Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:
२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता. ब्रीटीशांनाही भारताला स्वातंत्र्य तर मिळालेय पण ते कुठपर्यंत टिकवता येईल ह्याबाबत शंका होती .पण आपल्या देशाने ती खोटी ठरवली व देशाचा कारभार यशस्वीरीत्या केल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात जे महान नेते होते त्यांचे आदर्श नवीन पिढी समोर होते. देशाची भक्कम घटना नि त्या घटनेला न्याय देणारे राज्यकर्ते भारताला लाभले हि आपल्या देशासाठी मोठी सुदैवाची बाब आहे. सत्ताधार्यांकडून काही प्रमाणात घटनेला धाब्यावर बसवण्याचेही प्रयत्न झाले पण ते यशस्वी होवू शकले नाही. भारताची घटना हि योग्य असल्यानेच आणि सुजाण राज्यकर्ते लाभल्यानेच भारताचा विकास झाला. अन्यथा आपला देश हा पाकिस्तानच्या वाटेने कधीच गेला असता.आपण आणि पाकिस्तान एकत्रच स्वतंत्र झालो पण आज पाकिस्तानची अवस्था काय आहे हे साऱ्या जगाला दिसतेय धर्मावर आधारित राजकारण केल्याची विषारी फळे आज तिथली जनता भोगतेय. आज आपण कॉम्पुटर युगात आहोत हेही राज्याकार्त्यांच्याच दूरदृष्टीचे परिणाम. याचा अर्थ देशात सारे आलबेल आहे असे नव्हे प्रश्न समस्या असायच्याच पण त्याच्याशी धैर्याने मुकाबला करण्यात येत आहे. जगात असा एकही देश नाही जेथे सारे आलबेल असेल. भारत स्वातंत्र्य होवून ६६ वर्षे उलटली ६६ वर्षाचा हा कालावधी मानवी जीवनासाठी मोठा कालावधी वाटत असला तरी देशासाठी हा अत्यंत लहान कालावधी आहे. ह्या इतक्या कमी कालावधीत देश सर्वच क्षेत्रात ज्या वेगाने मुसंडी मारत आहे ते पाहून सर्व भारतीयांचा उर अभिमानाने भरून आला पाहिजे. देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अजूनही सर्व समस्या सुटलेल्या नाहीत पण पेला अर्धा भरलाय, ह्यात आनंद मानायचा कि अर्धा रिकामा आहे ह्याचे दुखः करत बसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दुर्दैवाने बरीच जनता पेला अर्धा रिकामा आहे म्हणून दुख करणारी आहे. देशाच्या विकासातही काही महाभाग भकास काय आहे हे शोधत बसतात. तर आदर्श राज्यकर्ते ते असतात जे भकासातून विकास करून दाखवतात. २०१४ च्या निवडणुकीत देशात पुढील प्रमाणे स्तिथी येवू शकते व त्यानुसार कोण प्रधानमंत्री बनू शकतो ह्याबद्दलचा हा अंदाज १)कॉंग्रेसला बहुमत- प्रधानमंत्री-राहुल गांधी किंवा सोनिया गांधी २)तिसरी आघाडी- ह्यांना बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने समविचारी पक्षांचे सरकार येवू शकते -प्रधानमंत्री- मुलायम सिंग यादव ३)मायावतींनी जर उत्तर प्रदेशात ४० जागांपर्यंत मजल मारली तर कॉंग्रेसच्या पाठींब्याने त्याही प्रधानमंत्री बनू शकतात. प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीचा ह्या निवडणुकीवर प्रभाव राहील. आप सारखी नवीन पार्टी बरीच मते मिळवू शकते. परंतु सत्तेचे सोपान मात्र कॉंग्रेस किंवा तिसर्या आघाडीकडेच राहतील असे देशातील सध्याचे वातावरण आहे. भाजपा ह्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहील अशी चिन्न्ह आहेत परंतु आपच्या राजकारणातील प्रवेशामुळे नि प्रादेशिक पार्ट्यांच्या सध्याच्या वर्चस्वामुळे तिसऱ्या स्थानासाठी भाजपा नि आपमध्ये चुरस राहू शकते. शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आंधळ्या मोदीभक्तांनी कितीही उपरोधीक लिखाण केलं तरी सत्य बदलणार नाहि. उपरोध करताना देखील काहि क्वालिटी जपावी लागते. शरद पवार साहेबांना खड्यासारखं बाजुला काढलं प्रधानमंत्रीपदाच्या यादीतुन. तिसर्‍या आघाडीचं सरकार पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच बनेल.

