*फक्त शहरात मिळत, एकावेळी साधारण १२०-१३० किमी पुरेल इतकच भरता येत.
*बूट मधली जागा वाया जाते.
*इंजीन वॉरंटी संपते.(कंपनी फिटेड नसेल तर)
आणि
मज्ज्जा नाय राव..
धागा निघालाच आहे तर माझाही प्रश्न विचारुन टाकतो.
माझ्या कडे आत्ता वॅगन आर आहे. मला सेदान सिगमेंट मध्ये ११ ते १२ लाख बजेटात पेट्रोल गाडी कोणती घ्यावी हा प्रश्न पडला आहे. होंडा सिटी कि वेरना का वेन्टो अस कनफ्युजन आहे
रेनॉ स्काला पहा.. नुकतीच कलीगने घेतली. उत्तम.
सेदानच का? असा खास चॉईस नसेल तर तुमच्या बजेटमधे इतरही खूप चॉईसेस आहेत की..
सेदानचा क्लास बाजूला ठेवला तर XUV 500 घ्या की. माझं तसं बजेट असतं तर मी डोळे मिटून घेतली असती. वेगळ्याच लेव्हलवर जाऊन बसेल तुमचा डेली ड्रायव्हिंग एक्स्पिरियन्स..
सनी, किंवा वेर्ना... हँड्स डाउन.
एस एक्स फोर ला मायलेज नाही म्हणून नाहीतर तीही होती.
फोक्सवागन जर्मन कार्स वगैरे ठीक आहेत पण खर्च जाम होतो; प्रत्यक्ष मालकांचे शब्द आहेत. वेन्टो भारी लो आहे बाबा. बाकीच्या गाड्यांना जो गतिरोधक असेल तो हिला डोंगर होतो.
१) खर्च - गेल्या दोन वर्षात एकुण खर्च रु. २१,०००.०० मात्र. तोही केवळ वार्षिक देखभाल, तेल व गाळण्या आदी बदलण्याचा, आणि आसनांच्या उत्तम साफसफाइसह. गाडी घेताना मूळ वॉरंटी २ वर्षे + वाढीव आकारासह पुढील दोन वर्षांसाठी रु. ८०००.०० म्हणजे एकुण गाडी घेतल्यापासुन चार वर्षे - अनिर्बंधीत अंतरासाठी. यात सगळे इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल भाग व एसी तसेच सर्व स्विचेस, मोटर्स, रेडीओ, सीडी समाविष्ट. वर्षाला १०५००.०० रु देखभाल खर्च रास्त आहे, अवाजवी नाही. या गाडीला ६ वर्षांची अँटी परफोरेशन गॅरंटी आहे, तळाला खर्च करुन कोटींग करावे लागत नाही. सर्विस अतिशय तत्पर आहे. गाडी नेल्यापासून परत करे पर्यंत सेवा विभागाचे कर्मचारी संपर्कात असतात, ते कामे व खर्च याचा अंदाज देतात व आपल्या संमतीनंतर काम करतात. गाडी परत केल्यावर देयक व पावती मिळाल्याची खातरजमा केली जाते व नंतर सेवेच्या दर्जाचा अभिप्रायही घेतला जातो.
२) स्पीड ब्रेकर - जर वेंटोला स्पीड ब्रेकर डोंगर असेल तर सीटीला तो हिमालय असेल. मी स्वतः पुढे २ मागे ३ असे एकुण ५ प्रवासी घेउन अनेकदा गाडी चालवली आहे. स्पीड ब्रेकरला घासले जातात ते कडक फायबरचे मड फ्लॅप, गाडी नव्हे. ग्राउंड क्लिअरन्स सीटीचा बरा की वेन्टोचा याचा एक तर अनुभव घ्या नाहीतर सीटी चालविणार्यांना विचारा ते स्वतः गाडी प्रत्येक स्पीड ब्रेकरला घासल्याची तक्रार करतात.
