Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एक संपादक श्री वल्ली जे जवळच रहात असल्याने लेखांची गुणवत्ता ई गोष्टींवर चर्चा होते. बाबासाहेबाना ( बाबासाहेब आम्बेडकर बाबासाहेब भोसले नव्हेत ) अपेक्षित नसलेली लोकशाही जशी चालू आहे.तसेच तात्या वा नीलकांत याना ( कदाचित) अपेक्षा नसलेले मिपा ते हेच. काही लोक नर्म विनोदासाठी येथे येत असल्याने सर्वांच्याच हातून ( अगदी संपादक पदावर असलेल्यांच्या सुद्धा) अवांतर लिहिले जाते. चालायचंच ! माझी लेखाची कल्पनाच अशी आहे की ते एक दस्तावेज व्हावे. म्हणजे असे की लेख व प्रतिक्रिया असे त्याचे स्वरूप असूच नये तर लेख व प्रतिलेख असे असावे. असा प्रतिलेख मूळ विषयात भर टाकणारा असावा अगर त्यातील त्रूटी दाखविणारा असावा. आस्वादातील आवडले व नावडले या मोघम प्रतिसादापेक्षा का आवडले नाही वा का आवडले याचे प्रतिसाद असावेत. उगीच आणखी येउ द्या. वाचत आहे आहे मस्तच रे खपल्या गेलो आहे. जबराट वगैरे प्रतिसादात काही अर्थ नाही.

अत्यावांतर- :D (हघ्या) ------------------ सगळेच कसे बागेमधे व्यायाम करत असणार? किंवा हातात गीता घेउन चिंतन करित बसणार? बागेतल्या कोपर्‍यात कुणी घट्ट बिलगुन बसतंच नां? गालाला गाल लाउन गुलु गुलु करित असतंच ना? असं काही दिसलं की यांचं डॊकं सणकलंच! यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच!! नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं पण यांना मुलं होतात हे एक कोडंच असतं!!

असं काही दिसलं की यांचं डॊकं सणकलंच! यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच!! नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं पण यांना मुलं होतात हे एक कोडंच असतं!!
ठ्ठो!!!!!!!! काय जबराट कडवं आहे तेच्यायला, मान गये!!

अवांतर प्रतिसादच दु:ख नाही , पण माझा मोबाईल 25 प्रतिसाद झाले की गंडतो त्याच वाईट वाटत . अतिअंवातर - याला म्हातारी मेल्याच दु:ख नाय पण काळ सोकावतोय या चालीवर वाचा . =))

म्हातारी मेल्याच दु:ख नाय पण काळ सोकावतोय या चालीवर वाचा . >>> चुकुन " सोक्या काळवतोय " असे वाचले आणि तिकडे चेन्नई च्या उन्हाने काळवंडलेल्या सोक्याचे चित्रच समोर आले ;) =))

वाश्या, लेका का माझ्या सुखी चेन्नै वास्तव्यावर घसरतो आहेस उगाच? शाप देऊ का तुला ?? असो, लैच अवांतर करुन राह्यलो ह्या धाग्यावर. स्वारी शक्तीमान प्यारे! - (अजूनही गव्हाळ वर्णाचाच असलेला) सोकाजी

मिपावर अवांतर प्रतिसाद येतात? काहितरीच काय? मिपा प्रतिसादांसाठीच प्रसिद्ध आहे. धागेच अवांतर असावेत बहुधा. (लोक मूळ लेख पण वाचतात का?)

यग्जॅक्टली! माझ्या माहितीचे बरेच जण प्रतिक्रिया कोणी काय दिल्यात हे बघतात आणि मग लेख्/धागा वाचतात!

वैसाच कर्ता. पय्ले पर्तिक्रिया देख्ता, जिदर ज्यादा उदर हंगामा होयेला ये पक्का फिर वोईच्च खोल्ता.