भौ सकाळ मधली कोणती बातमी ?
जरा लिंक द्या कि राव.
आणि तुमचा उद्रेक समजू शकतो पण देवयानी खोब्रगाडे यांच्याशी संबधित
बातमी मध्ये स्वतः बद्दल,शिक्षणा बद्दल माहिती देण्याचे प्रयोजन समजले नाही.
आणि त्या सकाळ मधील लेखा खालील प्रतिक्रियां बद्दल म्हणाल तर बरेचदा "उचलली जीभ लावली टाळ्याला"असा प्रकार असतो, कारण प्रत्यक्ष समोर जाब विचारणारे कोणीच नसते. त्यामुळे जालीय ट्रोलभैरवांचा मुक्त अड्डा असतो. या अशा प्रतिक्रियांनां आपण किती महत्व द्यायचे हे ज्याच्या त्याच्या प्रगल्भतेवर अवलंबून आहे.
एक राजनैतिक अधिकारी म्हणून त्यांना भारतातून नोकर नेता येतो. त्याकरता खास व्हिसा बनवून घ्यावा लागतो. ह्या बाईंनी अशा कामाकरता एका स्त्रीला निवडले. तिला अमुक एक पगार देऊ असे कबूल करणारे आफिडेव्हिट बनवले. पण दुसरेही आफिडेव्हिट बनवले जे खूपच कमी पगाराचे होते. अमेरिकेतील कायद्याप्रमाणे व्हिसाकरता अशी विसंगत कागदपत्रे बनवणे हा गुन्हा आहे. आणि तो खोब्रागडे बाईंनी केला आहे असे सकृतदर्शनी दिसते आहे. हा गुन्हा नोंदवण्याकरता पगार हातात टिकवायची गरज नाही असे दिसते आहे. व्हिसा कागदपत्रे पुरेशी आहेत.
एक राजनैतिक अधिकारी म्हणून बाईंनी जबाबदारीने वागायला हवे होते. कायद्याची बारकाईने माहिती घ्यायला हवी होती पण बाईंनी ते केलेले दिसत नाही.
कुठल्याही देशाच्या वकिलातीतल्या अधिका-याला अटक करता येत नाही. दूतावासाची आणि राहण्याची जागा ही त्या देशाची स्वतंत्र भूमी समजली जाते. तिथे अमेरिकन कायदे लागू होत नाहीत. तसंच कुठल्याही देशाच्या दूतावासात नोकर या नावाखाली महत्वाच्या ठरू शकणा-या व्यक्तींना नेण्यात येतं. याला अमेरिकाही अपवाद नाही. या व्यक्ती जर त्या देशाच्या काळ्या यादीत असतील तर मग येणकेण प्रकारेण कुठलेही विधिनिषेध न बाळगता, कायद्यांची बूज न बाळगता अटक केली जाते. भारतीय राजनैतिक अधिकारी रविंद्र म्हात्रे यांनाही अशीच अटक करून त्यांचा छळ करून हत्या झाली होती. अटक करताना ठेवलेले आरोप हे फुटकळ आणि हास्यास्पद असेच असतात. या प्रकरणी प्रीत भरारा या भारतीय वंशाच्या महिलेने तक्रार दिलेली आहे. संशयाला नक्कीच वाव आहे.
ई सकाळच्या प्रतिक्रिया हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. त्या मानाने महाराष्ट्र टाईम्सने ईमेल व्हेरीफिकेशन आणि मॉडरेशनची केलेली व्यवस्था स्तुत्य आहे.
