Welcome to misalpav.com
लेखक: बुडबुडा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बरोबर. सवाईलाच मी एकदा पहिले होते कि एक जर्मन पिता-पुत्र दोन कार्यक्रमांच्या मध्ये मागे जाऊन काहीतरी खायला घेऊन आले त्यांनी भारतीय बैठक मांडली होती तिथे बसून त्यांनी ते खाऊन घेतले आणि कागद वगैरे सर्व गुंडाळून एका पिशवीत भरून ती पिशवी परत आपल्या शबनम मध्ये ठेऊन पुढचा कार्यक्रम पाहण्यात दंग झाले. तुमच्या मुद्द्यावर मी एका पुणे काराबरोबर इतका भांडलो कि पोलीस आले आणि मला म्हणाले "जाऊ द्या हो दंगा करू नका " आणि पुणेकर (सपत्नीक असल्याने )"येतोस कशाला त्रास होतो तर..?" तेव्हा तुमचा दर्द मी समजू शकतो. असो यंदा जमले नाही दुर्दैवाने.

हा माझा लेख वाचा उलगडा होईल राव (माझ्याबरोबर आणि कुणी होते जे त्यांच्याशी बोलत होते त्यांनी माहिती दिली.)सगळे डी ट्टेल लागते बुवा सगळ्यांना ....

काल माझ्याशेजारी बसलेला एक कोल्हा... येणार्‍या/जाणार्‍यांना अजिबात वाट न देता..यांच्यामुळे "रसभंग" होतो,म्हणून बोंबलत होता..आणी स्वतःच्या ऑफिसमधले फोन आल्यावर अतिशय निर्लज्जपणे १०/१० मिनिटं फोनवर बोलत होता. मी दोनचार वेळा त्रासिक नजरेनी त्याच्याकडे पाहिल्यावर सुद्धा त्याचा नूर बदलला नाही. नंतर मधे चहा आणायला उठला,तेंव्हा बाकिच्या लोकांनी त्याच्या नावानी यथेच्छ शिव्या मोजल्या...आणी मी सॅकमधली टाचणी काढून त्याच्या बसायच्या जागी जाजमात लावती, नंतर ती त्याच्या मांडीला टोचली,आणी तो हंगामा करत पुढे बसायला निघून गेला. =)) (शेवटी जसराज सुरु झाले होते..तेंव्हा!)

.आणी मी सॅकमधली टाचणी काढून त्याच्या बसायच्या जागी जाजमात लावती, नंतर ती त्याच्या मांडीला टोचली,
ते आधी मिरच्या लावून नंतर त्यावर रक्तचंदन लावलं तसंच का? ;)

शीर्षक वाचून चपापलो ! पुन्हा पुन्हा बघितलं... त्यातला अनुस्वाराचा अभाव अनर्थ करतोय शीर्षकाचा :D :) :P तेवढं जरा सांभाळा बरं का :D

शीर्षकात "गाणं की खाणं" अशी दुरुस्ती तेवढी करा बरं संपादकांना विनंती करुन .... बाकी पुण्यात पीएमटीसारखी सवाईची पण तीच कहाणी आहे वर्षानुवर्षं!

वेल्लाभट, आतिवास मिपा वरती नवीन आहे आणि त्यात मराठी टाइप करताना जरा गोंधळ होतोय.. पहिलेच लेखन आहे.. यावेळी समजून घ्या.. पुढच्या वेळी अशी चूक नाही होणार.. कृपया अर्थाचा अनर्थ न करता वाचावे हि विनंती :) सदर शीर्षक एडिट कसे करावे हे सांगितले तर बरे होईल..

मिपा वरती नवीन आहे अरेच्चा कायतरी गोंधळ होतोय. मस्तकलंदर या नावाची एक व्यक्ती इथे चार वर्षापूर्वी वावरत होती. ती बेंगलुर ला असायची.

गुरुमहाराज आपण कृपा केलीत तर आम्हालाही हि सिद्धी प्राप्त होऊ शकते.. कृपया या पामरास कसे केले ते सांगून उपकृत करावे ;)

एके काळी पुण्यात असताना "तुंम्ही सवाई ला जात नाही?" (म्हणजे तुमची अभिरुची किती हीन आहे) किंवा "मी फक्त भीमसेन ऐकतो. बाकीचे काय आहेत असे तसे" असे बर्याच "रसिक आणी प्रतिष्ठित" लोकांकडून ऐकत असे. सुदैवाने तेंव्हा भ्रमणध्वनी नव्हते. आता काय परिस्थिती आहे ते जरा विस्ताराने कळेल काय?

