मंगल यान हे प्रदीर्घ कालावधी साठी असणार आहे . त्यासाठी यानातील विविध उपकरणांना लागणाऱ्या विजेचा पुरवठा कशा मार्फत केला जात आहे ? सोलर सेल्स कि छोटा आण्विक जनित्र ?
अनेकवेळा पहिले आहे कि याने हि सोनेरी रंगाच्या कागदाने/प्लास्टिक ने लपेटलेली असतात नक्की कशासाठी?
१.८ मीटर लांब आणि १.४ मीटर रुंद अशा आकाराची तीन पॅनेल मंगलयानाला जोडलेली आहेत. अवकाशात २४ तास सूर्याचा प्रकाश असतो. ८४० वॉट इतकी वीज या पॅनेल्समध्ये तयार होऊ शकेल. या यानाचे कल्पनाचित्र इथे पहा. ही पॅनेल्स या चित्रात दाखवली आहेत.
मंगलयानाचा मंगळा भोवती फिरत राहण्याचा कालावधी किती असणार आहे. त्याचा शेवट कसा होणार आहे. उपयुक्तता
संपल्या वर ते मंगळा भोवती फिरत राहणार आहे कि त्या वर आदळणार आहे.
मंगलयान मंगळाभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये प्रदक्षिणा घालणार आहे. सुमारे तीन दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा घालतांना ते यान मंगळ ग्रहापासून जास्तीत जास्त ८०००० किलोमीटर इतके दूर जाईल आणि ३६५ किलोमीटर इतके जवळात जवळ येईल असा अंदाज आहे किंवा प्लॅन आहे. अवकाशात पाठवलेल्या वस्तू कधीच आपोआप नष्ट होत नाहीत. हे यानसुद्धा बहुधा अनंत काळापर्यंत फिरतच राहील. या यानावरील उपकरणे बिघडली (ती मात्र कधी ना कधी बिघडणारच) तर आपला संपर्क तुटेल, त्यामुळे त्याचे पुढे काय झाले हे समजणार नाही. या यानावर काही इंधन शिल्लक राहिले असले आणि काही कारणाने त्याचे ज्वलन झाले आणि त्यामुळे त्याला मंगळाकडे जाण्याची गति मिळाली तर मात्र ते मंगळावर जाऊन आपटणे शक्य आहे.
नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवले तेंव्हा तो एका लहानशा उपयानातून तिथे गेला होता. प्रुथ्वीवरून त्याला ज्या यानाने तिथपर्यंत नेले आणि सुखरूप परत आणले ते मुख्य यान चंद्राभोवती फिरतच राहिले होते. पूर्वीच्या काळात कोकणात किनार्याने जाणारी मोठी जहाजे खोल समुद्रात नांगर टाकून उभी रहात असत आणि त्यातून जाणारे प्रवासी बंदरापासून एका होडीमधून तिथपर्यंत जात येत असत तशा प्रकारची ही व्यवस्था होती. चंद्रावर उतरणार्या यानाला अलगदपणे खाली उतरणे आणि पुन्हा उड्डाण करून मुख्य यानापर्यंत जाऊन मिळणे याची सगळी तरतूद त्यात केलेली होती. नील आर्मस्ट्राँगचा एक सहकारी त्याच्या पाठोपाठ चंद्रावर उतरला, पण दुसरा सहकारी आभाळातच फिरत राहिला. त्याची यात्रा काशी यात्रेला जाऊन विश्वनाथाचे दर्शन न घेताच परत आल्यासारखी झाली.
मी १९६९ मधे १६ वर्षाचा होतो. आमच्या कडे फक्त एक लहान तीन बॅन्डचा रेडिओ सेट होता. लुनर मोड्यूल व कमांड मोड्यूल
अशी त्या यानांची नावे आठवतात. रात्री सर्वजण जागे होते. " आणि मानवाचे चंद्रावर पाउल पडले आहे !!!" ही मानवी वंशाच्या
इतिहासातील अत्यंत महत्वाची घटना कर्ण साक्षीदार म्हणून अनुभवलेली आहे. माझ्या आठवणी प्रमाणे हिंदीत ही घोषणा
जसदेवसिंग यांच्या आवाजात झाली.
