Welcome to misalpav.com
लेखक: नानबा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

DISCLAIMER मी विपश्यना केलेली नाही किंवा त्यातील तज्ञ सुद्धा नाही.(फक्त तटरक्षक दलाच्या जहाजावर दोन आठवडे काहीही न करता राहिलो आहे.यात दिवसेन दिवस काहीही न बोलता राहावे लागले) जर आपण आपल्या मनावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असू तर दहा दिवसात ते होणारे नाही. आपण साधक आहोत. सिद्ध किंवा योगी होणे हे इतके सोपे नाही. मी फक्त प्रथमला एकच सांगितले कि संपूर्ण एकांतवास हा आपल्याला स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. तेंव्हा तू विपश्यना चा अभ्यासक्रम करशील तेंव्हा पूर्ण मोकळ्या मानाने त्याला सामोरे जा. पण जर दहा दिवसात स्वताची थोडीशी ओळख पटली तरी चांगलेच आहे.

माझा पहिलाच कट्टा मला आवडला .मिसळपाव डोंबिवली दिवाळी कट्टा २०१३ .गप्पांचा फड जमला पण खाण्याची ऑर्डर काय द्यावी या विचारात मुक्तविहारी आणि विनोद१८ .फोटो http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/Katta13/Photo5236_zpsad7cc6cd.jpg ॥ विपश्यना ,मनावर ताबा याविषयी एक मुद्दा समजावतांना डॉ. सुबोध खरे (खास मुलुंडहून आले),सोबत शैलेन्द्र .http://i1366.photobucket.com/albums/r778/Wdapav/Katta13/Photo5237_zps57a1daa3.jpg ॥प्रथम फडणीस (मध्ये) याने पावणेआठला येऊन जागा बुक केली .पुढच्या त्याच्या शिक्षणाबद्दल सांगतांना ॥शैलेंद्र स्थानिक आणि राज्यातील राजकारण यावर बोलतांना ,डावीकडे डॉ सुबोध खरे आणि कँजूस यांचा अर्धाफोटो ।

छोटेखानी पण मस्त कट्टा वृत्तांत. तुमच्या कट्ट्याच्या वेळेसही मी, धन्या, सूड आणि सूडचा भाऊ असे चौघेजण एफसी रोडवर 'याना' मध्ये छोटासा कट्टा करत होतो. तिथले सिझलर्स खाऊन मग कॅफे चॉकोलेडमध्ये वॉलनट क्याडबी. मजा आली जाम.

हो ना !! पुढल्या वेळेस नक्की सांगू हो, या म्हणजे झालं. ती देवरुखकरांची मीनाक्षी अजून येतेच आहे, तसं करु नका.

हम्म !! छान वाटला आटोपशीर वृत्तांत. वर वल्ली म्हणतो त्याप्रमाणे याच दिवशी आमचाही पुण्यात छोटासा का होईना कट्टा झाला. वॉलनट कॅड बी म्हणजे अगदी 'अप्रतिम*' होता. *मी बरा न म्हणता अप्रतिम म्हटलंय याची जाणकारांनी नोंद घ्यावी. ;)

"
वॉलनट कॅड बी म्हणजे अगदी 'अप्रतिम*' होता.
वल्लीने एकदा सांगितलंय, परत परत सांगितल्यास तुमच्या खर्चाने पुरावा मागण्यात येइल

वल्लीने एकदा सांगितलंय, परत परत सांगितल्यास तुमच्या खर्चाने पुरावा मागण्यात येइल
अगदी अगदी. डोंबिवलीतसुद्धा कॅड बी मिळतं हो..

पण हे काय दोनच फोटो? कट्टेकरी कमी असले म्हणून काय झालं फोटो हे ढिगाने हवेतच......निदान खाण्या/पिण्याचे फोटो टाकुन ईनोचा खप करायचा रे! बाय द वे हि "चोळेगावकर" काय भानगड आहे?

भानगड?? जरा जपून बोला हो, सबंध आगर आळी यायची 'पोकल' बांबूचे फटके द्यायला.

आता मुंबई-पुणे कट्टा करुयात ,पुण्यात. किवा मग नववर्ष्याच स्वागत समस्त मिपाकर मिळून करू सर्वांना सोयिस्कर अशा ठिकाणी.

महान व्यक्तिमत्त्च श्री. चुलबूल पांडे सांगून गेलेत, *देअर इज आलवेज अ नेक्श्ट टाई* ;)

आम्हाला नको म्हणून सांगितले... मोदीना व्हिसा नाकारल्याचा राग आमच्यावर काढला. :)