साऱ्या गोरगरीब,धर्मनिरपेक्ष, अल्पसंख्यांक,देशाच्या विकासाच्या बाजूने असणार्यांमुळे काँग्रेसचेच राज्य येणार. ह्यात शंका नाही .

ई सकाळ व आता मिसळपाववरही प्रधानमंत्री हा हिंदी शब्द मराठी लोक सर्रास वापरताना दिसतात. मराठीत पंतप्रधान असा शब्द असताना लोक हिंदी माध्यमांचे अनुकरण करत प्रधानमंत्री हा शब्द का वापरायला लागलेत हे अनकालनीय आहे. प्रधान व मंत्री हे दोन्ही शब्द मराठीत अस्तित्वात असले तरीही प्रधानमंत्री हा शब्द हिंदीच आहे.

देशाच्या विकासाचे नियोजन करण्यात सत्ताधारी पक्षांनी (काही अपवाद वगळता) उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
याचे स्पष्टीकरण द्याल काय ?

म्हणजे कोन्ग्रेस ने नियोजनबद्ध विकास केला. आणि जो काही "विकास" केला त्यास ६० वर्षे लागली? आपल्या बरोबरच जपानलाही स्वातंत्र मिळाले (चू, भू, द्या घ्या) पण मला नाही वाटत जपानला आपला एवढा "विकास" करता आला. मागासलेलाच राहिला बिचारा नै.

पप्पूच्या निमित्ताने भारताला एक नवा विदूषक लाभला आहे. सत्ता कुणाचीही आली तरी राष्ट्रीय विदूषक या पदासाठी पप्पू आणि लालू यांच्यात पहिल्या व दुसर्‍या स्थानासाठी स्पर्धा राहील हे नक्की. ;)

>>> पप्पूच्या निमित्ताने भारताला एक नवा विदूषक लाभला आहे. सत्ता कुणाचीही आली तरी राष्ट्रीय विदूषक या पदासाठी पप्पू आणि लालू यांच्यात पहिल्या व दुसर्‍या स्थानासाठी स्पर्धा राहील हे नक्की. दिग्विजयला विसरलात की काय? आणि चेहरा कोरा ठेवून विनोद करणारे म.मो.सिंग कितव्या क्रमांकावर असतील? भ्रष्टाचाराची कितीही गंभीर प्रकरणे बाहेर आली तरी चेहरा कोरा ठेवून "भ्रष्टाचार्‍यांची अजिबात गय करणार नाही", "आमच्याकडे लपविण्यासारखे काहीही नाही", "दोषींना शिक्षा होईल" अशी छापील वाक्ये उच्चारतात तेव्हा खेदाने का होईना पण हसू आल्याखेरीज रहात नाही.

पुन्हा एकदा जबरदस्त विनोदी लेख! वाचताना पोट धरधरून हसत होतो. हे असे एकापाठोपाठ एक दर्जेदार व निखळ विनोदी लेख यांना सुचतात तरी कसे!! सचीनराव, अजून विनोदी लेख येऊ द्यात. आम्ही वाट बघतोय.

कालपासून दहावेंदा वाचतोय हा लेख . . प्रत्येकवेळी तेवढाच हसतोय . . एकदा कोन्ग्रेसी झाल्यावर लोकांना खरंच काही दिसत नाही का? फक्त गांधी घराण्याचा पायचाटेपणा करणे . एवढेच समजते का?