या यानाच्या मंगळाभोवतीच्या कक्षेची केंद्रच्युती अंदाजे ०.९१ आहे. ती इतकी जास्त असण्याचे कारण तुम्हाला माहित आहे का? मी आणी माझ्या मित्रांनी शोधण्याचा प्रयत्न केला होता, मंगळयानाच्या एका conference paper च्या author ला email पण केली होती, पण उत्तर मिळाले नाही. आमचा अंदाज असा आहे की पुरेसे इंधन नेणे शक्य नसल्याने apoapsis यापेक्षा कमी करणे शक्य नसावे. (थोडक्यात, that orbit is not by design, it's because there is no alternative)
आंतर्जालावर जेवढी माहिती उपलब्ध आहे तेवढीच मलाही आहे. बहुतेक वेळा 'काय आहे?' हे त्यात दिलेले असते, त्याच्या मागचे कारण वा कारणपरंपरा दिली जात नाही. टेलिव्हिजन किंवा टेलिफोन कम्युनिकेशनसाठी पृथ्वीच्या सभोवती जिओसेन्ट्रिक उपग्रह ठेवावे लागतात ते वर्तुळाकार कक्षेत फिरतात. मंगळयानाच्या बाबतीत त्याची गरजही नाही आणि उपयोगही नाही. माहिती मिळवण्यासाठी लंबवर्तुळाकार उपग्रह जास्त फायदेशीर ठरत असावेत. ज्या काळात ते Apoareon च्या जवळ असतात त्या वेळी त्यांची गति सावकाश झालेली असते, त्या ग्रहाचा जास्त भाग त्यांच्या नजरेच्या टप्प्यात असतो. याचा झाला तर फायदाच होईल. जेंव्हा ते Periareon च्या जवळ असतांना त्यांना बारकाईने पाहता येते. मंगलयानाची Periareon 365.3 km आणि Apoareon 80,000 km इतकी आहे तर नासाच्या मेव्हन उपग्रहाची Periaeron 150 km आणि Apoaeron 6,200 km इतकी आहे. दोन्ही लंबवर्तुळाकाऱ आहेत. मंगलयानाचे वस्तुमान (पे लोड) फक्त १५ किलोग्रॅम एवढेच आहे तर मेव्हनचे ६५ किलो आहे. तो नक्कीच अधिक शक्तीशाली असणार.
इतके दिवस पृथ्वीप्रदक्षिणा करीत असलेले मंगलयान आता त्याचा आकाशातला मार्ग बदलून मंगळ ग्रहाच्या दिशेने निघाले आहे. ते आता कुठे मार्गी लागले आहे असे म्हणता येईल. पण त्याचा हा प्रवास विमानासारखा एका सरळ रेषेत होणार नाही. एका लंबगोलाकार कक्षेत ते सूर्याभोवती फिरायला लागले आहे. त्या कक्षेतून पुढे पुढे जात असतांना ३०० दिवसांनंतर ते मंगळाला गाठणार आहे.
पण त्याचा हा प्रवास विमानासारखा एका सरळ रेषेत होणार नाही. एका लंबगोलाकार कक्षेत ते सूर्याभोवती फिरायला लागले आहे. त्या कक्षेतून पुढे पुढे जात असतांना ३०० दिवसांनंतर ते मंगळाला गाठणार आहे.
ते यान मंगळाकडे सरळ रेषेत का जाऊ शकत नाही ??? समला जर गेलेच तर काय होइल ??