डिप्लोमॅटिक इम्युनिटी नावाने एक संकेत पाळला जातो (पाळला जाणे अपेक्षित आहे) त्यानुसार वकिलातीतल्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट अटक करता येत नाही.इटलीच्या राजदूतांनी भारतीय मच्छिमार हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या इटालीयन मरीनना त्यांच्या देशात मतदानासाठी जाऊ द्यावे, "ते परत येतील हा शब्द माझा" असे आश्वासन इटलीच्या राजदूताने सर्वोच्च न्यायालयाला दिले होते.पण प्रत्यक्षात काही दिवस इटलीने या बाबतीत भारताला ठेंगा दाखविला.या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाला दिलेला शब्द मोडला म्हणून इटलीच्या राजदूताला अटक करणे या डिप्लोमॅटिक इम्युनिटीचा भंग झाला असता.फार तर त्या राजदूताला भारतात "persona non grata" जाहिर करून भारतातून जायला सांगणे शिष्टाचाराला धरून होईल. या प्रकरणीसुध्दा देवयानी खोब्रागाडे यांनी अमेरिकन कायदा मोडला असला तरी त्यांना ताबडतोब अटक करणे या शिष्टाचाराला धरून आहे असे वाटत नाही.त्यांना अमेरिका सोडायला सांगणे कधीही अमेरिकन सरकारच्या हातात होतेच.
तरीही एक wild imagination--जर का एखाद्या राजनैतिक अधिकाऱ्याने कुणा अमेरिकन नागरिकाचा खून करणे किंवा तत्सम गंभीर गुन्हा केला तर त्यालाही ही डिप्लोमॅटिक इम्युनिटी मिळेल की नाही याची कल्पना नाही.
भारतीय राजनैतिक अधिकारी रविंद्र म्हात्रे यांनाही अशीच अटक करून त्यांचा छळ करून हत्या झाली होती.
म्हणजे रविंद्र म्हात्रेंची हत्या इंग्लंडच्या सरकारने केली होती असे म्हणायचे आहे का तुम्हाला?तसे असेल तर ते चुकीचे आहे.रविंद्र म्हात्रेंचे अपहरण जे.के.एल.एफ या काश्मीरातील दहशतवादी संघटनेने केले होते आणि नंतर त्यांची हत्या त्याच संघटनेने केली होती.इतर देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्याला अटक करून त्याचा छळ करून हत्या करणे हा प्रकार इंग्लंडसारख्या देशाचे सरकार करणे (१९८४ म्हणजे अलीकडच्या काळात) शक्य नाही.
१९९२ मध्ये पाकिस्तानात भारतीय राजनैतिक अधिकारी राजेश मित्तल यांचे अपहरण करून त्यांचा छळ करण्यात आला होता.आणि नेहमीप्रमाणे पाकिस्तानने तो दोष "non-state actors" वर टाकला होता.
अवांतर: रविंद्र म्हात्रेंच्या हत्येबद्दल इंदिरा गांधींनी आठवड्याभरात मकबूल बटला फासावर चढविले असा समज खूप जणांमध्ये असतो.वस्तुस्थिती तशी नाही.मकबूल बटला १९६० च्या दशाकाच्या शेवटी (बहुदा १९६८-६९) मध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपावरून १९७८ मध्येच फाशीची शिक्षा सुनावली गेली होती आणि त्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे होता.म्हात्रेंची हत्या झाल्यानंतर राष्ट्रपतींनी (इंदिरा गांधींच्या घरी झाडू मारायला तयार असलेल्या राष्ट्रपतींनी म्हणजे नक्की कोणी हे लक्षात यायला वेळ लागू नये) त्याचा दयेचा अर्ज नाकारला आणि त्याला फासावर लटकविले.म्हणजे म्हात्रेंची हत्या हा त्या फाशीला ट्रिगर होता पण त्या कारणावरून त्याला फाशी दिले हा समज अनेकांमध्ये असतो ते चुकीचे आहे. आठवड्याभरात तपास पूर्ण होऊन शिक्षा सुनावली जाऊन त्याची अंमलबजावणी होईल अशी परिस्थिती भारतात थोडीच आहे :(
त्या हरामखोर मकबूल बटला सोडवण्याकरताच तर म्हात्र्यांचे अपहरण केले गेले. त्या अतिरेक्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्याच पण म्हात्र्यांची हत्या केल्यावर त्याला रोखठोक प्रत्युत्तर म्हणून इंदिराबाईंनी बटला फाशीला टांगले.
रविंद्र म्हात्रे ह्यांच्या हत्येचा थेट परिणाम म्हणजे मकबूल बटची फाशी. त्या बट इसमाचा मूळ गुन्हा काय होता हा प्रश्न गौंण आहे.