>>> शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल. लोकशाही जपणारा - काँग्रेस, समाजवादी, द्रमुक, बसप, राजद इ. पक्षात हुकूमशाही आहे त्यामुळे हे पक्ष सत्तेवर यायला पात्र नाहीत. देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा - काँग्रेस, समाजवादी, द्रमुक, बसप, राजद इ. पक्षात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयवाद, मुस्लिमांचे लांगूललाचन इ. ला सर्वोच्च प्राधान्य आहे. विकास हा मुद्दाच त्यांच्याकडे नाही. त्यामुळे हे पक्ष सत्तेवर यायला पात्र नाहीत. धर्मनिरपेक्ष - काँग्रेस, समाजवादी, द्रमुक, बसप, राजद इ. पक्ष जातीयवादी आहेत. मुस्लिमांचे लांगूलचालन, जातीजातीत भांडणे लावणे, दुर्बल जातींवर अत्याचार हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे हे पक्ष सत्तेवर यायला पात्र नाहीत. मानवी विकासाची जाण असणारा - काँग्रेस, समाजवादी, द्रमुक, बसप, राजद इ. पक्षात स्वतःची तुंबडी भरण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. देशाचे वाटोळे झाले तरी चालेल आम्ही लुटालूट करत राहणार हे त्यांचे धोरण आहे. त्यामुळे हे पक्ष सत्तेवर यायला पात्र नाहीत. >>> शेवटी लोकशाही जपणारा, देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारा, धर्मनिरपेक्ष, मानवी विकासाची जाण असणारा पक्षच सत्तेवर यावा हीच तमाम भारतीयांची अपेक्षा असेल. असे गुण असणारा सध्या भाजप हा एकमेव पक्ष दिसतो. सचीन हे भाजपवाले दिसतात. त्यामुळे आपल्या पक्षाचे नाव न घेता ते भाजपला मते द्या असा प्रचार करत आहेत.

लोकशाही जपणारा - काँग्रेस, समाजवादी, द्रमुक, बसप, राजद इ. पक्षात हुकूमशाही आहे त्यामुळे हे पक्ष सत्तेवर यायला पात्र नाहीत.>>>>>>>>>>>>>>ह्या सर्व पक्षांचे प्रमुख स्वत जनतेतून निवडून येतात त्यांना नागपूरच्या आदेशाची वाट पहावी लागत नाही मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे काय हो गुर्जी ? असे गुण असणारा सध्या भाजप हा एकमेव पक्ष दिसतो.>>>>गुर्जी तुम्ही विनोदी आहात

>>> ह्या सर्व पक्षांचे प्रमुख स्वत जनतेतून निवडून येतात त्यांना नागपूरच्या आदेशाची वाट पहावी लागत नाही कोणत्या पक्षाचे प्रमुख जनतेतून निवडून आलेले नाहीत? मौनमोहन सिंग कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते/आहेत्/येतील? >>> मुस्लिमांचे लांगूललाचन म्हणजे काय हो गुर्जी ? हा प्रश्न म्हणजे "भ्रष्टाचार म्हणजे काय?" असं कॉग्रेसने विचारल्यासारखं किंवा अतिरेकी म्हणजे काय असं कसाबने विचारण्यासारखं आहे. >>>> गुर्जी तुम्ही विनोदी आहात तुमच्या तुलनेत काहीच नाही.

>>> पण एक कळले नाही तुम्हाला अजून बर्‍याच गोष्टी कळत नाही. पण त्यात तुमचा दोष नाही. असो. >>> मुस्लिमाचे लागुललाचन म्हणजे काय या विषयात ग्रेटथुंकर हे तज्ञ आहेत. आम्ही काहीही लिहिले तरी भाजपवाल्याने लिहिले म्हणून ते तुम्ही पटत असून सुद्धा नाही म्हणणार. त्याऐवजी ग्रेटथुंकरच् तुमचे शंकासमाधान करतील. ग्रेटथुंकर - नुस्लिमांचे लांगूलचालन म्हणजे काय हे जरा समजावून सांगा हो या अज्ञ बालकाला.

*yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo: उद्या निवडणुकीनंतर ह्याच पक्षांनी (समाजवादी, द्रमुक, बसप,()भाजपला पाठींबा दिला तर ते पुण्यवान ठरणार हो कि नाही गुर्जी...

>>> उद्या निवडणुकीनंतर ह्याच पक्षांनी (समाजवादी, द्रमुक, बसप,()भाजपला पाठींबा दिला तर ते पुण्यवान ठरणार हो कि नाही गुर्जी... हे पक्ष आपल्या पूर्ण विरूद्ध विचारसरणी असलेल्या भाजपला पाठिंबा देणार नाहीत. त्याऐवजी 'समानशीलेषु व्यसनेषु सख्यम्' या न्यायाने ते आपल्यासारखाच भ्रष्टाचारी, जातीयवादी, देशद्रोही अशा अनेक गुणांची खाण असलेल्या "आदर्श" काँग्रेसलाच पाठिंबा देणार.

उद्या शरद पवारांनी भाजपला पाठींबा दिला तर आता हे जे नेट भैरव त्यांच्यावर टीका करतात तेच त्यांना जाणता राजा म्हणतील हो कि नी गुर्जी .

शरद पवारांचा पाठिंबा घ्यावा त्यासाठी भाजपाला २०० जागा हव्यात त्या त्याना मिळणार नाहीत. व पाठिंबा देण्या इतक्या जागा शरद पवारांच्या प्रादेशिक पक्षाला ही मिळणार नाहीत. अशी पाळी आलीच तर...... सिकंदर बख्त, नकवी, ई नावे घेत भाजपा हा धर्मनिर्पेक्षच पक्ष आहे असा शीध पवाराना लागेल.

मध्यंतरी भाजपचे एक 'वजनदार' नेते' पवार आमची चार कामे करतात आम्ही त्यांची चार कामे करतो' असे म्हण्टल्याचे वाचले होते .एनडीएच्या काळात पवार सैब डीझास्टरचे मॅनेजमेंटचे हेड होते ,भाजप सुरवातिपासुनच पवारांच्या ताटाखालचे मांजर आहे, विशेषतः महाराष्ट्रात.

मध्यंतरी भाजपचे एक 'वजनदार' नेते' पवार आमची चार कामे करतात आम्ही त्यांची चार कामे करतो' असे म्हण्टल्याचे वाचले होते मी ऐकले/वाचलेले नाही. असले तरी आश्चर्य वाटणार नाही. पण आपली आधीची बिनबुडाची वक्तव्ये लक्षात घेता, जर नावानिशी माहिती देऊ शकलात तर बरे होईल. एनडीएच्या काळात पवार सैब डीझास्टरचे मॅनेजमेंटचे हेड होते ,भाजप सुरवातिपासुनच पवारांच्या ताटाखालचे मांजर आहे, विशेषतः महाराष्ट्रात. हे म्हणजे "उचलली जीभ लावली टाळ्याला का काय म्हणतात" तसे झाले... मागचा-पुढचा संदर्भ न देता कॉन्फिडंटली दुसर्‍यांना कमी दाखवणारे विधान करायचे... पवारांनी लातूरच्या भूकंपाच्या वेळेस आणि त्याही आधी शेअर मार्केटच्या बाँबस्फोटाच्या वेळेस चांगले नेतृत्व दाखवले होते. आपत्कालीन परीस्थिती कशी हाताळावी हे करून दाखवणार्‍या राजकीय पुढार्‍यांमधे ते अग्रणी होते. वास्तवीक असे गुण त्यांच्यात बरेच आहेत, पण बिघडले झालं... एनीवे, त्यांच्या या अनुभवामुळे त्यांना डिझॅस्टर मॅनेजमेंटचे हेड केले गेले होते. ९३-९४ साली पाकीस्तानने काश्मीर प्रश्न व्हिएन्न्नामधील सभेत उपस्थित करून भारताची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा भारताबद्दल पॅशनेटली बोलणारा असा जाणता राजकीय वक्ता तेथे हवा होता. तेंव्हा नरसिंहरावांनी तत्कालीन विरोधी पक्ष नेते असलेल्या वाजपेयींच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळ पाठवले. याचा अर्थ काय ते वाजपेयी/भाजपाच्या ताटाखालचे मांजर होते का? चांगला राजकारणी हा गुणग्राहक असतो आणि त्याला माहीत असते की समोरच्याचा (अगदी विरोधक असला तरी) गुणांचा उपयोग केला तर आपला फायदाच आहे... ते या दोघांना चांगले माहीत होते. अशी अजूनही उदाहरणे मिळू शकतील.