विनोद१८
मंगळयानच नव्हे तर मंगळ, पृथ्वी, गुरु, शनी वगैरे ग्रहसुद्धा न्यूटनच्या नियमानुसार सरळ रेषेत पुढे जाऊ पहात असतात, पण सूर्याचे गुरुत्वाकर्षण त्यांना केंद्रबिंदूकडे खेचत असते. त्यामुळे प्रत्येक क्षणी त्यांची दिशा बदलत जाते आणि ते सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत राहतात. माझ्या लेखामधील पहिल्या चित्रात केंद्रस्थानी सूर्य आहे असे समजा आणि उपग्रहाच्या जागी मंगळयान. या यानाला पृथ्वीपासून दूर जातांना इतका जास्त वेग दिला आहे की त्याची कक्षा वर्तुळाकार न होता जरा जास्त लंबवर्तुळाकार झाली आहे. दुस-या चित्रात दाखवल्याप्रमाणे ही कक्षा पृथ्वी आणि मंगळ ग्रह या दोन्ही ग्रहांच्या कक्षांपेक्षा अधिक लंबगोलाकार असल्यामुळे हे यान हळूहळू पृथ्वीच्या कक्षेपासून दूर आणि मंगळाच्या कक्षेच्या जवळ जात अखेर त्याच्यापर्यंत जाऊन पोचेल. हे सगळे होत असतांना मंगळ ग्रहसुद्धा एका जागी स्थिर नसून तो सुद्धा भ्रमण करतो आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार मंगळयानाचा मार्ग आखला गेला आहे. वेळोवेळी त्याची अवकाशातली जागा पाहून गरज पडल्यास त्याचा वेग वाढवावा किंवा कमी करावा लागेल. अर्जुनाने केलेल्या फिरत्या माशाच्या डोळ्याचा वेध घेण्यासारखेच हे कौशल्याचे काम आहे.
आवडली. वीज कोठून मिळते आणि यान सरळ रेषेत का जात नाही या प्रश्नांवरून वाचक हा विषय जिज्ञासेने लक्षपूर्वक वाचताहेत हे या लेखाच्या यशाचे दर्शक आहे. अभिनंदन.
सुधीर, तुम्ही अगदी माझ्या मनातले बोललात. मी सुरुवातीपासून मिपाचा सदस्य आहे. अधून मधून इथे येऊन नवे लेखन पहात असतो. आपण त्यापेक्षा वेगळे काही दिल्यास ते कितपत स्वीकारले जाईल ही शंका मनात असतेच, पण देऊन तरी पहावे, काहीजणांनी वाचले तरी माझ्या प्रयत्नांमागचा माझा हेतू साध्य होईल असा विचार मी केला होता. इतर धाग्यांच्या तुलनेत या लेखावरील प्रतिक्रिया नगण्य असल्या तरी त्या अर्थपूर्ण आहेत. फायदा तोटा यासारखे विवादास्पद मुद्दे यात आणू नयेत ही माझी अप्रत्यक्ष सूचनासुद्धा सूज्ञ वाचकांनी मान्य केलेली दिसते. या सगळ्याबद्दल मी समाधानी आणि वाचकमित्रांचा आभारी आहे.
विश्वात कोणतीच गोष्ट सरळ जाउ शकत नाही. ज्यात नजिकच्या दुसर्या गोष्टीचे गुरूत्वाकर्षण तोडण्याची काही कारणाने क्षमता आहे अशीच वस्तू या बंधनातून काही काळ सुटेल पण पुन्हा दुसर्या बंधनात अडकेलच !
आपले लेख खरोखर सुंदर झाले आहेत. सोप्या भाषेत लिहिलेल्या विज्ञानविषयक लेखनाचे मराठीत प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. अधिक लेखनाची अपेक्षा आणि आशा आहे. हिग्ग्स-बोसॉन, स्ट्रिंग थिअरी, सर्नचे काम, अणुऊर्जा (पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर) यावर वाचायला आवडेल. अशा लेखनामुळे माहिती तर मिळतेच, शिवाय पारिभाषिक शब्दांच्या निर्मितीला हातभार लागतो.
धन्यवाद.
आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. हिग्ग्ज बोसॉन पार्टिकल्सवर मी अणू, रेणू आणि देवाचा कण - भाग १,भाग २ आणि भाग ३ असे तीन लेख लिहिलेले आहेत. आणुशक्ती हा तर माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यासंबंधी मी अनेक लेख लिहिलेले आहेत. मिपावरील वातावरणाशी ते सुसंगत न वाटल्यामुळे अजूनपर्यंत इथे दिले नाहीत. पुढे मागे त्याचा विचार करावा असे आता वाटू लागले आहे
घारे साहेब, अणूशक्तीवरील लिखाणही इथे द्याच, कूडनकुलम येथल्या अणूशक्तीकेंद्रातील विद्युतनिर्मितीच्या निमित्ताने सुरू झालेल्या चर्चेत शास्त्रीय माहिती मिळाली तर हवीच आहे.