३) सुरक्षितता. - आणिबाणीच्या परिस्थितीत म्हणजे गाडीला आग लागणे वा पाणी आत शिरणे अशा वेळी देखील दरवाजे लॉक केलेल्या अवस्थेतदेखिल उघडता येतात, आपोआप बंद होत नाहीत. (२६ जुलै २००५ मध्ये अशा घटना घडल्या होत्या)
४) मजबुती - दोन्ही गाड्या पाहा आणि स्वतः ठरवा.
दोन्ही गाड्या स्वतः चालवुन पाहा, एक फोन करायची खोटी, विक्रेते गाडी घेऊन येतील. तुमच्या अनुभवानुसार निवड करा. अर्थात गाडीचा आकार, रुप वगैरे वैयक्तिक निवडी आहेत, त्याला तुलना नाही.
दोन्ही गाड्या चालवुन पाहील्या आहेत.
वेंटो मजबुत आहे, सिटीच इंजीन जास्ती स्मुथ आहे अस वाटत आहे.
सुरक्षा ह्या मुद्दयावर वेंटो चांगली वाट्ते आहे.
काटा परत ५०/५० ला आला आहे.
ते तर मेकॅनिकल लॉक आहे! त्याचा आगीशी काय संबंध? (मी सीट बेल्ट्चा उल्लेख केलाही नव्हता.)
खालच्या चित्रात गाडीचा दरवाजा उघडा दिसत आहे. वरच्या चित्रात ड्रायव्हरकडचा दरवाजा दिसत नाही. अपघाताचा तपशिल आहे का?
अनलॉक विषयी अर्थात मला प्रत्यक्ष अनुभव नाही पण फोक्स्वॅगनचा असा दावा आहे. अगदी दरवाजे लॉक करुन बॅटरी काढली तरीही दरवाजे आतुन उघडतात असा त्यांचा दावा आहे - पडताळुन पाहिला नाही.
तो दरवाजा उचकटून बाहेर काढलाय लोकांनी, वैशाली हॉटेल जवळ घडलेलं हे,
गाडीचा ECU आगीमुळे आधी जळाला किंवा खराब झाला असावा त्यामुळे असेल कदाचित, पण कुठलीच गाडी फुलप्रूफ नसते
लिनिया मी स्वत: मागची अडिच वर्ष वापरतो आहे खटाखट गाडी आहे, नशिबाने आज पर्यंत झिरो मेंटनन्स ,१४० च्या स्पिडलाही अगदी आरामत चालते.फक्त भल मोठ धुड आहे त्याची सवय करुन घेणे गरजेचे.मित्र वेर्ना वापरतो,तो देखिल तीच्याबद्दल चांगलच बोलतो.बाकी ज्याचा त्याचा चॉइस
होंडाने सिटीचं उत्पादन बंद केलं आहे. नुकतंच ऑफिसमधल्या एकांना घ्यायची होती म्हणून बरीच शोधाशोध केली, पण सगळ्या होंडा शोरूम्समधून एकच उत्तर आलं की नवी सिटी जानेवारीमध्ये लाँच होणार आहे.
बाकी व्हेर्नाचा ग्राऊंड क्लियरन्स फारच कमी आहे. खड्डेमय रस्ते आणि उंच स्पीडब्रेकर्सना बंपर हमखास घासतो.
एकदा टेस्ट ड्राईव्हला जा, जर्मन उत्पादकांचा आत्मविश्वास म्हणजे काय ते दिसेल. तुमच्या बरोबर आलेला विक्रेता स्वतः सांगतो की खड्ड्यात घाला, हळु करायची गरज नाही. गाडी स्थीर आणि दणकट आहे. पिक अपही उत्तम. न्यायची म्हटली १४० -१६० ला न झुलता सहज जाते. एसी सह ठाणे पुणे साधारण १८ किमी/ प्रतिलिटर (पेट्रोलवर) मिळते तेही राजमार्गावर १००-१२० ला चालवुन. मुंबईच्या बीटुबी वाहतुकीत १०.-१०.५० मिळते. सर्विसिंग वर्षातुन एकदा/ १५००० किमी वर. शिवाय स्वतः सर्विस सेंटरला जायची गरज नाही.
