Welcome to misalpav.com
लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पु. ना हे व्यक्तिमत्त्व एक इतिहासज्ञ, ताजमहालसंबंधातले सत्य समाजापुढे आणण्यासाठी अथक प्रयत्न करणारे म्हणून ठाऊक होते. आझाद हिंद सेनेचे अधिकारी देखील होते हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. पुभाप्र धन्यवाद.

याचा इतका शॉर्टफॉर्म काहींना सिक्सर म्हणून डोक्यावरुन जाईल. शीघ्र कार्रवाई करायला हवी. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

ताजमहाल नव्हे तेजोमहाल हे लिहिणारे पु ना ओक ते हेच? ते कॅप्टन होते का?..हि नवीन माहिती वाचून आनंद झालं...त्यांच्याविषयी अजून कुठे माहिती मिळेल का? कृपया अजून थोडे तपशील द्याल का?

नेताजींभोवती एक वलय निर्माण झालं होतं हे खरं आहे. त्याची सुरूवात झाली ती त्यांनी १९४१ नजरकैदेतून स्वतःची बेमालूमपणे सुटका केली तेव्हा. ते अदृश्य झाले आणि अफगाणिस्तानमार्गे गुप्तपणे जाऊन एकदम रशियात प्रगट झाले. शिवाजीने औरंगजेबाच्या तावडीतून सुटका करून घेण्यासारखीच ती जादूई घटना होती. त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ते भारतात नव्हते. संपूर्ण वातावरणच प्रचंड गोंधळाचं होतं. दुसरं महायुद्ध चालू होतं, आजाद हिंद सेना ज्या जपानी सेनेचा साथ करत होती तिचा पराभव झाला होता. अशा वातावरणात आपला लाडका नेता गेला याचं दुःख सहन होणं कठीण होतं. त्यातही बातमी इतक्या दुरून आली असल्यामुळे ही नेताजींचीच पुन्हा गुप्त होण्यासाठीची चाल असावी यावर विश्वास बसणं सहज शक्य होतं. त्यामुळे ते खरोखऱ गेले नाहीतच यावर विश्वास बसला, आणि तो टिकून राहिला. दुर्दैवाने अनेक विश्वास असे असतात की जे बदलणं कठीण असतात. सत्य समोर आलं तरी ते रिपोर्टांतून येतं, त्यामुळे हे रिपोर्टच खोटे आहेत, तपास करणारांचा काहीतरी अंतस्थ हेतूच आहे अशा धारणा करून सगळंच नाकारता येतं. अशा वातावरणातच कॉन्स्पिरसी थियरीज मूळ धरतात, तगतात, आणि वाढतातही.