Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाचताना आमचीच यान बनुन उडायची वेळ आलती . :-)

@मग़ त्याने डोळे चोळत आपल्या हातातील ते यान पाहिले तर ते ग़रम झाले होते, बहुतेक ते उडल्यामुळे की हातात धरल्या मुळे हे माहीत नव्हते, पण त्याने यानात पाहिले तेव्हा त्या मध्ये तो यान चालवणारा तेथे नव्हता, ह्याचे मात्र त्याला आश्चर्य वाटले. >>> http://www.pic4ever.com/images/bl2.gif कुनी काई बी म्हना आपला दावा आहे... जिवनभाऊ मिपा'चा लेख कू छावा आहे. http://www.pic4ever.com/images/1522.gif

जिवु काका हा लेख मुक्तपिठ मध्ये द्या .... खरच छान लिहिलयत , अगदि यानात कधी बसेन आणि उडेन असं झालय मला खुप छान ... मस्त लेख खरच मुक्तपिठ मध्ये द्या , तुम्हालाहि यानातुन फिरवुन आणतिल तिथले प्रतिसाद .... आवडला ... ज्याम आवडला ....

आपण या विश्वात किती लहान आहोत ना? तरीपण लोक स्वत:ला किती मोठे समझतात ना,
असेच म्हणते.
त्यावेळी मात्र हे वादळ शांत करण्यासाठी त्याच्या पप्पांना मात्र हाताचा वापर करावा लाग़े, मात्र त्याच्या आशेवर पाणी पडत आसे
:)) मात्र! मात्र! मातेर!
पण तो उभा राहुन ही पेगत आसे हे कोणाला माहीत नसे.
अस कस? कायतरी गडबड आहे. असो. मुवि कुठाहेत? पूजा इथुन पुढे मुविंची वाट पहायची. पहिला प्रतिसादाचा नारळ मुविच फोडणार.

पेगत???
अरेच्चा , हे बालसाहित्य एकदम वयात आले की काय ? एक्दम पेग मारायला लागले आहे?

ज़ीव़ऩ भा़उ़ंच्या़ अतिशय बारीक बारीक बारकावे ठळकपणे दाखवणार्‍या लिखाणाचा पंखा आहे

एक राहिलचं, वरचा लेख मी वाचलेला नाही हे सगळे मागील अनुभवाचे बोल....

अप्रतिम लेखन ! असा लेखक मिपावर गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही !! ( जिवनभाउ, आता छान छान म्ह्ट्लय की नाही ?... आता थांबायच हं !) यांना काही दिवस लेखन संन्यास घ्या हे सभ्य आणि योग्य भाषेत ( बाळ हो ते, मन कस दुखावायच ) कसे सांगावे या विवंचनेत असलेला...

नाय नाय ह्ये चालणार नाय... जीवनभौ तुम्ही मागे हटू नका, आम्ही हाओत तुमचे पंखे. आता माघार घ्यायची नाय, अरे चर्चा तर होणारच... पुढचा लेख येणारच...

यासाठी मार्वल नामक संस्थानाला धन्यवाद द्यावे लागतील. या शहरात रहाणार्‍या लोकांना अजून कळले नाहीये की ते या शहराचे नाव आहे की काम. (तुम्हाला काय वाटलं आम्ही सारखे सारखे पृथ्वीवर कशाला येतो? लवकरच इकडे रेशनकार्डावर नाव लावून घेणारे बगा.)

हो का? मग़ चला लवकर मला पाहयाला खुप आवडते,'आकाश आंनदाने म्हणाला
काय पाहायला आवडते ते पण पुढच्या वेळी लिहीत चला ! उगीचच मनात नसत्या शंका येतात हो....

___/\___ तुमच्या भाषांतरासारखाच. ;) बाकी ते 'ग़ुग़ं' लिहायला बराच त्रास झाला मला. तुम्हाला चटकन जमला ना जीवनभौ? -राँर्बट प्यारे

हा कुण्या जुन्या मिपाकराचा डु आय डी असावा असा दाट संशय ! कंपुबाजीचे बाळ्कडु उपजतच आहे .. . . . . संपादक मंडळाचे इकडे लक्ष आहे का ?

छान लिहलयस. फक्त तुजी शैली बदलू नकोस. "सग़ळ्याच्या मना वेगळा" मधे 'वेगळा' हा 'वेग़ळा' असा हवा होता. बाकी कथाबिज भ्ल्तच सशक्त आहे हे मान्य केलेच पाहिजे.

हत्ती चालला की कुत्री भुंकतात , तुमच्या पुढच्या लेखनाला शुभेच्छा ! 242 वाचने>> बघा तुमचा वाचक वर्ग केवढा मोठा आहे..

लहानपणी किशोर, ठकठक इ. मासिकांत अश्या कथा असाअच्या. आजकाल ही मासिके बहुतेक निघत नसल्याने किंवा निघूनही कुणी वचत नसल्याने जी पोकळी तयार झाली होती ती जीवनभाऊंच्या या कथेने भरून निघाकी. पोकळ्या तयार झाल्याचे आपण कितीदा वाचतो / ऐकतो पण पोकळी भरून काढल्याचे काम सहसा दिसत नाही. हे असेच एक दुर्मिळ उदाहरण.

>>>>मग़ तो स्पाइडर मँन सारखे उडायचा प्रयत्न केला , पण जेव्हा त्याच्या पायाला लाग़ले तेव्हा त्याचे प्रयत्न बंद झाले. हे भारीच......पायापेक्षा डोक्याला लागले असते तर बरे झाले असते.....

एका लहानग्या जिवामार्फत त्यांनी पोहोचवलेले त्यांच्या संवेदनशील मनातले झंकार म्हणजे जीवनभौची ही कथा. रुपकात्मक ललितबंध म्हणून ह्या कलाकृतीकडे बघितल्यास जीवनभौचा ह्या प्रकारतला हातखंडा दिसून येतो. वर्तमानाच्या परिप्रेक्षात बालमनाच्या परिप्रेक्षातून बघायला लावणे ही जीवनभौची खासियत आहे. विश्वाचा पसारा, त्यापुढे मानवाचे खुजेपण आणि सांप्रतची मनुष्याची 'लार्जर दॅन लाइफ' होण्याची लालसा ह्यावर मार्मिकतेने केलेले भाष्य मन मोहवून जाते. त्यासाठी त्यांनी खुबीने वापरलेले 'आकाश' हे त्या मुलाचे नाव आणि त्या मुलाला पडणारे निरागस प्रश्न ह्यातून जीवनभौची प्रतिभा दृष्टीगोचर होऊन जाते. वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व त्यांना समजले असल्याने त्यांनी विज्ञान प्रदर्शन, अवकाश, प्लॅस्टिकचे अवकाश यान ह्यांची रुपकात्मक सांगड कथेत इतक्या सहजपणे केली आहे की जीवनभौचे असामान्यपण त्यातुन अलगद उलगडले जाते. 'आसा कसा रे तु वेग़ळा वेग़ळा, आसा का वाग़तोस सग़ळ्याच्या मना वेगळा ,' ह्या ओळीतून त्यांचे बहुआयामी व्यक्तीमत्व कळून येते आणि कथेशी वाचक चक्क एकरुप होतो. - (समिक्षक) सोकाजी