शक्य असल्यास १ लाख अधिक द्या आणि ऑटोमॅटिक घ्या, विशेषतः मुंबईत रोज चालवायची असेल तर.
सनी, किंवा वेर्ना... हँड्स डाउन.
एस एक्स फोर ला मायलेज नाही म्हणून नाहीतर तीही होती.
फोक्सवागन जर्मन कार्स वगैरे ठीक आहेत पण खर्च जाम होतो; प्रत्यक्ष मालकांचे शब्द आहेत. वेन्टो भारी लो आहे बाबा. बाकीच्या गाड्यांना जो गतिरोधक असेल तो हिला डोंगर होतो.
माझ्या मते 'स्कोडा - रयापिड' विचारात घेऊ शकता, अतिशय उत्तम जर्मन बनावटीचे इन्जिन, मजबूत बान्धणी, कमी मेन्टेनन्स व सुरक्षित तसेच तुमच्या बजेट मध्ये बसणारी. एकदा शोरुमला जाउन याच. सध्या त्यान्च्या काही डिस्काऊन्ट ऑफर्स चालु आहेत. एक लक्षात असू द्या 'जर्मन' गाड्या केव्हाही उत्तमच.
विनोद१८
मारुती ने फियाटचं क्वाड्राजेट इंजिन वापरण कधिच बंद केलं आहे. आता मारुती k-series नावाचं सुझुकी मेड इंजिन वापरते (सर्व गाड्यांमधे). फियाट ही पुर्वी पासुन उत्क्रुष्ट इंजिन बनवणारी कंपनी.
क्वाड्राजेट इंजिन बद्दल सहमत.
भौ, मारुती अजुन पन फियाटचं क्वाड्राजेट इंजिन वापरतं फक्त त्याचं नाव डी डी आय (ड्रीम डिझल) अस ठेवलय. k-series इंजिन हे फक्त पेट्रोल कार्स मधे येते आणी डी डी आय एस (फियाटचं क्वाड्राजेट) हे डिझल इंजिन आहे.
वॅगन आर बद्दल बरीच अनुकूल मतं आहेत. खरंच आहे ते. ही एक बेस्टसेलर गाडी आहे. विशेषतः नवी वॅगन आर.
फक्त एकच मुद्दा जरा लक्षात आणून द्यावासा वाटतो, जो केवळ तुलनेनेच सिद्ध होऊ शकेल. वॅगन आरच्या मागच्या सीटवर तीनजण नीटपणे बसू शकत नाहीत. लहान मुले ठीक,पण तीन नॉर्मल आकाराचे मोठे लोक तिथे बसताना खूप ओढाताण होते. बाळसेदार मोठे लोक तर अशक्यच.
नुसती तीन पार्श्वभागांच्या एरियाची बेरीज असा भाग नसतो.. जरा मोकळीक लागतेच.. प्रवासात / लिफ्ट देताना एकमेकांशी जवळचं नातं नसलेले एक स्त्री आणि दोन पुरुष किंवा उलट, असं कॉम्बिनेशन नातेवाईकांत मित्रमंडळात किंवा कलीग्जमधे झालं तर इतके खेटून बसवता येत नाहीत.
सँट्रो बरी मग त्याबाबतीत. मागचा भाग किंचित फुगीर असल्याने तीनजण आरामात बसतात. मी तर पहिली कार म्हणून वॅगन आर या एका मुख्य कारणाने नाकारली होती. नवी वॅगन आर थोडी वाईड दिसते पण प्रत्यक्षात हा इफेक्ट किरकोळच आहे.