क्लिंटन साहेब,
इटलीच्या राजदूताने ते मरीन परत येतील हा वैयक्तिक जामीन सुप्रीम कोर्टाला दिला होता. आणी नंतर राजनैतिक संरक्षणाचा फायदा घेऊन त्यांना परत न आणण्याचा त्यांचा डाव होता.
परंतु सर्वोच्च न्यायालयाचा मेंदू इटालियन मेंदू पेक्षा सुपीक असल्याने न्यायालयाने त्यांचा पासपोर्ट काढून घ्या आणी त्यांना भारतीय हद्द पार करण्यास मनाई करण्याचा भारत सरकारला हुकुम दिला. त्यामुळे त्यांना अटक न करताही काम झाले आणी (DIPLOMATIC IMMUNITY ) राजनैतिक संरक्षणाला व्यवस्थित फाट्यावर मारले गेले. आणी म्हणूनच गपचूप सगळे इटालियन मरीन्स भारतात हजार झाले.
बाकी खोब्रागडे बाई नि "आदर्श" मध्ये सदनिका घेताना माझी दुसरीकडे कुठेही जागा नाही असे शपथपत्र लिहून दिले आहे आणी आता ते त्यांच्या वडिलांनी तसे लिहून दिले आहे असे म्हणतात. तर त्यांचे वडील म्हणतात त्यांची वर्सोव्याला जागा आहे असे मला माहित नाही. उंदराला मांजर साक्षी. त्यांचे वडील महाराष्ट्र सरकार मध्ये उच्च सनदी अधिकारी होते. कदाचित निवडक विस्मरणाचा( SELECTIVE MEMORY LOSS) भाग असावा
यात जातीचा संबंध किंवा लेखकाचे शिक्षण याचा संबंध कुठे आला ते समजले नाही.
"वैयक्तिक स्वार्थ हा जाती पेक्षा श्रेष्ठ असतो".
सर्वोच्च न्यायालयाचा मेंदू इटालियन मेंदू पेक्षा सुपीक असल्याने न्यायालयाने त्यांचा पासपोर्ट काढून घ्या आणी त्यांना भारतीय हद्द पार करण्यास मनाई करण्याचा भारत सरकारला हुकुम दिला. त्यामुळे त्यांना अटक न करताही काम झाले आणी (DIPLOMATIC IMMUNITY ) राजनैतिक संरक्षणाला व्यवस्थित फाट्यावर मारले गेले.
सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे कि ज्यांची आरक्षणाचा फायदा घेतल्यामुळे आर्थिक , शैक्षणिक आणि सामाजिक उन्नति झाली आहे अशा व्यक्तिंची किंवा कुटुंबांची गणना आरक्षित समाजाच्या एका वेगळ्या उच्च स्तरातले (न्यायालयाचा शब्द क्रिमी लेयर) अशी केली पाहिजे. आणि अशा लोकांच्या पुढच्या पिढयांना आरक्षणाचा फायदा मिळायला नाही पाहिजे.
खोब्रागडे बाईंचे वडील हे महाराष्ट्र सरकारमध्ये उच्च सनदी अधिकारी होते. तेंव्हा देवयानी खोब्रागडे या क्रिमी लेयर मध्ये मोडतात की नाही याची चौकशी झाली पाहिजे.
क्रिमी लेयर चा कायदा फक्त इतर मागास वर्गीयान्बाबत(OBC) आहे आणी तो हि बदलण्याची जोरदार मागणी चालू आहे.
याबाबत एक मजेदार सत्यकथा.
मुलुंड मधल एक श्रीमंत सोने चांदीच्या पेढीचा मालक माझ्याकडे आला होता. काही तरी बोलताना त्यांनी आम्ही सोनार म्हणून सांगितले तर मी त्यांना विचारले कि तुम्ही तुमची जात दैवज्ञ ब्राम्हण म्हणून लावता असे ऐकले आहे त्यावर ते म्हणाले डॉक्टर दैवज्ञ ब्राम्हण म्हणू नका. मी का विचारले तर ते म्हणाले कि ब्राम्हण म्हटल्यावर आम्हाला इतर मागास वर्गीयांचे आरक्षण कसे मिळणार?