हा मंगळावरील लेख आवडलाच (आणि रविवारी मंगळयानाने पृथ्वीची कक्षा सोडून मंगळाच्या दिशेने झेप घेतल्याचं वाचल्यावर तुमच्या 'अपडेट'ची अपेक्षा होतीच, ती पूर्ण केल्याबद्दलही धन्यवाद!)
आणखी ३०० दिवसांनी मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहोचेल, तोपर्यंत ISRO च्या नियोजन केंद्राशी मंगळयानाचा संपर्क कसा आणि काय वारंवारितेने होईल? तो नियमित असेल तर इथे कृपया 'अपडेट' देत चला ही विनंती.
१ डिसेंबर रोजी पृथ्वीला टाटा बाय बाय करून मंगळाला भेटायला निघालेले मंगलयान आता सूर्याभोवती फिरत आहे. ते अपेक्षित मार्गक्रमण करत आहे की नाही यावर अनेक निरीक्षणकेंद्रांमधून बारीक लक्ष ठेवले गेलेले आहेच. रेल्वेगाडी रुळावरून धावत असते, रूळ जसे जोडले गेले असतील तशी ती जात असते. इंजिन ड्रायव्हर या बाबतीत काहीही करू शकत नाही. मोटारगाडी चालवणारा ड्रायव्हर रस्त्यावर नजर ठेवून स्टीअरिंगच्या सहाय्याने गाडीला दिशा देत तिला रस्त्यावर ठेवत असतो. हवेत उडणा-या विमानांमध्ये अत्यंत अचूक उपकरणे (इन्स्ट्रुमेंट्स) असतात. त्यांच्या सहाय्याने विमान नेमके कुठे आहे आणि ते कुठे असायला हवे वगैरे माहिती पायलटला मिळते आणि तो दिशा बदलू शकतो. विमानतळ जवळ आल्यावर ग्राउंड स्टाफकडून त्याला नेमक्या सूचना मिळतात. कार ड्रायव्हर आणि पायलट यांना जमीनीवरील जागा दिसत असतात आणि त्यांच्या रेफरन्समध्ये त्याला आपले वाहन कुठे आहे आणि त्याला कुणीकडे न्यायचे आहे वगैरे समजते.
मंगलयानमध्ये कोणी अॅस्ट्रोनॉट नाहीच. त्यावर ठेवलेल्या इन्स्ट्रुमेंट्समधून जे संदेश पृथ्वीवरील केंद्रांना येतील त्यांच्यावरूनच ते कुठे आहे हे इथले शास्त्रज्ञ ठरवतात. या यानाच्या सर्व बाजूंना अथांग पोकळी पसरलेली आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण यासारख्या दिशांना फक्त पृथ्वीवर अर्थ आहे. अवकाशात त्या अस्तित्वातच नसतात. पृथ्वीवरून पाहता दूरच्या तारकांच्या संदर्भातच इतर ग्रहांच्या जागा ठरवल्या जातात. काहीशा तशाच प्रकारे मंगलयान कुठे आहे हे ठरवावे लागते. यातही आणखी एक अडचण अशी आहे की पृथ्वी स्वतःच स्थिर नसून तिच्या कक्षेत वेगाने फिरत आहे. मंगलयान एका वेगळ्या कक्षेत फिरत आहे. त्यामुळे त्याचे कोणतेही निरीक्षण सापेक्ष असते. ते यान सध्या पृथ्वीपासून २९ लाख किलोमीटर्स इतके दूर आहे आणि त्याला संदेश पाठवून उत्तर मिळवायला सुमारे वीस सेकंद लागतात.
रस्त्यावरून कार चालवत असतांना वेग वाढवला किंवा कमी केला तरी गाडी त्याच रस्त्याने जात राहते. अवकाशातले नियम वेगळे आहेत. तिथे वेग वाढवला तर कक्षा अधिक लंबवर्तुळाकार होते आणि कमी केला तर ती कमी लंबवर्तुळाकार होते. वेग फारच कमी केल्यास ती वस्तू स्पायरलमध्ये गिरकी घेत केंद्रबिंदूपाशी असलेल्या ग्रह किंवा ता-यावर जाऊन आदळते. मंगलयानाची दिशा वळवण्यासाठी त्या यानावर ठेवलेले थ्रस्टर्स विशिष्ट दिशेला फिरवून ४० सेकंदांसाठी चालवले (फायर केले) गेले. यामुळे ते यान अपेक्षित मार्गावर आले. एप्रिल २०१४ आणि सप्टेंबर २०१४ मध्ये पुन्हा अशा प्रकारचे करेक्शन करायची योजना आहे.