दुसरं, वॅगन आर घेवून कधी ८०-९० च्या वेगात कॉर्नरींग कराव लागतंय अशी कल्पना करुन बघा.. प्रचंड अन्स्टेबल गाडी आहे ती. या वेगात गाडी वळवावी असा याचा अर्थ नव्हे पण आणीबाणीच्या वेळी जेंव्हा असं कराव लागतं तेंव्हा गाडीवर विसंबता आलं पाहीजे
मुळातच गाड्या, ड्रायव्हिंग हा अत्तिशय जिव्हाळ्याचा विषय असल्याने 'ज्या वाटेला जायचं नाही तिथला पत्ता कशाला विचारायचा?' हा नियम न मानता गाड्यांचे रिव्ह्यूज, स्पेक्स मी वाचत, अभ्यासत असतो. त्यावर आणि स्वानुभवावर आधारित माझी काही मतं/सल्ले तुम्हाला सांगतो.
५-६ लाखाच्या रेंज मधे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गविंनी म्हटल्यानुसार इंजिन, किंवा तांत्रिक बाबी पहिले, मग दृश्य बाबी असा क्रम असावा.
नंबर १ पर्याय. मारुती. आमच्या घरात आजवर केवळ मारुतीच्या गाड्या आल्यात. परंतु मांडतोय ती मतं अनबायस्ड आहेत.
स्विफ्टः ड्रायव्हिंग चं वेड असेल; तर यासारखी पेप्पी गाडी नाही. मायलेज खूप भारी नाही पण खूप कमीही नाही. १५-१६. रियलिस्टिक. मागे बसायला इतर गाड्यांच्या तुलनेत अडचण होते. सिटी असो किंवा हायवे; दोन्हीसाठी योग्य. तुम्ही दिलेल्या वापरास साजेशी. डिझेल इंजिन जबरदस्त आहे; पण सर्वसाधारण नियमानुसार डिझेल घेणार असाल तर रनिंग भरपूर असलेलं बरं; तरंच डिझेल ची प्फ्युएल इकॉनॉमी जमेची बाजू ठरते. पेट्रोलही सुरेख आहे.
मारुती ची ASS (वेगळा अर्थ न काढणे. आफ्टर सेल्स सर्व्हिस म्हणायचंय) सर्वोत्तम आहे यात वाद नाही.
वॅगन आर - एक ट्राईड अॅण्ड टेस्टेड गाडी. उंच किंवा बुटक्या सर्वांनाच स्विफ्ट पेक्षा जास्त आरामशीर बसता येईल अशी. मायलेज छान. १७-१९. ड्युओ चा पर्याय उपलब्ध. लगेज स्पेस सुधा चांगली. गाडी तुम्हाला निराश करायची नाही.
आय१० ग्रँड - नवीन चेहरा. पण अतिशय प्रॉमिसिंग. रिव्ह्यूज सुरेख आहेत. स्पेक्स वरूनही ती गाडी चांगलीच आहे यात शंका नाही. साधी आय१० चांगली आहेच; पण हिच्यात खूप गोष्टी सुधारलेल्या आहेत. काही फीचर्स तर सी क्लास सेडान्स मधे नाहीत अशी आहेत. त्यामुळे हिचा विचार कराच. ह्युंडईची पेट्रोल व डिजेल दोन्ही इंदिन्स डोळे मिटून घेण्यासारखी आहेत. त्यामुळे ती चिंता नसावी. मायलेज चांगलं. १७-१९
फोर्ड फिगो - फोर्ड हा ब्रँड तसा नवीन नाही; (एस्कॉर्ट, आयकॉन, इ.) पण आता खूप बदललेला आहे. फिगो गाडी सर्वगुणसंपन्न आहे. पण नख-याची आहे. मेंटेनन्स लई जास्त येऊ शकतो. बाकी जागा, फीचर्स, पर्फॉर्मन्स, सगळं मस्त. नक्की विचार करायला हरकत नाही.