असो.
भारत हा जगाच्या पाठीवर एकच असा देश आहे जेथे आम्ही "मागासलेले" आहोत हे म्हणण्यात आणी "मागासलेले" राहण्यात चढा ओढ आहे. -- श्री एन आर नारायण मूर्ती.
म्हात्रेंची हत्या हा त्या फाशीला ट्रिगर होता
बरोबर आहे. दयेचा अर्ज हा गृहमंत्रालयाकडून टिपण्णी मिळून क्लिअर व्हावा लागतो. अफजल गुरूच्या बाबतीत कसा वेळ लावला ते पाहीलेच आहे, तेच कसाबच्या बाबतीतह होऊ शकले असते. मला वाटते त्या काळात असा वेळ काढूपणा सहज चालत असे कारण आत्ता इतकी माध्यमे आणि जनता मागे लागत नसे. मकबुल भट्टची फाशी देखील काही राजकीय फायदा होऊ शकतो म्हणून लांबवली असली तरी आश्चर्य वाटायला नको. पण म्हात्रे अपहरण-हत्या प्रकरणानंतर काय होऊ शकते हे समजले आणि निर्णय प्रक्रीया तात्काळ पूर्ण केली गेली.
असेच एक उदाहरण त्यावेळेस वाचलेले - जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील जक्कल आदी गुन्हेगारांची फाशी देखील अशीच लांबली होती. मला वाटते ती तर दयेचा अर्ज नाकाराल्यावर देखील लांबली होती. सरते शेवटी त्या दोन्ही कुटूंबियांनी इंदीराजींना पत्र लिहीले की किती दिवस वाट पहायला लावणार आणि चक्रे हलली... तो काळ असाच होता की जगातली मोठ्ठी लोकशाही ही कारणे काही असोत व्यक्तीकेंद्रीत होती.
रविंद्र म्हात्रे यांच्याबद्दल चुकीचं लिखाण झाल्याने मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. तसंच योग्य काय आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद देतो.
(खरंतर ही गोष्ट शाळेत असतानाची आहे कि त्याआधीची आहे माहीत नाही. पण कुठेतरी दोन बातम्या एकत्र वाचल्या होत्या. एकतर म्हात्रेंची हत्या, त्यानंतर कॅनडा कि अमेरिका इथं एका अधिका-याची चौकशी केल्याबद्दल भारताने नोंदवलेला निषेध. लोकप्रभा असावं बहुतेक. कारण आमच्याकडे चित्रलेखा, आउटलुक आणि लोकप्रभा यायचं. त्यातलं लोकप्रभा वाचायची सवय लागली होती पीजे साठी. एव्हढे बोलून माझे आत्मचरित्र सपले असे जाहीर करतो).
बाईंना वकिलातीत घुसून अटक केलेली नाही. मुलीच्या शाळेजवळ अमेरिकी जमिनीवर अटक झालेली आहे.
डिप्लोमाटिक इम्युनिटी ही इतकी चिलखतासारखी अभेद्य नसते. त्या प्रतिनिधीच्या आरोपित गुन्ह्याचे स्वरुप हे त्याच्या अधिकृत कामाशी संबंधित नसेल तर वकिलात आपले हात झटकू शकते. एखादा कर्मचारी आपल्या देशाकरता हेरगिरी करत असेल तर बहुधा सदर देश त्याला/तिला संरक्षण देऊ शकते. पण बाकी गुन्ह्याकरता तसे होईलच अशी शाश्वती नाही. फालतू गुन्ह्यावर पांघरूण घालून पाहुणा देश यजमान देशाशी असलेले संबंध का बरे ताणेल? एक नागरिक म्हणून माझी तरी तशी अपेक्षा नाही.
ह्या बाईंनी खोटी कागदपत्रे बनवून मोलकरीण आणली. न्यू यॉर्क मधील किमान वेतन कायद्यापेक्षा कमी पगारात नोकर ठेवणे हेही बेकायदा आहे ते त्यांनी केल्याचे दिसते आहे. खर्याखोट्याचा फैसला न्यायालय करेलच. पण असल्या गफलतीकरता डिप्लोंम्याटिक इम्युनिटीचा इतका ढोल वाजवायची गरज नाही. खाजगी कामाकरता आणलेली मोलकरीण ही अमेरिकन कायद्यापासून लपू शकत नाही.