हो, अजूनही असा एक वर्ग आहे, ज्यांच्या मते सवाई ला न जाणे हे अत्यंत अरसिकपणाचे लक्षण आहे. आणि यापैकी खरोखर गाण्याची आवड असणारे किती आणि केवळ रसिकता दाखवण्यासाठी जाणारे किती हे देवच जाणे.

पुणेकरांना हल्ली घरी खायला मिळत नाही असल्या हपापलेपणाने बाहेर खात असतात. कित्येक दळभद्री रस्त्यावर हातात घेऊन चालत चालत खातात.

पुणेकरांना हल्ली घरी खायला मिळत नाही असल्या हपापलेपणाने बाहेर खात असतात. कित्येक दळभद्री रस्त्यावर हातात घेऊन चालत चालत खातात. हि मूळ स्टाईल मुंबईकरांची, पुण्याने अनुकरण करायला सुरुवात केली असेल तर कल्पना नाही. हा पण मुंबईत यात दळभद्रीपणा किंवा हपापलेपणा दिसत नाही हे हि खरे, सूट होते, स्टायलिशच वाटते !

पुणेकरांना हल्ली घरी खायला मिळत नाही असल्या हपापलेपणाने बाहेर खात असतात. कित्येक दळभद्री रस्त्यावर हातात घेऊन चालत चालत खातात.>>> =)) =)) =)) =)) =)) आयच्च्या गावातं ......काय प्रतिसाद आहे !!!!!!!!!

गाणं आणि खाणं दोन्हीही लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असतात, अर्थातच त्यांनी एकमेकांचा रसभंग करू नये याचं सर्वांनाच तारतम्य असायला हवं. असो, नामसाधर्म्याचं थोडं आश्चर्य वाटलं.. आता जशी मी अर्धवट आणि अर्धवटराव यांच्यामध्ये गोंधळते तसं होईलसं वाटत होतं पण आता लेखनशैली पाहिल्यावर ती शंका राहिली नाही. हुश्श!! (ओरिगिनल) मक/मकी

पण आता लेखनशैली पाहिल्यावर ती शंका राहिली नाही. हुश्श!! मलाही आश्चर्य वाटलं होतं चूक आणि एकंदर लेख पाहून - आता 'ती मी नव्हेच' हा खुलासा झाला .. हुश्श :-)

मिपा वरती नवीन आहे आणि त्यात मराठी टाइप करताना जरा गोंधळ होतोय.. पहिलेच लेखन आहे.. यावेळी समजून घ्या.. पुढच्या वेळी अशी चूक नाही होणार.. हे वाचल्यावर जरा गोंधळ उडाला होता, बर्‍याच दिवसांनी 'मक'चं लिखाण दिसतंय म्हणून वाचलं तर बाईसाहेब चेष्टा करताहेत असं वाटलं, पण नंतर 'कलन्दर' हे 'कलंदर' पेक्षा वेगळं आहे कळलं. लेखातील तळमळीची टीका पटली. सवाईतील रसिक श्रोते सिंगापुरातल्या कचराफेकू दंगलखोर कामगारांपेक्षा सुसंस्कृत असतील अशी आशा होती. (अवांतरः मस्त कलंदर् - तुमच्या लिखाणाची वेळ उलटून गेलीये, कधी लिहिताय?)

>>दिवसांनी 'मक'चं लिखाण दिसतंय म्हणून वाचलं तर बाईसाहेब चेष्टा करताहेत असं वाटलं अनुस्वाराबद्दलचे प्रतिसाद वाचून मलाही प्रश्न पडला मकमावशी शुद्धलेखनात कशी काय चुकली!! ते 'कलन्दर' वाचून ट्युब पेटली.

बहुतांश पांढरी चिपाडं आलेली... गाण्यातलं ओ की ठो कळत नसावे... स्टॉलवर भिकार्यासारख्या नजरेने पदार्थांकडे बघत होते ...काही पांढरे गेंडेपण होते...सवाई म्हणे PBCA लोकांचा मेळावा वाटायला लागला आहे..

!!! किती किती ते पूर्वग्रह? आणि असं एका वाक्यात पार निकाल लावायचं एक अप्रतिम उदाहरण. चालू द्या. शुभेच्छा.

मकीचा धागा म्हणुन घाई घाईनं उघडला. पुढले काही प्रतिसाद आणि ती विश्वविख्यात स्वाक्षरी न दिसल्याने गोंधळही उडाला . पण पुढे डायरेक्ट 'घोडी'च्या तोंडुनच खुलासा आल्याने आमचाही जीव भांडयात पडला हो. :)