महिंद्रा व्हेरिटो व्हाईब - केवळ महिंद्रा ब्रँड एका विशिष्ट प्रकारच्या गाड्यांबरोबर जोडला गेलेला आहे म्हणून की काय, पण या गाडीला हायलाईट केलं जात नाही. अनसंग हीरो प्रमाणे असलेली ही गाडी खरं तर खूप छान आहे. स्पेस मधे हिला दुसरी कुठलीही गाडी मागे टाकू शकत नाही. बसण्याची स्पेस असो वा सामानाची. रेनो चं १.५ लि. इंजिन स्विफ्ट डीडीआयस (व्हाईब फक्त डिझेल मधे येते) इतकं पेपी नसलं तरी इट्स अ वर्कहॉर्स. टेक माय वर्ड. Driving behaviour of the car isnt really refined though, as much as that of i10 or i10 grand and WagonR.
बाकी रिट्झ आहे, सेल आहे, लिव्हा आहे, विस्टा आहे. या सगळ्याही आपापल्या जागी छान आहेत. पण माझ्या मते टॉप पाच पर्याय असे असावेत. If I was at your place.
1. आय१० ग्रँड (टेक्नॉलॉजिकली लेटेस्ट, खूप फीचर्स आणि विश्वसनीय इंजिन)
२. वेरिटो व्हाईब (प्रचंड स्पेस, स्टर्डी डिझाईन, चांगलं डीजेल इंजिन)
३. वॅगन आर किंवा स्टिंग रे (ट्राईड टेस्टेड, मस्त ऑल राउंड समाधान देणारी गाडी. नो नॉनसेन्स)
४. फिगो (केवळ बसायला खूप लो, आणि खर्चिक, म्हणून नंबर ४)
५. सेल/व्हिस्टा/लिव्हा (सगळं छान असूनही स्टँड आउट न होणा-या गाड्या. म्हणून शेवटी. माझ्या मते बरं का.)
बघा बुवा.
ऑल द बेस्ट.
महिंद्रा व्हेरिटो व्हाईब - केवळ महिंद्रा ब्रँड एका विशिष्ट प्रकारच्या गाड्यांबरोबर जोडला गेलेला आहे म्हणून की काय, पण या गाडीला हायलाईट केलं जात नाही. अनसंग हीरो प्रमाणे असलेली ही गाडी खरं तर खूप छान आहे. स्पेस मधे हिला दुसरी कुठलीही गाडी मागे टाकू शकत नाही. बसण्याची स्पेस असो वा सामानाची. रेनो चं १.५ लि. इंजिन स्विफ्ट डीडीआयस (व्हाईब फक्त डिझेल मधे येते) इतकं पेपी नसलं तरी इट्स अ वर्कहॉर्स. टेक माय वर्ड. Driving behaviour of the car isnt really refined though, as much as that of i10 or i10 grand and WagonR.
मी बराच वेळ ही गोष्ट बोलणार होतो, पण थोड थांबलेलो..
मी गेली १ वर्ष महींद्रा वेरिटो चालवतोय, वर्षभरात ४२००० किमी रीडींग आहे, मुंबैहुन थेट नागपुर, जबल्पुर ते खाली नांदेडपर्यंत , आजवर सर्विसिंग सोडुन खर्च शुन्य.. मेटल क्वाळीटी ए १, , बिल्ट अतिशय मजबुत, गाडी रस्ता पकडुन चालते, ८०-१०० या टप्प्यात गाडी लोण्यासारखी पळते. आत जागा इतकी आहे की SUV वाल्यांनापण कॉम्प्लेक्स येतो. प्रचंड मोठा बूट..