१०० % सहमत.
वकिलातीत अटक करता येत नाही, हे खरे असले तरी नोकराला पगार अमेरिकन कायद्यानुसारच द्यावा लागणार. त्याबाबतीत गुन्हा घडला असेल तर अटक योग्यच आहे.
मूळ बातमी कुठे आहे माहीत नाही. पण सकाळ जात आणेल असे वाटत नाही. पण प्रतिक्रीयांमधे वाचकांनी जात आणली असावी. यात नवल काहीच नाही. बॉस्टनला बृहन महाराष्ट्रमंडळाच्या झालेल्या अधिवेशनाची बातमी सकाळमधे आली होती. त्याच्या खालील प्रतिक्रीयांमधे देखील जात आली होती. :(
बॉस्टनला बृहन महाराष्ट्रमंडळाच्या झालेल्या अधिवेशनाची बातमी सकाळमधे आली होती. त्याच्या खालील प्रतिक्रीयांमधे देखील जात आली होती
हो त्यावेळी प्रतिक्रिया वाचल्या होत्या.एकूण काय की आपण भारतीय पहिल्यांदा अमुक एका जातीचे असतो आणि या जातीपातींमधून वेळ मिळालाच तर मग भाषा, वंश, राज्य इत्यादींचे असतो आणि सगळ्यात शेवटी भारतीय असतो :(
मी आरक्षणातून नाही याचा अकारण ढोल पिटून लेखकानेही हीच प्रवृत्ती नाही का दाखवलेली? :)
मुळात मी आरक्षणातून नाही याचा अर्थ माझी गुणवत्ता जास्त आहे, हेच म्हणणे चुकीचे आहे. शाळेत जास्त मार्क आहेत, याचा अर्थ नंतरच्या आयुष्यात कामाशी डिवोशन, योग्य लोकसंपर्क, तत्परतेने काम करणे तुम्हालाच जमेलच याचा तो हवाला नसतो. आणि एखादा आरक्षणातून असेल तर त्याला हे जमणारच नाही, याचाही तो हवाला नसतो.
तसे लिहीण्या मागचे प्रयोजन मी आधीच प्रकट केले आहे. मी अमुक जातीचा आहे म्हणून माझे आयुष्या असे आहे असे मी कधीच म्हणालो नाही. लेखनात नाही आणी प्रत्यक्ष आयुष्यात पण नाही. मला जे अयोग्य वाटले त्याचा उहापोह करताना लोकांनी, विचारणारा उपत्सुंभ कोण ह्याचा विचार सोदावा म्हणून तो उल्लेखा आहे.
विवा
एरवी बातम्या-लेखात कटाक्षाने (आणि चांगल्याच अर्थाने) जातीभेद असलेले लेखन माध्यमे टाळतात, त्यात "सकाळ" देखील आले. पण मग असले जातीवाचक भडक लेखन तेथे का चालते? कोणीतरी मला सांगितल्याप्रमाणे तसे टिआरपी वाढवण्यासाठी अशा प्रतिक्रीया उडवण्याऐवजी, त्यांच्याकडे दुर्लक्षित केले जाते. त्यात तथ्य असले तरी आश्चर्य वाटायला नको...
आरक्षणातून येताना किमान पात्रता लागतेच.. एखाद्या डॉक्टरला ४० टक्के आणि दुसर्याला ८० टक्के असतील तर दोघांची पात्रता सारखीच असते.... यात कमी जास्त काही नाही...
खालील विचार हे वेगवेगळ्या नेट, टीवी चानेल आणि पेपर च्या बातम्यांवर अवलंबून आहेत---.
१ जर खोब्रागडे बाई त्यांच्या जातीच्या आरक्षणाच्या आधारावर , म्हणजे अतिशय कठीण अशा रीतसर ओपन निवडीत भाग न घेता, विदेश सेवा विभागात निवडल्या गेल्या असतील, तर त्यांच्या जातीचा उल्लेख करणे वावगे आहे का ?