यातही आणखी एक अडचण अशी आहे की पृथ्वी स्वतःच स्थिर नसून तिच्या कक्षेत वेगाने फिरत आहे. मंगलयान एका वेगळ्या कक्षेत फिरत आहे. त्यामुळे त्याचे कोणतेही निरीक्षण सापेक्ष असते.
असं असतांना (म्हणजे मंगलयानाची पृथ्वी-सापेक्ष स्थिती कायम बदलत असतांना) यापुढील एप्रिल २०१४ पर्यंतच्या काळात ISRO च्या मुख्य कक्षाचं communication आणि यानावर नियंत्रण कसं राखलं जाईल? "दिशा"हीन अवस्थेत global positioning system वगैरे उपलब्ध नसेल असा समज असल्याने थोडासा गोंधळ उडाला आहे....
पृथ्वीच्या सभोवार फिरत असलेल्या कृत्रिम उपग्रहांकडून केलेल्या निरीक्षणावर जीपीएस अवलंबून असल्यामुळे ते फक्त पृथ्वीच्या संदर्भात असते. अवकाशामधील कृत्रिम उपग्रहांवरून येणार्या संदेशाची अंशात्मक (अँग्युलर को ऑर्डिनट्स) दिशा आणि त्याला लागणारा वेळ या माहितीवरून त्यांचे ट्रकिंग केले जात असावे. कोठल्याही क्षणी असलेले अवकाशामधील पृथ्वीचे स्थान, तिच्या स्वतःभोवती फिरत असतांना तिच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी (अक्षांश व रेखांशावर) प्रयोगशाळा असतील त्यांची त्या क्षणी असलेली स्थिती. वगैरे सर्वांचे गणित घालून ते करावे लागते. खूप सक्षम असा संगणकच हे करू शकतो.
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण यासारख्या दिशांना फक्त पृथ्वीवर अर्थ आहे. अवकाशात त्या अस्तित्वातच नसतात.
हे विचार मी ही यापूर्वी इथे मिपावर मांडले आहेत. माझ्या मते फक्त स्थान व्यवहारासाठीच दिशा या संकल्पनेचा ऊपयोग होतो. म्हणून दिशा या संकल्पनेवर आधारलेले " वास्तूशास्त्र" हे सुडो सायन्स असून लोकांची फसवणूक करण्याचे उत्तम (?)साधन आहे असे माझे ठाम मत आहे.
हा विचार येथे आपण मांडल्याबद्द्ल धन्यवाद !
पृथ्वीवरसुद्धा उत्तर ध्रुवावर सगळ्या बाजूला दक्षिण दिशा असते आणि दक्षिण ध्रुवावर चोहीकडे उत्तर दिशा असते.
या लेखाचा विषय नसला तरी वास्तुशास्त्राबद्दल मी आपणाशी सहमत आहे. यात ऊन वारा वगैरेंचा दिशांनुसार विचार केला आहे असे म्हंटले तरी एकच विचार जगभरात सगळीकडे लागू पडत नाही. निरनिराळ्या भागातली स्थानिक परिस्थिती भिन्न असते. सर्वसाधारणपणे आपल्याला पाऊस हवासा वाटतो, इंग्रजांना तो नकोसा वाटतो. अमुक ग्रह तमक्या राशीमध्ये आला वगैरेसुद्धा आभास असतात. राशींच्या ठराविक जागा, त्यांच्यामधील सीमारेषा वगैरे काहीही आकाशात अस्तित्वातच नाहीत त्यामुळे कुठल्या ग्रहाने तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही.
अमेरिकेचं NASA चं Maven हे यान मंगळाच्या कक्षेत पोहोचल्याचं वृत्त आल्या पाठोपाठ, ९ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आज झालेल्या अखेरच्या यशस्वी rocket thrust नंतर २४ सप्टेंबरला भारतीय "मंगलयान" मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याची सुचिन्हे आहेत!