वाइब मध्येही या सगळ्या गोष्टी मिळतील पण ३-४ वर्षात विकणार असाल तर नका घेवू
गवि साहेब, तुमचा मुद्दा चु़कीचा आहे कारण माझ वजन ११५ किलो. असुन मी, माझी आई जी बर्यापैकी स्थुल आहे व माझी बायको आम्ही आरामात मागे बसु शकतो. माझ्या साईजला साजेशी म्हणुनच मी वॅगन आर VXI घेतली.
अजुन ऐक टाटा इंडिगो नविन ताकदवान इंजिन असलेली जरुन घ्या. ५ लाखात येत. अतिशय सोलीड इंजिन आहे. मायलेज साधारणपणे १३ ते १५ मीळत. मी ती २०१३ सप्टेंबर मध्ये घेतली. ३ महिन्यात ८००० किमी चालवली आहे. गविसाहेब म्हणाले तसे टाटांची सर्व्हिस ऐ वन आहे. गाडी चालवायला ही अतिशय दमदार आहे. लेगस्पेसलाही ठीक आहे.
आणि माझा गोंधळ वाढत चाललाय..म्ह्णजे तुम्ही सर्व बरोबर सांगताय त्याबद्दल वादच नाही
पण माझे निकष बदलत/वाढत चालले आहेत ..
एक अजुन प्रश्न---डिलरनुसार किंमत बार्गेन होउ शकते का? म्ह्णजे अमुक डिलर नवीन म्ह्णुन किंमत कमी..तमुक एस्टॅब्लिश म्हणुन no compromise वगैरे
शी... फ्रँन्कली, ही गाडी फोर्ड ने केवळ डस्टर च्या तोडीचा आपला पत्ता उतरवायचा म्हणून अट्टाहास करून काढलेली आहे चायला. अॅग्रेसिव्ह फ्रंट डिझाईन सोडलं तर वाया आहे ही गाडी. माझ्या मते यायची नाही ६ च्या आत; आणि आली तरी नका घेऊ असा माझा सल्ला आहे.
असेना का! ती गाडी नाहीच आहे मुळी पैसे घालण्यासारखी.
ईकोस्पोर्ट चं आधीच खूप हाईप करून ठेवलं गेलं होतं. त्यामुळे धडाधड बुक केल्या लोकांनी. पण बहुतांश मंडळी पस्तावतायत आता; ओळखीतलंच एक उदाहरण आहे माझ्या.
Duster is just far better than the others in the class. आता डस्टर ने प्राइस जवळजवळ दीडपटीच्या वर केलीय लाँच पासून.
भारतातल्या पब्लिकला आपल्या गरजेपेक्षा, लोकांचं बघुन किंवा लूक बघुन गाडी घ्यायची वाईट सवय आहे..
डस्टर, इकोस्पोर्ट या गाड्या थोड्या ऑफरोडींगसाठी बनवल्यात. ज्याला बराच वेळ एकट्याला गाडी चालवायचीय, किंवा पुणे/मुंबईसारख्या शहरात चालवायचेय, त्याने कार घ्यावी, एव्हरेज चांगला मिळतो, स्वस्तही पडते..
मी सध्या ह्युन्दाई आय २० वापरतोय. एकदम झकास. १२० /१३० च्या स्पीडला एकदम स्टेडी चालते. रीअर सीट कम्फर्टेबल. दोन्ही बाजुचे आरसे, कार रेडीओ यांचे कन्ट्रोल्स स्टेअरिंग मधे आहेत. पाचवा आणि सहावा गिअर वापरताना अक्षरशः तुम्ही येन्जॉय करत असता.
इतर फीचर्स जसे रीव्हर्स घेताना मागे एखादे ऑब्जेक्ट आले तर तुम्हाला सिग्नल मिळतो वगैरे .
गाडी एकदम भन्नाट. रोड क्लीअरन्स थोडा कमी आहे. अॅव्हरेज कमी आहे. पण ड्रायव्हिंग कम्फर्ट ला तोड नाही.