२.याच महिलेकडे घोटाळा प्रसिध्द आदर्श इमारतीत एक सदनिका आहे आणि त्या आधीहि एक सरकारी सदनिका त्याना मुंबईत दिली गेली आहे.
३. अमेरिकेच्या सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहिती प्रमाणे त्यांचा तथाकथित गुन्हा विएन्ना convention च्या नियमाप्रमाणे असलेल्या diplomatic immunity च्या व्याखेत बसत नाही. त्यांना हातकड्या घातल्या गेल्या हे सुद्धा arrest वारंट च्या स्वरूपास धरून होते, असेही प्रवक्ता म्हणतो.
४. यापूर्वीही अमेरिकेतील भारताच्या दुतावासात काम करणार्यांना दोन तीन कर्मचार्यांवर याच प्रकारच्या तथाकथित गुन्ह्यांब्द्द्ल कारवाई करण्यात आली आहे.
५. आधी काही वर्षे विदेश विभागात काम केलेल्यांचीच , त्या ज्या पदावर आहेत त्या पदावर नेमणूक होऊ शकते. म्हणजे त्या अनुभवी आहेत आणि अमेरिकेत किती दिवसापूर्वी नोकरीवर आल्या याला काही महत्व नाही.
राजनैतिक अधिकार्यांना कायदेशीर संरक्षण असते आणि माझ्या माहितीनुसार ते अगदी खुनासारख्या आरोपांसाठीही असते. मग या *क्षुल्लक (*पॉलिटिकल इम्युनिटीची व्याप्ती लक्षात घेता) कारणासाठी देवयानी खोब्रगडेंना अटक करणे पुर्ण निषेधार्हे आहे. नौकरांना कमी वेतन देणे हा अमेरिकेत मोठा अपराध असेल भारतात तो तसा मानला जात नाही. मी कमी पगार देण्याच्या मनोवृत्तीचे समर्थन करत नाही आहे ते नक्कीच निषेधार्हे आहे. या कारणासाठी देवयानी खोब्रागडे या व्यक्तील अटक होउ शकते पण देवयानी खोब्रागडे या राजनैतिक अधिकार्याला नाही. हे राजनैतिक पातळीवर नक्कीच निषेधार्ह आहे.
या कारणासाठी देवयानी खोब्रागडे या व्यक्तील अटक होउ शकते पण देवयानी खोब्रागडे या राजनैतिक अधिकार्याला नाही.
अगदी चूक .... उलट , अधिकार्याला तर ताबडतोब अटक झाली पाहिजे. ज्याने कायदे राबवायचे, त्याच्यावर देखरेख ठेवायची, त्यानेच ते बिनदिक्कतपणे मोडायचे, तर त्याला जास्त शिक्षा झाली पाहिजे.
"अधिकार्याला तर ताबडतोब अटक झाली पाहिजे. ज्याने कायदे राबवायचे, त्याच्यावर देखरेख ठेवायची, त्यानेच ते बिनदिक्कतपणे मोडायचे, तर त्याला जास्त शिक्षा झाली पाहिजे."
थोडेसे अॅडिशन...
"अधिकार्याला तर ताबडतोब अटक झाली पाहिजे. ज्याने कायदे राबवायचे, त्याच्यावर देखरेख ठेवायची, त्यानेच ते बिनदिक्कतपणे मोडायचे, तर त्याला (त्याची कुठली जात/धर्म आहे न बघता) जास्तच शिक्षा झाली पाहिजे.
सहमत....
प्रचंड सहमत...
