Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:
२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता. ब्रीटीशांनाही भारताला स्वातंत्र्य तर मिळालेय पण ते कुठपर्यंत टिकवता येईल ह्याबाबत शंका होती .पण आपल्या देशाने ती खोटी ठरवली व देशाचा कारभार यशस्वीरीत्या केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात जे महान नेते होते त्यांचे आदर्श नवीन पिढी समोर होते. देशाची भक्कम घटना नि त्या घटनेला न्याय देणारे राज्यकर्ते भारताला लाभले हि आपल्या देशासाठी मोठी सुदैवाची बाब आहे. सत्ताधार्यांकडून काही प्रमाणात घटनेला धाब्यावर बसवण्याचेही प्रयत्न झाले पण ते यशस्वी होवू शकले नाही. भारताची घटना हि योग्य असल्यानेच आणि सुजाण राज्यकर्ते लाभल्यानेच भारताचा विकास झाला. अन्यथा आपला देश हा पाकिस्तानच्या वाटेने कधीच गेला असता.आपण आणि पाकिस्तान एकत्रच स्वतंत्र झालो पण आज पाकिस्तानची अवस्था काय आहे हे साऱ्या जगाला दिसतेय धर्मावर आधारित राजकारण केल्याची विषारी फळे आज तिथली जनता भोगतेय. आज आपण कॉम्पुटर युगात आहोत हेही राज्याकार्त्यांच्याच दूरदृष्टीचे परिणाम. याचा अर्थ देशात सारे आलबेल आहे असे नव्हे प्रश्न समस्या असायच्याच पण त्याच्याशी धैर्याने मुकाबला करण्यात येत आहे. जगात असा एकही देश नाही जेथे सारे आलबेल असेल. भारत स्वातंत्र्य होवून ६६ वर्षे उलटली ६६ वर्षाचा हा कालावधी मानवी जीवनासाठी मोठा कालावधी वाटत असला तरी देशासाठी हा अत्यंत लहान कालावधी आहे. ह्या इतक्या कमी कालावधीत देश सर्वच क्षेत्रात ज्या वेगाने मुसंडी मारत आहे ते पाहून सर्व भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला पाहिजे. देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अजूनही सर्व समस्या सुटलेल्या नाहीत पण पेला अर्धा भरलाय, ह्यात आनंद मानायचा कि अर्धा रिकामा आहे ह्याचे दुखः करत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने बरीच जनता पेला अर्धा रिकामा आहे म्हणून दुख करणारी आहे. देशाच्या विकासातही काही महाभाग भकास काय आहे हे शोधत बसतात. तर आदर्श राज्यकर्ते ते असतात जे भकासातून विकास करून दाखवतात. २०१४ च्या निवडणुकीत देशात पुढील प्रमाणे स्तिथी येवू शकते व त्यानुसार कोण प्रधानमंत्री बनू शकतो ह्याबद्दलचा हा अंदाज १)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी २)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव ३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात. प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीचा ह्या निवडणुकीवर प्रभाव राहील. आप सारखी नवीन पार्टी बरीच मते मिळवू शकते. परंतु सत्तेचे सोपान मात्र कॉंग्रेस किंवा तिसर्या आघाडीकडेच राहतील असे देशातील सध्याचे वातावरण आहे. भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते. शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

कोण बरे असावा तो विरोधी पक्षनेता जो शरद पवारांचे चार काम करायचा. गडकरी नक्कीच नसावेत भाजपा सारख्या महान पक्षाचे ते नेते आहेत.*fool* :-| :| =| :-|

बंगारू लक्ष्मण हे मला वाटते स्वतःच्या मुलीच्या वयाच्या सहकारी पत्रकार मुलीवर अत्याचार करणार्‍या तरूण तेजपाल यांच्या कपील सिब्बल यांनी फंडीग केलेल्या तेहलका या वृत्तपत्राच्या पहील्या वहील्या स्टींग ऑपरेशन मधून सापडलेले एक भ्रष्ट व्यक्तीमत्व होते. अशी स्टींग ऑपरेशन्स ही तेहलकाने कधी काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात केली नाहीत आणि गेल्या ४-६ वर्षातील कोट्यावधींचे भ्रष्टाचार झालेल्या एकाही भ्रष्टाचाराचे संशोधन हे तेहेलका करू शकले नाहीत. बाय द वे, मुरली मनोहर जोशीं संदर्भात धाधांत खोटे लिहीणारे कोण होते हो? का नैतिकता ही फक्त इतरांच्या बाबतीत बघण्यासाठीच असते?