भाजपा हा खरच महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादीचा मित्र पक्ष आहे. ते सत्तापक्षावर बेफाम आरोप करतात पण एकही मंत्र्याला किंवा आमदाराला धक्क्याला लावत नाहीत.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Nitin-Gadkari-Vs-Anjali-Damania-in-Lok-Sabha-election/articleshow/27471582.cms "हम शरद पवारजीके चार काम करते हे" असे विधान भाजपचे एक 'वजनदार' नेते' गडकरींनी केले होते असा त्यांच्यावर आरोप करणाऱ्या दमानिया ह्या गडकरी विरुद्ध निवडणूक लढवणार ..

खाली दैनिक भास्कर मधील बातमीचा भाग देत आहे... आधी देखील म्हणले असल्याप्रमाणे कोणी एका भाजपा नेत्याने असे म्हणले असते तरी आश्चर्य वाटणार नाही. पण येथे जे काही खोटारडेपणा करत लिहीणे चालले आहे ते योग्य नाही. (मग ते कुणाविरुद्धही असुंदेत). अंजली या आर टी आय कार्यकर्त्या आहेत. त्यांनी म्हणले की मला असे विरोधी पक्षाच्या एका पार्टी अध्यक्षाने असे म्हणले. आता गडकरी म्हणतात की मी त्यांना भेटलोच नाही. तरी त्यांचा हट्ट चालूच आहे. कोण खरे आणि कोण खोटे हे केवळ पुराव्यानेच ठरू शकते. जसे तेजपालच्या बाबतीत सिद्ध झाले तसे. येथे जर एखाद्या चळवळीतील व्यक्ती विरुद्ध मताच्या व्यक्तीवर "आरोप" करत असली तर त्यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असू शकतो. त्यामुळे अंजली यांनी म्हणलेले ग्राह्य धरत अफवा पसरवण्याचे धंदे बंद करा...
अंजलि ने एक प्रेस कांफ्रेंस में कहा, 'जब हम विपक्ष की एक पार्टी के अध्यक्ष के पास गईं तो उन्होंने कहा कि शरद पवार से हमारे बेहतर रिश्ते हैं, उनके चार काम हम करते हैं और वो चार काम हमारे करते हैं इसलिए सीधे हम शरद पवार के खिलाफ नहीं आ सकते।' अंजलि ने प्रेस कांफ्रेंस में यह भी कहा कि वह संबंधित पार्टी अध्यक्ष का नाम इसलिए नहीं ले पाएंगी क्योंकि उनके पास बातचीत का कोई सबूत नहीं है। अंजलि ने अपने परिवार की जान को खतरे का डर भी जताया। हालांकि अंजलि के इस आरोप के बाद भाजपा अध्यक्ष नितिन गडकरी की ओर से कहा गया कि उन्होंने अंजलि से मुलाकात नहीं की है लेकिन अंजलि ने बाद में मीडिया से यह कहा कि नितिन गडकरी ने ही उनसे कहा था कि वो शरद पवार के खिलाफ मामला नहीं उठा पाएंगे। अंजलि यह साफ कर चुकी हैं उनके पास गडकरी से हुई बातचीत के सबूत नहीं है। वहीं गडकरी ने तो किसी भी तरह की मुलाकात तक से ही इंकार कर दिया है।