अधिकार्याला तर ताबडतोब अटक झाली पाहिजे. ज्याने कायदे राबवायचे, त्याच्यावर देखरेख ठेवायची, त्यानेच ते बिनदिक्कतपणे मोडायचे,
अगदी चूक. आपण खोब्रागडे नावाच्या अमेरिकेत काम कारणार्या भारतीय राजनैतिक अधिकार्याबद्दल बोलतो आहोत. पॉलिटिकल इम्युनिटी नावाची एक पद्धत जगभर रुढ आहे आणि त्याचा जगभर आदर केला जातो आणि त्याचे अमेरिकेकडुन भारताबाबत वारंवार विनाकारण उल्लंघन होत आहे. त्याचा निषेध आहे. बाई चूक वागली का बरोबर ते वेगळे. ती चूकच वागली आणि त्याच्यासाठी भलेही भारतीय न्यायालयाने तिला शिक्षा द्यावी. पण ती शक्यता फारच कमी आहे म्हणा.
अमेरिकेतील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे
खोब्रागडे बाई वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आहे. या कृत्याबद्दल भारतीय सरकारने तिला बडतर्फे केले असेल तर नाही माहिती अन्यथा अजुन तरी आहे. त्यामुळे तिला पॉलिटिकल इम्युनिटी लागु होते.
इथला काय आणि तिथला काय, अधिकारी हा अधिकारीच असतो. शिवाय आज लोकशाही आहे, राजेशाही नाही. तुम्ही ज्या पॉलिटिकल इम्युनिटीचा वापर करताय, त्याचा उगम राजेशाहीत आहे... sovereign immunity - an exemption that precludes bringing a suit against the sovereign government without the government's consent; "the doctrine of sovereign immunity originated with the maxim that the king can do no wrong" आजच्या काळात हे चूकच आहे.
शिवाय या इम्युनिटीचा वापर देशहितासाठी असला पाहिजे. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी नाही.
The American Civil Liberties Union filed an amicus brief in Swarna v. Al-Awadi to argue that human trafficking is a commercial activity engaged in for personal profit, which falls outside the scope of a diplomat’s official functions, and therefore diplomatic immunity does not apply
http://en.wikipedia.org/wiki/Diplomatic_immunity
जर खोब्रागडे बाई त्यांच्या जातीच्या आरक्षणाच्या आधारावर , म्हणजे अतिशय कठीण अशा रीतसर ओपन निवडीत भाग न घेता, विदेश सेवा विभागात निवडल्या गेल्या असतील, तर त्यांच्या जातीचा उल्लेख करणे वावगे आहे का ?>>>>>>>>>>>>>>>>>>>>लष्करात आरक्षण नसते तेथील घोटाळा तहलकाने उघडकीस आणला होता. आरक्षण न घेता लष्कराच्या कठीण निवडीत पास झालेले हे सारे लोक होते त्यांच्या जाती उघड करणे काही वावगे आहे का ?
तसे असेल तर मग भारतातले सगळेच घोटाळे आणी भ्रष्टाचार आणी ते करणार्यांच्या जाती उघड करा. कशाल नसती चर्चा करत आहात. इथे सगळेच जण या घटनेत जात मध्य आणल्याचा निषेध करत आहेत. पण आणायचीच असेल तर मग एक सांगोपांग चर्चाच करुयात की. बंगारु लक्ष्मण पासुन तरूण तेजपाल पर्यंत सगळ्याचीच जातीच्या मुद्द्यावर चर्चा होउ द्यात मग.
क्लीअरन्स हा हातचा मळ आहे राजकारण्यांचा. जागा विकली नाही तर जमिनीवर आरक्षण आणले की झाले. इतकी सोप्पी युक्ती आहे. पुण्यातल्या बाणेर , चाकण, मुळशी, लवासा, नांदेड सिटी, नाशिक नगर साइडची गावेच्या गावे कोणाच्या नावावर आहेत हे शेंबडे पोर देखील सांगेल्. राजकारणी भ्र्ष्ट नाहित हे आजघडीला सगळ्यात मोट्ठे विनोदी विधान आहे.
माझ्या माहितीतील एका राजपत्रित प्रथम दर्ज्याच्या लष्करी अधिकार्याला पंधरा लाखाचा करार(बॉन्ड) पूर्ण झालेला नसताना लष्कर सोडायचे होते. त्याच्या सर्व वरिष्ठ अधिकार्यांनी त्याच्या राजीनामा पत्रावर नकार लिहिला होता. आपले माजी संरक्षण मंत्री श्री मुलायम सिंह यादव यांनी कागदपत्रे एक आठवड्यात माझ्या टेबलवर आली पाहिजेत असे सांगितले आणि त्यांच्या कडे कागद आले तेंव्हा त्यावर त्यांनी याला सोडा असे लिहिले आणि पुढच्या एक महिन्यात त्याला रजा पत्र मिळाले. तो आता विलायतेत असतो.
