Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

श्री. जयन्त कुलकर्णी, एव्हढी सुन्दर व सकस लेखमाला सादर केल्याबद्दल आपले शतशः आभार व धन्यवाद. ! पुन्हा पुन्हा वाचुन काढावे असे आपले लेखन असते हे निर्विवाद, आपली लेखनशैली ओघवती, उत्कन्ठा वाढविणारी, खिळवून ठेवणारी, आनन्द देणारी व उच्च दर्जाची हा माझा अनुभव.
मित्रहो, अशा रितीने ही दहा युद्धकथांची भली मोठी मालिका येथे संपली असे जाहीर करतो. या दहा युद्धकथांचे एक पुस्तक काढावे असा विचार आहे. .............:-)
याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा. ! पुस्तक काढाच.
आता परत भेट केव्हा.......ते माहीत नाही.....
असे का ???? पुन्हा आभार व धन्यवाद. विनोद१८

"आता परत भेट केव्हा.......ते माहीत नाही....." हे मात्र नामंजूर.... तुम्ही आणि तुमच्या सारखी असंख्य मंडळी इथे लिहीता म्हणून तर माझ्या सारखी मंडळी इथे टिकून आहेत. त्यानुळे निदान आमच्या सारख्या वाचकांसाठी तरी लिहा, ही जाहीर विनंती आहे.

मी ही लेखमाला पहिल्यापासून वाचत होतो. छानच आहे. पुस्तक काढाच. पहिला नंबर माझा असेल.

नुसती लेखमाला वाचतानाच कसंनुसं होत होतं... तुम्ही तर या सगळ्याचा अभ्यास करता, त्यावर मनन चिंतन करता. आणि कुठलाही अभिनिवेष न आणता शक्य तेव्हढं न्युट्रल राहुन हा जहाल इतीहास आमच्या पुढे ठेवता. हॅट्स ऑफ्फ टु यु सर.

भारल्यासारखे सगळे भाग परत वाचून काढलेत. भीषण काळ होता तो. कर्स्टनचे कौतुक आहे खरोखरच. ब्रान्टला फाशी दिली गेली हे वाचून फार वाईट वाटलं...

>>> आता परत भेट केव्हा....... आरामात होऊ द्या. असल्या लिखाणाने शीण जाणवणारच. आम्हाला नुसतं वाचून दडपायला होतं. -पुढची चांगली मालिका येणार ह्याबद्दल निश्चिंत असलेला प्यारे

क्रौर्याची परिसीमा गाठणा-या काळात प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून माणूसकीचा झरा वाहत ठेवणा-या कर्स्टनला खरोखरीच मानाचा मुजरा.. जयंतजी अफलातून लेख मालीका प्रचंड आवडली.. मात्र अशाच घडमोडींवर आपले लेख वाचत रहायला आवडेल.

सग्ळे भाग वाचले.त्याकाळात असेही काही लोक होते हे पाहुन चांगले वाटले.परंतु ब्रान्टला फाशी दिली गेली हे वाचून फार वाईट वाटलं. तुम्ही पुस्तक अवश्य लिहा!!

सगळ्या मालिका आवडल्या. अप्रतिम ओघवत्या भाषेत लिहील्या आहेत. जणु काही आपण त्या त्या पात्रांबरोबरच त्या त्या प्रसंगात आहोत असं वाटत होतं. मला वाटत यातच लेखमालिकेचं यश आहे. पु.ले.शु. - वाट्या..

खूप आवडले सर.. पण काही शंकासुद्धा आहेत. कर्स्टनने मदत नक्कीच केली असणार पण थोडीशी अतिशयोक्तिसुद्धा वाटत आहे. जर त्याने एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर ज्यू वाचविले होते तर त्याला युद्ध संपल्यावर दोस्त राष्ट्रांनी विशेषकरून इस्त्रायलने डोक्यावरच घ्यायला हवे होते. गूगलवरसुद्धा ही शंका व्यक्त केली आहे. अर्थात इतिहास लेखन हा प्रकार फार क्वचितच प्रांजळपणे व त्रयस्थ दृष्टिकोनातून केला जातो. अगदी ह्यात अमेरिकन वा ब्रिटिश इतिहासकारसुद्धा अपवाद नाहीत. डिस्कव्हरी हिस्टरी चॅनल्सवरच्या कितीतरी डॉक्युमेंटरी पाहताना हे सहज उमजून येते. दोस्त राष्ट्रांना मोठे करण्यासाठी अगोदर जर्मनी किती शक्तिशाली आणि तितकाच क्रूर दाखवायचा मग नंतर देवदूतासारखे दोस्त सैन्य (त्यातही शक्यतो अमेरिकनच.. इतर अनेक जसे फ्रेंच, ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंड्स, भारतीय सैनिकांच्या शौर्याला अश्या माहितीपटांमध्ये फारसे स्थान नसते) अवतरते आणि मग परिकथेच्या शेवटासारखा आनंदीआनंद होतो. मी जर्मनीच्या वा हिटलरच्या क्रूरतेची भलावण करत नाही पण तथाकथित दोस्त राष्ट्रांचे (इंग्रज आपले दोस्त नव्हतेच, आपण त्यांचे गुलाम म्हणूनच दुसर्‍या महायुद्धात पहिल्या दिवसापासून होतो) मातीचे पाय कधीच दाखविले जात नाहीत ह्याबद्दल माझा आक्षेप आहे.