जर तुम्ही ऐखाद्या कंपनीत नोकरी करत असाल व ती कंपनी कार डिलरच्या कंपनी डिसकाउंट यादीत असली तर तुम्हाला त्या डिलर कडुन कंपनी डिसकाऊंट मिळतो. मलाही असाच मिळाला होता.
रेनोची स्कॅला आणि निसानची सनी.दोघांचेही इंजिन रेनॉचे आहे.दोन्ही गाड्या मोठ्या असल्याने ८ ते ९ लाखापर्यंत जातात.
टोयोटा एटियॉस लिवा बघा. no-nonsense गाडी म्हणतात.६ लाखापर्यंत बेसिक मॉडेल यायला हरकत नाही.
रिसेल गाडी ही पहिल्या लग्नाचा घटस्फोट झालेल्या व्यक्तीसारखी असते, ती चांगलीही असु शकते पण पहिला घटस्फोट का झाला असावा हा प्रश्न छळत राहतो. :)
ओळखीत, रोजच्या पाहण्यात वगैरे असेल तर घ्या, ट्रु व्हॅल्यु वगैरेला फारसा अर्थ नाही.
पण स्पेअर पार्ट्बद्दल गॅरंटी काय? म्हणजे कितीही true value/first choice म्हटले तरी..
म्हणजे सोर्स चांगला पाहीजे.शिवाय पहीला ओनर की दुसरा ओनर ,RTO transfer वगैरे आलेच
प्रतिक्रिया
*फक्त शहरात मिळत, एकावेळी
धागा निघालाच आहे तर माझाही
रेनॉ स्काला पहा.. नुकतीच
सेदानच हवी आहे हे नक्की, SUV
सनी, किंवा वेर्ना... हँड्स
असहमत
दोन्ही गाड्या चालवुन पाहील्या
आणिबाणीच्या परिस्थितीत म्हणजे
सीट बेल्ट जॅम????????
तो दरवाजा उचकटून बाहेर काढलाय
फियाट लिनिया किंवा हुंडाइ वर्ना
बरोबर
ताजी बातमी
११-१२ लाखाचं बजेट असेल तर
वेन्टो
सनी, किंवा वेर्ना... हँड्स
धन्यवाद!
सिटी एक नंबर
माझ्या मते 'स्कोडा - रयापिड'
होंडा सिटी
मारुती ने फियाटचं क्वाड्राजेट
वॅगन आर बद्दल बरीच अनुकूल मतं
दुसरं, वॅगन आर घेवून कधी ८०
+१
राजेंद्र मेहेंदळे साहेब, CNG ला पीक अप मिळत नाही चांगला
CNG ला पीक अप मिळत नाही चांगला
माझी माहिती आणि त्यावर आधारित मत्/सल्ला
महिंद्रा व्हेरिटो व्हाईब -
द्या टाळी
गवि साहेब, तुमचा मुद्दा चु़कीचा आहे कारण......
स्वीफ्ट LXI/VXI घेउन टाका
अजुन ऐक टाटा इंडिगो नविन ताकदवान इंजिन असलेली
धागा इंटरेस्टिंग होत चाललाय
होतं ना तुम्ही टेस्ट
माझ्या मते...
५-६ लाखात टाइटनिएम?
ईकोस्पोर्ट????
भारतात पैसा हा सगळ्यात
असेना का! ती गाडी नाहीच आहे
भारतातल्या पब्लिकला आपल्या
भारतातल्या पब्लिकला आपल्या
मी सध्या ह्युन्दाई आय २०
माहितीपूर्ण प्रतिसाद.
जर तुम्ही ऐखाद्या कंपनीत नोकरी करत असाल व
स्कॅला
रिसेल कार
रिसेल गाडी ही पहिल्या लग्नाचा
रिसेल बघायला हरकत नाही
हरकत नाही ना
एस्टिलोबद्दल लोकांचं काय मत
Pagination