या अभूतपूर्व घटनेची नोंद जागतिक माध्यमांनी घेतली नसती तरच नवल. Forbes मधल्या वृत्तात ही वाक्ये आहेतः
If it does enter the Martian orbit on Wednesday, India will become the first Asian country to do so and join a select group consisting of missions from the American, Russian and European space agencies. India will however have the distinction of becoming the only country to reach the orbit of Mars in its first attempt. (चीनची मंगळमोहीम २०११ मध्ये फसली होती.)
भारतानी मंगळाला गवसणी घातली. सर्व इस्रो शास्त्रज्ञ, अभियंते आणि कर्मचार्यांचे अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. एवढं मोठं यश पहिल्याच प्रयत्नात मिळाल्याचा मान फक्त भारताला मिळाला आहे. :) :)
जगद्विख्यात 'नेचर' नियतकालिकाच्या Ten People Who Mattered This Year या वर्षअखेरच्या दहा मानकर्यांच्या यादीत इस्रो चे संचालक डॉ. कोपिल्लील राधाकृष्णन यांचा समावेश केला गेला आहे. [KOPPILLIL RADHAKRISHNAN: Rocket launcher]...Radhakrishnan says that India's space plans should not be judged against those of other countries: “We are not racing with anyone. We are only racing with ourselves.”
प्रतिक्रिया
सुन्दर माहीती
सुंदर सोप्या भाषेत माहिती.
सुंदर माहिती
सुरेख माहिती..
पूर्वार्ध
मंगल यान हे प्रदीर्घ कालावधी
सौर ऊर्जा
मंगळावर जाऊन आलो...
मस्त!
सुंदर !
छान लेख
छानच
मंगलयानाचा प्लॅन
ह्याच अनुषंगानं, चंद्रावर जे
चंद्रावर पाऊल
आठवण आली...
या यानाच्या मंगळाभोवतीच्या
मंगलयानाची कक्षा
थोड़े विदन्यान थोड़ी गंमत
मंगलयान मार्गी
मंगळ्यानाचा प्रवास.
क्रुपया : समजा जर गेलेच तर
सूर्याचे गुरुत्वाकर्षण
छान माहीती
सोप्या भाषेत छान माहिती ......
वाचकांचा इंटरेस्ट
यचाच अर्थ असा की ...
जग हे बंदीशाला...
आपले लेख खरोखर सुंदर झाले
इतर वैज्ञानिक विषयांवरील लेखन
घारे साहेब, अणूशक्तीवरील लिखाणही इथे द्याच,
मंगलयानला मार्गावर आणले
धन्यवाद!
यातही आणखी एक अडचण अशी आहे की पृथ्वी स्वतःच स्थिर नसून तिच्या कक्षेत वेगाने फिरत आहे. मंगलयान एका वेगळ्या कक्षेत फिरत आहे. त्यामुळे त्याचे कोणतेही निरीक्षण सापेक्ष असते.असं असतांना (म्हणजे मंगलयानाची पृथ्वी-सापेक्ष स्थिती कायम बदलत असतांना) यापुढील एप्रिल २०१४ पर्यंतच्या काळात ISRO च्या मुख्य कक्षाचं communication आणि यानावर नियंत्रण कसं राखलं जाईल? "दिशा"हीन अवस्थेत global positioning system वगैरे उपलब्ध नसेल असा समज असल्याने थोडासा गोंधळ उडाला आहे....जीपीएस आणि पृथ्वी
धन्यवाद यासाठी
सहमत
दोन दिवसांत भारतीय "मंगलयान" मंगळाच्या कक्षेत!
प्रचंड माहितीपूर्ण लेख.
पोहोचले. त्या यानावर एक
भारतानी मंगळाला गवसणी घातली.
सर्व इस्रो शास्त्रज्ञ, व भारतीय जनतेचे अभिनन्दन
या मोहिमेतल्या सर्व
+१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित+२
+३
+४
+५
'नेचर' च्या या वर्षीच्या मानकर्यांमध्ये डॉ. राधाकृष्णन
Radhakrishnan says that India's space plans should not be judged against those of other countries: “We are not racing with anyone. We are only racing with ourselves.”