सनदी अधिकार्याचे हक्क आणि दर्जा हा सीमित असतो( आणि असायला हवा). लोकनियुक्त प्रतिनिधी लोकशाहीत सर्वोच्च असतो( आणि असायला हवा)( selected v /s elected) मग त्याची लायकी आहे कि नाही हा मुद्दा गौण आहे. (लायकी ठरविणारे तुम्ही कोण? जनतेने त्यांना निवडून दिलेले आहे. मग आपल्या मताप्रमाणे जनता मूर्ख असेलहि)
राजकारण्यांची बदली करण्याचे अधिकार सनदी अधिकार्यांना नाहीत. पण सनदी अधिकार्याची बदली करण्याचे किंवा त्यांना निलंबित करण्याचे अधिकार राजकारण्यांना आहेत. हे आपण विसरलात. श्री गो रा खैरनार यांना कसा त्रास दिला गेला हे आपण विसरलात काय ? प्रामाणिक अधिकार्यांना कसा त्रास दिला जाऊ शकतो याची किती उदाहरणे आहेत. खैरनार, खेमका, वाय पी सिंह , अरुण भाटीया. आणि इतर.
घटनेने सनदी अधिकाऱ्यांचे अधिकार मर्यादित ठेवलेले आहेत तर राजकारणी लोकांना घटना दुरुस्तीचेच अधिकार दिलेलेअहेत यावरुन आपण समजून घ्या.
काही काळापूर्वी शाहबानो प्रकरणात कायदा बदलताना आणि नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचा कलंकित लोकसभा सदस्यांच्या संबद्धीचा निवाडा निष्कासित करण्यासाठी वटहुकूम काढण्याचा (फसलेला) निर्णय करताना राजकारण्यांनी तुम्ही नमूद केलेली प्रक्रिया पाळली असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असे अनेक निर्णय आहेत... मुद्दा समजायला पण हेच पुरे आहेत असं वाटतं.
कुठल्या काळातल्या व्यवस्थेबद्दल बोलता आहात साहेब?!
प्रतिक्रिया
सहमत
सकाळ मधली कोणती बातमी
प्रयोजन
खुलासा
कुठल्याही देशाच्या
+१/-१
विषयांतराबद्दल क्षमस्व
बरोबर आहे ना. म्हणूनच
क्लिंटन साहेब,
मान्य
क्रिमी लेयर
.
क्रिमी लेयर चा कायदा फक्त इतर
रविंद्र म्हात्रे
रविंद्र म्हात्रे यांच्याबद्दल
अटकेची जागा
.
नोकराला पगार भाअत सरकारने
बातमी वाचा ना
मुद्दा पटला
मला वाटते
दुर्दैवाने खरे आहे
.
प्रयोजन
प्रतिक्रीया आणि टिआरपी
इसकाळ हा फक्त....
आरक्षणातून येताना किमान
जातीचा उल्लेख
राजनैतिक अधिकार्यांना
.
+ १
अधिकार्याला तर ताबडतोब अटक
@ म्रुत्युंजय...
अमेरिकेतील भारताच्या वरिष्ठ
.
मग सरसकट आधी आलम दुनियेतुन ती
.
जर खोब्रागडे बाई त्यांच्या
तसे असेल तर मग भारतातले सगळेच
क्लीअरन्स हा हातचा मळ आहे राजकारण्यांचा
सरकार कसे काम करते ते आपणास माहित नाही
राजकारण्यांची बदली करण्याचे
फरक
:)
काही काळापूर्वी शाहबानो
कुठल्या काळातल्या
चला या कल्पनेतल्या बेटावर
एक्का साहेब, प्रवासवर्णन
अन देवयानी "खोब्रागडे"
हो खरेय, आणि खान किंवा शेख
Pagination