे नुसत्या हाताने पकडायचा
बिनविषारी साप चावल्यामुळे अजिबातच काही होत नाही का? माझ्या महिती प्रमाणे बिनविषारी सापांच्या दातांमध्ये त्यांनी खाल्लेल्या भक्श्याचे कण साठुन रहातात. हे सडलेले कण चावता वेळी माणसाच्या शरीरात जाउन प्रसंगी जीवावर बेततात.
प्रकाश टाकावा...
काही नाजूक लोकांना इन्फेक्शन झालेले मला माहित आहे. पण त्यांना ताप येतो, तो भीतीने येतो का इन्फेक्शन ने मला अजून पूर्ण माहित नाही.
पहिली गोष्ट, साप चावून भक्ष्य खात नाही (तो गिळतो !), त्यामुळे आपल्या दातात जसे बडी शेप अडकते तसे काही अडकत नाही. अजगरासारखा मोठं साप चावला तर जास्त रक्त जाऊन चक्कर येऊ शकते.
>> सापांच्या दातांमध्ये त्यांनी खाल्लेल्या भक्श्याचे कण साठुन रहातात.
तशी शक्यता कमी आहे, कारण साप भक्ष्य आपल्याला लहापणी शिकवतात तसं बत्तीस वेळा वैगरे चावून खात नाहीत. ते सरळ गिळतात, असा आत्तापर्यंतचा तरी माझा समज आहे.
चूक बरोबर जेडिभौ सांगतीलच!!
>>सुंदरशी परीदेखील चावणे म्हणजे दुखणार आणि ठसठसणारच की रे ...
साप चावल्याचा अनुभव नसला तरी लोकांच्या सांगण्यावरुन, वाचनातून कळतं हो. आता परी चावलेलं कोणी माहितीत नाही, स्वानुभव तर नाहीच नाही. आता सापडलीच एखादी आणि चावलीच तर सांगतो. ;)
स्वगतः चला, आता एक चावरी परी शोधणे आले. ;)
नाग आणि धामण यातला फरक पटकन ओळखता येईल असे काही फरक सांगाल का? फणा काढणे आणि न काढणे हा एक फरक आहे का?
मी पकडायला जाणार नाहीच पण जमल तर एखादा मुका जीव मरण्यापासुन तरी वाचवू शकेन :)
प्रतिक्रिया
सही!!!!
परीक्षा असल्यामुळे हा लेख
नेहमीप्रमाणे अप्रतिम . धामण
धन्यवाद् ! हा खूप मोठा गैरसमज
पाचवी - सहावीत असताना एका
:))
अधाश्या सारखा वाचला
झकास
डोके
धामण आणि नाग ह्यातील फरक चटकन
अस काही वळ्वळणार भयंकर समोर
दुर्दैवाने नाग आणी धामण यातील
मस्त..
त्या बद्दल मी पुढच्या भागात
एकदम कडक लिखाण!
+१
रोचक अन मजेशीर
उत्तम लिखाण.. माहिती
हा पाळीव वरून आठवलं. आमची आजी
घणस म्हणजे?. घोणस?.?बापरे....
पावरबाज लेख ज्याक साहेब .
सापटी म्हणजे काय?
भेग - फट, दोन गोष्टींच्या
अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद!
जॅ.डॅ. आपन तुमच्या लेखनाचे
काय वेग असतो या धामणीचा! एकदा
इतर लेखांप्रमाणेच खुसखुशीत
हो
हो, किंग कोब्रा चे स्टेपल
नेहमीप्रमाणे उत्कृष्ठ लिखाण.
Khup chhan information.
आयडी बदलला का रे प्यार्या?
मोबिलसाठी! मराठी टायपत न्हाई.
तुम्हाला कसे कळले, हा प्यारे
खूप आवडला हा भाग सुध्दा(सध्या
झकास !
लेख आवडला
बिनविषारी साप म्हटलं की थोडं
धामण झकास दिसतेय !!
बिनविषारी साप असल्यामुळे
हे सडलेले कण चावता वेळी
काही नाजूक लोकांना इन्फेक्शन
मेल्या...
>> सापांच्या दातांमध्ये
तो शिंचा रोज दात जरी घासत
>>सुंदरशी परीदेखील चावणे
(No subject)
जेडी
मी पुढच्या भागात सांगायचा
मस्त लेख.
Pagination