>>> उद्या शरद पवारांनी भाजपला पाठींबा दिला तर आता हे जे नेट भैरव त्यांच्यावर टीका करतात तेच त्यांना जाणता राजा म्हणतील हो कि नी गुर्जी . नाही. त्यांना उपरती होऊन प्रायश्चित्त घेत आहेत असं म्हणतील.

लेखन एकदम सखोल वाचताना लेखकाचा व्यासंग,त्यांची राजकारणाची माहिती,भारतातील जनते विषयीची कळकळ,सेक्युलर पक्षांबद्दल ची तळमळ प्रतिबिंबीत होते. सचीन सर बहुधा ठाणे,रत्नागिरी किंवा मिरज भागातील मतदार दिसतात.

उचलली जीभ लावली टाळ्याला!!! मुद्दे मांडायला नसले कि अशे "सुपीक" विचार येतात. शामियान्याच्या दरवाज्यात "कोणता" दरवान उभा होता मोजणी करायला. मोदीविरोध कुठल्याही थराला जाऊ शकतो याचे लक्षण! वैचारिक विरोध करा मोदींचा!

माध्यमांचे दुवे काय कोणिही किती आणि कुठल्याही बाजूने देऊ शकते. नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे?

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/--/articleshow/27809890.cms गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील चेकपोस्टवर जास्त महसूल

मोदीची फेकुगिरी कोणत्या थराला जावू शकते ह्याचे उदाहरण म्हणजे बीकेसी मधले त्यांचे भाषण. त्यांनी वोट फोर इंडिया मागितलेय पण इंडिया विरुद्ध भारत हि लढाई भारतच जिंकणार. तुम्ही थापा मारून ३ राज्यात विजय मिळवू शकता पूर्ण भारतात नाही

त्यांनी वोट फोर इंडिया मागितलेय पण इंडिया विरुद्ध भारत हि लढाई भारतच जिंकणार>>>> बघा कशी एकदम तंतोतंत जुळतेय प्रतिक्रिया!! नवाब मालिकांनीहि हीच प्रतिक्रिया दिली आहे. मोदींची नेमकी काय फेकुगिरी आहे ते कळेल काय?

१०८ पैकी ३८ प्रतिसाद स्वतः लेखक सचीन यांचे. त्यांचा ब्लॉग वाचत आहे असं वाटलं. पुढच्या वेळी सर्व मिपाकरांना एक प्रेमळ धमकीवजा सूचना किंवा सूचनावजा धमकी (काय हवं ते समजा) लेखावरचे सर्व प्रतिसाद स्वत: सचीनभाऊंना देऊ द्या. म्हणजे एक नवीन नवीन रेकॉर्ड तयार होईल!

राखी सावंतने रामदेवबाबांशी लग्न करायचे आहे म्हणण्याचे कारण आणि वरील लेख लिहिण्याचे कारण एकच… फुकटची (कु)प्रसिध्दी! बघा मिळाल्याना १०० पेक्षा जास्त प्रतिक्रिया! त्यांना खरंच मत प्रदर्शन करायचे असते तर कदाचित वस्तुस्थितीशी निगडीत लिखाण केले असते. आअप व भाजपची तिसऱ्या स्थानासाठी चुरस हे वस्तुस्थितीला धरून नाही (उलटपक्षी हास्यास्पद आहे, आणि यावरून मी आअपविरोधी आहे असे सिद्ध होत नाही) आणि फक्त सचिन यांचा राजकीय 'कल' दर्शविते.

राखी सावंतचे तिला माहित. पण माझ्या लेखाबद्दल मात्र मी सांगू इच्छितो कि कॉंग्रेस आणि तिसरी आघाडी ह्यात सत्ता मिळवण्याबाबत लढत होईल. भाजपा मात्र तिसर्या स्थानावर किंवा आप मुळे चौथ्या स्थानावर राहील.

गुजरात दंगलप्रकरणी मोदींना क्‍लीन चीट अहमदाबाद - गुजरात राज्यात 2002 मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्‍लीन चीट देण्याच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) निर्णयाला आव्हान देणारी याचिका महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज फेटाळली. कॉंग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया यांनी ही याचिका दाखल केली होती. Smiley Smiley Smiley Smiley

हे सर्वजण नक्कीच संघाचे असणार. एसआयटी म्हणजे संघाची इन्व्हेस्टिगेशन टीम ? न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले तरी आम्ही त्यांना दोषीच मानणार.